वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लस्ट स्टोरीज २ पाहिली, ओव्हरहाइप्ड आहे !
एक कोंकणानी डिरेक्ट केलेली गोष्ट आणि दोन्ही अ‍भिनेत्री ( तिलोत्तमा, अमृता सुभष) फक्तं चांगले आहेत !
तिलोत्तमाचे प्रमोशन झालाय, तिला 'सर' मधे मेड म्हणून पाहिलं इथे ती मालकिण आणि अमृता सुभाष मेड आहे Happy
तमन्ना भाटिया आणि विजयराजची गोष्ट तर हस्यास्पद आहे , डिरेक्टरचा फोकस फक्तं तमन्नाचे क्लिव्हेज असताना स्टोरीत नक्की ससपेन्स वगैरे टाकायची काय गरज होती, तेही इतकं विनोदी ससपेन्स कशाला Proud

काजोलच्या गोष्टी बद्दल स्पॉयलर्स :
अ‍ॅब्युजिव रंगेल नवर्‍याचा सूड म्हणून एचाअयव्ही पिडित वेश्या घरी कामवाली म्हणून आणते, कित्ती किडिश कन्सेप्ट आहे Uhoh
तो नवरा एचायव्ही पिडीत झाला तर तिला स्वतःलाही धोका आहेच कि, रोज तिच्यावरही रेप करत असतो तो !
अर्थात जे होते ते वेगळेच पण लॉजिकच गंडलय !

आज 'दहाड' बघून संपवली. मस्त आहे. आवडली! सगळ्यांची कामं चांगली झाली आहेत. व्यक्तिरेखा उत्तम, पटण्यासारख्या उभ्या केलेल्या आहेत. शेवट मला तरी गुंडाळल्यासारखा नाही वाटला.
नुसती सीरियल किलरची गोष्ट न दाखवता त्या गोष्टीच्या अनुषंगाने समाजातल्या प्रश्नांच्या विविध पैलूंना स्पर्श केलाय, तेही आवडलं.

नाईट मॅनेजर २ कोणी पाहिली का? हो. कथेचा वेग भन्नाट आहे. पण बरेच लूपहोल्स आहेत. शेवट प्रेडिक्टेबल आहे. माझा फोकस फक्त आदित्य रॉय कपूर वर असल्याने बाकी गोष्टी इग्नोर केल्या. Happy

नाईट मॅनेजर २ कोणी पाहिली का? >>>
मूळ पुस्तक वाचले असल्याने आणि ओरीजिनल सिरीज हि पहिली असल्याने (टॉम हिडलस्टोन, ह्यू लॉरी वाली) हा रिमेक बघण्यात काही इंटरेस्ट नव्हता.

तसेही हॉटस्टार वाले ओरीजिनल ब्रिटीश/अमेरिकन सिरीज चे वाईट रिमेक काढतात असे प्रांजळ मत आहे.

Night manager हिंदी remake सिजन 1 पाहिला होता
तो मध्येच सोडल्याने मग इंग्रजी संपूर्ण सिजन पाहिला.
पुढे काय होतं हे माहीत असल्याने उरलेला हिंदी सिजन बघेनच असे नाही. अर्थात अनिल कपूरने character चांगले पकडले आहे हे मत अजूनही आहे.

असुर २ बघितली, आवडली. अर्थात ट्रिपल लेयर encryptions अशी बसल्या बसल्या तोडणारी बाई अतिरंजित वाटले (तो पुरुष असता तरी अतिरंजित वाटलेच असते) फक्त work nodes दिवाळीच्या लायटिंग सारखे न दाखवता जरा नीट दाखवले ते समाधान.

फॉरेन्सिक procedures उत्तम हाताळल्या आहेत. कन्सेप्ट प्रचंड इंटरेस्टिंग वाटली. Spoiler देण्याची ईच्छा कशीबशी आवरतोय.

मीही अगदीच वेळ जात नव्हता तेव्हा असुर २ पाहिली. पहिल्या सीझन पेक्षाही अ. आणि अ. होती. टू मेनी लॉजिकल एरर्स!
अर्थात ट्रिपल लेयर encryptions अशी बसल्या बसल्या तोडणारी बाई अतिरंजित वाटले >>>> हे काहीच नाही असे अजून खूप आहेत. Happy
त्यांच्याकडे कन्सेप्ट इन्टरेस्टिंग होती पण एक्झिक्यूशन गंडले. मला निखिल चे कास्टिंग अजिबात आवडले नाही. कसला रड्या वाटतो तो. आणि बोलतोही तसाच. अमेय वाघ, अर्शद वारसी बरे वाटले.
लस्ट स्टोरीज २ - मोस्टली बोरिंग. नीना गुप्ता वाली स्टोरी सर्वात बोअर. मला कोंकोनाची पण ठीक आहे टाइप्स वाटली, काहीच विशेष उल्लेखनीय नाही.
विजय वर्मा च्या कथेत जी स्टोरी आयडिआ होती ( मला पहिल्या काही मिनिटात काय ते लक्षात आलेच Happy ) त्यात लस्ट स्टोरीज म्हणावे असे काहीच नव्हते. म्हणून बळेच १-२ सीन घातलेत.
काजोल च्या गोष्टीत तिच्या पहिल्याच वाक्याला तिचा आवाज ऐकून पत्र्यावर ओरखडा उठावा तसे इरिटेटिंग वाटते . तिलाच घ्यावे असे त्या रोल मधे काही नव्हते. जो काही कथेचा जर्म आहे तो ठीकठाक आहे पण तरी डीजे म्हणली तसे लॉजिकल झोल आहेच.

नाईट मॅनेजरचा सिझन २ नाहि, उरलेले ३ एपिसोड्स आले आहेत. मूळ इंग्रजी वेब्सिरीज पण ७ भागात आहे, आणि हे हिंदी अ‍ॅडाप्शन फ्रेम-टु-फ्रेम कॉपी आहे. फिल्ममेकिंग मधे आलेली टेक्नालजी म्हणा किंवा दिग्दर्शकाचं कौशल्य, हिंदी सिरीज माझ्यामते सरस आहे...

अ‍ॅपलटिवी वर टॉम हॉलंडची द क्राउडेड रूम वेबसिरिज चालू आहे. कौंटुंबिक परिस्थितीमुळे भरकटलेला तरुण; इंटरनॅशनल एस्पियनाज या पार्श्वभूमीवर कथानक आहे. फर्स्ट २-३ एपिज आर स्लो, बट इट टेक्स ऑफ फ्रॉम फोर्थ...

The Sinner पाहिली . कशी काय miss झाली नाही माहीत. खूपच भारी आहे . ४ सिझन आहेत. २ binge watch केले. suspense खूप मस्त आहे,

सिटी ऑफ ड्रीम्स कशा वर पाहता आहात लोक्स?>> Disney Hotstar वर. १ला सिझन ठीक, दुसरा पण बघणेबल पण तिसरा महा बोअरींग आहे. कसे बसे दोन भाग बघीतले. पुढे बघायची हिम्मत नाही Happy

मिसेस मेजल सी १ बघायला सुरूवात केली आहे.. चांगली वाटत आहे..काही काही क्लिशे गोष्टी आहेत पण खटकत नाहित.

जुबिली संपवली.. मस्त खूप आवडली..नेहमीच्यांची कामं चांगलीच पण जय खन्ना, निलोफर (वामिका) आणि जय च्या प्रेमात असलेली साधीशी गोड फेस ची नटी पण छान ..सरप्राईस पॅकेज मिळाले. शेवट अशक्य रडा आणि निराश घेतलाय..

नाइट मॅनेजर बघून संपवली. मला आवडली. मूळ इन्ग्रजी सीरीज मी मधे एकदा बघायला घेतली होती पण माझ्या मते हिंदी सीरीज जास्त ग्रिपिंग आणि वेल मेड आहे!
शेलीचे कॅरेक्टर मस्त बिल्ड केलेय, टिपिकल रुथलेस, क्रूर, क्रीपी छाप व्हिलन न दाखवता थंड डोक्याने काम करणारा, जरासा मिष्किल , स्मार्ट असा शेली आवडला.
अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, सोबिता धुलिपाला यांची कामे आवडली, आणि सर्वात विशेष उल्लेखनीय म्हणजे लिपिकाच्या रोल मधली तिलोत्तमा शोम!! तो रोल मस्त आहे आणि तिलोत्तमाने मस्त केलाय!

मॅनिफेस्ट
शेवटचा भाग बघून संपविला. शेवटी अगदीच तुटेपर्यंत कथानक ताण ताण ताणून च्युईंग गम झालं. ना धड चव ना पोट भरल्याची भावना. एक कथानक आणि अनेक उपकथानक, अनेक वेगवेगळे सिद्धांत यांचा गुंता सोडवता सोडवता दिग्दर्शक शेवटी साडेपाच वर्ष हरवलेले विमान परत मूळ काळवेळात आणून ठेवतो.

लस्ट स्टोरीज
अतिशय भंपक आणि अतिरंजित, त्यातल्या त्यात आर. बाल्कीचा कथानक ठीकठाक, नीना गुप्ताने चांगला अभिनय केलाय. कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित कथा अतिशय सामान्य आहे. बाकीच्या दोन कथा तर विनाकारण घुसडल्या आहेत. इच्छुकांनी त्यापेक्षा अल्ट बालाजी बघावे.

विचर
नवीन काही भाग आले आहेत, हळूहळू पकड घेत आहे.

बरेच आधी नेटफ्लिक्सवर Indian Predator नावाची मालिका आहे. त्यातील Beast of Bangalore आणि Indian Predator: Murder In A Courtroom बघितल्या, काही दिवस अस्वस्थ झालो. त्यावर सविस्तर धागा काढण्याचा विचार आहे.

हाऊस ऑफ द ड्रॅगनच्या प्रतिक्षेत

स्कूल स्पिरिट्स

स्कूल स्पिरिट्स बघायला घेतली, एक शाळेतली मुलगी तिच्या शाळेतच मरते, पण तिचा खून झाला असतो, तिचा खुनी कोण आहे? हे तिला आठवत नसतं, पण तिचा आत्मा शाळेतच राहतो, कारण मुक्ती मिळत नाही. मग त्याच शाळेत तिला इतर आत्मे भेटतात, त्यांचे खून, सुसाईड वगैरे झालेले असतात. तिथे तिच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते, छान आहे सिरीज.

मला निखिल चे कास्टिंग अजिबात आवडले नाही. कसला रड्या वाटतो तो.

मला तर निखिल नायर ओरिजिनल कल्की वाटतो राव, त्याचे काहीच बॅकग्राऊंड दिसत नाहीये....

कल्की की शुभ ?

मला पण एका मित्राने हीच शंका बोलून दाखवली.

Pages