क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेपटामुळे फॉर्मातल्या जडेजाची फलंदाजी फुकट जातेय. पुजारा उभा राहिला असता त्यासोबत तर अजून एक भागीदारी झाली असती..

भारताला मोठा धक्का, जडेजा आणि पंत दोघेही injured, आता available नसतील
>>>>>>
बादच झाले का? फलंदाजीला नसणार का? मग सोडा आता सामना...

४ थ्या दिवशी खेळ नेण्यात गोलंदाज यशस्वी.. फक्त उद्या हारवायचे की परवा हे कांगारू ठरविणार.. आता वाचण्यासाठी वरुण देवाची प्रार्थना करणार भारतिय संघ!!

जडेजा चा अंगठा fracture आहे, दुसऱ्या डावात गोलंदाजी आणि फलंदाजी पण करता येणार नाही तसेच शेवटच्या कसोटीत पण खेळू शकणार नाही. पंत फलंदाजी करू शकेल. ही कसोटी तर गेलीच पण आता पुढची पण कठीण आहे. जडेजा नसल्यामुळे 5 गोलंदाज खेळवता येणार नाहीत आणि 4 गोलंदाजातील दोन मुख्य गोलंदाज बुमराह आणि अश्विन आताच थकल्यासारखे वाटत आहेत.

४०७ टारगेट
१३८ ओवर
जिंकायला खेळा आता
पुजाराने थोडे आक्रमक खेळावे. ऑसी गडबडून जातील..

सामना जिंकणे किंवा अनिर्णित ठेवणे अतिशय कठीण आहे, अनिर्णित जरी ठेवला तरी मागच्या कसोटीतील विजयापेक्षा मोठी achievement ठरेल.

पुन्हा सलामी २० ओवर खेळले रे..
या आधी एकाच सामन्यात दोन्ही इनिण्गला हा पराक्रम १६ वर्षांपूर्वी झालेला.. आणि तो देखील मायदेशात झालेला Happy
परदेशात वा आशियाबाहेर झालेला तरी का हे शोधावे लागेल

आल्या आल्या रहाणेने नांगी टाकली...

आणि स्मिथने रडीचा डाव चालू केलाय... ड्रिंक्सब्रेकमध्ये बॅट्समनच्या गार्ड्मार्कवर पायाने मुद्दाम खड्डा केल्यासारखं केलं... लायनला मदत व्हावी म्हणून??

त्यातले किमान एक तरी (अर्धेही चालेल) लाल बॉल समोर ऑस्ट्रेलिआमधे येईतो माझ्यासाठी तरी हि पुंगीच >>>>> रोहीतने किमान एक नाही तरी अर्धे का होईना शतक लालबॉल समोर ऑस्ट्रेलियामध्ये मारले. मग असामी, आता गाजराची पुंगी म्हणायचं की नाही ? Happy

पंतने सणसणीत सिक्स हाणल्या लियॉनला!

पंत येडा झालाय...
मी ऑफिसला जात नाही आता.. वर्क फ्रॉम होम सांगतो साहेबांना

गेला Sad

पुजाराही गेला..
जडेजा नाहीये
चला कामाला लागा...
पण मजा आली जे काही क्रिकेट पाहिले

हिंदूस्तान चहापाना पर्यंत २८०\५. अजुन एक भागीदारी ऑस्ट्रेलिया ला विचार करायला भाग पाडेल. जाडेजा तयार होऊन बसला आहे. कदाचित खेळायला पण येईल. महत्वाचं आहे अश्विन आणि विहारी किती जवळ जाता लक्ष्याच्या.
कारण विहारी खुप चाचपडतोय. आवरलं असुन ऑफिस ला गेलो नाहीये. अनिर्णित ठेवली तरी खुश आपण.

आता ड्रॉ साठीच खेळावे. तरच मालिका विजयाच्या आशा राहतील.
जडेजा पॅड बांधून तयार असला तरी बॉल तटवायलाच येणार, कमीत कमी वेळासाठी येईल हे आश्विन विहारी यांनी बघावे.

Ponting supported Pant's approach in fourth innings. If Vihari could have batted little fast we could won the match. Still we have chance.

गेमप्लान आतूनही ठरतो.
पंतला पुढे पाठवले तेव्हा लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन ईतकाच हेतू नसून त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करायची मुभा दिलेली हे स्पष्ट होते.
विहारी आल्यावर लगेच पुजारा गेला नसता तर कदाचित मॅच वेगळी पुढे सरकली असती. पण पुजारा गेल्यावर आश्विन-विहारी मागे जखमी जडेजा पाहता प्रश्नच नव्हता जिंकायचा प्रयत्न करायचे. त्यातही आश्विनचा नैसर्गिक खेळ आक्रमक नाही, त्याचे शेवटचे अर्धशतक किंवा शेवटचे १०० चेंडू केव्हा खेळलेला ते सुद्धा आठवत नाही. अश्यात सामना वाचवायला खेळायचे या शिवाय पर्यायच नव्हता. तश्याच सूचना असाव्यात. तो तसाच खेळला. वेल प्लेड बोथ, विहारी अ‍ॅण्ड आश्विन ...

आता फक्त ४ ओवर बाकी Happy

विहारी, मॅन ऑफ द मॅच फॉर मी.
>>>
बहुतेक स्मिथला देतील सामनावीर.

भारतासाठी मात्र माझ्यामते पंतची इनिंग स्पेशल होती. त्याने मोमेंटम चेंज केले, ऑस्ट्रेलियन गोलंजानांना डोईजड होऊ दिले नाही, किंबहुना बॅकफूटवर ढकलले. अन्यथा रहाणे आज लवकर गेला तिथे विहारी आला असता तर पहिले म्हणजे आपण तिथूनच घाबरत सामना वाचवायला खेळलो असतो आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाज आणखी डोक्यावर चढून बसले असते. सामना वाचवायला दिवस खेळून काढायचा या दबावाखाली खेळणे फार अवघड असते जे पंतने आपल्यावर येऊच दिले नाही.

सामना अनिर्णित!
विहारी, अश्विन ४३ षटके खेळून काढली! कांगारू निराश होऊन चिडचिड करीत होते तरी दुर्लक्ष केले!
जडेजाला पॅड बांधून बसलेला दाखविल्याचा परिणामही बहुदा कांगारूंवर झाला असावा. त्याचा मानसिकतेवर परिणाम थोडा तरी झाला असे मला वाटते (पंत इफेक्ट).

सलाम आपल्या पोरांना !!
' बाॅडी लाईन ' म्हणण्या इतपत आंखूड टप्पयाची ' मिडल-लेग स्टंप ' गोलंदाजी केली ऑसी तेज गेलंदाजांनी !

झकास कामगिरी.
पंत आऊट झाला नसता तर जिंकलो पण असतो.
विहारी अन अश्विन ड्रॉ साठी कमाल खेळले.

पण राहून राहून एक विचार डोक्यात येतोय.
आपलं टीम कंपोझिशन हे विनिंग टीम कंपोझिशन बिल्कुल नव्हतं. खूप मोठी टेल घेऊन खेळलो आपण.
दोन ओपनर्स + पुजारा, कोहली, रहाणे हे किमान ५ पूर्ण फलंदाज एरवी टीम मधे असतात. ६ नंबरचा विहारी हा डेसिग्नेटेड ऑलराऊंडर. सातवा कीपर अन नंतर चार बोलर्स ज्यात किमान एक बरी बॅटिंग करणारा (देशात अश्विन-जडेजा दोघंही असल्यानी २).
आत्ताच्या टीममधे आपण ४ पूर्णवेळ बॅट्समन सह खेळलो, हे डावपेच यशस्वी करायचे असले तर या चौघांपैकी किमान दोघांनी फायर होणं मस्ट आहे. गेल्या सामन्यामधे रहाणे अन गिल खेळले, खालून पंत अन जडेजाचा भक्कम सपोर्ट मिळाला म्हणून आपण जिंकलो. या सामन्यात या चौघांकडून म्हणावी तशी कामगिरी झाली नाहे (पुजारा अन रहाणे तर आपण गेल्यावर सगळे गडगडणारच अशा भावनेतूनच खेळताना दिसले). त्यात मल्टिपल इंज्युरीज झाल्यानी पंत-जडेजा बद्दल साशंकता होती (पंत कमाल खेळून गेला. मिसिंग पाचव्या बॅट्समनची भूमिका त्यानी समर्थपणे पेलली, पण तशी त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा ठेवता येणार नाही, कारण मुळात तो कीपर आधी आहे, बॅट्समन नंतर.) हेच अश्विन बद्दल. विहारी सहावा बॅट्समन म्हणून पर्फेक्ट आहे, पण त्याच्याकडून पूर्ण बॅट्समन इतकी खेळी नाही एक्सपेक्ट करता येणार.

तस्मात पुढची मॅच जिंकायची असेल, तर आणखी एक पूर्ण बॅट्समन संघात येणं गरजेचं आहे.

Pages