वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनटचेबल्स.. आता मागच्या आठवड्यात बघून पूर्ण केली.. पहिला भाग युट्यूब वर बघितला आणि पुढचे भाग तिथे नाहीच.. चुटपुट लागली पुढचे भाग बघण्यासाठी.. कळालं की पुढचे भाग VB on the Web ह्या app वर 18 रू भरून बघता येतील.. मग काय अॅप डाऊनलोड करुन, पैसे भरुन पुढील सगळे भाग बघितले.. सस्पेन्स एवढा काही टिकवता आला नाही त्यांना कारण खुनी कोण हे आपल्याला सहज ओळखता येतं.. आणि नेहमीप्रमाणे न पटण्याऱ्या गोष्टी आहेतच.. एक एवढी हूशार डॉक्टर असलेली मुलगी पैशांसाठी असं काम करेल हेच मुळात पटत नाही.. पण कोर्टातील सादरीकरण आणि सगळेच संवाद खूप छान आहेत.. विशेषतः वकील झालेल्या विक्रम भट्टचे आणि नताशाचे. दोघांचे कामही छान झाले आहे.
विक्रम भट्ट वेबसीरीज दिग्दर्शन करता करता ह्या सिरीज मधून अभिनय क्षेत्रात ही उतरले..!

मी सगळ्यात पहिली पाहिलेली वेबसिरीज बहुतेक TVF पीचर्सची "तू बीअर है"...... Startup सारखा विषय, आपल्या आजुबाजूची बघण्यातली कॅरेक्टर्स आणि सगळ्यांचा एकदम नॅचरल अभिनय..... फारच आवडलेली बीअर!

क्रिकेट आणि त्यातल्या त्यात आयपीएल च्या चाहत्यांनी amazon prime वरची Inside Edge नक्की बघा.... मी फक्त चार दिवसात बघून फस्त केली ही सिरीज!

ट्विस्टेड - मला खुप आवडली होती
मस्तेय
चुटपुट लागली पुढचे भाग बघण्यासाठी.. कळालं की पुढचे भाग VB on the Web ह्या app वर 18 रू भरून बघता येतील.. मग काय अॅप डाऊनलोड करुन, पैसे भरुन पुढील सगळे भाग बघितले.. >>>> यु ट्युबवर येतात काही दिवसांनी, मी सगळे एपी आल्यावरच बघते, उगा अर्धवट कशाला बघायचे ना

वाह छान धागा.
फिल्म फेस्टला एकदा अंधेरीला गेलो होतो त्यावेळी या वेब सिरिजबद्दल माहिती मिळाली. तिथे ट्रीपलिंगचे अ‍ॅक्टर्स आले होते. खुप काही बोलत होते. मग एकदा सहज यूट्युबवर ट्रिपलिंग सर्च केली. बघितली. मस्त वाटली. त्यानंतर, हिंदीपासून ते इंग्रजीपर्यंत अनेक वेबसिरिज पाहिल्या.
त्यातल्या त्यात परमनंट रुममेट, च्युक्यागिरी, आणि टीव्ही सिरिजमधली यंगर आणि गर्ल इन द सिटी- (दोन्ही सिजन) चांगल्या वाटल्या

'ब्लॅक काॅफी' मधे काय आहे? हिरो लेखक असतो ती?

मला 'girliyapa' च्या या सिरिज आवड्ल्या. टिपी आहेत.
https://www.youtube.com/watch?v=lzI9ilVNzno
https://www.youtube.com/watch?v=NXcGCGGtJI0
https://www.youtube.com/watch?v=mHOVIyffPlw
https://www.youtube.com/watch?v=eeGzDo_EPxc

माझी सगळ्यात आवडती...... all time favourite is "SIT: Shitty Ideas Trending"

रोजचे छोटे छोटे प्रसंग आणि सहजसुंदर अभिनय!

धागाकर्त्यास विनंती- या प्रतिसादातल्या लिंक्स वर हेड्रात घ्या म्हणजे सगळ्या शॉफीज एकाठिकाणी मिळतील...

मूव्हींग आऊट वेब्सिरीज चा पहिला भाग बघताना परत नाव चेक केले नक्की मराठीच आहे ना? फारच बोल्ड वाटतेय.

सर्वांना धन्यवाद. कारण बर्याच वेबसीरीज बद्दल माहिती मिळाली.. वेळ मिळेल तसं बघेन. Happy
@ VB, यु ट्युबवर येतात काही दिवसांनी तोपर्यंत धीर नव्हता ना.. काही काही वेब सीरीज फक्त ठराविक चॅनेल वरच असतात..! जसं की ALT BALAJI, AMAZON PRIME.. त्या पेसे भरुनच बघाव्या लागतात.. त्यामुळे त्या नाही बघितल्या..

'ब्लॅक काॅफी' मधे काय आहे? हिरो लेखक असतो ती? हो.

ब्लॅक काॅफी' मधे काय आहे? हिरो लेखक असतो ती? हो...
मला कै च्या कै वाट्ली. तो तिला वाप्रून घेतो स्वतःच्या पुस्तकासाठी. ठिक आहे. पण कुठला CA अशी होमसर्विस देतो? पार बेडरूमपर्यंत जाऊन डॉक्युमेंट्सची देवाण-घेवाण.
ती मोलकरीण कसली हाय-फाय होती पण तिच जरा बरी वाटली.

मराठी : कोरी पाटी प्रॉडक्ष्नसः गावाकडच्या गोष्टी:
गावाकडच्या लोकांनी एकत्र येऊन सुरु केलेली वेब सेरिज. एक स्तुत्य प्रयत्न.
अल्पावधीतच लोकप्रियता मिळाल्याने परदेशागमनाची तयारी.

https://www.youtube.com/channel/UChJBjEipru2hvTq1pgi24Pg

Moving out - अभीज्ञा भावे , छान आहे...(मराठी)
Girl in the city - मिथिला पालकर ( हिंदी ) ,ही पण चांगली आहे
मोना सिंग ची पण कुठली तरी आहे हिंदी मधे ती पण चांगली आहे असं ऐकलंय..

मराठी : कोरी पाटी प्रॉडक्ष्नसः गावाकडच्या गोष्टी:
गावाकडच्या लोकांनी एकत्र येऊन सुरु केलेली वेब सेरिज. एक स्तुत्य प्रयत्न.>>>>>
सुर्वातीला वाजनारे बासुरि चे स्वर खुपच छान

<मोना सिंग ची पण कुठली तरी आहे हिंदी मधे ती पण चांगली आहे असं ऐकलंय..>
टिव्हीएफची ये मेरी फॅमिली..
जरूर पहा.

जिओसिनेमा आणि आल्ट बालाजी या दोन स्ट्रीमिंग पोर्टल्सवरची द टेस्ट केस ही मालिका पाहण्यासारखी आहे. लंचबॉक्स या सिनेमामुळे गाजलेल्या निम्रत कौर या अभिनेत्रीची दमदार भूमिका आणि घट्ट पटकथा या बाबी खिळवून ठेवतात. मनोरंजन म्हणूनच पहाव्यात.

अरे सेक्रेड गेम्सची कुणी आठवणही काढत नाही?
नग्न दृश्ये, कुकुचा ट्रॅक आणि राधिका आपटे सोडता, इतकी पकड घेणारी सिरीज मी अजून बघितली नाही!
गायतोंडेच ट्रान्सफॉर्मेशन, सरताजमध्ये होणारा बदल आणि जितेंद्र जोशींचा काटेकर, मस्ट वॉच!
म्युजिकही छान जमलंय! मध्येच वेस्टर्न फिल्मसारखं म्युजिक छान वाटतं. टायटलही छान आहे!

अल्ट बालाजीवर "अपहरण" नावाची वेब सिरीज आहे, जब्राट ए. भाग छोटे आहेत, ट्विस्ट भारी आहेत. सवांद मजेशीर आहेत, मुख्य म्हणजे शिव्यांचा अतिरेक नाही, मला तर आवडली, मस्ट वॉच.

अल्ट बालाजीवर "अपहरण" नावाची वेब सिरीज आहे>>>>>>> हे कुठे बघायला मिळेल? युट्युबवर आहे का? की त्यांचे वेगळे चॅनल आहे?

सेक्रेड गेम्स लागोपाठ दोनदा बघितलं. आता पुढच्या सिझनची वाट बघणं चालू आहे. मिर्झापूर मात्र एकच एपिसोड बघितला न बघितला.
वरच्या वेबसिरीज भारताबाहेर बघता येतील का?

सध्या smoke बघतेय. गोव्यातले drug mafias , त्यांचे शह,काटशह, प्रेमप्रकरण , पोलीस , राजकारणी ई.ई. . बर्यापैकी gripping आहे.
Tom alter ला बघून एकदम nostalgic झालं. त्याचा मोशे बराक फार आवडला. Body language , accent . त्या नंतर Roy (जीम सर्भ). आणि एसीपी परेरा.
बाकी भरमसाट शिव्या , sex scenes,हाणामारी आहेच.पण SGames सारखे अंगावर येत नाही.

6 episodes झाले बघून, ही संपली की अपहरणकडे वळते.

वेब मालिकांचा हा वेगळा धागा आज दिसला. म्हणून अन्य धाग्यावरील माझा प्र इथे डकवतो:
************
गेले ६ महिने NF वरची Breaking Bad बघत होतो. सावकाश रवंथ करीत पहिली. अमेरिकी कौटुंबिक व समाजजीवनाचे सुरेख दर्शन जवळून झाले. मात्र ड्रग माफियांचा हिंसाचार बघायला नकोसा वाटला.
मालिकेच्या शेवटून तिसऱ्या भागात Hank ला मारून टाकले त्याचे मला दुःख झाले ! मला तो खूप आवडला या मालिकेत; अगदी Walter पेक्षाही. गोल गुटगुटीत !

Pages