क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या शान मसूद, अबिद अली, अझर अली व बाबर आझम या ४ फलंदाजांनी शतक केले.

एकाच कसोटी डावात ४ शतके होण्याची ही पहिलीच वेळ आहे का?

दुसऱ्या डावात पहिल्या 4ही फलंदाजानी शतके करण्याची ही पहिलीच वेळ. याआधी एका डावात पहिल्या 4ही फलंदाजानी शतके भारताने बांग्लादेशविरुद्ध ठोकली होती. दिनेश कार्तिक , वसीम जाफर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर.

एकाच डावात चार शतके बहुतेक यापूर्वी बरेचदा केली आहेत.

या मॅच चे स्कोअरकार्ड १९९९ ऑक्टोबर मधल्या भारत - न्यूझीलंड मॅचची आठवण करून देते. इथे पाक ने पहिल्या डावात ११९ तर दुसर्‍या डावात ५५५/३. असाच फरक भारताच्या स्कोअर मधे त्या मॅच मधे होता.
https://www.espncricinfo.com/series/15772/scorecard/63848/india-vs-new-z...

पहिल्या डावात ऑल आउट ८३, तर दुसर्‍या डावात ५०५/३ घोषित.

पण सचिनच्या कप्तानपदाच्या काळात आपल्या बोलिंगची काहीतरी गडबड होती. अनेकदा विजयाच्या जवळ जाउन विजय हुकलेले आहेत. तसेच या मॅचमधेही झाले. किवीज च्या ७ विकेट्स गेल्या पण आपण १३५ ओव्हर्स मधेही त्यांना ऑल आउट करू शकलो नाही.

त्याला 'सर' किताब मिळाल्याच्या निमित्ताने अॅलिसटर कुक वर लिहीलेला एक छान लेख वाचला. प्रसिद्धीपासून जाणीवपूर्वक दूर रहाणं, मर्यादित षटकं , विशेषत: टी-20, आपला प्रांत नाही हें ओळखून त्या वाटेला न जाणं, केवळ पैशासाठी आयपीएल सारख्या स्पर्धेत खेळण्याच्या मोहाला बळी न पडणं, शेती व मेंढया पाळणं हा उद्योग आत्मसात करणं व 'सोशल मिडीया'वर कधीही न चमकणं इ.इ. वैशिष्ट्य कुकबददलचा आदर दुणावतात !
' मेंढ्या क्रिकेटबद्दल एक शब्दही काढत नाहीत, त्यामुळे मीं त्यांच्यात रमतो ', त्याचं हें तर फारच भावलं !

( मीं इतरत्र पोस्ट केलेलं व्यंचि इथंही करण्याचा मोह झाला ) -
' गेलं वर्ष कसोटीचंच गेलं , आतां 2020 तरी बघूं ', हें तुमच्या क्रिकेटबद्दल नाहीं हो म्हणत मीं ! !!20191217_200723_8.jpg

काल स्मिथ ने शतक केले तरी आपण सामना अगदी जिंकायचाच हे ठरविल्या सारखे खेळलो त्यामुळे मालिका जिंकणे शक्य झाले!

*त्यामुळे मालिका जिंकणे शक्य झाले!* +1.
बापू नाडकर्णी ! साधेपणा पेहरलेला क्रिकेटमधला राजा माणूस !! फ्लाइट व टप्प्यावर असामान्य प्रभुत्व असलेला गोलंदाज, चिकाटीने सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फलंदाज, क्रिकेटचा आदरणीय अभ्यासक व जंटलमन क्रिकेटर !!
श्रद्धांजली !!!

>>> काल स्मिथ ने शतक केले तरी आपण सामना अगदी जिंकायचाच हे ठरविल्या सारखे खेळलो त्यामुळे मालिका जिंकणे शक्य झाले! >>>

२०११ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताविरूद्ध पॉंटिंगने शतक करूनही ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता.

बापू नाडकर्णी यांना विनम्र श्रद्धांजली!!! ___/\__

ह्यांची गोलंदाजी नाही पाहता आली पण रेडिओ कॉमेंट्रीच्या काळात कोमेंटेटर सोबत तज्ञ समालोचक म्हणून बर्‍याचदा ऐकले!
आणि कंजूस गोलंदाजी विषयी तर आजही आदर्श!!

*आणि कंजूस गोलंदाजी विषयी तर आजही आदर्श!!* -
14 - 10 - 5 - 1 असली भन्नाट आंकडेवारी असे त्यांच्या गेलंदाजीची ! ' गुड लेंगथवर नाणं ठेवा, फ्लाइट बदलत षटकाचे सहाही चेंडू त्या नाण्यावर टाकेल बापू ', असं म्हटलं जायचं.... व विनोदाने नव्हे !

आयपीएल मध्ये बापूना संधी द्यायला पाहिजे होती. शेवटच्या दोन ओव्हर मस्त टाईट टाकल्या असत्या.

* शेवटच्या दोन ओव्हर मस्त टाईट टाकल्या असत्या.* - सांगणं कठीण आहे. शिस्तीत फलंदाजी करणारयांसाठीच त्यांची शिस्तबद्ध गोलंदाजी धास्तीदायक होती ! Wink

बापू नाडकर्णींना भावपूर्ण श्रद्धांजली!!

१.६८ रन्स/ओव्हर हा रेकॉर्ड (जागतिक क्रमवारीत दुसरा. पहिल्या क्रमांकाचा १.६४ आहे) अविश्वसनीय आहे. असं वाचलंय की ते लंगडी, खो-खो, कबड्डी (शालेय स्तर), टेनिस, टेबल टेनिस (महाविद्यालयीन स्तर), बॅडमिंटन (राष्ट्रीय स्तर) आणी क्रिकेट (आंतरराष्ट्रीय) असे 'कंप्लीट अ‍ॅथलीट' होते. इंटर च्या परिक्षेत गणितात २००/२०० गुण मिळवणारे गुणवान विद्यार्थी होते. पैजेवर लागोपाठ ५० बॉल्स, पिचवर नाणं ठेवून, ते उडवून दाखवणारे अचूक बॉलर होते आणी अत्यंत चिकाटीनं फलंदाजी करणारे बॅट्समन होते.

कालची मॅच भारतानं अत्यंत क्लिनिकल पद्धतीनं जिंकली. धवन च्या इंज्यूरीचा परिणाम जाणवूही न देता आपल्या बॅट्समेन नी कमालीचा चेस केला. रोहीत, विराट, अय्यर सगळेच जबरदस्त खेळले. स्पेशल कुडोज टू राहूल. सद्ध्या राहूल ड्रीम फॉर्म मधे आहे. शेवटी पांडे ने सुद्धा तेव्हढ्यात २ बाऊंड्रीज मारून पटकन मॅच संपवली. पहिल्या मॅच चा अपवाद वगळता बॉलर्स तूफान खेळले. वेल प्लेड टीम इंडीया!!

Rahul 'the keeper' allows us to play an extra batsman - Kohli

मागच्या वर्ल्डकपला राहुल धोनी पंत कार्तिक हे चार विकेटकीपर एकत्र खेळवलेले आणि आता याला हा साक्षात्कार झाला Lol

*मागच्या वर्ल्डकपला राहुल धोनी पंत कार्तिक हे चार विकेटकीपर एकत्र खेळवलेले* -
'स्पेशालिस्ट ' वि. ' ऑलराऊंडर ' हा वाद क्रिकेट एवढाच जुना आहे ! '-

अरे, फलंदाज म्हणून आपल्या मागची विकेट टिकवायची असते व विकेटकीपर म्हणून आपल्या पुढची विकेट पाडायची असते . तूं नेमकं उलटं करतोयस !!20190115_202451_0_0.jpg

भाऊ Lol

भाऊ Lol

भाऊ Lol

जागतिक हवामान बदलाचे परिणाम विचित्र प्रकारे उमटूं लागले असावेत ; सामना व मालिका हरल्यावर ऑसीज कर्णधार चक्क विरूद्ध संघाचं कौतुक करतो, ऑसी नसलेल्या कोहलीला ' ऑल टाईम ग्रेट ' म्हणतो, शर्माची व गोलंदाजीची वाहवा करतो, सारंच विचित्र !!! Wink

भाऊ Happy

इशांत शर्माचे जखमी होणे आपल्यासाठी वरदान ठरावे नि अजून एक बॉलर सैनीच्या रुपात उपलब्ध व्हावा अशी आशा धरूया.

सामना व मालिका हरल्यावर ऑसीज कर्णधार चक्क विरूद्ध संघाचं कौतुक करतो
>>>

आईपीएल ईज कमिंग सून...
फिंच कोहली कनेक्शन

फिंच मला पहिल्यापासून स्वभावाने चांगला वाटतो. ईतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसारखा माज नाही त्याच्यात.

Pages