Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कन्सल्टंट चालू केली आहे. ३
कन्सल्टंट चालू केली आहे. ३ भाग झालेत. वीकेंडला संपवूच.
राशी खन्ना ला ऍक्टिंग येते हे
राशी खन्ना ला ऍक्टिंग येते हे बघून जरा धक्का बसला.
अदरवाईज तिचे तेलगू सिनेमातले रोल पाहून पूजा हेगडे, काजल अगरवाल, ह्यांच्या कॅटेगरीतच धरत होतो.
विजय सेतूपती यांचा super
विजय सेतूपती यांचा super deluxe पण छान आहे .
नेटफ्लिक्स वरची लिंकन लॉयर
नेटफ्लिक्स वरची लिंकन लॉयर (2022) हि सिरीज पाहून संपवली.
मनोरंजक आणि इझी वॉच आहे एवढं म्हणू शकतो. जास्त प्लॉट होल वगैरे विचार करायला गेला नाहीत तर आवडेल.
९६ कुठे बघावा? ओरिजिनल का
९६ कुठे बघावा? ओरिजिनल का डब्ड?
Submitted by अंजली_१२ on 1 March, 2023 - 11:11
YouTube वर आहे , डब केलेला .
अवश्य बघा !
काहीही म्हणा , पण हे South वाले लव्ह स्टोरी फुलवतात छान .
त्याचा पप्पू पासपोर्ट आणि सेथूपती हे मूव्ही पण छान आहेत .
पासपोर्ट काढण्यासाठी खोट्या लग्नाच्या उचापत्या छान दाखवल्या आहेत , कुठेही बोअर् होत नाही .
तर सेतूपती मध्ये त्याने कर्तव्यदक्ष पोलिस ऑफिसर चा रोल केला आहे . त्यात देखील मस्त भाव खावून जातो .
YouTube वर आहे , डब केलेला .
YouTube वर आहे , डब केलेला .
अवश्य बघा !>>>>>> ओके. थँक्यू!
फर्जी बघायला सुरुवात केली,
फर्जी बघायला सुरुवात केली, पहीला भाग बघितला. मला आवडणारा शाहीद एवढा कळकट, किती दिवस आंघोळ न केलेला का दाखवला आहे, त्याचा मित्र बरा वाटला. मला आवडणारा के के मेनन एवढा खप्पड, कीडकिडीत, सुरकुत्या चेहेऱ्यावर असलेला का बरं, श्या. कामं सर्वांनी छान केली आहेत. सेतुपती बघितला एकदाचा.
स्पॉयलर अलर्ट -----
डुप्लीकेट गोष्टीचे एवढं डिटेलिंग, सेन्सॉर अजूनही नाहीच का वेबसिरिजला. क्रांती पत्रिका हे दोघे लहान असल्यापासून खपत नसतेच, हे पैसे साठवून तरी कुठून देतात आणि ते इतके कुठे असतात की अमोल पालेकर अनेक जणांना पैसे उधार देऊ शकतो.
वेबसिरिजमधल्या शिव्यांचे काय
वेबसिरिजमधल्या शिव्यांचे काय करायचं, ऐकवत नाहीत. कधी येणार माहिती नसतं त्यामुळे सीन्स पुढे ढकलता येत नाहीत आणि सततच असतात. ही शाहिद साठी बघायला घेतली, त्यामुळे बघेनच म्हणा.
कंसल्टंट संपवली. सुरुवातीला
कंसल्टंट संपवली. सुरुवातीला वेगळी वाटलेली. गुंतायला झालं. शेवट येईपर्यंत रस निघुन गेला. भाग २ मधे काय असेल काय माहिती. असेल तरी का हीच शंका आहे. मी पाहीन असं वाटत नाही.
>>डुप्लीकेट गोष्टीचे एवढं
>>डुप्लीकेट गोष्टीचे एवढं डिटेलिंग, सेन्सॉर अजूनही नाहीच का वेबसिरिजला
प्राईमवर आजकाल बर्याच सिरिज चा x-ray सेक्शन असतो. या सिरिज चा ही आहे. त्यात त्यांनी सांगितलय कि नोटा बनवण्याच्या ८ स्टेप पैकी महत्वाच्या २ स्टेप्स सिरिज मध्ये दाखवल्या नाहिएत
आणि अगदी सगळ्या दाखवल्या तरी
आणि अगदी सगळ्या दाखवल्या तरी सगळ्या आपल्याला जमणारेत थोडंच
मला अजून कागद कात्रीने सरळ रेषेत कापणंही जमलेलं नाहीये.
सुनिधी , शेवट ढेपाळलाय.
सुनिधी , शेवट ढेपाळलाय.
त्यात त्यांनी सांगितलय कि
त्यात त्यांनी सांगितलय कि नोटा बनवण्याच्या ८ स्टेप पैकी महत्वाच्या २ स्टेप्स सिरिज मध्ये दाखवल्या नाहिएत >>> हा मग ठीक आहे, धन्यवाद.
तो एक्सरे सेक्शन शिव्या पास करतो मात्र.
आणि अगदी सगळ्या दाखवल्या तरी सगळ्या आपल्याला जमणारेत थोडंच >>> हाहाहा, आपल्याला जमणारही नाही आणि आपण पापभीरु लोकं. पण असे विचार असणारे आणि अमलात आणणारे असतील की.
प्राईमवर ‘ब्लॅकफिश’ नावाची एक
प्राईमवर ‘ब्लॅकफिश’ नावाची एक डोक्युमेन्ट्री पहात आहे. व्हेल माशावर. अजुन १५ मिनिटेच झालीत पाहून तरीही काटा आला. कल्पना होती पण त्यावर कधी खोलात विचार केला नव्हता. सीवर्ल्डमधे शामुला पाहून टाळ्याही वाजवल्यात, अचंबित व्हायला झालंय माणुस व एक बलाढ्य देहाचा किलर माशाची मैत्री पाहुन. माणसाचे कौतुकही वाटले. पण त्यामागे काय आहे याचा जास्त विचार केला नव्हता. ते आता कळतंय. पुर्ण झाली की सध्याची परिस्थिती कळेल.
नोटा बनवण्याच्या ८ स्टेप पैकी
नोटा बनवण्याच्या ८ स्टेप पैकी महत्वाच्या २ स्टेप्स सिरिज मध्ये दाखवल्या नाहिएत >>> मुद्दाम दाखविल्या नसतील. ते बघून लोक नोटा बनवायला शिकतील असे वाटले असेल त्यांना.
तो सेतुपती जास्त स्मोकींग अँड
तो सेतुपती जास्त स्मोकींग अँड ड्रीकींगसाठीच लक्षात रहातोय, स्टार्टींगला एक भारी अॅक्शन सीन होता तोच काय तो. कामं सर्वांनीच जबरदस्त केली आहेत पण शाहीद, फिरोज अति सहज करतात.
काउंटर्फिट नोट ओळखु नयेण्या
काउंटर्फिट नोट ओळखु नयेण्या इतपत बनवण्याची टॅलंट असणारा आर्टिस्ट मुर्खासारखा जोखीम पत्करुन डिलिवरी करतो यावरुन काय निष्कर्श काढायचा तो काढा. मायकलच्या कॅरेक्टरची वाट लावली आहे त्या अॅक्टरने. एकदम बकवास. अॅक्टिंगमधे सहजपणा येण्याकरता त्या कॅरेक्टरमधे घुसावं लागतं, याला धड डायलॉग डिलिवरी जमत नव्हती. शाहिद, केके, फिरोज, अनिस फिट झाले, बाकि आनंदि आनंद...
के के टीशर्टमध्ये भारी दिसतो.
के के टीशर्टमध्ये भारी दिसतो.
कनसल्टन्ट नुकतीच संपवली,
कनसल्टन्ट नुकतीच संपवली, चर्चा करायला आवडेल.
फर्जीच्या माझ्या पोस्टस
फर्जीच्या माझ्या पोस्टस स्पॉयलर अलर्टच असतील. पाच भाग बघून झाले.
सेतुपती एवढा ग्रेट वाटला नाही मला, काही सीन्समधेच आवडला, बरेचदा ओव्हरअॅक्टींग वाटली. त्यापेक्षा शेखर आवडला. बिलाल म्हणजे निलेश दिवेकर, कसला वेगळा दिसतो, यापुर्वी फार किडकिडीत बघितलेला, फार नव्हता आवडला, इथे भारी काम केलंय, बिलालबरोबरच्या हॉस्पिटलच्या सीनमधे सेतुपती आवडला.
नानु अॅडमिट असतात तो हॉस्पिटल सीनपण भारी होता, सर्वच छा गये. पालेकर, चाचु, सन्नी, केके. व्हाईट टीशर्टमधे शाहीद कसला दिसत होता. शाहीदने प्रत्येक सीन मस्त केलाय, फिरोज आणि काका त्याला पुरतं ओळखून असतात आणि त्यानेही ते सर्व बेअरिंग छान घेतलं आहे.
ते काका शाहीदला सुनावतात तो सीनही भारी होता, फर्जी नोटांचा बिझनेस करताना तोही फर्जी होत चाललाय.
मेघा काम छान करते पण कॅरॅक्टरवाईज पहील्या सीनमधे जेवढी इंप्रेसिव्ह वाटली तेवढीच नंतरच्या प्रत्येक सीनमधे थोडी माठ, अजुन जास्त माठ वाटत गेली. एवढ्याश्या कॉफीशॉपच्या ओळखीवर एवढा विश्वास, आता ती शाहीदच्या जाळ्यात अडकतेय की त्याला अडकवतेय, बघायला मजा येईल.
अनिसला काम कमी आहे पण त्यानेही फार सहज केलंय. इतकंच काय मनसूरकडच्या जमालनेही छान केलंय.
काकाच्या रोलमध्ये चित्तरंजन
काकाच्या रोलमध्ये चित्तरंजन गिरी, लेथ जोशी फेम आहेत. बाकी मराठी कलाकारही खूप आहेत. प्रियदर्शिनी इंदळकर (हास्यजत्रा फेम), निलेश दिवेकर, रुद्रममधला सदा (हाही मायकलचा रोल उत्तम करू शकला असता पण बिचारा अगदी काही मिनिटंच दिसतो), शी मधला पोलीस कॉन्स्टेबल इथेही त्याच रोलमध्ये आहे. शी मधला हेमंत इथेही खूप आवडला. मध्ये मध्ये बोर होतं पण एकंदरीत ठीकठाक. सेतूपतीची घटस्फोट न हवा असण्याची कळकळ पोहचत होती. स्वतःच्या मुलाला पावभाजी वगैरे खायला घालतो ते मस्त.
प्रियदर्शिनी म्हणजे आता
प्रियदर्शिनी म्हणजे आता फुलराणी रोल करणार आहे ती का. मराठी candidate chara आहे का तिचं. तिचं सिलेक्शन होतं ती का.
रुद्रममधला सदा >>> हा कोण होता.
काकाच्या रोलमध्ये चित्तरंजन गिरी, लेथ जोशी फेम आहेत >>> हा बघायचा आहे.
प्रियदर्शिनी म्हणजे आता
प्रियदर्शिनी म्हणजे आता फुलराणी रोल करणार आहे ती का. >>> हो. हास्यजत्रा मधे असते ती नेहमी.
चित्तरंजन गिरी आणि अश्विनी गिरी यांचे काही नाते आहे का?
प्रियदर्शिनी त्यांच्या
प्रियदर्शिनी त्यांच्या ऑफिसमध्ये स्वागतिका म्हणून सिलेक्ट होते. सदा म्हणजे शेवटी मॉलमध्ये मेघाबरोबर गाडीत असतो तो. रुद्रममध्ये छान काम केलं होतं त्याने. मुलगी झाली हो मध्ये किरण मानेच्या रोलमध्ये आला होता.
आज सहा भाग संपवले. स्पॉयलर
आज सहा भाग संपवले. स्पॉयलर असतील.
पोलिसांना फोनला ट्रॅकर लावलेला समजत नाही का. मेघाचा फोन हाताळून फक्त संदीप कोण विचारतो मायकल.
प्रियदर्शिनी त्यांच्या ऑफिसमध्ये स्वागतिका म्हणून सिलेक्ट होते. >>> तीच असेल वाटलेलं. मी हास्यजत्रा बघत नाही पण फुलराणीचे गाणं बघितलं होतं.
काकाच्या रोलमध्ये चित्तरंजन
काकाच्या रोलमध्ये चित्तरंजन गिरी, लेथ जोशी फेम आहेत >>> हां, तरीच चेहरा ओळखीचा वाटत होता.
आधी मला तो कहानी सिनेमातला विद्या बालनला मदत करणारा बंगाली इन्स्पेक्टर आहे की काय वाटलं. पण त्या इन्स्पेक्टर कलाकाराची उंची जास्त आहे.
बघितली कन्संल्टंट.
बघितली कन्संल्टंट.
असो. यात स्पॉयलर नाही काही, स्पॉयलर सह बोलायचं असेल तर वेगळा धागा काढतो. हवा असेल तर.
मेह्ह फीलिंग आलं. 'आम्ही चालवू हा पुढे वारसा' इतकंच दाखवायचं होतं तर इतका सगळा डार्क ह्युमर इ. दाखवुन केलं काय??? आणि काचांवरुन वजनाने पडणे गेम साठी हा सगळा अट्टाहास आणि त्याची बॅक स्टोरी दाखवायला इतके कष्ट!
फर्जी सात भाग बघुन झाले,
फर्जी सात भाग बघुन झाले, शेवटचा नवऱ्याबरोबर बघेन कदाचित, कारण आमच्या वेळा जमत नसल्याने मी एकटीनेच बघितली सिरिज, शेवटी कदाचित सार असेल मग त्याला पूर्ण बघायची गरज नाही.
मायकेल आणि त्याची बायको यांचा सातव्या भागातला शेवटचा सीन फार ज्येन्यूईन वाटला, दोघेही आपापल्या जागी योग्य वाटले. मायकेलच्या बाबतील व्यसने जास्त हायलाईट करणे ही या सिरिजमधली चुक वाटते मला, खरंतर तो फार हुशार आहे, मंत्र्याला प्रत्येकवेळी कोंडीत छान पकडतो पण ऑफिसमधले आणि मिशनमधले सीन्स सोडले तर तो दारुत डुबलेला आणि फुकडयाच वाटतो.
गोडबोलेबाई मला कधीच आवडत नाही पण कोर्टात आवडली, केसच्या वेळी.
मेघाला कुठेतरी बघितलं आहे का वाटतंय, as a chara मेघा मनातून उतरत जाते, मिशनमध्ये पटकन कोणावर विश्वास ठेवणं हे धोकादायक नाही का.
बाय द वे झाकिर हुसैन (तो
बाय द वे झाकिर हुसैन (तो मंत्री गेहलोट) चा रोल एकदम मस्त आहे. हे मंत्री वगैरे लोक, त्यांच्या राजकीय गरजा, भ्रष्टाचार वगैरे सहसा एकदम टोकाच्या दाखवतात. हा जास्त रिअल वाटतो. जनरली चांगले काम करतो हा. "सरकार" मधे होता आणि बहुधा "मदारी" मधेही. सिद्धार्थ मल्होत्राच्या त्या स्पाय पिक्चरमधेही होता.
यातली स्वेटलाना एकदम अतरंगी दिसत आहे. तिला पुढच्या सीझन मधे जरा फुटेज द्यायला हवे.
'आम्ही चालवू हा पुढे वारसा'
'आम्ही चालवू हा पुढे वारसा' >>>
हे राहिले आधी वाचताना
Pages