Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Cricket is a game of.. and
Cricket is a game of.. and Supriyo is a real gentleman..

आणि हो, बिहारी नाय रे विहारी आहे ते बाबुल
आइ
आपली मुलं गेलीं जरा जेवायला बाहेर आंणि बोललीं कुणाशी, तर एवढी बोंबाबोंब ! मग आज आपल्या फलंदाजांच्या एवढ्या जवळच कशाला मुद्दाम अख्खा दिवस उभे होते हो ते सगळे ऑसीज !!!
जबरी मॅच! पंत होता तोपर्यंत
जबरी मॅच! पंत होता तोपर्यंत जिंकायचा चान्स होता. पंत जेव्हा ८० वर पोहोचला तेव्हापासून त्याची बॉडी लँग्वेज बदलली. तो रेस्टलेस वाटत होता. पुजाराने त्याला "बिग पिक्चर" दाखवले का माहीत नाही. एखाद्याला पाणी वगैरे घेउन टीम मॅनेजमेण्टनेही पाठवायला हवे होते. एकदम घाईत आल्यासारखा खेळत होता पंत. त्याचे शतक हुकल्याचे वाईट वाटले पण तो टिकला असता तर जिंकलोही असतो.
पुजारा आउट झाला तो बॉल खतरनाक होता.
चौथी मॅच खेळणार आहेत का नाही याबद्दल गेले काही दिवस वाद सुरू होता. पण काल वाचले की खेळणार म्हणून.
जडेजा पॅव्हिलियन मधे पॅड बांधून बसलेला असणे हे जबरी जेश्चर होते. रिस्पेक्ट.
सलाम आपल्या पोरांना !!
सलाम आपल्या पोरांना !!
' बाॅडी लाईन ' म्हणण्या इतपत आंखूड टप्पयाची ' मिडल-लेग स्टंप ' गोलंदाजी केली ऑसी तेज गेलंदाजांनी ! >> +१ ऑसी स्लेजिंग राहिले भाऊ त्यात. विहारी नि अश्विन एकदम तुटलेला जबडा घेऊन खेळणार्या कुंबळे ची आठवण करून गेले. काय ती जिगर ! जाडेजा चे पण कौतुक करायला हवे. अश ने पेन ला दिलेला जवाब जबरदस्त होता.
भारताबाहेर खेळताना पंत च्या नावाखाली सर्कल डिफॉल्ट झाले पाहिजे निदान ह्या वर्षासाठीतरी अशी इनिंग खेळून गेलाय. चौथ्या इनिंगमधे अशी तिसरी इनिंग त्याची मला आठवते त्याप्रमाणे.
चौथ्या टेस्टसाठी जडेजा बाहेर, कदाचित अश्विनि पण बाहेर. परत बाऊंसी पिच असल्यामूळे कुलदीप कामाला येऊ शकतो. जाडेजाच्या जागी ठाकूर नि विहारी ची जागा मयांक ला देऊन अॅडजेस्ट्मेंत कराव्या लागणार असे दिसतेय.
रोहित आणि गिल ने चांगली
रोहित आणि गिल ने चांगली ओपनिंग दिली..... पंत ने अफलातून खेळत ऑस्ट्रेलियन बॉलर्सना बॅकफूटवर नेले.... मॅच वाचवायच्या प्रेशरखाली जी फलंदाजी कोषात गेली असती ते प्रेशर पंतने बरेच कमी केले..... आणि उरलेली कामगिरी पुजारा, विहारी आणि आश्विन यांनी चोख पार पाडली.... रहाणे आज चालला नाही पण एकूण तो कप्तानी चांगली करतोय..... खेळाडू जास्त मोकळेपणाने खेळतायत असे जाणवतेय..... एकूण पूर्णतः सांघिक खेळ
पुढच्या मॅचला अश्विन, जडेजा दोघेही नसतील तर आपले शेपूट जरा जास्तच लांब होईल.
कोहलीला कन्यारत्न झाले असे ऐकले..... त्याचेही अभिनंदन!
राहुल द्रविडला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!
जबरदस्त मॅच! आश्विन, विहारी,
जबरदस्त मॅच! आश्विन, विहारी, पंत, पुजारा, जडेजा, बुमरा आणि सगळ्यांनाच मनापासून सॅल्युट!
खेळाडू जास्त मोकळेपणाने
खेळाडू जास्त मोकळेपणाने खेळतायत असे जाणवतेय..... एकूण पूर्णतः सांघिक खेळ >>> अगदी असंच वाटलं.
कमाल!!! अविश्वसनीय!!! काल
कमाल!!! अविश्वसनीय!!! काल रात्री जागून पाहिलेल्या मॅच ने अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं. अनेक वर्षांपूर्वी रात्रभर जागून पाहिलेल्या अशाच त्या इडन गार्डन च्या मॅच च्या आठवणी जिवंत झाल्या. भारतीय संघाला, त्यांच्या लढण्याच्या जिगरीला, त्यांच्या विजिगीषू वृत्तीला त्रिवार सलाम!!
सादर कुर्निसात!!
परवा ऑस्ट्रेलियाने भारताला ४०७ चं लक्ष्य देताना चार पूर्ण सेशन्स खेळायला दिले तेव्हाच मनातला आशावादी कोपरा सुखावला होता. भरपूर वेळ होता. थोडासा अहंकार पण दुखावला होता की ऑस्ट्रेलिया ने भारतीय जायबंदी फलंदाजीला आणी स्वतःच्या अभेद्य गोलंदाजीला गृहीत धरलं होतं. तेव्हाच कुठेतरी नियती मनात हसली असावी.
चौथ्या दिवस अखेर २ गडी बाद ९८ धावा. चौथ्या डावात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना एकदा सेट झाल्यावर बॅट्समन ने अर्धशतकात समाधान मानायचं नसतं आणी स्कोअरिंग च्या संधी शोधताना मोठ्या इनिंग ची संधी हुकवायची नसते हे शुभमन गिल ने लवकरात लवकर विराट कोहलीकडून शिकावं. रोहितकडून सुद्धा मुंबई ब्रँड च्या 'खडूस' क्रिकेट ची अपेक्षा होती पण तो दिवस संपता संपता षटकाराच्या मोहात फसला. जडेजा जायबंदी, पंत चं खेळणं अनिश्चित आणी २ सेट बॅट्समेन आऊट होऊन परतलेले. आता सगळं रहाणे-पुजारा जोडीवर अवलंबून होतं. हे किती तग धरतात कुणास ठाऊक!
पाचवा दिवस प्रथमग्रासे मक्षिकापातः म्हणावा तसा रहाणे च्या विकेट ने सुरू झाला आणी 'जाऊ दे, नको बघायला मॅच, फार त्रास होईल' असा विचार करत होतो. पण जित्याची खोड असल्यामुळे टीव्हीसमोरून हाललो नाही. आणी टीम मॅनेजमेंट ने पहिला मास्टर स्ट्रोक खेळला. पंत बॅटींग ला उतरला. भारतीय संघानं रणशिंगच फुंकलं. एक खणखणीत संदेश होता ऑसीज ना - 'आम्ही मॅच जिंकण्यासाठी खेळतोय. तुम्ही ठरवा काय करायचं ते, अडवू शकत असला, तर प्रयत्न करा' - लाऊड अँड क्लियर!!! पुढचे दोन-एक तास पंत ने अक्षरशः धुमाकूळ घातला. सिडने च्या मैदानावर चौथ्या डावात नॅथन लायन हे ऑस्ट्रेलियाचं सगळ्यात मोठं शस्त्र असणार होतं, पण पंत च्या बॅटने त्याला पार बोथट करून टाकलं. सकाळपासून 'ऑस्ट्रेलिया ला जिंकायला किती बळी हवे आहेत' हे दाखवणारे धावफलक, आता 'भारताला जिंकायला किती धावा हव्या आहेत' ते दाखवत होते. शतकाच्या उंबरठ्यावर असताना घात झाला. पंत च्या हातात बॅट फिरली आणी एक 'वेल-डिझर्व्ड' शतक थोडक्यात हुकलं. पण ऋषभ पंत च्या कारकिर्दीत तो ह्यापुढे जितकी शतकं मारेल, त्या सगळ्यांच्या बरोबरीनं, हे हुकलेलं शतक मानानं मिरवेल.
ऑसीज ने सुटकेचा नि:श्वास टाकत त्यांच्या बॉलिंगमधल्या हुकूमी एक्क्याला - पॅट कमिन्स ला बॉल सोपवला. आता समोर भक्कम बचाव करणारा पुजारा होता. तान्हाजी धारातिर्थी पडल्यावर ज्या त्वेषानं शेलारमामानं समशेर चालवली होती त्या त्वेषानं आता पुजारानं कमिन्स वर हल्ला चढवला आणी त्याला लागोपाठ तीन चौकार खेचले. हा प्रतिहल्ला ऑसीजसाठी अगदीच अनपेक्षित होता. पण इतकी सरळसोट पटकथा नियतीला नामंजूर होती. लायन च्या चेंडूवर एक चोरटी धाव घेत असताना हनुमा विहारी चा मांडीचा स्नायू दुखावला आणी काही कळायच्या आतच जॉश हेझलवूड चा एक चेंडू अगदी शेवटच्या क्षणी हलकासा स्विंग झाला आणी पुजारा च्या ऑफ-स्टंप चा वेध घेऊन गेला. अजून चहापानाला एक तास शिल्लक होता. अश्विन-विहारी जोडी मैदानात होती. त्यापैकी विहारी जायबंदी आणी अश्विन च्या नावावर जरी कसोटी शतकं असली तरी इतक्या कठीण परिस्थितीत त्याच्याकडून कसलेली फलंदाजी त्याच्या निस्सीम चाहत्यांनी सुद्धा अपेक्षिलेली नव्हती. अजून ४० हून अधिक षटकं शिल्लक होती. ऑस्ट्रेलिया ला विजय खुणावत होता, भारतीय चाहते चुटपुटत होते आणी नियती अजूनही हसत होती.
त्यानंतर जे घडलं ते केवळ अविस्मरणीय होतं. चहापानानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज आखूड टप्प्याचा, शरीरवेधी मारा करत होते आणी ते वेगवान चेंडू जमतील तसे चुकवत, खेळत आणी अंगावर घाव झेलत अश्विन आणी विहारी खंबीरपणे उभे होते. रॉक-सॉलिड!! त्या उसळत्या चेंडूंच्या बरोबरीनं ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांचे वाग्बाण झेलत आणी परत टोलवत दमलेली, जायबंदी झालेली ही भारतीय फलंदाजांची जोडी भारतीय संघाची अब्रू राखत, पराभवाच्या आणी भारतीय संघाच्या मधे धीरोदात्तपणे उभी होती. धावांचा हिशोब आता कुणीच करत नव्हतं. आता हिशोब होता तो उरलेल्या चेंडूंचा आणी मिनिटांचा. आंध्र प्रदेश चा विहारी आणी तमिळनाडू चा अश्विन असे झुंजत असताना भारतीय वंशाची, पण जन्मानं आणी कर्मानं ब्रिटीश असणारी इशा गुहा कॉमेंट्री करताना म्हणाली की 'सगळा दक्षिण भारत ह्या दोघांना अशी फलंदाजी करताना पहायला टीव्हीसमोर एकवटला असेल.' भारतीय वंशाची असूनही तू भारतीयत्वाला ओळखलंच नाहीस इशा!! त्या दोघांना लढताना पहायला, त्यांच्यामागे शुभेच्छांचं आणी प्रार्थनेचं बळ उभं करायला 'सगळा भारत' उभा राहिला होता.
अखेर भारतानं सामना अनिर्णीत राखला. शेन वॉर्न म्हणाला तसं क्रिकेट न कळणार्या माणसाला पाच दिवस खेळूनही सामन्यात विजयी कोण हे ठरलंच नाही हे समजावून सांगणं अशक्य आहे. पण ती चुरस, त्या फारशा धावा न काढता खेळून काढलेल्या ओव्हर्स, तो पराभवाच्या जबड्यातून, पोटापर्यंत पोहोचलेला सामना अनिर्णीत राखण्यासाठी शेवटच्या कणापर्यंत पणाला लावलेली शारिरीक आणी मानसिक ताकद ह्याचं नातं मानवी जिवनाशी आहे. प्रत्येक वेळी कुणी जिंकत किंवा हारत नसतं. पण आयुष्यानं समोर उभी केलेली आव्हानं ताठ मानेनं झेलून, हार न मानता पुढे चालत रहायचं असतं. 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला'.
नशीब नावाची काही वस्तू अस्तित्वात असेल तर ते फक्त अथक प्रयत्नांनाच फळतं ह्याचं परत एकदा प्रत्यंतर आलं. ह्याच सिडने च्या मैदानावर २००३-०४ च्या दौर्यात विजयाच्या उंबरठ्यावर भारत उभा असताना, यष्टीरक्षक पार्थिव पटेल नं स्टीव्ह वॉ ला जीवदान दिलं आणी हारत आलेली मॅच अनिर्णीत राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. काल शेवटच्या आठ ओव्हर्स शिल्लक असताना मिचेल स्टार्क चा एक चेंडू हनुमा विहारीच्या बॅट ची कड घेऊन ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक टीम पेन च्या दिशेनं गेला आणी एरव्ही असे झेल सहज घेणार्या पेन च्या हातातून तो झेल मात्र सुटला, एक वर्तुळ पूर्ण झालं आणी नियती भारतीय संघाकडे पाहून प्रसन्न हासली.
भारी लिहिलय फेफ
भारी लिहिलय फेफ
काल मॅच बघायला जबरी मजा आली. ब्युटी ऑफ टेस्ट क्रिकेट !
जबरी लिहीले आहे फेफ! वेगळा
जबरी लिहीले आहे फेफ! वेगळा लेखच टाक. आश्विन व विहारी ने पहिली धाव डुलतडुलत घेतली तेव्हा आता हे १३२ रन्स कसे करणार असे वाटू लागले. बहुधा वॉर्नही तेव्हा असेच काहीतरी म्हंटला. पण रन्स नाही काढले तरी हरकत नाही. काल जेवढी बॅटरी शिल्लक होती त्याच्या जोरावर ते दोघे ठाम उभे राहिले. आता पुन्हा रिचार्ज होउन येतील चौथ्या टेस्टला. विहारी ने मेलबर्न मधली एक भागीदारी वगळता फार लक्षात राहण्यासारखे काही केले नव्हते या सिरीज मधे. पण आता किमान अजून एक चान्स 'अर्न' केला आहे त्याने. कदाचित अजून एक होम सिरीज.
सगळा दक्षिण भारत >>> एक नं बिनडोक कॉमेण्ट आहे ती.
फक्त एक - पुजारा इन्स्विंग आहे असे समजून खेळला पण बॉल स्विंग झाला नाही किंवा टप्पा पडल्यावर सरळ लाइनीत गेला - असे मला वाटले पाहताना.
भारी लिहिलयस फेफा.
भारी लिहिलयस फेफा.
आता पुन्हा रिचार्ज होउन येतील चौथ्या टेस्टला. >> आपली पहिली बॅटींग असेल तर मजा येईल चौथ्या डावात ऑसीज नी भरपूर मेहनत केली आहे. स्टार्क ला बघताना स्ट्रेस जाणवत होता. परत लगेच बॉलिंग करायला लागली तर मजा येईल.
पुजारा चा बॉल टप्पा पडल्यावर आत येण्या ऐवजी लाईन मेंटेन करून राहिला असे वाटले.
काय भारी लिहलयस फेफ!!
काय भारी लिहलयस फेफ!!
सगळा दिवस अक्षरशः डोळ्यासमोर उभा केलास
क्रिडावार्तांकनाचा दर्जेदार नमुना..... नाहीतर आपले पेपरवाले किती सपक आणि ठोकळेबाज लिहतात राव!
तुझी पोस्ट वाचताना मला एकदम लहानपणी ते बाबासाहेब पुरंदरेंच्या कॅसेट वगैरे ऐकायचो तसेच वाटले
भारताला फार मोठा धक्का,
भारताला फार मोठा धक्का, बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर. अश्विन पण बाहेर असू शकतो, 11 फिट खेळाडू जमा करणे सुद्धा कठीण ठरतेय.
फेफ, मस्त लिहलयं! अगदी अचूक
फेफ, मस्त लिहलयं! अगदी अचूक शब्दबद्ध केले!
बुमराह हा मोठा धक्का! अर्थात आता उमेद एकदम उच्चकोटीची असणार भारतीय संघात विशेषतः कांगारूंच्या बडबडीने त्यांचे दात घशात घालायला सज्ज असतील सर्व त्यामुळे प्रत्येकजण १००% योगदान देण्याचा प्रयत्न करेल!
*जबरी लिहीले आहे फेफ* +100 !!
*जबरी लिहीले आहे फेफ* +100 !!
*बुमराह हा मोठा धक्का! * - कुणी सांगावं, नियतिने सिराज, सैनी व नटराजन या नवीन त्रिकूटाकडूनच ऑसीजचं नाक ठेचायचंच कशावरून नसेल ठरवलं !
बुमराह ची बातमी कंफर्म्ड
बुमराह ची बातमी कंफर्म्ड नाहिये अजून. बुम्राह नसेल तर त्यागी ला ह्यावे. भलताच अँग्री यंग मॅन आहे तो. मला त्यागी नि सैनीचे शॉर्ट पिच्ड बॉलिंग ऑसीज कसे खेळतात ते बघायला आवडेल.
*तर त्यागी ला ह्यावे. * हो,
*तर त्यागी ला ह्यावे. * हो, मलाही तो आवडतो . पण तो उपलब्ध आहे नियमानुसार?
फेरफटका, तुमच्या अश्या पोस्ट
फेरफटका, तुमच्या अश्या पोस्ट वाचताना द्वारकानाथ संझगिरी आठवतात हे मागेही म्हटलेले. स्क्रॉल न करताच कोणाची आहे हे कळते. आताही तेच झाले..
जडेजा बाद.. विहारी बाद..
जडेजा बाद.. विहारी बाद..
साहाला किपिंग देऊन पंतला फलंदाज म्हणून खेळवत ४ गोलंदाजांवर खेळतील का आता?
तसेच मयंकला आत आणतील आणि विहारीच्या जागी टाकतील...
सर जडेजाने खूप समतोल साधलेला...
पण तो उपलब्ध आहे नियमानुसार?
पण तो उपलब्ध आहे नियमानुसार? >> बीसीसीआञ नियम ठरवते
आता पंत बॅट्स्मन म्हणून नि साहा किपर म्हणून खेळवला आपण 
फिरकीसाठी कुलदीपला खेळवावं.
फिरकीसाठी कुलदीपला खेळवावं. गरज पडलीच तर तो चिवटपणे फलंदाजीही करतो.
रोहित, गिल,पुजारा, रहाणे, मयांक, पंत, अश्विन, कुलदीप, शारदूल ठाकूर, सिराज, सैनी .
(आतां बरेच नवोदित गोलंदाज उपलब्ध असल्याने, निवडीसाठी फलंदाजीचा निकषही लावला जाईल हें त्यांच्या मनावर ठसवण्याची हीच योग्य वेळ आहे.)
अगदीच गरज पडली तर विक्रम
अगदीच गरज पडली तर विक्रम राठोडला ओपन करायला अन शात्रीबुवांना बोलिंग ऑलराऊंडर म्हणून खेळवायला लागेल...

*अन शात्रीबुवांना बोलिंग
*अन शात्रीबुवांना बोलिंग ऑलराऊंडर म्हणून खेळवायला लागेल... * - हल्ली पाहीलंत वाटतं त्याना ? 'ऑलराऊंडर ' म्हटलंत, म्हणून ही शंका इतकंच !!!
आधी पिशवी घेवून दहा मिनीटं तरी कधीं दुकानासमोर उभं राहिलात का, तें सांगा ! बॅट धरून दोन तास ऑसीजसमोर ते दोघे उभे ठाकले , त्याचं कौतुक नंतर
!!!
भाऊ, भारीच!!
भाऊ, भारीच!!
(No subject)
गेले दोन दिवस इकडे फिरकायला
गेले दोन दिवस इकडे फिरकायला वेळच झाला नाही. तिसर्या टेस्ट च्या पाचव्या दिवशीच्या माझ्या पोस्ट ला दिलेल्या प्रतिक्रिया आणी प्रोत्साहनाबद्दल मनापासून धन्यवाद! त्या मॅच चं गारूड मनावरून उतरायला तयारच नव्हतं आणी त्यातून ते सगळं लिहीलं गेलं.
फा, वेगळा लेख टाकावा असं नंतर वाटलं, पण इथे असलेल्या क्रिकेटरसिकांपेक्षा वेगळं कुणी मायबोलीवर आहेत का असा विचार पण मनात आला. असो. आता तयारी ब्रिस्बेन ची.
ऑलराऊंडर ' म्हटलंत, म्हणून ही
ऑलराऊंडर ' म्हटलंत, म्हणून ही शंका इतकंच !!! >>
रोहित, गिल,पुजारा, रहाणे, मयांक, पंत, अश्विन, कुलदीप, शारदूल ठाकूर, सिराज, सैनी . >> fast नि बाऊन्सी pitch असल्यामूळे दोन स्पिनर गरजेचे आहेत का की आपले पाच बेस्ट बॉल्र्स घ्यायचे हा निर्णय घ्यावा लागेल. बुमरा फिट असेल तर नक्कीच एकच स्पिनर खेळवू शकू मात्र.
विहारीच्या जागी मयंकलाच
विहारीच्या जागी मयंकलाच खेळवतील. जडेजाच्या जागी पाचवा गोलंदाज आणला तर फलंदाजी कमजोर होईलच, पण पंतचा आधीच यष्टीरक्षक म्हणून असलेला जेमतेम दर्जा आणि सध्याचा फिटनेस पाहता तो यष्टीरक्षणाची जबाबदारी घेऊ शकेल का हा प्रश्नच आहे.
मला संघ हा असा दिसतोय -
शर्मा
गिल
पुजारा
रहाणे
पंत
मयंक
साहा
आश्विन
सिराज
सैनी
बुमराह
यातला बुमराह फिट नसेल तर मात्र शार्दुल आणि कुलदीप असे दोन गोलंदाज खेळवावे लागतील. त्यात मयंक बाहेर जाईल किंवा साहा.
फिटनेसचे गणित काय आहे ते आता टीम मॅनेजमेंटलाच ठाऊक आणि त्यावर अंतिम एकादश अवलंबून असेल आता...
अश्विन जर खेळू शकत नसेल तर
अश्विन जर खेळू शकत नसेल तर वॉशिंग्टन सुंदर ला खेळवयला हवे, तो थोडीफार फलंदाजी करतो आणि तो ऑस्ट्रेलियात थांबला आहे.
वॉशिंग्टन सुंदर किंवा नटराजन
वॉशिंग्टन सुंदर किंवा नटराजन ह्यांचा लाल बॉल मधला कमकुवत रेकॉर्ड किंवा 'रेकॉर्ड नसणे' धोकादायक ठरु शकते. ह्यापलीकडे दोघेही विशिष्ट रोल्स मधे उपयुक्त ठरू शकतील ह्यात शंकाच नाही.
Pages