क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाधव मस्त खेळला परवा. त्याच्या स्टँड अँड डिलीव्हर खेळात बरेच वेळा पुण्यातल्या हाफ-पीच मॅचेस मधल्या बॅटींग ची झाक झळकते.

जाधव चांगला खेळला नि धोनीला क्रेडीट देऊन गेला Happy

जाधव एका पायावर बसून बॉलिंग करतो तो प्रकार महान आहे निव्वळ. मी करून पाहिला, बॉल जवळ्जवळ फेकावा लागतो फुल लेंग्थ हवा असेल तर.

"बॉल जवळ्जवळ फेकावा लागतो फुल लेंग्थ हवा असेल तर." -परत एकदा क्रेडिट गोज टू हाफ-पिच क्रिकेट इन पुणे गल्ली क्रिकेट. Wink

*......नि धोनीला क्रेडीट देऊन गेला * - मीं पाहिलीय ती मॅच . स्वत: केदार जाधव पण हंसेल , कपाळावर हात मारून, हे वाचलन तर !
शिवाय, " राऊळाच्या कळसाला, लोटा कधीं म्हणू नये " , असं बहिणाबाई बजावून गेल्याच आहेत !! Wink

दुसरा सामनाही रंगतदार होतोय. कुणालाही दुखवायचा हेतू नसूनही धोनीच्या reflexes चं कौतुक केल्याशिवाय रहावत नाही. आज जडेजाच्या गोलंदाजीवर डाऊन द लेग जाणारी पुसटशी कट जवळ जवळ विकेटच्या लाईनमधे पकडून त्याने अशक्य झेल घेतला !
आज हरभजन जाधवच्या गोलंदाजीचं कौतुक सतत करत होता. आणखी कसलं सर्टिफिकेट हवंय एका ऑफ स्पीनरला !

WHAT A MATCH ! अभिनंदन भारत !!
शेवटचं षटक विजय शंकरला ( ऑसीजना जिंकण्यासाठी 11 धांवा ) आणि दोन बळी !
अप्रतिम टीम वर्क!

जबरदस्त मॅच!! शंकर ने शांत डोक्याने अचूक लाईन वर शेवटची ओव्हर टाकली. विकेट ला बाऊन्स नसल्यामुळे त्याला लाईन मधून मारणं पण अवघड होतं. वेल-प्लेड इंडिया!!!

WC team अशी असावी : आजचा संघ + राहुल, कार्थिक, पांड्या सिनियर, भुवी. हे पंधरा सगळ्या possibilities नि combo cover करतील.

*हे पंधरा सगळ्या possibilities नि combo cover करतील.* - मला वाटतं, चहल संघात असावा .
विजय शंकरची कालची कामगिरी कौतुकास्पद होती व तो नक्कीच संघातील स्थानासाठी दावेदार ठरतो. पण त्याच्या शेवटच्या षटकाचं यश हें बव्हंशी surprise elementला जातं, हेही मान्य करायला हवं. त्याची निवड पुढील दोन-तीन सामन्यानंतर निश्चित होईल .

कार्थिक कीं पंत , हाही पेंच आहेच. WC इंगलंडमधे आहे व या मालिकेबरोबर गेल्या तिथल्या दौरयातील कामगिरीही लक्षात घेतली जाईलच.

भाऊ, असामी - बव्हंशी सहमत. मला सद्ध्याच्या संघात अंबाटी रायडू जरा वीक लिंक वाटतो. inconsistent batting, indifferent fielding and non-bowling हे कच्चे दुवे वाटतात. त्याच्यापेक्षा फॉर्म मधे असलेला राहूल जास्त सॉलिड वाटतो. मला मनिश पांडे सुद्धा आवडतो, पण तो सद्ध्या टीम च्या प्लॅन्स मधे नसावा.

फेफ - राहुल, धवन, रोहित तिघांनाही स्विंग होत असलेल्या पिचेस वर आत्मविश्वासाने खेळताना पाहिल्याचे लक्षात नाही.

फा, आता असलेल्या पर्यायात फार बदल घडण्याचे चान्सेस नाहीयेत, ह्या अँगलमधून मी लिहीतोय. दुसरं म्हणजे, वन-डे च्या वर्ल्ड-कप ला पिचेस फ्लॅट असायची शक्यता आहे आणी मॅचेस दुपारी सुरू होतील. अगदी ढगाळ, पावसाळी हवेचा अपवाद वगळता, बॅट्समेन समोर टिपीकल इंग्लिश वातावरणाचं (स्विंग बॉलिंग) आव्हान कितपत असेल, ह्याबद्दल मी जरा साशंक आहे.

अगदी ढगाळ, पावसाळी हवेचा अपवाद वगळता, बॅट्समेन समोर टिपीकल इंग्लिश वातावरणाचं (स्विंग बॉलिंग) आव्हान कितपत असेल, ह्याबद्दल मी जरा साशंक आहे. >> एखादा चुकार अपवाद वगळता १००% नसेल. साऊथ आफ्रिके मधल्या किंवा ९९ मधल्या इंङ्लंड मधल्या किंवा २०१२ का तेरा मधल्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधले पिचेस आठवा. ICC will make sure pitches are batting friendly with no or less grass. That suits current English team make up as well.

भाऊ मला चहल ला नेण्याचे चान्सेस कमी वाटतात कारण, इंग्लंड मधे आहे. कुलदीप जास्त surprise element ठरतो नि जाडेजा चीफिल्डींग नि बॅटींग त्याला उजवे ठरवते. जाधव तिसरा आहेच.

रायुडू बद्दल शंका असली तरी त्याला सध्या तरी कप्तान नि कोच नि निवड समितीचे पूर्ण बॅकिंग आहे. आधी IPL होतेय हे चांगली गोष्ट आहे त्यामूले तो सराव तरी करेल. ना ही तर domestic cricket खेळत नसल्यामूळे तो नेहमीच सुरूवातीला चाचपडतो.

कार्थिक कीं पंत , मधे कार्थिक च्या अनुभवामूळे नि पंत च्या सध्या सुमार कामगिरी मुळे कार्थिला उजवे माप दिले जाईल असे वाटते.

विजय शंकर जाईल कारण त्याची बॅटींग त्याला रायुडू साठी बॅ़अप बनवते. त्याची हिटींग अ‍ॅबिलीटी पांड्यासाठी नि बॉलिंग चौथा सीमर option देतेय. सध्या तो फॉर्म मधे पण हाय वाटतो आहे.

आपला फास्ट अटॅक आतां जागतिक दर्जाचा झाला आहे हे मान्य करूनही, आपली फिरकी गोलंदाजी अजूनही आपलं खरं बलस्थान आहे असं मला वाटतं, as it gives us definite edge over other competeters. म्हणून चहल सुचवला.
ऑलराऊंडरसचं महत्व वादातीत असलं तरीही फलंदाजांनी व गोलंदाजांनी आपाआपली कामगिरी चोख बजावणं व क्षेत्ररक्षण अचूक करणं, हा विजयाचा खरा राजमार्ग आहे . त्यामुळे, ' कोअर' फलंदाजी व गोलंदाजीची निवड निव्वळ त्याच गुणवततेवरून व्हावी.

काल सामना जिंकल्यानंतर कोहली म्हणाला कीं तो नेहमीच धोनी व रोहितशी सललामसलत करत असतो व विजय शंकरला शेवटचं षटक देतानाही त्याने तसं केलं होतं. विजय शंकरचं आजचं विधान आहे कीं बुमराहने त्याची शेवटची ओव्हर टाकल्यावर विजयकडे येवून त्याला महत्वाच्या उपयुकत टिप्स दिल्या होत्या. मला वाटतं , संघ निवडी इतकीच ही संघभावना विश्वचषक जिंकण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

it gives us definite edge over other competeters. >> हो भाऊ. मला वाटते चहल T 20 साठी एकदम चपखल बॉलर आहे. ODI मधे त्याचे ups and downs खूप असतात. कुलदीप पण विकेट टेकिंग बॉलर म्हणून वापरला जात असल्यामूळे दुसर्‍या बाजूने जाडेजासारखा डार्टर जास्त उपयोगी ठरतो असे मला वाटते. फक्त १५ असल्यामूळे १-२ हार्ड निर्णय घ्यावे लागणार आहेत.

मला वाटतं , संघ निवडी इतकीच ही संघभावना विश्वचषक जिंकण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. >> +१

गेल्या १४-१५ सामन्यांमधे (चँपियन्स ट्रॉफी नंतर) धवन फारच सुमार खेळलाय (२ अर्धशतकं ती ही पाटा विकेट्सवर)
रायडू एखादी इनिंग खेळून पुढच्या सिरीजची जागा आडवतोय इतकंच

कार्तिक टी२० मधे ठीक आहे, वन डे मधे त्याचीही फार ग्रेट कामगिरी नाहिये (पण तरी त्याला कॉन्ट्रॅक्ट मात्र वरचं मिळालंय)
फिनिशर्स म्हणून वन डे मधे धोनी-जाधव-शंकर-पांड्या हे चौघं असताना कार्तिकला वर्ल्डकप खेळवायची मला तरी गरज दिसत नाही.
(शंकरला त्याच्या बोलिंगमुळे कधीही जास्त प्रेफरन्स देईन मी)

त्यामुळे दुसरा ऑफिशिअल कीपर (जाधव अन राहूल हे तसेही टेंपररी कीपर्स आहेतच) अन अनॉफिशिअल ओपनर म्हणून माझी पसंती पंत ला. ऑसीजविरुद्ध एक-दोन सामन्यांमधे एकदा त्याला ओपन करायला लावलं तर ती बाजूही टेस्ट करून घेता येईल.

बर्‍यापैकी कन्सिस्टन्सी दाखवूनही जाधवला फारच बेसिक कॉन्ट्रॅक्ट मिळालंय...
>> खरय . पण त्याला संधी देत आहेत हेच मला बर वाटत आहे .
कारण महाराष्ट्राचे (मुंबई नाही) त्याच्यापेक्षा बरेच चांगले खेळाडू संधीअभावी कुजलेत Sad

Submitted by केदार जाधव on 8 March, 2019 - 13:08>>> खेळावर लक्ष द्या तुम्ही, सामना सुरू व्हायला 20 मिनिटे बाकी आहेत आणि मायबोलीवर काय करताय. सराव करायला जा देशाला तुमची गरज आहे

*...आणि मायबोलीवर काय करताय. सराव करायला जा ..* अहो, इथं मिळतात तशा टिप्स त्यांच्या नेटवर मिळणार आहेत का त्याना! Wink

कोहली आऊट - मॅच गॉन??

अंबाटी रायडू चा खरच कितपत उपयोग आहे? एखादी इनिंग खेळतो आणी बर्याच इनिंग्ज अपयशी ठरतो. मला मुळात त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणं सोडलेलंच फारसं रुचलेलं नाहीये. मॅच प्रॅक्टीस कशी मिळते ह्याला? त्याच्यापेक्षा राहूल परत संघात येऊ शकेल.

जाधव आऊट - बॅड शॉट सिलेक्शन >> आज थोडा अडखळतच खेळत होता असे वाटले. was trying bit harder that usual. कोहली एव्हढा सुसाट खेळत असताना फक्त स्ट्राईक रोटेट केला असता तरी पुरे होते.

त्याच्यापेक्षा राहूल परत संघात येऊ शकेल. >> राहुल ओपनिंग सोडून कुठेही खेळू शकत नाही हा बेसिक वांदा आहे. मधल्या फळीत हुकुमी गीअर्स बदलू शकणारा कोणीच नाही. रायुडू मधे ती capacity आहे (तो ती वापरतोच असे नाही) म्हणून preference मिळतो.

आज भुवीला आणायला हवे होते. जर मेन बॉलर असणार असेल तर तीन सामने तरी खेळू द्यायला हवे होते.

इथल्या कुणी तक्रार केली माझ्या बद्दल ? केबलवालयाने माझा टीव्हीच बंद करून टाकला !! साॅरी, मीं आज नाही एक्सपर्टचा आव आणूं शकत !! Sad
पण कोहलीला मात्र सलाम !!!

कोहली चेस करताना कमीत कमी sub continental style pitches वर consistently जसा खेळतो, जसा गेम प्लॅन करतो, पेस करतो तसे आज वर कोणी केलेले बघितले नाही. bits and pieces मधे बरेच जण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात पण हे complete package आहे ह्याबाबतीमधे. mesmerizing असते.

Pages