Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बॉलर्स ना सुचना देत होता. पण
बॉलर्स ना सुचना देत होता. पण आज कुठे काही त्याची ‘बातमी’ नाही झाली. >>>
त्याच्या सुचनेनंतर लगेचच विकेट पडली का म्हणजे सुचनेमुळे??
पोरींनी देखिल पोरांसारखेच
पोरींनी देखिल पोरांसारखेच किवीज पोरींसोबत २-० मालिका जिंकली पहिल्या दोन वन डे जिंकून! अभिनंदन! तब्बल २४ वर्षांनंतर न्युझिलंड मध्ये मालिका जिंकली!
"त्याच्या सुचनेनंतर लगेचच
"त्याच्या सुचनेनंतर लगेचच विकेट पडली का म्हणजे सुचनेमुळे??" - विकेट पडण्यात जर धोनी च्या सुचनेचा इतका मोठा वाटा असेल, तर आपले बॉलर्स अगदीच कुचकामी आहेत असं म्हणावं लागेल. मग वर्ल्डकप नंतर अवघड आहे आपलं. विकेट्स च नाही पडणार कुलदीप, जाधव वगैरे बॉलर्स ना. कुलदीप ने पण रिटायर व्हावं मग.
आपले बॉलर्स सद्ध्या कमालीच्या फॉर्म मधे आहेत. वर्ल्डकप पर्यंत हा फॉर्म टिकावा अशी आशा आहे.
स्मृती मानधना (मंधना) कमालीच्या फॉर्म मधे आहे. मस्त जिंकल्या दोन्ही मॅचेस.
"ही क्लिप बघितलीस का?" - अरे
"ही क्लिप बघितलीस का?" - अरे मी त्याचा अनुभव आणी त्याचं महत्व नाकारत नाहीये.
मध्यंतरी धोनी विरूद्ध रान
मध्यंतरी धोनी विरूद्ध रान उठवलं गेलं, तेंव्हा मलाही अशाच प्रकारची शंका होती ! >> म्हणजे फे फे नि रॉबिन हूडाचे कनेक्शन जबरीच दिसतात
एकंदरीत धोनी ही ‘शंकास्पद’
एकंदरीत धोनी ही ‘शंकास्पद’ व्यक्ती आहे, हे खरं.
>>विकेट पडण्यात जर धोनी च्या
>>विकेट पडण्यात जर धोनी च्या सुचनेचा इतका मोठा वाटा असेल, तर आपले बॉलर्स अगदीच कुचकामी आहेत असं म्हणावं लागेल.
That was unlike फेफ!
*....म्हणावं लागेल. मग
*....म्हणावं लागेल. मग वर्ल्डकप नंतर अवघड आहे आपलं. * - चला, वर्ल्डकपमधे धोनी आहे हें तरी फेफानीं मान्य केलं !
तुला आवडत नसली तरीही माझी आई तिथे असणार हें नक्की! आतां तें महत्वाचं कीं माझ्या वडिलांचा भव्य सत्कार समारंभ, हें तूच ठरव.
"वर्ल्डकपमधे धोनी आहे हें तरी
"वर्ल्डकपमधे धोनी आहे हें तरी फेफानीं मान्य केलं !" - ते माझ्या मान्य करण्या- न करण्यानं काय फरक पडतो? ते आहेच. आणी तो खेळला चांगला आणी भारताचा परफॉर्मन्स चांगला झाला, तर मला आनंदच होणार आहे.
"That was unlike फेफ!" - तसं नाही रे. धोनी हा एकेकाळी लिमीटेड ओव्हर्स मधला जबरदस्त कॅप्टन आणी खेळाडू होता. आजूबाजूला थोडे कमी-अधिक खेळाडू असले तरी तो अविश्वसनीय निकाल द्यायचा. पण सद्ध्या, म्हणजे गेली दीड-दोन वर्षं धोनी चा बॅटींग फॉर्म खूप उतरलाय. ज्या मॅचेस तो पूर्वी शेवटपर्यंत खेचून जिंकून द्यायचा, त्या मॅचेस, त्याला गेल्या दीड-एक वर्षात जिंकून द्यायला जमलेल्या नाहीत. ह्यात काही अनैसर्गिक नाही. विकेटकिपींग सारखा फिजीकली चॅलेंजिंग जॉब केल्यावर, ३७ व्या वर्षी थोडी शिथीलता येणं हे नैसर्गिक आहे. गेल्या काही मॅचेस त्याने रन्स काढल्या, पण त्याचा स्ट्राईक रेट ६०-७० च्या दरम्यानच आहे. (शेवटची न्यूझिलंड ची मॅच सोडून - ज्यात सुरूवातीला त्याचं टायमिंग अजिबात नीट नव्हतं). ह्या पार्श्वभुमीवर, थोडा आधीच एक पर्याय शोधून ठेवायला हवा होता. तसं न करता, जी व्यक्तीपूजा चालू आहे, त्यातून कधी कधी असा 'अनलाईक मी' प्रतिसाद येतो.
आज रात्री मॅच सुरू होतीये. कोहली ला विश्रांती दिलीये. त्याच्या जागी कार्थिक खेळेल की शुभमन गिल?
शुभमन गिल बद्दल स्वतः कोहलीचे
शुभमन गिल बद्दल स्वतः कोहलीचे मत 'गिल ह्या वयात जितका क्रिकेटमधे मॅच्युअर आहे त्याच्या १०% ही मी नव्हतो'. निव्वळ ह्यासाठी त्याला एक संधी द्यावी नंबर ३ वर असे वाटते. कार्थिक बॅक अपमधे आहेच.
हं .... ३३/५ पन्नास तरी
हं .... ३३/५ पन्नास तरी होणार का? कोहली पेक्षा १०० पट माच्युअर क्रिकेट पटू आताच ९ वर बाद झाले....
६-३४
६-३४
तीनही पराभवांचा बदला एकाच मॅच मध्ये..
न्यूझीलंड सिरीज मध्ये एकदा
न्यूझीलंड सिरीज मध्ये एकदा तरी अशी जोरदार घसरगुंडी उडतेच आपली..
चेंडूची 'लॅटरल मूवहमेंट ' हा
चेंडूची 'लॅटरल मूवहमेंट ' हा आपल्या फलंदाजीला असलेला शापच आहे, हें मान्य करुनही ही खेळपट्टी एक दिवसीय सामन्यासाठी अयोग्य आहे हेंही स्पष्ट आहे. न्यूझीलंडलाही फलंदाजी करणं सोपं जाणार नाही.
कुलदीपची फलंदाजी बघून तो एक चांगला ऑलराऊंडर होवूं शकतो असं नेहमीच वाटतं.
कितीचं target दिलंय?
93??
काय झालं होतं team India ला...??
तीनही पराभवांचा बदला एकाच मॅच
तीनही पराभवांचा बदला एकाच मॅच मध्ये.+11
युज्वेन्द्र चहल टॉप स्कोअरर .
युज्वेन्द्र चहल टॉप स्कोअरर ... ब्रावो.
सवय नाही जात यांची...
सवय नाही जात यांची... (T. India)
बोल्ट नि स्विंग कंडीशन हे
बोल्ट नि स्विंग कंडीशन हे डेडली कॉम्बीनेशन आहे हे लक्षात घेतले तरी कालचे सगळे शॉट्स सिलेक्शन फारसे चांगले वाटले नाहीत. विशेषतः मधल्या फळीतल्या खेळाडूंनी थोडाही पेशन्स दाखवला नाही असे वाटले. बिचारा गिल अतिशय चुकीच्या वेळी पदार्पण करता झाला. जर आपण टॉस जिंकला असता तर भुवी नि शमी ने पण इतकाच धुमाकूळ घातला असता नक्कीच.
असो, मागच्या काही सामन्यांनंतर असा रीयअॅलिटी चेक जरुरीच होता. वर्ल्ड कप मधे होण्यापेक्षा आत्ता झालेला जास्त उत्तम.
हे खास रॉबिनहूड साठी, धोनी असता तर शंभरच्या वर झाले असते रे
*असा रीयअॅलिटी चेक जरुरीच
*असा रीयअॅलिटी चेक जरुरीच होता. वर्ल्ड कप मधे होण्यापेक्षा आत्ता झालेला जास्त उत्तम.* - सहमत.' खेळपट्टी व हवामान पोषक असलं तरीही त्याचा फायदा उठवायला कसब लागतंच ', असं गावसकर म्हणाला . इंग्लंडमधल्या वातावरणात असं कसब असणारे गोलंदाज निवडणंच योग्य.
“ मधल्या फळीतल्या खेळाडूंनी
“ मधल्या फळीतल्या खेळाडूंनी थोडाही पेशन्स दाखवला नाही असे वाटले.” - आत्ता हायलाईट्स पाहिले. खरंय. कार्थिक, रायडू आणी जाधव चं शॉट सिलेक्शन खटकलं.
भारता जिंकत होता, तेव्हा
भारता जिंकत होता, तेव्हा पुरूषांची, स्त्रीयांची आणी ए अशा तीन्ही टीम्स जिंकत होत्या. आणी हारला तेव्हा तिन्ही टीम्स हारल्या.
काल पुन्हा विंडीज ने ईंग्लंड विरूद्ध दणदणीत सुरूवात केलीये. विंडीज च्या बाकीच्या फलंदाजांनी सुद्धा जवाबदारीनं बॅटींग करावी. दर वेळी होल्डर-चेस भागीदारी होत नाही.
*काल पुन्हा विंडीज ने ईंग्लंड
*काल पुन्हा विंडीज ने ईंग्लंड विरूद्ध दणदणीत सुरूवात केलीये. * - मला आतां भिती वाटतेय येत्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत वि. वे.इंडीज सामना होण्याची. कुणाच्या बाजूने उभं रहायचं, ही जीवाची घालमेल तर होईलच पण 1982 ला वे. इंडीजला झालेल्या वेदनेवर फुंकर मारायचा तर नियतिचा बेत नाही ना, अशीही धास्ती वाटेल !!
जणू काही ४थ्या वन डे चे
जणू काही ४थ्या वन डे चे पुनःप्रक्षेपण सुरू आहे भारतीय संघाचे.. आज धोनी असून देखील.....
अरेरे...
अरेरे...
धोनी out jhala ka?
आताच लावलीये मॅच
50-4 ! इंग्लिश वातावरणातल्या
50-4 ! इंग्लिश वातावरणातल्या विश्वचषकासाठी पुजाराला पाचारण करावं का ?
जुने ते अनुभवी आहेत म्हणून
जुने ते अनुभवी आहेत म्हणून आणि नवे बरे खेलतात म्हणून हाच सण्घ जाणार वि.क. साठी
# वर्ल्ड कपको जाउंगा मै, घर नही जाउंगा मै...
रायडू - पांड्या आले धावून...
रायडू - पांड्या आले धावून... २५० पार ! पांड्याचं तोंड कॉफीने चांगलंच पोळलंय
आज पण १०० च्या आत संपणार वाटत होतं..
छान पलटवली मॅच..
छान पलटवली इनिंग., .
पलटवायला वेळ आहे अजून
पलटवायला वेळ आहे अजून
Pages