Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"राहुल ओपनिंग सोडून कुठेही
"राहुल ओपनिंग सोडून कुठेही खेळू शकत नाही हा बेसिक वांदा आहे. " - तो तिसर्या क्रमांकावर पण चांगली बॅटींग करू शकेल असं वाटतं. मुळात तो १३ च वन-डेज खेळलाय. त्यावरून अंदाज बांधणं कठीण आहे. पण मिडल ऑर्डर मधल्या शर्मा-धवन ला जर आपण ओपनर्स बनवतो, तर ओपनर असलेल्या राहूल ला ३ र्या नंबर वर पाठवणं तितकसं अवघड नसावं. खरं तर रायडूपेक्षा शंकर जास्त लेव्हल हेडेड वाटला मला. निदान विकेट पर प्राइस तरी ठेवतो. कोहली ३, धोनी / शंकर ४/५, जाधव ६ आणी पंड्या ७ असा लाईन-अप पण चालेल. ७ बॉलिंग ऑप्शन्स मिळतील.
तो तिसर्या क्रमांकावर पण
तो तिसर्या क्रमांकावर पण चांगली बॅटींग करू शकेल असं वाटतं. >> Let me put it this way. Would you prefer you want best person to bat at #3 (Read : Kohli) not to bat at #3 to accommodate Rahul ? कोणीही कुठल्याही क्रमांकावर खेळू शकतो हे बरोबर आहे पण why try to fix which is not broken ? Dhawan, Rohit, Kohli पहिल्या तिघांवर आपण उडतो. वर्ल्ड कपच्या एक सिरीज आधी कसले बदल करणार रे हे असे ? आणी मुख्य म्हणजे का ? पांड्या असेल कि नाही वर्ल्ड कपम्धे हीही शंका आहे रे आता. ombudsman नेमला गेलाय,
असामी, बरोबर आहे तुझं. मला
असामी, बरोबर आहे तुझं. मला कोहली तिसर्या क्रमांकावर येऊन राहूल / शंकर चौथ्या क्रमांकावर येऊ शकेल असं म्हणायचं होतं. सद्ध्या रायडू जितका टेंटेटिव्ह खेळतो त्यापेक्षा कुणीतरी सॉलिड हवा. मग त्या केसमधे कोहली -३, धोनी -४ शंकर-५ असंही करता येईल. पण धोनी मोठ्या चेस मधे चौथ्या क्रमांकावर येऊन कितपत फास्ट खेळू शकेल, ह्याविषयी मला शंका आहे. कदाचित पंत जर चांगला खेळला (पुढच्या दोन वन-डेज मधे) आणी टीम मधे येऊ शकला, तर पंत / धोनी चौथ्या / पाचव्या क्रमांकावर खेळवता येतील. either way, रायडू फारच weak-link आहे.
सद्ध्या रायडू जितका
सद्ध्या रायडू जितका टेंटेटिव्ह खेळतो त्यापेक्षा कुणीतरी सॉलिड हवा >> तो सुरूवातीला एकदम असाच टेंटेटिव्ह खेळतो नि मग एकदम लय सापडते त्याला जर तू मागच्या काही सिरीज बघितल्यास तर पण त्याच्व्हा अर्थ रन्स निघतीलच असेही नाही
पण त्याच्या ability वर धोनी, शास्त्री नि कोहली ला भरवसा आहे त्यामूले तो निघायचे चान्सेस कमी वाटतात (unless IPL throws some surprises)
धोनीला चौथ्या क्रमांकावर जर पडझड झाली असेल तरच येउ द्यावे असे मला वाटते.
पंत रोहित विराट शंकर धोनी
पंत रोहित विराट शंकर धोनी जाधव हार्दिक बुमरह भुवनेश्वर कुलदीप जडेजा or शामि
आज सुडाचा प्रवास चालू आहे..
आज सुडाचा प्रवास चालू आहे....
आज 350+ करनार की नाही......
आज 350+ करनार की नाही...... राहुल पन गेला
बुमराहला जाधवच्या जागी पाठवला
बुमराहला जाधवच्या जागी पाठवला असता तर मस्त सिक्सरवर सिक्सर मारले असते
बुमराहला जाधवच्या जागी पाठवला
बुमराहला जाधवच्या जागी पाठवला असता तर मस्त सिक्सरवर सिक्सर मारले असते>>>
शेवटच्या चेंडूवर मारला षटकार बुमराह ने..
2 तर गेले विकेट.....
2 तर गेले विकेट.....
शेवटच्या चेंडूवर मारला षटकार
शेवटच्या चेंडूवर मारला षटकार बुमराह ने..>>>बुमरामधली ही चुणूक मी आधीच हेरली होती. बुमरा अष्टपैलू आहे उगीच नाय A+ मध्ये टाकलाय त्याला.
<<<सुडाचा>>
<<<सुडाचा>>

अहो तो सुड नसतो, सूड असतो.
छ्या:! एव्हढेहि कळत नाही क्रिकेटमधलं!!
आता आणखी एक दोन विकेट्स घ्या
आता आणखी एक दोन विकेट्स घ्या लवकर! फार टिकले हे दोघे.
275 - 5 ! आतां टिव्हीसमोरून
275 - 5 ! आतां टिव्हीसमोरून हलतां येणार नाही.
मी याला भावी धोनी समजत होतो
मी पंतला भावी धोनी समजत होतो पण हा तर गत जन्मातील साबा करीम निघाला
ऑसीजचं अभिनंदन! टरनर ग्रेट
ऑसीजचं अभिनंदन! टरनर ग्रेट खेळी !! धोनी आज असायला हवा होता व येत्या विश्वचषकासाठी हवाच !!!
झक्की साहेब, मराठीतल्या
झक्की साहेब, मराठीतल्या कित्येक शब्दांचे पहिले अक्षर दीर्घ असते. परंतु जेव्हा तोच शब्द वेगळ्या स्वरूपात येतो (बहुतेक वेळा काही प्रत्यय लागून, किंवा दुसऱ्या शब्दाला जोडून जेव्हा शब्द लांब होतो) तेव्हा त्या शब्दाचे पहिले अक्षर र्हस्व होते. उदाहरणार्थ "वीज पडली" -> "विजेचा धक्का लागला". "मी कुणाला भीत नाही" -> "भित्यापाठी ब्रह्मराक्षस". त्या दृष्टीने "सूड" -> "सुडाचा" योग्य वाटते. हे उच्चारावर अवलंबून आहे. बहुतेक वेळा शब्द जर लांब असेल तर पहिले अक्षर र्हस्व उच्चारले जाते. पण "सूड" -> "सूडबुद्धी" ह्यात पहिले अक्षर दीर्घच हवे.
दवा मुळे हरलो हे कारण
दवा मुळे हरलो हे कारण संयुक्तिक वाटते. डीआरेस चा पण घोळ आहे.
पण अजूनही ४-५-६ नंबरवर बोंब आहे. माझ्यामते परिस्थिती याबाबतीत गंभीर आहे. इंग्लंडमधे १-२-३ नेहमीच प्रत्येक मॅचला खेळतील असे होणार नाही. आता आयपीएलच्या फॉर्मवर निवड होणार. मला अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी आणि मनिष पांडे जास्ती आशादायक वाटतात, रायडू आणि कार्तिक पेक्षा. शुभनम गिलला जास्ती संधी द्यायला पाहिजे होती.
अहो, शुद्धलेखनामुळेच अजून
*दवा मुळे हरलो हे कारण संयुक्तिक वाटते. डीआरेस चा पण घोळ आहे* - आणखी एक - भुवीच्या गोलंदाजीची धार बोथट होत चाललीय ही खूप काळजीची बाब आहे. दुखापतीमुळे त्याच्या खेळात खंड पडला व नंतर पुर्वीचा भुवी पहायलाच मिळाला नाही. देव करो व या गुणी खेळाडूला त्याचा फाॅर्म गवसो !
*.पण "सूड" -> "सूडबुद्धी" ह्यात पहिले अक्षर दीर्घच हवे.* -,
अहो, नातू विचारत होता, ' दीर्घायुष्यातला 'दी' र्हस्व कीं दीर्घ '. मीं सांगून आलेय, आमच्या पुरता तरी तो दीर्घच ठरलाय !
कालची मॅच सलग बघायलाच नाही
कालची मॅच सलग बघायलाच नाही मिळाली. पण नंतर निकाल बघून, नाही पाहिली तेच बरं झालं असं वाटलं. दवाचा परिणाम पहिल्या १० ओव्हर्स नंतरच जाणवत होता. तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती, पण तरी ३५९ धावांचा डोंगर आश्वासक वाटत होता. असो. शेवटची मॅच जिंकायला हवी.
न्यूझिलंड वि. बांग्लादेश टेस्ट खतरनाक चाललीये. पहिले २ दिवस पावसाने संपूर्णपणे वाहून गेल्यावर सुद्धा मॅच निकाल लागण्याच्या स्थितीत आहे.
देव करो व या गुणी खेळाडूला
देव करो व या गुणी खेळाडूला त्याचा फाॅर्म गवसो ! >> +१. दीर्घकाळ बाहेर राहिल्याचा परीणाम नक्कीच जाणवतो आहे. पस्तिसाव्या over नंतर विकेट्स ची सतंतधार लागल्यामूळे आपले थोडे रन्स कमीच निघाले.
फेफे, कोहली राहुलला accommodate करायला चार नंबर वर आला. नि बघ.
अरे मी लिहीलं होतं ना, की
अरे मी लिहीलं होतं ना, की टायपो होता, मला कोहली तिसर्या क्रमांकावर येऊन राहूल / शंकर चौथ्या क्रमांकावर येऊ शकेल असं म्हणायचं होतं. हे लिहीलं की राहून गेलं आता आठवत नाही. पण कोहली ची जागा बदलू नये ह्यात काही वादच नाही. अर्थात परवाची मॅच त्यामुळे नाही हारलो. एनीवे, माझा मुद्दा फक्त रायडू व्हॅल्यू अॅड करत नाही / कन्सिस्टंसी नाहीये आणी त्यासाठी टीम कडे एक पर्याय हवा इतकाच आहे.
अरे तुला फक्त सांगत होतो कि
अरे तुला फक्त सांगत होतो कि जेंव्हा जेंव्हा असे प्रकार केले आहेत तेंव्हा backfire झाले आहेत
भाऊ, मस्तच!
भाऊ, मस्तच!
"जिवाची" मुंबई करत "दीर्घायुष्य" enjoy करा.
आपल्या पराभवाचा एवढा धक्का ?
आपल्या पराभवाचा एवढा धक्का ? कुणाचीच प्रतिक्रिया नाही ?
अजूनही ४-५-६ नंबरवर बोंब आहे.
अजूनही ४-५-६ नंबरवर बोंब आहे. माझ्यामते परिस्थिती याबाबतीत गंभीर होत चालली आहे.
एकच जागा डिबेटेबल आहे - रायडू
एकच जागा डिबेटेबल आहे - रायडू ची. आणी पंत आणी राहूल चा परफॉर्मन्स बघता रायडू च फर्स्ट चॉईस असेल असं वाटतं. बाकी टीम मधे काही बदल (वर्ल्डकपसाठी) संभवत नाहीत.
एकच जागा डिबेटेबल आहे - रायडू
एकच जागा डिबेटेबल आहे - रायडू ची. आणी पंत आणी राहूल चा परफॉर्मन्स बघता रायडू च फर्स्ट चॉईस असेल असं वाटतं. बाकी टीम मधे काही बदल (वर्ल्डकपसाठी) संभवत नाहीत. >> +१. शेवटी रायुडूच आला का रे ?
"शेवटी रायुडूच आला का रे ?" -
"शेवटी रायुडूच आला का रे ?" - असंच वाटतय. बाकीच्यांना संधी साधता नाही आली. त्यातल्या त्यात शंकर ने थोडं पोटेन्शियल दाखवलं, पण बात जमी नही!
विश्वचषकाचे सामने वेगवेगळ्या
विश्वचषकाचे सामने वेगवेगळ्या खेळपट्टयांवर, वेगवेगळ्या संघांविरूदध होणार आहेत . इतक्या कांटेकोरपणे फलंदाजीचे क्रमांक, टीमचं कपोझिशन, ठरवणं खंच शक्य व हितावह आहे का ? त्यापेक्षा, याबाबतीत लवचिकता ठेवणंच, मला वाटतं, अधिक योग्य व ही गोष्ट प्रत्येक खेळाडूने मनावर बिंबवणं आतयंतिक महत्वाचं.
Pages