क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताने सैनी च्या जागी कुलदीप ला घेतले असते तर परिस्थिती खूप वेगळी असती, आता सैनी गोलंदाजी करू शकणार नाही या सामन्यात, मोठी चूक ठरणार

भारताने सैनी च्या जागी कुलदीप ला घेतले असते तर परिस्थिती खूप वेगळी असती
>>>>>
त्या केसमध्ये तो शार्दुलच्या जागी आला असता ..
आता आपण ईतकेच नशीब समजूया की ५ गोलंदाज असल्याने आता निदान ४ तरी राहिलेत, अन्यथा ३ गोलंदाजांनी खेळावे लागले असते. त्या केसमध्ये जिंकायची आशा आणखी कमी झाली असती कारण रन्स कितीही मारा, कसोटी जिंकायला समोरच्या २० विकेट घ्याव्या लागतात.

भारताने सैनी च्या जागी कुलदीप ला घेतले असते तर परिस्थिती खूप वेगळी असती, आता सैनी गोलंदाजी करू शकणार नाही या सामन्यात, मोठी चूक ठरणार >> ठाकूर, सुंदर नि नटराजन (त्यातल्या शेवटच्या दोघांचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड बघता) फक्त फास्ट बॉलिंग ला बूस्ट देणे जरुरीचे असल्यामूळे (फास्ट पिच वर सैनी चा पेस नि बाऊन्स एक्स्ट्रॅक्ट करायची अ‍ॅबिलिटी ) ह्या जोरावर योग्यच होते सिलेक्शन. एकच स्पिनर हवा असेल तर यादव हवा होता पण अननुभवी बोलींग मुळे शक्य तेव्हढी बॅटींग पॅड अप करण्याचा हा प्रयत्न आहे हे उघड आहे.

अजून तरी पिच लाईव्ह्वाटत नाही बाउन्स वगळता तेंव्हा पहिल्या इनिंग मधे बॅटींग जोमाने करावी लागेल. आपला फर्स्ट चॉईस संघ नाही हे बघता ड्रॉ इस विन टू.

बॉलिंग अ‍ॅटॅक मधे अनुभवाचा अभाव काल चांगलाच जाणवला. फास्ट बॉलर्स चा स्पीड कमी होता आणी दिवसाखेरीस तो कमी होत गेला. लाईन-लेंथ मधे शिस्तीचा अभाव दिसत होता. टी-२० चा प्रभाव बराच जाणवला - पेशन्स ने एक प्लॅन आखून त्याप्रमाणे बॉलिंग करण्यापेक्षा, खूप व्हरायटी आणायचा प्रयत्न दिसला. त्यामुळे बॅट्समेन वर सातत्यानं प्रेशर निर्माण नाही झालं.

सैनी ची दुखापत म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. लबुशेन चा रहाणे ने सोडलेला कॅच अगदीच चुकीच्या वेळी झालेली जखम होती. त्यावेळी ग्रीन-वेड जोडी मैदानात आली असती तर बॉलर्स चा उत्साह वाढला असता. असो. दुसर्या दिवशी दुपारपासून पावसाचा अंदाज आहे. पण त्याआधी पहिल्या सेशनमधे ऑस्ट्रेलियाच्या बॅटींग ला रोखलं पाहिजे.

"पण अननुभवी बोलींग मुळे शक्य तेव्हढी बॅटींग पॅड अप करण्याचा हा प्रयत्न आहे हे उघड आहे." - सहमत!! कुलदीप बहुतेक 'इतक्या अननुभवी बॉलिंग नंतर लाँग टेल नको' ह्याच लॉजिकने बाहेर राहिलेला दिसतो.

"पहिल्या इनिंग मधे बॅटींग जोमाने करावी लागेल" - +१ - ह्या मॅच मधे आपली मदार बॅटींगवर जास्त आहे. तेव्हा सगळ्या नव्या-जुन्या, अनुभवी-नवख्या बॅट्समेन ने टिच्चून बॅटींग करायला हवी.

*ह्या मॅच मधे आपली मदार बॅटींगवर जास्त आहे.* 100% सहमत. पहिल्या डावात आघाडी मिळवणं अत्यावश्यक. तरच ऑसीज दबावाखाली आल्याने आपली गोलंदाजी प्रभावी होण्याची शक्यता.
सुंदर फ्लाइट छान देतो व seems to be imparting lot of spin to the ball. थोडं वैविध्य आणत गेला गोलंदाजीत, तर खूप उपयुक्त ठरेल असं वाटतं .
नटराजनने उजव्या फलंदाजांना 'ओव्हर द विकेट ' गोलंदाजीचा अधिकाधिक उपयोग करून बघायला काय हरकत आहे ? स्टार्कचं उदाहरण समोर आहेच कीं..
विकेटचा अंदाज घेतां, आपली फलंदाजी बहरायला अडचण येवूं नये. आशा करूंया व शुभेच्छा देवूंया.

शर्मा क्लास खेळतोय आज, सुरुवातच झालीय पण आज मोठी खेळी करेल, केली पाहिजे असे वाटते...

श्या.. काय केले.. काय शॉट मारला उचलून लायनला.. अगदीच अनावश्यक.. छान टचमध्ये होता.. वाया घालवले एका चुकीने

जुन्या हायलाईट मध्ये बकनरने सचिनला बघितलं काय कसा आऊट दिला? म्हाताऱ्याला 83 चा पराभव जामच जिव्हारी लागलेला दिसतोय.

*म्हाताऱ्याला 83 चा पराभव जामच जिव्हारी लागलेला दिसतोय.* - 'कपिल शर्मा शो 'मधे हल्ली '83 ची आपली टीम आली होती. त्याची व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप दाखवायला हवी बकनरला. वैतागून थयथयाटच करेल तो !! Wink

एक सहज डेटा गोळा केला हा संघ बहुदा आजवरचा गेल्या काही वर्षातील सर्वात कमी कसोटी सामने खेळलेला संघ असावा.
२ खेळाडू ५० च्या वर सामने खेळलेले.
१. पुजारा- ८० सामने
२. रहाणे- ६८ सामने
३ खेळाडू १० पेक्षा जास्त सामने खेळलेले.
१. ऱोहित - ३२ सामने
२. पन्त - १५ सामने
३. आग्रवाल- १३ सामने
बाकी ६ जण ०-२ सामने खेळलेले.
सरासरी १९.४५ सामन्यांचा अनुभव ११ खेळाडूंचा..
ह्यांनी सामना अनिर्णित राखला तरी भारताने कांगारुना त्यांच्या देशात दणका दिला म्हणायला हरकत नाही!

*ह्यांनी सामना अनिर्णित राखला तरी ...* - ह्यानी सामना जिंकला तर.... ! सर्वाधिक दुखापतग्रस्त यादीचा एक विक्रम तर आधी आहेच नांवावर ! Wink

खेळपट्टीला आज अचानक जाग आली ! पंत व सुंदरची जोडी निदान ऑसीजची आघाडी नाममात्र ठेवतील असं वाटत असताना पंत सोडलेल्या चेंडूला बॅट घालून अगदींच अजागळासारखा बाद झाला ! अजूनही आघाडी 50 धांवाचया आसपास ठेवली, तरीही आतांच्या पीचवर मॅच रंगतदार होवूं शकते ( आशावाद भ्रामक असला तरी त्याज्य कां समजावा. क्रिकेट आहे हें !)

गिलचा अपवाद वगळता बाकीचे ५ जण स्टार्ट मिळून गेले..
आता शार्दुल आणि सुंदरलाही स्टार्ट मिळालीय पण त्यांनी मोठी खेळी खेळावी अशी अपेक्षा धरता येणार नाही.. तरी खेळली तर मजा येईल.. या दौरयात जे काही चमत्कारीक घडतेय ते पाहता लढायचे सोडू नका अखेरपर्यंत.....

टी टाईम - भारत - 252-6 . 7व्या विकेटसाठी नाबाद 67 ची गाब्बावर विक्रमी भागीदारी ( सुंदर व शारदूल ) !
*अश्विन जर खेळू शकत नसेल तर वॉशिंग्टन सुंदर ला खेळवयला हवे, *- 'साधा माणूस', तुम्ही स्वत:ला म्हणवता तसे साधे वाटत नाहीं. सुंदर वाशिंग्टनच सिद्ध करतोय हें ! Wink
सुंदर- good technic, excellent temperament & exemplary application of mind !!

*लढायचे सोडू नका अखेरपर्यंत.....* +1000 !

शार्दूल पण चांगला खेळतोय..... अर्थात त्या दोघांकडून असलेल्या बॉलिंग ऑलराउंडर च्या अपेक्षा ते नक्कीच पूर्ण करतायत!

<<<'साधा माणूस', तुम्ही स्वत:ला म्हणवता तसे साधे वाटत नाहीं. सुंदर वाशिंग्टनच सिद्ध करतोय हें ! Wink>>>

सहमत... Proud

*शार्दूल पण चांगला खेळतोय..... * +1. त्याचे कव्हर ड्राईव्ह तर द्रवीड, सचिन इ.ची आठवण यावी , इतके नेटके होते !
उद्याचं पहिलं सत्र निर्णायक ठरेलच असं नसलं तरीही निकालाची दिशा ठरवणारं असेल. ऑल द बेस्ट, इंडिया!

काय सुरेख खेळली पोरं. पहिली मॅच सोडली तर बाकी सिरीज मध्ये मजा आणली पोरांनी. असा लढवय्येपणा असावा मग हरले तरी फिकीर नाही.

त्याचे कव्हर ड्राईव्ह तर द्रवीड, सचिन इ.ची आठवण यावी , इतके नेटके होते ! >>> भाऊ - मी ही काल पाहताना हेच म्हणत होतो सारखा. काय जबरी खेळत होता शार्दुल ठाकूर! तो 'निप बॅक' होणारा व कोणालाही खेळायला जड जाइल असा बॉल नेमका तेव्हा पडला नसता, तर ही जोडी आणखी शंभरएक रन्स सहज करेल असे वाटले होते काल. अगदी पेशण्टली खेळत होते.

४०० विकेट्स सहज पूर्ण करेल असा गाजावाजा केलेला आणि शंभरावी टेस्ट खेळणारा लायन काल चाचपडत होता, तर पहिलीच टेस्ट खेळणारा वॉशिंग्टन सुंदर त्याला अगदी सहज खेळत होता. आणि या मॅच मधे तोपर्यंत (आणि अजूनपर्यंत) त्याने काढलेल्या विकेट्स आणि केलेले रन्स लायनपेक्षा जास्त आहेत Happy

खरे म्हणजे हा नवखा. समोरचा बोलिंग अ‍ॅटॅकही वर्ल्ड क्लास. मात्र त्याच्या डावात पुढे पुढे हाच सिनीयर बॅट्समन असल्यासारखा स्ट्राइक रोटेट करणे, चान्स मिळेल तेव्हा शॉट्स मारून रन्स काढत राहणे, बाउन्सर्स शब्दशः अंगावर घेणे वगैरे करत होता. त्याचा खेळ पाहताना फारसा अनुभव नसलेला व पहिलीच टेस्ट खेळणारा फलंदाज आपण पाहतोय असे अजिबात वाटत नव्हते. टोटल रिस्पेक्ट!

काल संपूर्ण पाहिला डाव! शार्दूल आणि सुंदरने दाखवून दिले कसे खेळायला हवे इथे. ज्यापद्धतीने दोघांनी डिफेन्स आणि अ‍ॅटॅक यांचे मिश्रण करून दमविली कांगारूंना. जलदगती गोलंदाज आता बीमरचा मारा करतात की काय असे वाटत होते त्यांचा नंतरचा त्वेष बघून. शार्दूल बाद झाल्यावर सुंदरने थोडे आक्रमक धोरण घेतले असते तर कदाचित ३६९ पार देखिल झाले असते तो आक्रमक फलंदाजी करू शकतो.

तरीही दोघे अप्रतीम खेळले. त्यांचा खेळ पाहून आपला डाव किती धावांवर घोषीत करावा ह्या संभ्रमात कांगारू नक्कीच पडतील.
खेळपट्टी भेगाळली आहे त्याचा फायदा नक्कीच गोलंदाज उठवतील पण कसे खेळावे ह्याचे प्रत्यक्षिक पुजारा, रहाणे आणि मयांक ह्यांना मिळाले आहे त्याचा ते उपयोग करून घेतील. Happy
सध्या पावसाची बॅटिंग सुरु बघुया तो किती षटके खातो ते.

*डाव किती धावांवर घोषीत करावा ह्या संभ्रमात कांगारू नक्कीच पडतील.* -
तो प्रश्न सोडवलाय आपल्या गोलंदाजांनी !
' Uneven bounce ' ची जाणीव हवी पण धास्ती नको, ही तारेवरची कसरत जमवणं ही उद्याची फलंदाजीची खरी कसोटी आहे ! जिंकण्यासाठी खेळायचं पण 'ड्राॅ' चा पर्याय लक्षात ठेवून इनींगजचं नियोजन करायचं, ही दुसरी कसोटी आहे.
या दोन्ही कसोटींना उतरण्याची क्षमता, आत्मविश्वास व जिद्द आतां या संघात आहेच. आमच्या सदिच्छेचं पाठबळ तर आहेच आहे ! चला तर, सुनवाच त्याना, ' Aussies, now we are the bosses !! '

उद्या दुपारी ३ नंतर पावसाचा अंदाज आहे म्हणे!
दोन सत्रात इतक्या धावा निघणे अवघड आहे त्यामुळे ड्रॉसाठीच खेळावे.
ड्रॉ हा नैतिक आणि मानसिक विजयच आहे Happy

रोहित उद्या फास्ट खेळून विजयश्री खेचून आणणार आहे. तो आनंद साजरा करायला पाऊस पडणार आहे. लगान शेवटचा सिन.

सामना फार अवघड आहे. जिंकणे अशक्य तर अनिर्णित राखणे तितकेच अवघड.
अखेरच्या सत्रात पाऊसाची शक्यता लक्षात घेता ड्रॉ हेच लक्ष्य असावे डोक्यात, पण खेळताना ते समोरच्याला जाणवू देऊ नये ईतपत सकारात्मक खेळावे अन्यथा ऑस्ट्रेलियन सुरुवातीपासूनच घेराव टाकतील...
शर्मा आणि गिल यांना तसेही कुंथणे फारसे जमणार नाही, प्रश्न ते बाद झाल्यावर रहाणे पुजारा जोडी मैदानावर आल्यावरचा आहे.
त्यामुळे पहिली प्रार्थना हिच की सलामी जोडी जास्तीत जास्त टिकावी.
त्यानंतर ऋषभ पंतला किंवा किमान मयंक अग्रवालला जरा पुढे पाठवून बघायला हवे जेणेकरून पुजारा रहाणे जोडी जमू नये, दोघे सुटेसुटे क्लास प्लेअर आहेत पण एकत्र असले की शेलमध्ये जाऊन खेळण्याची शक्यता वाढते. उगाच त्याने गोलंदाज डोक्यावर चढतात आणि त्यांना लय मिळून जाते.

Pages