क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुलदीप सुचवणयाचं कारण , तो पठडीत बसणारा ' लेफ्ट
आर्म स्पीनर ' नाहीय. तो चेंडूला फ्लाइट देतो, फसवा गुगली ( चायनामन ) टाकतो व कोणत्याही फलंदाजासाठी तो कांहीसा ' सरप्राइज एलिमेंट ' असतोच . बाऊनसी विकेटवर तो प्रभावी ठरण्याची दाट शक्यता मला जाणवते. ( बाऊनसी विकेटसवर हल्ली फिरकी अधिकाधिक भेदक ठरतेय, असंही मला वाटतं. )

कुलदीप मलाही फ्रंट-रनर वाटतोय (अश्विन च्या गैरहजेरीत). बुमराह च्या जागी ठाकूर (थोडीफार बॅटींग करू शकणारा, तुलनेनं जास्त फर्स्ट-क्लास क्रिकेट खेळलेला, मिडीयम-फास्ट बॉलर) का नटराजन (फास्ट, लेफ्ट हँडेड, लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट मधे चांगल्यापैकी कंट्रोल दाखवलेला, पण फर्स्ट क्लास चा अनुभव कमी आणी बॅटींग स्किल्स अननोन) हा प्रश्न आहे. कदाचित दोघंही खेळतील. इतका अननुभवी बॉलिंग अ‍ॅटॅक असताना चारच बॉलर्स खेळवण्याची शक्यता कमी आहे.

मयंक फीट असेल तर तोच येईल, नाहीतर पंत मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून खेळेल आणी साहा विकेट कीपींग करेल अशी शक्यता आहे. एक आऊटसाईड चान्स आहे की मयंक/शॉ - रोहित अशी ओपनिंग ठेवून गिल ला मधल्या फळीत खेळवतील. सध्या तरी असं वाटतंय की संघ पुढीलप्रमाणे असेलः
रोहित, गिल, पुजारा, रहाणे, मयंक/पंत/साहा (ह्या तीनातले २), अश्विन (कुलदीप), ठाकूर, सैनी, सिराज, नटराजन

*एक आऊटसाईड चान्स आहे की मयंक/शॉ - रोहित अशी ओपनिंग ठेवून गिल ला मधल्या फळीत.. * - ' मयांक सलामीला व गिल मधल्या फळीत ', हे गावसकरही म्हणतोय.

साहाऐवजीं पंतला विचापूर्वक एकदा पसंती दिल्यावर, एकाच सामन्यानंतर त्यांत बदल करतील/ करावा असं वाटत नाही.

फलंदाज पंतला बदलणे या स्थितीत शक्यच नाही असे मला वाटते. प्रश्न फक्त ईतकाच आहे की साहाला कीपर म्हणून खेळवताहेत की ते काम पंतलाच करायला लावतील.

कुलदीप सुचवणयाचं कारण >> कुलदीपचा प्रश्न नाही तर प्रश्न दोन स्पिनर्स संघात असण्याचा होता. मी ही काल म्हणालो होतोच कि यादव बाउन्सी विकेट्स वर कामी येईल. अ‍ॅश फिट नसेल तर प्रश्नच येत नाही पण असेल तर फास्ट पेस्ड बाऊन्स असलेल्या पिचवर दोन स्पिनर खेळवणे श्रेयस्कर कि एक? एकच असेल तर कोण ?. ह्यात अजून एक कंगोरा असा आहे की बुमरा फिट नसेल तर फे फ च्या पोस्ट चे एक्स्टेंशन आहे की तीन अननुभवी फास्ट बॉलर्स खेळण्याचा धोका उद्भवतोच आहे. पाच बॉलर्स केल्यास बॅटींग लंगडी पडणार. (मयांकचा फॉर्म अनिश्चित आहे नि ठाकूर नक्कीच जाडेजा एव्हढा सरस बॅटस्मन नाही) . इंटरेस्टींग असणार आहे टीम कंपोझिशन.

शॉ - रोहित अशी ओपनिंग क्लिक होत असताना आता त्यात बदल करू नये असे वाटते. मयांक ला मधल्या फळीत सहज खेळवता येईल. साहा नि पंत ह्यामधे पंत असणार हे उघड आहे. आहे त्या बॅटींग कंडीशन मधे साहा नि पंत दोघेही ही चैन आपल्याला परवडणार नाहिये.

अनुभवाचा / अननुभवाचा मुद्दा जरा बाजूला ठेवला तर बॉलिंग पीचवर एक्स्ट्रॉ बॅट्समन खेळवणं कधीही श्रेयस्कर. तसंही बॉलिंग कंडीशन्स मधे पाचवा बॉलर अंडरयुटीलाईझ होतो. पण इतका नवखा बॉलिंग अ‍ॅटॅक असताना चारच बॉलर्स खेळवणं - अश्विन इंज्युअर्ड असेल तर दुष्काळात तेरावा - रिस्की आहे. पण काही काही बॉलर्स आणी कॅप्टन्स ची केमिस्ट्री इतकी जमते की ते बॉलर्स त्या कॅप्टनच्या कॅप्टन्सीखाली कमालीची प्रभावी बॉलिंग करतात (द्रविड-मुरली कार्तिक). तसं कुलदीप ला टेस्ट मधे रहाणे ने संधी दिली होती आणी त्याने ती जबरदस्त कामगिरीने गाजवली होती. त्यामुळे अगदी चारच बॉलर्स घेऊन खेळायची वेळ आली आणी अश्विन अ‍ॅव्हेलेबल असेल तरी एक वेगळं टीम कॉम्पोझिशन म्हणून अश्विन आणी कुलदीप ला खेळवता येईल. त्या केस मधे पंत (नुसता बॅट्समन म्हणून, साहा - कीपर) आणी मयंक अशी बॅटींग strengthen करता येऊ शकते. वेळ आलीच तर मयंक ला ४-५ ओव्हरपुरतं पार्ट-टाईमर म्हणून वापरता येईल.

त्यामुळे अगदी चारच बॉलर्स घेऊन खेळायची वेळ आली आणी अश्विन अ‍ॅव्हेलेबल असेल तरी एक वेगळं टीम कॉम्पोझिशन म्हणून अश्विन आणी कुलदीप ला खेळवता येईल. त्या केस मधे पंत (नुसता बॅट्समन म्हणून, साहा - कीपर) आणी मयंक अशी बॅटींग strengthen करता येऊ शकते. वेळ आलीच तर मयंक ला ४-५ ओव्हरपुरतं पार्ट-टाईमर म्हणून वापरता येईल. >> फे फ म्हणजे बाऊन्सी फास्ट पिचवर दोन स्पिनर्स नि दोन पेसर्स असे म्हणतोयस , बरोबर ? थोडं ऑड वाटतेय

अश्विन किंवा बुमराह पैकी कोणी पण 11 मध्ये घेतला तर तर आपल्याला एक बॅकअप म्हणून 5 गोलंदाज खेळवावें लागतील, कारण सामन्यात दोघांपैकी कोणी पण injured होऊ शकतो. चारच गोलंदाज खेळवले आणि त्यात एक injured झाला तर तिथेच सामना हातातून जाईल. त्यामुळे चार गोलंदाज खेळवायचे असतील तर पूर्ण फीट पाहिजे. कुलदीप, सिराज, ठाकूर आणि नटराजन हे 4 गोलंदाज खेळवावें. आणि 5 गोलंदाज खेळवायचे असतील तर मग मला वॉशिंग्टन सुंदर हा पर्याय बरा वाटतो

ओपनिंग पेअरला शक्यतो धक्का लागणार नाही.
पंत, पुजारा, रहाणेच्या जोडीला मयंक येईल.
अश्विन, कुलदीप, ठाकूर, सिराज, सैनी खेळावेत.

कुलदीप-रहाणे कॉंबो मुद्दा बरोबर आहे (रेफ: धरमशाला)

आपले सगळे बॅट्समन 1D आहेत हा एक मोठा प्रॉब्लेम आहे!

माझी पसंती अजूनही 6 फलःदाज + 5 गोलंदाज ( 3 पेसरस, 2 स्पीनरस ). पंतला यष्टीरक्षक व फलंदाज म्हणून खेळवण्याचा प्रयोग सुरूंच ठेवावा व मयांक मधल्या फळीतील फलंदाज म्हणून विहारीच्या जागीं. बुमराह नसला तर शारदूल ठाकूरला नक्की घ्यावे.

असामी, बरोबर. लेफ्ट फिल्ड थिंकिंगच आहे दोन पेसर्स आणी दोन स्पिनर्स. एक लॉजिक असं होतं की अश्विन आणी कुलदीप हे दोघं अनुभवी आहेत आणी बाउन्स चा उपयोग करून भेदक ठरू शकतात, बॉलिंग विकेट असल्यामुळे चार बॉलर्स पुरेसे ठरावेत आणी बॅटींग स्ट्राँग व्हावी. पण मी म्हणतोय तो फारच आऊटसाईड चान्स आहे. बहुदा ३ पेसर्स, २ स्पिनर्स (अश्विन फिट असल्यास) असाच अ‍ॅटॅक असेल. बॅटींग मधे विहारीच्या जागी फिट असल्यास मयंक नाहीतर साहा येईल. अजून टीम डिक्लेअर केली नाहीये. बहुदा फिटनेस टेस्ट वर सकाळी ठरेल.

पाच बॉलर्स घेऊनच खेळणार असू तर मला खरच त्यागी ला बघायला आवडेल. अननुभवी आहे नि तेच सर्प्राईज इलिमेंट पण आहे. स्पीड स्टर आहे , वर्क हॉर्स पण आहे. 'अरे ला का रे' म्हणून बॉलिंग करण्याची आवड आहे. डोसाईल पिचेस वर १४०+ असतो. ब्रिस्बेन वर धमाल येईल. ऑसी पेस्ड बॉलिंग समोरे आपल्या इतकेच चाचपडतात त्यामूळे (बुमरा॑ , सैनी, त्यागी मधले) दोन तरी १४०+ वाले हवेत ह्या मॅच मधे. हे माझे पाईप ड्रीम आहे की ऑसी बॅटस्मन शॉर्ट पिच बॉल वर नजर जमीनी कडे, दोन्ही पाय हवेत , बॅट ऑकवर्ड पोझिशन मधे नि बॉल फॉरवर्ड शॉर्‍ट लेगच्या हातात Happy

*ऑसी बॅटस्मन शॉर्ट पिच बॉल वर नजर जमीनी कडे, दोन्ही पाय हवेत , बॅट ऑकवर्ड पोझिशन मधे नि बॉल फॉरवर्ड शॉर्‍ट लेगच्या हातात* ' - असामिजी, तुम्ही आंणि तेंही आज म्हणताय असं, ' तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ' च्या दिवशीं ! पण आणखी एक तासाने तुम्हाला 100% पाठींबा. गेल्या मॅचची खुन्नस धुमसते आहेच मनात !!! Wink

"पाच बॉलर्स घेऊनच खेळणार असू तर मला खरच त्यागी ला बघायला आवडेल." - फर्स्ट क्लास चा अजिबात अनुभव नसताना इतक्या मोठ्या मॅचमधे 'टिकेल' का ही एकच शंका आहे मला. ४ किंवा १० ओव्हर्स टाकणं आणी दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी, मॅच च्या वेगवेगळ्या दिवशी आणी वेगवेगळ्या परिस्थितीत, नवीन आणी जुना बॉल घेऊन ~२० ओव्हर्स टाकणं ह्यात टिकला तर आनंदच आहे. मलाही त्याचं अ‍ॅग्रेशन आवडलं होतं.

उद्या वादळ आणी उरलेले दिवस पावसाची शक्यता आहे. मॅच चा निकाल लागेल का ही पणा उत्सुकता आहे.

सुंदर, नटराजन, ठाकुर आणि मयांक आता... चार जलदगती आणि एक फिरकी गोलंदाज. ऑस्ट्रेलिया ची फलंदाजी... पंत आणि बाकी झेल सोडू नका... ही कसोटी आपलीच आहे

शक्य होईल तितकी बॅटींग मजबूत करणे नि ह्या पिच वर अशा वेदर मधे हे चार पेसर्स पुरेसे ठरतील असा अनुमान बांधून संघ तयार केलेआ दिसतो आहे. टॉस जिंकला असता तर बरे झाले असते. ऑसी बॉलर्स थकलेले आहेत त्यांना लगेच बॉलिंग करायला लागली असती तर ....

असो चला बघूया काय होते ते.

वॉर्नर गेला... पहिल्याच ओव्हर मध्ये, सिराजने पुन्हा त्याची विकेट घेतली...
अवांतरः मेलबर्न आणि आज जे राष्ट्रगीत वाजवले, त्यात मोठ्या आवाजात तानपुरा सुरू करून बाईने शेवटी इतकं बेसूर गायलंय, की देशभक्तीच्या भावना पार बारगळतात. शिवाय लांबवलंय पण बळेच :| उद्या स्टेडियमला जाऊन भारताची बॅटींग पहायला मिळणार, पावसाचा व्यत्यय नको फक्त Happy

माझ्या मते 5 गोलंदाज सिराज, नटराजन, ठाकूर, कुलदीप आणि सुंदर असे खेळवयला हवे होते. योग्य बॅलन्स झाला असता, सैनी मला फार आश्वासक वाटत नाही.

स्मिथ लाबुशान गेल्या सामन्यात रुळावर आले होते.
या सामन्यात त्यांना किती लवकर घेतो यावर बरेच पेक्षाही बरेच काही अवलंबून राहील..

स्मिथ सुंदरच्या पहिल्या ओवरला जरासा गडबडलेला वाटला. गेला पाहिजे लगेच त्याच्या पुढच्याच ओवरला... सुंदरची निवड सार्थ ठरेल

ऑसीजचं गेल्या मॅचचं अनुकरण न करतां आपले गोलंदाज ऑफ स्टंप गोलंदाजी करताहेत, हें कर्णधार व संबंधितांची वैचारिक परिपक्वता दाखवतात. बुमराह, अश्विन याना खेळवण्याचा दुराग्रह न धरणं हेही शहाणपणाचंच व दूरदृषटीचं.
सुंदरला शुभेच्छा!

सुंदरनेच घेतला स्मिथला.. लंचनंतर बंद केल्याने उशीर झाला. पण काय स्वप्नवत पदार्पण.. पहिली धाव देण्याआधी पहिली विकेट आली..ती सुद्धा स्मिथची !

झेल सोडणे आपल्याला कायम महाग पडते..
लबुशेन तर सोडलेल्या झेलानेच बरेच धावा करतो प्रत्येक डावात.. सर्वात नशीबवान..

नटराजनने आणला परत सामन्यात. वेड आणि लाबूशान गेला. २१३-५ ..आता रोखा लवकरात लवकर.... १४ ओवरने नवीन बॉल सुद्धा येईल. आजच गुंडाळा

Pages