क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपकप्तान पद शोभेचे आहे, फार फरक पडत नाही कोणालाही केल्याने असे मला वाटते. तसंही कोणाची जागा फिक्स्ड नाही, पुजारा सलग 2 series चांगला खेळू शकला नाही तर तो पण जाऊ शकतो

अहो असामी तुम्हाला माझा शेवटचा मुद्दा कळला नाही. पुजारा उपकप्तान होता की नाही याने काही फरक पडत नाही. असला तरी तो कोहली शर्माच्या अनुपस्थितीतच होता. टेंपरवारीच होता.

बाकी शर्माबाबत मी नुसत्या आयपीएल कप्तानीचा उल्लेख केला नाही तर लिमिटेडमध्येही तो उपकप्तान आहे. आणि संधी मिळाली तेव्हा आंतरराष्ट्रीय लेव्हलवर स्वताला कप्तान म्हणून सिद्ध केलेय.

आता शर्मा आल्यावर उपकप्तान निवडताना निवडसमितीने काय विचार केला असावा असा विचार त्यांच्या जागी स्वत:ला ठेवून करा. क्रिकेट जे मैदानाबाहेर खेळले जाते त्याचा विचार येथील चर्चेत फार कमी होतो हे मी आयपीएलमध्येही पाहिले आहे.

असो..
मॅच बघायला उठलो तर पाऊस पडलाय..
आता जागावे की पुन्हा चादर ओढून झोपावे कळत नाहीये Sad
कॉलेजात असताना निर्णय घेणे फार सोपे होते..

एक बाद झाल्या नंतर पावसाने कांगारूना पावसामुळे विचार करायला संधी दिली जरा चिकटून खेळत आहेत दोन्ही फलंदाज!

पंतच्या दिलदारपणे झेल सोडण्यामुळे पदार्पणात मोठी धावसंख्या उभारण्याची, कदाचित शतकदेखिल पुकोवस्कीला संधी..

मी आधी म्हटले होते की नटराजन ला संधी दयायला हवी सैनी पेक्षा, कारण तो कंट्रोल करू शकतो आणि सैनी कधी कधी खूप स्वैर मारा करतो, सैनी अतिशय स्वैर गोलंदाजी करतोय

सैनी अतिशय स्वैर गोलंदाजी करतोय>>

त्यानेच पुकोवस्कीला पकडकले यष्ट्यांसमोर अचूक आणि पहिला बळी मिळविला तिसर्‍याच षटकात!

स्मिथ पुढे टप्पा पडलेले चेंडू V मधे अप्रतिम खेळतो, अगदीं गावसकर, तेंडूलकर इ.ची आठवण यावी असे ! फिरकीला तो मधूनच बाहेर येवूनही खेळतो व त्यामुळे आश्विन व जडेजाला ती शक्यता नेहमीच लक्षात घ्यावी लागत असावी. मस्त फलंदाजी!
पंतने अधिक एकाग्रता व चपळाई दाखवणं आत्यंतिक महत्वाचं.
खेळपट्टी अजून तरी फलंदाजीला योग्य वाटतेय.

पंत बद्दल भारतीय management नी सिरीयस विचार करायला हवा, इतके सोपे झेल सोडणे परवडणार नाही. सहा आणि पंत ऐवजी अजून ऑपशन्स try करायला हवेत, ईशान किशन, K S भारत वगैरे. कामरान अकमल ची किपिंग बघून एकदा इयान chappel म्हणाला होता की याने ब्रॅडमन सारखी जरी फलंदाजी केली असती तरी कीपर म्हणून याला खेळवले नसते

कालचे फिल्डींग लॅप्सेस aberration होते असं समजून पुढे जायला हवं. ते तसे महागात पडले. विकेटकिपींग हा किमान टेस्ट क्रिकेटमधे तरी स्पेशलाईझ्ड जॉब आहे.

पुवोलस्कीचा कॅच घेतला असता तर .... फ्लॅट पिच वर (पहिल्या दिवशी तरी) मार्जिन ऑफ एरर एव्हढी कमी आहे कि प्रत्येक सोडलेला झेल महाग पडणार. आशा करूया कि उद्या बर्‍याच गोष्टि आपल्या बाजूने जातील. ह्या वेळी पहिल्या इनि<ग मधे बॅटींगचा कस लागणार आहे.

फिरकीला तो मधूनच बाहेर येवूनही खेळतो >> भाऊ नि फास्त बॉलिंग तो क्रीज मधे आडवा हलत खेळतो Happy

"पुवोलस्कीचा कॅच घेतला असता तर" - सहसा अश्विन ला सुरूवातीला विकेट पडली तर तो खूप वेगळा बॉलर असतो - जास्त अ‍ॅग्रेसिव्ह असतो. 'जर-तर' ला क्रिकेट मधे स्थान नाही हे मान्य, पण तरिही असं वाटलं की त्या वेळी पुवोस्कीची विकेट महत्वाची ठरली असती. अश्विन वर आक्रमण करताना ऑस्ट्रेलियाने विचार केला असता, अश्विन ने जास्त आक्रमक बॉलिंग केली असती. टी च्या आधी नविन बॅट्समन क्रीझ वर आला असता, आणखीन एका विकेट ची संधी मिळाली असती. डेब्यू इनिंग ला हाफ सेंच्यूरी मारली हा कॉन्फिडंस घेऊन पुवोस्की पुढच्या तीन इनिंग्ज खेळला नसता. पंत आणखीन कॉन्फिडन्स ने खेळला असता.

फिरकीला तो मधूनच बाहेर येवूनही खेळतो >> भाऊ नि फास्त बॉलिंग तो क्रीज मधे आडवा हलत खेळतो >>>>> मी मागेही इथे लिहिलं होतं. स्मिथ एकूणच किती हलतो ! आणि एव्हडा अनस्टेबल स्टान्स असूनही टेस्टमध्ये किती खोर्‍याने धावा काढतो...

रच्याकने, तो राष्ट्रगीताच्या वेळेलाही स्थिर उभा रहात नाही. बुटका असल्याने दोन्ही बाजूला उभे असलेले खेळाडू ऊंच असतात. त्यांच्या उंच खांद्यांवर हात ठेऊन ह्याचं हलणं फार विनोदी दिसतं. Happy

*एव्हडा अनस्टेबल स्टान्स असूनही टेस्टमध्ये किती खोर्‍याने धावा काढतो...* - कांहीं फलंदाजांचे विशिष्ट mannerism त्यांच्या फलंदाजीच्या लयीशीं घट्ट निगडीत असतात व चांगले प्रशिक्षक तंत्राचा आग्रह धरत त्याना ते बदलायला लावण्याविरूदध असतात. हा तसाच प्रकार असावा.
एक सहजचा विचार - पंत गाॅगलस लावून यष्टीरक्षण करतो. बर्याच वेळा तो गाॅगलस कॅप /हेल्मेटच्या वर खालीं करत असतो. उच्च दर्जाच्या गाॅगलसमुळे दृष्टीला साधारणपणे फरक पडत नसला, तरीही क्षणार्धात करायच्या कृतिवर कदाचित फरक पडूं शकेल. शिवाय, तो खालीं-वर करण्याच्या संवयीने एकाग्रतेवर थोडा परिणामही होण्याची शक्यता आहेच. नेट सराव करतानाही तो गाॅगलस लावत असेल ? ( कृपया हें माझं मत समजूं नये. विचार शेअर करावासा वाटला, इतकंच )

आणि एव्हडा अनस्टेबल स्टान्स असूनही >> मह्त्वाची गोष्ट हि आहे पग्या की शॉट खेळतान तो स्थिर असतो नि डोके अगदी अचूक पोझीशनमधे असते. चॅपेल चा एक व्हिडियो आहे बघ यु. वर ह्याबद्दल. आधीच्या त्या प्रचंड हलण्य्तामूळे आपल्याला तो हलता डुलता वाटतो Happy

तरीही क्षणार्धात करायच्या कृतिवर कदाचित फरक पडूं शकेल >> मला आधी असे वाटायचे पण प्रकाशाप्रकाशाचीअडवली जात असेल तर फायदाच व्हायला हवा खर तर. तो स्पिनर्स चे कॅचेस घेताना त्याची बोटे जमिनीकडे नसतात ही अतिशय कळीची बाब आहे असे किरण मोरे म्हणाला होता. कालचा झेलही घेताना बॉल त्याच्या हातात येण्या ऐवजी दोघे एकमेकांकडे आले.

सहसा अश्विन ला सुरूवातीला विकेट पडली तर तो खूप वेगळा बॉलर असतो - जास्त अ‍ॅग्रेसिव्ह असतो. >> हो. मागच्या दोन सामन्यांमधे विकेट जात नसातानाही तो आक्रमक होता. इथे मला वाटते पहिल्या स्पेल च्या शेवटी त्यने खूपच शॉर्ट बॉल्स टाकले. त्यामूळे रन्स गेले नि मग त्याने कंटृओल आणण्यासाठी डिफेन्सिव्ह लाईन घेतली असावी. तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

सहा आणि पंत ऐवजी अजून ऑपशन्स try करायला हवेत >> एक अजून आहे थोडाफार. आयपीएल खेळतो तर हे ही खेळू शकेल. त्याच्या बॅटिंग वर त्याला कायम जज केले गेल्याने त्यात अपयश येउ लागले तेव्हा त्याच्यावर टीका झाली. पण काल जी पंतगिरी चालू होती तितका तो वाईट अजूनही नसेल Happy रहाणेला चार सल्लेही देइल Happy

त्याव्यतिरिक्त - दिनेश कार्तिकचा का विचार होत नाही फारसा?

त्याव्यतिरिक्त - दिनेश कार्तिकचा का विचार होत नाही फारसा? > >आयपील च्या कामगिरीवर विचार करायचा तर अगदीच सुमार होता कार्तिक ह्यावेळी. कप्तानपद पण सोडून दिले होते. इशान किशन पंतची कॉपी आहे बॅटींग मधे नि किपिंग बर्‍यापैकी डिसेंट आहे. पण पंत वर एव्हढ्या तडकाफडकी अविश्वास दाखवताना त्याला सुधारण्याची संधी द्यायला हवी असे ही वाटते.

सहज एक विचार काल डोक्यात आला: २००३ साली ह्या सिडनेतच, एका वयानं लहान, बर्यापैकी चांगली बॅटींग करू शकणारा, विकेटकिपींगमधे 'वर्क इन प्रॉग्रेस' असणार्या पार्थिव पटेल ने स्टीव्ह वॉ ला आणी रिकी पॉटींग ला जीवदान दिलं आणी जिंकू शकणारी मॅच ड्रॉ झाली. नंतर पटेल पाकिस्तान मधे खेळला, पण मग कार्थिक आणी नंतर धोनी आला आणी पार्थिव चं आंतरराष्ट्रीय करियर डळमळीत झालं. पंत ला तशी imminent risk नसावी बहूदा, पण त्याने विकेटकिपींगवर कष्ट घ्यायला हवे. मिडिऑकर विकेट किपींग आणी 'उलगडलं तर सूत, नाहीतर भूत' बॅटींग च्या जीवावर मोठी आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडणं अवघड आहे.

पंत वर एव्हढ्या तडकाफडकी अविश्वास दाखवताना त्याला सुधारण्याची संधी द्यायला हवी असे ही वाटते. >> >हो अ‍ॅग्री.

फेफ - हो लक्षात आहे. इन फॅक्ट त्याच वर्षीची २००४ ची होम सिरीज सुद्धा हरण्यात त्याचा बराच सहभाग होता.

सर मदतीला धाऊन आले
स्मिथ पाठोपाठ वेड
आता ग्रीनला आश्विनने घ्यावे...

एव्हडा अनस्टेबल स्टान्स असूनही टेस्टमध्ये किती खोर्‍याने धावा काढतो>>>> मार्शल आर्टमध्ये वेगवेगळे स्टान्स आहेत. त्यातला एक स्टान्स असा आहे की तुम्ही स्टेबल उभे राहू नका. झिंगलेल्या माणसासारखी हालचाल करा जेणेकरून तुम्ही कसा अटॅक/डिफेन्स करणार याचा समोरच्याला अंदाज लागता कामा नये.

*कसा अटॅक/डिफेन्स करणार याचा समोरच्याला अंदाज लागता कामा नये.* - शिवाय, ठरवलेल्या फटकयासाठी योग्य पोझिशनमधे येणं त्याला त्यामुळे सोपं वाटत/जात असावं.
आज जडेजाने कमिनसची घेतलेली विकेट वैशिष्ट्यपूर्ण होती.A well flighted delivery becoming a perfect yorker ! त्याने उत्तेजित होवून जडेजाने तोच प्रयोग यशस्वीपणे आत्ता लिऑनवरही केला ! आज जडेजाचाच दिवस असावा ! लांबून धांवत येवून on the run pick up & direct throw to break the wicket !! ग्रेट!!
स्मिथचं नेटकं, सुंदर शतक , पाॅटींगची आठवण करून देणारं !

स्विंग नाहीये आणी पिचही बॅटींगला अनुकूल आहे. भारतानं चांगली बॅटींग करावी. रोहितसाठी बॅटींग कन्डीशन्स चांगल्या आहेत. त्याने एक मोठी खेळी करून भाऊंचा विश्वास सार्थ ठरवावा आणी भाऊंनी एक झकास व्यंगचित्र काढून ते साजरं करावं. Happy

Pages