क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किमान गेल्या १०-११ वर्षात आणि ९२ डावानंतर प्रथमच अशियाखंडाबाहेर परदेशात आघाडीच्या जोडीने २० पेक्षा जास्त षटके खेळली हे ही नसे थोडके!

१०-११ वर्षात आनि ९२ डावानंतर प्रथमच
>>>
हे आकडे माहीत नव्हते पण हेच बोलायला आलेलो की बरेच काळाने सलामीची भागीदारी दिसली.

बाहेर सलामीला एक मोठी खेळी आणि मग कॉन्फिडन्ट शर्मा वेगळाच दिसेल जो डॉमिनेट करू लागेल. ती खेळी अजून त्याच्या खात्यात नसल्याने नेहमीचा शर्मा वाटत नव्हता. पण त्याला परदेशात खेळवायचे असल्यास सलामीलाच खेळवावे अन्यथा नाही.

गिल चे अर्धशतक!
वेल प्लेड शुभमन! कीप इट अप!
एवढे म्हणे पर्यन्त कमिन्सने माघारी धाडले गिलला!

दरम्यान २६ धावांच्या खेळीत एक षटकार मारला तेंव्हा कांगारूंविरुद्ध १०० षटकार मारणारा (सर्व प्रकारचे सामने मिळून) रोहित पहिला फलंदाज ठरला!

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक जास्त षटकार ठोकणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत रोहितने 6 डावात 20 षटकार खेचले आहेत. या यादीत मयंक अगरवाल दुसर्‍या स्थानी आहे त्याने या स्पर्धेत 18 डावात 17 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर तिसर्‍या क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे. त्याने 12 डावात 10 षटकार लगावले आहेत.

तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित पहिला क्रमांकाचा खेळाडू आहे. रोहितने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 99 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे त्याने जर तिसऱ्या कसोटी एक जरी षटकार खेचला, तर तो आपले षटकांरांचे शतक पूर्ण करेल. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरेल.

टिव्हीवरील माहितीनुसार 14 कसोटींनंतर 50 च्या पुढे प्रथमच सलामीची भागीदारी!
गिल अप्रतिम शिस्तबद्ध व विश्वासपूर्ण खेळी करतोय ! रोहित मोठी खेळी करायच्या जिद्दीने छान खेळत होता. कदाचित, त्यासाठी स्वतःच्या स्वाभाविक खेळावर त्याने नको तेवढा अंकुश ठेवल्याने तो बाद झाला असावा. बॅड लक !

रोहित शर्मा आता टेस्टमध्ये डॉमिनेटिंग वगैरे असण्याचे दिवस राहिलेले नाहीत. २००७पासून तो खेळतोय. १३ वर्षं झाल्यावर शरीरावर परिणाम होतो. टेस्टसारख्या फॉरमॅटमध्ये तो उठून दिसतो. तो आता ३ महिन्यांत ३४चा होईल. त्यानंतर कसोटीमध्ये बॅटिंग कठीण होत जाते. ओपनिंग तर अजूनच कठीण. मुरली विजयबद्दल मी इथेच लिहिलं होतं. तो तर आता ३६चा आहे आणि त्याचे ओपनिंगचे दिवस संपलेले आहेत. ॲलिस्टेयर कुक इंग्लंड‌ ग्रेट आहे, तो ३३-३४च्या वयात रिटायर झाला, तेसुद्धा शेवटची काही वर्षे फक्त टेस्ट खेळून‌. सेहवाग २०११नंतर फार कधी चालला नाही, तो तेव्हा ३२-३३ वर्षांचा होता. तो शेवटची टेस्ट ३४चा असताना खेळला. गौतम गंभीर शेवटची टेस्ट ३५चा असताना खेळला. मॉडर्न क्रिकेटमध्ये वर्कलोड वगैरे भरपूर आहेत. त्याचाही इफेक्ट‌ होतो. ह्यात शर्माचाच काही दोष आहे अश्यातला भाग नाही. त्यामुळे वन-डे आणि टी-२० च्या हाईपवर आणि फॅनबॉय्ज आणि पीआर आणि मीडियाकडे लक्ष न देता गिल, अगरवाल, शॉ वगैरेंना ग्रूम करणं जास्त चांगलं आहे. नाहीतर त्यांची उमेदीची वर्षं ज्यात ओपनिंग चांगली होते ती वाया जातील.

(३४नंतर ग्रेट सेकंड कमिंग करणारा मॉडर्न एज बॅट्समन म्हणजे साहेब आहेत. (२००७-११) आणि त्याबद्दल फार काही बोलायलाच नको.)

*....मीडियाकडे लक्ष न देता गिल, अगरवाल, शॉ वगैरेंना ग्रूम करणं जास्त चांगलं आहे. * ' याबद्दल दुमत नाहींच. पण शाॅ व मयांक याना ग्रूम करण्यासाठीच तंत्रातील मूलभूत चुका सुधरायला तयाना अवधी द्यायला हवा, हें गेल्या 4 डांवावरून अधोरेखित झालंय. म्हणून तर रोहितला दोन कसोटीपुरत सलामीला खेळवलं जातंय ना.

भाऊ, हो. आत्ता रोहित खेळतो आहे त्यावर काही फार म्हणणं नाही, कारण कोणीच खेळत नाही तर रोहितला खेळू देण्यात तसं काही वावगं नाही. पण त्याच्याकडून मी आधी म्हटलं तसं फार अपेक्षाही ठेवलेलीच नाही. उपरोल्लेखित आणि इतर कारणांमुळे. आता २ कसोट्यांमध्ये काय व्हायचं ते होईल. मी म्हणतोय ते पुढच्या काही वर्षांसाठी. अगदी रोहितने ह्या कसोटीत पुढच्या डावात झणझणीत शतक मारलं, किंवा ब्रिस्बेनला मारलं, तरी २०२२मध्येही तो टेस्ट ओपनर म्हणून कंसिस्टंट परफॉर्मन्स देऊ शकेल, असं मला वाटत नाही. त्या अनुषंगाने म्हणत होतो.

संपला दुसरा दिवस. रोहित गिलच्या २७ षटकातील ७० धावांच्या सुरुवाती नंतर अजिंक्य पुजाराची १३ षटकात ११ धावांची अभेद्य भागीदारी.

*पण त्याच्याकडून मी आधी म्हटलं तसं फार अपेक्षाही ठेवलेलीच नाही* - पण हेंच परत परत कां सांगितले जातंय हेंच मला बुचकळ्यात टाकतंय !

सेहवागचे रिफ्लेक्सेस मंदावले त्याचा खेळ बदलला, गंभीरचाही फॉर्म गेला म्हणून बाहेर गेला. यांना संघात जागा राखणे अवघड झालेले. सचिनचे म्हणाल तर त्याची ग्रेट सेकंड कमिंग (२००७-११) दिली आहे तरी तो वन डे २०१२ च्या मध्यापर्यंत आणि टेस्ट २०१३ च्या अखेरपर्यंत रडतखडतच खेळला. थोडक्यात मोठ्या खेळाडूंना थोडा वेगळा न्यायही दिला जातो आपल्याकडे. त्यामुळे अ‍ॅलिस्टर कूक या अभारतीय खेळाडूचे नाव नको Happy

बाकी कसोटीचे काही वन डे सारखे नाही की येत्या विश्वचषकाकडे बघून आतापासूनच त्यादृष्टीने टीम बांधायला घ्या. कसोटी फॉर्मेटमध्ये प्रत्येक मालिका आपले महत्व राखून असते. जर एखादा खेळाडू आपल्या आजच्या खेळावर संघात स्थान मिळवत असेल तर वय या मुद्द्याचा ईथे विचार करू नये. त्यात सध्या तरी शर्माचा फॉर्म वा फिटनेस उतरणीला लागलाय असे दिसत नाही. प्रश्न फक्त त्याच्या परदेशातील टेकनिक आणि टेंपरामेंटचा आहे. जर आजच्या तारखेला तो पृथ्वी शॉ पेक्षा सरस असेल तर त्याचीच जागा संघात हक्काची आहे. शुभमन गिल परीपक्व वाटत आहे, मयंकला सुद्धा दोन अपयशानंतर डावलता येत नाही. अति क्रिकेटमुळे या सर्वांना आलटून पालटून संधी मिळत राहील. पण ईथे केवळ वय जास्त म्हणून भविष्याचा विचार करून शर्मावर फुली मारणे चुकीचे वाटते.

तसेच जर शर्मा भारतात या सर्वांपेक्षा शेर असेल तर त्याला भारतातील कसोटीत संधी मिळायलाच हवी. होम अवे सामन्यात गोलंदाज वेगवान की फिरकी हे खेळपट्टी बघून ठरवतात. मग फलंदाजांचा दोन्हीकडे एकच सेट कश्याला हवा असतो.

*कारण परत परत तो डॉमिनेट करेल अशी अपेक्षा व्यक्त‌ होतेय. * - अच्छा ! म्हणजे कुणी कुणाबददल कांहीं सकारात्मक विचार करत असेल, तर नकारात्मक हातोडयाने घण घालतच रहायचं का ! मला तर आतां वाटतंय, रोहित अपयशी ठरणयावरच जणूं आपल्या क्रिकेटचं भवितव्य अवलंबून आहे Wink

अच्छा ! म्हणजे कुणी कुणाबददल कांहीं सकारात्मक विचार करत असेल, तर नकारात्मक हातोडयाने घण घालतच रहायचं का ! >>> नाही बुवा, हे असलं काहीतरी तुम्हालाच वाटतंय. माझा विचार टीमबद्दल आहे आणि मला काय वाटतं ते सांगायचा अधिकार मला आहे. रोहितने पुढच्या ४ वर्षांत ४००० धावा केल्या तर मला आनंदच असेल. पण त्याची अमुक एक इमेज आहे म्हणून तो संघात चांगलीच कामगिरी करेल, आणि त्यामुळे त्याला ठेवायलाच हवं, हे म्हणणं मला तरी चुकीचं वाटतं.

ऋन्मेऽऽष यांचे बरोबर आहे. फार पुढचा विचार करण्यात अर्थ नाही, शर्मा ला आता कसोटीत संधी मिळणे योग्य आहे, शॉ आणि मयंक च्या जागी. मला असे वाटते की इंग्लड विरुद्ध आपण भारतात 4 आणि इंग्लडमध्ये 5 कसोटी सामने खेळणार आहोत, या 9 सामन्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी आयडिया आलेली असेल कोण सलामीला खेळू शकेल

जो सातत्याने धावा करेल तो संघात हवा आता त्या साठी किती वेळा तो फेल गेला तर चालेल? हा हिशोब काढत बसलो तर बरेचसे नामांकित खेळाडू संघात खेळू नाही शकणार अगदी कोहली, रहाणे, पुजारा हे बऱ्याचदा ४-५ सामने फारशी धावसंख्या करू शकलेले नाहीत. आणि रोहितला कसोटी संधी जरी तो २००७ मध्ये आंतराष्ट्रीय खेळला तरी २०१३ मध्ये प्रथम मिळाली. जो पर्यंत त्याची फलंदाजी चालतेय तो वर त्याला खेळवायला हरकत नसावी.

अगदी कोहली, रहाणे, पुजारा हे बऱ्याचदा ४-५ सामने फारशी धावसंख्या करू शकलेले नाहीत.
>>>>
कोहली वगळता पुजारा आणि रहाणे परफॉर्म करत नाहीत म्हणून संघाबाहेरही जाऊन आलेत.
किंबहुना आजही कोहली बुमराह वगळता ईतर कोणीही परफॉर्म करत नाही म्हणून कधीही संघाबाहेर जाऊ शकतो.
एकदिवसीयचा विचार करता या दोघांसोबत शर्माचेही नाव जोडले जाईल.

एक सहज आठवले, गेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात पुजारा, कोहली, रहाणे आणि शर्मा हे चौघे मिडल ऑर्डरचे फलंदाज मिळून ५-६ धावा करून बाद झालेले जो मिडल ऑर्डरचा नीचांक होता. त्यानंतर पंतने येऊन ४० धावा फटकावत आपल्याला १०० चा आकडा दाखवलेला. आपण पहिल्या डावातील आघाडीमुळे सेफ होतो. सामनाही जिंकलो. ती गोष्ट वेगळी.

सांगायचा मुद्दा हा की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. फॉर्म ईज टेंपररी आणि क्लास ईज पर्मनंट म्हणतात, पण ज्याच्याकडे आज क्लास दिसत नाही तो देखील कधी तंत्रात वा मानसिकतेत हलकासा बदल करून आपला खेळ बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे एखादा शर्मा. शॉ, पंत वगैरे ज्यांच्यात पोटेंशिअल आहे त्यांच्यावर कधीही कायमस्वरुपी काट मारू नये ईतकेच.

कालच्या बॅटींगला अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला दणदणीत ओपनिंग मिळेल असं मला वाटलं होतं. गेल्या काही मॅचेस च्या तुलनेत तर दणदणीतच म्हणावी लागेल अशी पण तरिही अजून नक्कीच चांगली मिळू शकली असती असं म्हणावं अशी सुरूवात झाली. बहूचर्चित रोहित शर्माचं पुनरागमन ठिक होतं. त्याने ज्या पद्दतीनं सुरूवात केली होती ते बघता एक मोठी खेळी खेळेल असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. अजून ३ इनिंग्ज (ह्या दौर्यात) शिल्लक आहेत, त्यात बघू काय घडतं ते. गिल चं अर्धशतक नक्कीच गूड न्यूज आहे. पण त्याच्याकडून सुद्धा एकदा सेट झाल्यावर मोठ्या इनिंगची च अपेक्षा आहे. स्कोअरिंग च्या संधी शोधणं ही सकारात्मक बाब आहेच पण ते करताना मोठी इनिंग उभारण्याकडे दुर्लक्ष होऊ नये ही गोष्ट कोहलीकडून त्याला शिकण्यासारखी आहे. (अजून खूप लहान / नवीन आहे. अनुभवानं शिकेल). आज रहाणे-पुजारा जोडी ने मोठी भागीदारी करावी अशी अपेक्षा आहे.

रोहितसाठी बॅटींग कन्डीशन्स चांगल्या आहेत. >> त्याने सत्तरेक बॉल खेळून काढले हा मोठा प्लस पॉईंट आहे. बोलींग ला त्यामूळे इनिशियल मोमेंटम मिळू शकला नाही. ऑसी बॉलिंग किती डीसीप्लीन्ड आहे ह्याचा कस लागेल असे पिच आहे. फक्त उद्या पुजारा ने भयंकर कोषात जाऊन खेळणे थोडे कमी केले तर बरे होईल. धावांसारखे प्रेशर बिल्ड्प करणारे दुसरे औषध नाही.

त्याने ज्या पद्दतीनं सुरूवात केली होती ते बघता एक मोठी खेळी खेळेल असं वाटलं होतं, >>>> रोहित हेझलवूडच्या माईंड गेमला बळी पडला का? आधीच्या शॉटला मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह अडवल्यावर हेजलवूडने त्याच्या दिशेने बॉल फेकला आणि 'बघाबघी' केली. त्यामुळे पुढच्या बॉलला पुन्हा तसाच शॉट मारण्याच्या प्रयत्नात सोपा झेल दिला ?

गिल मस्त खेळला एकदम. दोन्ही ओपनर्सला बर्‍यापैकी सरळ बॅटने खेळताना बघून भारी वाटलं!. Happy

Against the run of play म्हणतात कॉमेण्टेटर्स तशा दोन्ही विकेट्स गेल्या काल. गिल तर मोठी इनिंग खेळेल असे वाटले होते. त्याची स्टाइल एकदम वेगळी वाटते. एकदा बॉल ला बॅट लागली की त्या बॉल पुरते बॅटचे काम झाले अशा थाटात तो तेथेच थांबतो. हेच द्रविड असता तर ती बॅट फिरून डाव्या खांद्यापर्यंत जाउन थांबली असती Happy

त्याची स्टाइल एकदम वेगळी वाटते. >> +१ अजिबात फॉलू थ्रू नसतो कधी. पुल सारखा खणखणीत फटका सुद्धा डिफेन्सीव्ह पुश केल्या सारहा खेळतो. अफाट टायमिंग असणार.

सर जडेजा ला उद्या वर पाठवायला हवे. नुसतेच डावे उजवे नाही तर फॉर्म सुद्धा परफेक्ट आहे.

"त्याची स्टाइल एकदम वेगळी वाटते" - येस!! he presents a full face of the bat - इतकं की त्याच्या बॅट ची रूंदी बाकीच्यांपेक्षा उगाचच जास्त वाटते. गूड फाईंड!!

एक गंमत वाटली - १९८८ पासूनच्या भारताच्या अंडर-१९ च्या टीम्स पाहिल्या तर विराट कोहली चा सणसणीत अपवाद वगळता, टीम कॅप्टनपेक्षा त्या टीममधल्या व्हाईस-कॅप्टन किंवा इतर खेळाडूंना पुढे कारकिर्दीत जास्त यश मिळालंय. अपवादात्मक परिस्थितीत शॉ आणी गिल, दोघंही चमकले तर भारतीय क्रिकेटसाठी सोने पे सुहागा ठरेल.

लंच १८०-४.
रहाणे पुजारा विहारी पुन्हा सगळे पायात बेड्या घालून खेळत होते. अपेक्षेप्रमाणे पंत आला आणि गेम फास्ट झाला.
पुन्हा पंतने ऑस्ट्रेलियात किमान २५ धावा केल्यातच..:)
पण मोठी इनिंग हवी आज. सामन्याच्या निकालात फरक पाडणारी...

८/२१५
अरे काय मोठ्ठे शेपूट आमचे!!

Pages