क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओव्हरनाईट पावसामुळे खेळ उशीरा सुरू व्हावा आणी नंतर भारताने टिच्चून बॅटींग करावी. पीच खेळायला अवघड होत चाललंय. त्यामुळे दोन सेशन्स खेळून काढणं अवघड असणार आहे. चांगल्या बॉल ला किंवा पीचवरून कमी-जास्त उसळलेल्या बॉलवर विकेट जाण्याची शक्यता 'अराऊण्ड द कॉर्नर' असणार आहे. त्यामुळे विकेट्स गिफ्ट देऊ नयेत ही अपेक्षा.

पाऊस उद्या दोन प्रकारे मदत करेल. एक म्हणजे वेळ कमी करेल. दुसरे म्हणजे खेळपट्टीला तडे फार जाऊ नयेत. तुर्तास अनप्लेयेबल वाटत नाहीये. टेंपरामेंट आणि माईंडगेम मॅटर्स.. उद्याचा सामना अनिर्णित राखणे हाच या मालिकेचा पर्रफेक्ट क्लायमॅक्स आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी राखायची आहे ऊद्या. बोलो आमीन Happy

आरे धमाल मॅच चालूय... गिल गेला ९१ मारून.. पुजारा बसलाय नांगर टाकून..
आणि आता खुद्द कर्णधार रहाणेने लायनला पुढे सरसावत सिक्स मारून आपले ईंटेंशन क्लीअर केले..

२० बॉल २३ रहाणेची सुरुवात.. समोर पुजारा १५१ बॉल ३४
पंत तंबूत बसलाय आहे ऑस्ट्रेलियाच्या डोक्यावर धरलेली तलवार म्हणून..

रहाणे मारायचा नादात गेला.
मारू का सोडू मधे अडकला...

क्रिकिन्फो वर वाचलेलं एक स्टॅट :
Up until the end of the 52nd over of the innings Cheteshwar Pujara had faced 62 short or short-of-good-length balls from the Australia's pacers. He has been out of control against only 10 of those balls. But six of those 10 balls have hit him on some part of the body or his helmet.

त्याच्या बोटांवर बॉल लागल्यावर त्याची जी काही प्रतिक्रिया होती ती बघून वाटले आता जातोय हा पॅव्हेलियनमध्ये परत.... पण पठ्ठ्या नेटाने खेळतोय!

रहाणेचा आक्रमक खेळ व षटकार निश्चितपणे जिंकण्याचा पर्यायही खुला ठेवण्याच्या योजनेचा भाग असावा. बाद झाला तरी पॉझिटीव्ह वृत्ती बळावते संघाची.

अविश्वसनीय अदभुत...
सुंदरचे कमिन्सला फोर सिक्स आणि पंतचे लायनवर आक्रमण या दोन ओवरनी सामना भारताकडे झुकवलाय...
२ ओवर २६ आले
आणि आता ६ ओवर २४ शिल्लक

रोहित उद्या फास्ट खेळून विजयश्री खेचून आणणार आहे. तो आनंद साजरा करायला पाऊस पडणार आहे. लगान शेवटचा सिन.>>>> मी कालच बोललो होतो. ऋषभच लिहिणार होतो पण टायपो एरर झाली.

मॅच नंतर झेंडा घेऊन फेरि मारताना रहाणेनी आधी पंत कडे आणि मग शार्दूल - सिराज कडे झेंडा देणं
आणि नाथन लायनला शंभराव्या सामन्याबाबत टीम इंडियानी टोकन देणं

sportsmanship at its best

*sportsmanship at its best* - Rahane comes out with flying colours , as a player, captain & strategist !! Keeping both options ( Win & Draw) actively open at every stage of the match is a highly skilled job !! Rahane did this enviably well knowing, inspiring & using every resource at his disposal ! Great !!!
आज पंत जबाबदारीने, संयंमाने व विश्वासाने खेळला. नवीन चेंडूवर ऑसीजचा खरा भरवसा होता. त्याचवेळी तीन कडक कव्हर ड्राईव्ह मारून त्याने त्या भरवशाचाच पचका केला. सुंदर; नेटकी इनींगज बांधली त्याने. अभिनंदन व शुभेच्छा !

याहू !!!!!!!
प्रचंड खूष आज !!!
ही सीरीज विन स्पेशल आहे....
२०१८ मधे स्मिथ व वॉर्नर नव्हते.. पण ह्या सीरीजमधे कांगारूंना रडायला काहीच जागाच नाही.... पूर्ण चितपट केले आहे पहिली कसोटी सोडुन....
३र्या फळीतील गोलंदाज, कप्तान घरी... तरी मानल ह्या टीमला.....
आज गिल, पंत आणी दगडी भिंत चेपुचे भरपूर कौतुक !!! प्रचंड आनंद !!!!

या विजयाचा पाया आधी अश्विन्/विहारीने मागच्या सामन्यात तर पहिल्या डावात शार्दूल आणि सुन्दर ने रचला!
नवोदित गोलंदाजांनी कमालीची भेदक गोलंदाजी केली.

गिल/पंतची आफाट फलंदाजी तर पुजाराची मजबूत भिंतीची लढत ! कमिन्सचे कितीतरी तोफगोळे अंगावर झेलले त्याने!
रहाणेचे कल्पक नेतृत्व आल्याबरोबर षटकार खेचून आम्ही जिंकण्यासाठी खेळतोय हे दाखवून दिले.
एकंदरी खूप दिवसांनी एकसंध अशी सांघिक कामगिरी!

कमाल विजय होता हा! सकाळपासूनच धुंदीत आहे. हे बघायला मी होतो, हे माझ्या पुढील आयुष्यामधल्या संचितापैकी एक असेल. भारतीय संघाने आज जबरदस्त कामगिरी केली आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. वेल डन टीम इंडिया!

भन्नाट विजय !! पुजाराने किती बॉल्स अंगावर घेतले. फार शेकून निघाला पण टिचून राहिला. गिल आणि पंत ने भारी मारामारी केली. शेवटी एकदम कसे जिंकता येईल याच उद्देशाने खेळले. जबरी. फार भारी वाटले - ऑसिज ना त्यांच्या देशात इतक्या नविन संघाने हरवले. ( संगमनेरचा सुपुत्र रहाणेचे अधिकच कौतुक Wink )

लिहा रे अजून भरभरून.. मला तर आज फक्त जिथे तिथे वाचावेसेच वाटतेय.. मॅच संपली तेव्हा नुसते नाचावेसेच वाटत होते,, ते सुद्धा दादासारखे शर्ट फिरवून गॅलरीत उभे राहून Happy

कोणीतरी लेखही टाका आजच्या विजयावर.. या अख्या मालिकेवर... कारण ३६ ऑल ऑट नंतर जे झाले ते निव्वळ अदभुत होते !

मी कालच बोललो होतो. ऋषभच लिहिणार होतो पण टायपो एरर झाली.
>>>
मी हि भविष्यवाणी दोनेक वर्षांपूर्वीच केली होती .. किंबहुना जेव्हा स्टोक्सने जिंकवून दिलेले तेव्हाही हेच म्हटले होते की एक दिवस ऋषभ पंत अशी खेळी करून आपल्याला परदेशात जिंकवून देईल.. मागच्या सामन्यात त्या लयीत खेळूनही विजयश्री हुकली, कारण नियती आजच्या क्लायमॅक्सचीच वाट बघत होती.

अरे, तुझा बापूस माझ्या नांवापुढे 'पंत' लावतो ना ! तूंही आजपासून तसंच करायचं व गांवातल्या पोरांनाही तसं सांगायचं !!20210119_225628_4.jpg

प्रचंड भारी मॅच !! फार मजा आली.
२०११ च्या वर्ल्डकप नंतर जश्या सगळ्या बातम्या, फेबुवरच्या पोस्टी पुन्हा पुन्हा वाचल्या होत्या तश्याच आज वाचतो आहे सकाळपासून !

अविश्वसनीय प्रकार होता सगळाच. मी रात्री मधे उठून परत एकदा स्कोर चेक केलाक्कि हे सगळे स्वप्न तर नव्हते म्हणून. कुठेही काही कमेंट्स टाकाव्या असेही वाटत नव्हते.

१. सामना संपल्यावर शॉ धावत आल नि पंट च्या अंगावर उडी मारून बसला. पंत ने पुजारा ला आलिंगन देताना अलगड दिले नेहमीचा धसमुसळेपणा बाजूला ठेवत काय जबरदस्त एकी आहे टीम मधे. नो वंडर दे पुल्ड ऑफ हाईस्ट.
२. कालचा दिवस सेशन बाय सेशन खेळत शेवटी काय ते बघू असे ठरवल्याचे वाटले. कुठे ही बॉलर्स ना डोईजड होउ द्यायचे नाही , एखादा डोईजड होतो आहे असे वाटले तर त्याच्या विरुद्ध योग्य रितीने कंट्रोल्ड अ‍ॅग्रेसिव्ह व्हायचे असे ठरवून खेळले असे वाटले. गिल टेकिग ऑन शॉर्ट पिच्ड बॉल्स, राहणे नि पंत ने लॉयन ला दिलेली ट्रीटमेंट.स, सुंदर नि पंत नी सहा चा रेट झाल्यावर दोन ओव्हर्स मधे खेळलेले शॉट्स. जबरदस्त मॅनेज केलय सगळे.
३. पुजारा काल जवळजवळ तीस ओव्हर्स एकटा खेळलाय. कमिन्सचा २५% कोटा पूर्ण सिरीज मधे त्याने एकट्याने हाताळला आहे. काढलेल्या धावा बाजूला ठेवा , निवाळ किती वर्क लोड त्याने एकट्याने तयार केला समोरच्यच्या मुख्य बॉलर्स साठी ते बघितला तरी थक्क व्हायला होतेय.
४. पंत हेझलवूड ला पूल मारताना खाली पडला तो कसला भारी शॉट होता. फ्रंट वर कमीट झाला होता नि एकदम अ‍ॅडजस्ट करत पुल केला . कसल्याही पोझीशन मधे नसताना मारलेला शॉट चार देऊन गेला.
५. सुंदर ने मारलेला हूक कडक होता. खूप दिवसांनी पायावर स्विवेल होत असा सिक्स मारलेला बघितला.
६. पेन, लबू, वेड ह्यांचा आवाज काल एकदमच कमी होता. चौथ्या सामन्या नंतर च्या स्लेजिंग नंतर तंबी मिळालेली दिसतेय.
७. सामना संपल्यावर वॉरनर ने सिराज ला मिठी शी मारली . आयपील चा परीणाम. बहुधा म्हणून वॉर्नर एव्हढा सॉफ्ट झालाय Happy
७. ठाकूर ला विशेष नमूद केले पाहिजे. रणजी मधे तो बरेचदा असे हँडि हात खेळत आलाय. त्याची वाटत नसताना विकेट घेण्याचची अ‍ॅबिलिटी खतरा आहे. गॅबा वर इतरांपेक्षा त्याला अधिक स्विंग मिळत होता.
७. शास्त्री नि इतर कोचिंग स्टाफ चे पण कौतुक केले पाहिजे. ३६ नंतर हिम्मत हरू न देता, डावपेचआंवर विश्वस ठेवत अशक्य घडवून आणलय. शास्त्रीच्या कोचिंग मधे आपण असे बरेच अविश्वसनीय विजय मिळवले आहेत. कितीही म्हटले तरी त्याचे नशिब भारतीय संघाला लाभतेय खर.
८. ऑसीज ने शॉर्ट पिच्ड चा अति वापर केला असे वाटले. ठाकूर ला बाऊण्सराद्दल वॉर्निंग दिली गेली होती म्हणून जरा जास्तच आश्चर्य वाटले.
९. शेवटी मांजरेकर कॉमेंट्री करत नसल्याचा फायदा होतोय असे किती जणांना वाटतेय ? Happy

Pages