Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोहित ने संधी साधली. फक्त हे
रोहित ने संधी साधली. फक्त हे शॉर्ट-लिव्ह्ड असू नये. कारण भारतात, तुलनेने दुबळ्या द. अफ्रिकेविरूद्ध हे शतक आहे. असो. जे आहे, ते चांगलं आहे आणी त्याचं कौतुक आहे. >> आज पहिल्या सत्रामधे बॉल मूव्ह होत असताना दोघेही चाचपडले. नंतर मात्र एकदम सराईतपणे खेळले. थोडक्यात त्यांनी अपेक्षेप्रमाणे खेळ केला. सुरूवातीच्या सत्रामधला खेळ बघता भारताबाहेर खेळताना बदल करावे लागतील हे उघड आहे.
साहाबद्दल मी थोडासा काठावर आहे. तो बेस्ट "किपर" आहे ह्याबद्दल अजिबात शंका नाही फक्त पंत वर नकळत अन्याय झाला असे वाटत राहतेय. पंत T-20 नि ODI मधे फेल गेला हे मान्य आहे पण टेस्ट मधे साहाची बर्यापैकी उणीव भासू दिली नव्हती. स्पिनर समोर भारतामधे तो कसा असता हे कळणे अवघड आहे.
"स्पिनर समोर भारतामधे तो कसा
"स्पिनर समोर भारतामधे तो कसा असता हे कळणे अवघड आहे." - I am sure, he will get his chances. आणी त्यावेळी तो ती संधी साधेल अशी आशा करू या. मधल्या काळात त्याने विकेटकिपींगकडेही थोडं लक्ष द्यावं. टेस्ट मधे विकेटकिपींग मधली अचूकता जास्त महत्वाची ठरते.
I am sure, he will get his
I am sure, he will get his chances. >> माहित नाही. He is our future असे महिनाभरापूर्वी लागलेले सूर सध्या बदललेले आहेत.
BTW, शर्मा नि मयांकच्या खेळ्यांनंतर पांचाल नि ईस्वरन ह्यांना हरि हरी म्हणायची वेळ येणार हे नक्की. पुढच्या T20 WC पर्यंत आपण अगदी मोजक्या टेस्ट खेळतो आहोत. रोहित, मयांक आहेत. शॉ मोकळा होईल काही महिन्यांमधे, राहुल नि धवन perennial candidates आहेत. हे सगळे बघितल्यावर पांचाल नि ईस्वरन ला किती स्कोप मिळणार आहे देव जाणे. domestic cricket performance ला फारसे मह्त्व उरलेले नाही
शर्माजी का बेटा 400+
शर्माजी का बेटा 400+
मयांक मार्कंडेला विकेटकीपर
मयांक मार्कंडेला विकेटकीपर म्हणून एक दोन वर्षे संधी द्यावी असं मला वाटतंय.
कोहलीने सत्य परिस्थिती
कोहलीने सत्य परिस्थिती स्वीकारावी आणि कॅप्टनसीचा राजीनामा द्यावा. रोहित शर्मा कॅप्टन असेल तरच आपण T20 वर्ल्ड कप जिंकू शकतो.
द. अफ्रिकेनं चांगला प्रतिकार
द. अफ्रिकेनं चांगला प्रतिकार केला. कालपर्यंत अगदीच एकतर्फी होते की काय वाटणार्या टेस्ट मधे रंग भरले. एल्गर, डी-कॉक आणी फाफ मस्त खेळले. पाऊस नाही पडला तर ही टेस्ट अजूनही निकाली होऊ शकेल.
संजू सॅमसन आणी शिवम दुबे ची
संजू सॅमसन आणी शिवम दुबे ची टी-२० साठी निवड! अपेक्षित होतं हे कधीतरी. गेलं वर्षभर दोघंही चांगले खेळतायत. अर्थात त्या दोघांनी अनुक्रमे विराट कोहली आणी हार्दिक पंड्या ला रिप्लेस केलय. त्यामुळे कितपत लाँग रोप मिळेल हे सांगता येणार नाही. पण मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्यावा ह्या शुभेच्छा!!
दुबे खेळला तरस्राहील.
दुबे खेळला तरस्राहील. त्याला थोरल्या पांड्याच्या जागेवर पण येता येउ शकतेय. सॅमसन ला कीपर म्हणून पंत नि बॅट्समन म्हणून रोहित, धवन, राहुल, कोहली शी टक्कर द्यावी लागेल जे मला तरी अशक्य वाटतेय. सॅमसन चारच्या खाली उपयोगी नाही.
काय फेफ, रोहीतच्या टेस्ट
काय फेफ, रोहीतच्या टेस्ट सिरिजमधल्या बॅटींगबद्दल तुमची टिपण्णी दिसली नाही..
"रोहीतच्या टेस्ट सिरिजमधल्या
"रोहीतच्या टेस्ट सिरिजमधल्या बॅटींगबद्दल तुमची टिपण्णी दिसली नाही" - चांगला खेळला. मिळालेल्या संधीचं सोनं केलं. असाच खेळला आणी फिटनेस टिकवला तर अजून ४-५ वर्षं तरी चांगला टेस्ट ओपनर म्हणून भारतीय संघाला त्याचा उपयोग होईल. पृथ्वी शॉ चं पुनरागमन अवघड दिसतय - कदाचित अवे टेस्ट सिरीज ना तिसरा ओपनर म्हणून येईल. राहूल बहुदा लिमिटेड क्रिकेटपुरता लिमिटेड होईल .. निदान काही काळ तरी.
उमेश आणी शामी ने बुमराह नव्हता हे जाणवू ही दिलं नाही. नदीम ने पण छान बॉलिंग केली. जडेजा ची प्रगती पण कमालीची आहे. रुथलेस खेळली आपली टीम!
भारत-बांग्लादेश सिरीज कडे
भारत-बांग्लादेश सिरीज कडे सगळ्यांनी पाठ फिरवली की काय? चांगल्या झाल्या मॅचेस. रोहित शर्मा सध्या ड्रीम फॉर्म मधे आहे. मस्त खेळतोय. पंत चं ग्रहण लवकर सुटो. अय्यर मिळालेल्या संधीचं सोनं करतोय. खलील अहमद अगदीच सामान्य वाटला. धवन टी-२० चा बॅट्समन आहे का अशी शंका आहे. वन-डे मधे तो छान इनिंग बिल्ड करतो. पण टी-२० साठी त्याचा अॅप्रोच विचित्र वाटतो.
सगळ्याला +१.
सगळ्याला +१.
शर्मा काल (नेहमीच म्हणा) ज्या पद्धतीने खेळत होता ते बघून बआंग्ला ने २०० करायला हवे होते असे वाटून गेलेले.
धवनच्या जागी पंतला ओपन करायला सांगून - पंत ला गो फॉर ईट असे स्वातंत्र्य द्यायला हवे. तो तसाही पेसर्स समोर चांगला खेळतो. रोहित वरचे पण सुसाट सुटायचे टेंशन कमी होईल. ध्वनला खाली खेचता येईल हवेच असेल कारण तो स्पिन चांगला खेळतो.
धवन टी-२० नाही खेळला तरी
धवन टी-२० नाही खेळला तरी चालेल खरं तर. फार काही व्हॅल्यू अॅड नाही करत तो. राहूल फॉर्म मधे आला, तर त्याला किंवा, तू म्हणतोस तसं पंत ला किंवा लेफ्ट फिल्ड चॉईस म्हणून मयंक आगरवाल / पृथ्वी शॉ ला टी-२० मधे ओपन करता येईल.
सध्याच्या टीम composition
सध्याच्या टीम composition मधे शक्यतो left-right combo ठेवायचा प्रयत्न जाणून बुजून केलेला दिसतोय.
" left-right combo" - makes
" left-right combo" - makes sense. त्या केस मधे पंत चा ऑप्शन आहेच. अर्थात टीम जिंकत असल्यामुळे लगेच काही बदल संभवत नाही.
मस्त झाल्या शेवटच्या ८-१०
मस्त झाल्या शेवटच्या ८-१० ओव्हर्स. पूर्ण हातात होती बांगला देशच्या आणि काय जबरी फिरली आहे. चहर ने ६ काढल्या म्हणून तोच असेल बहुधा मॅन ऑफ द मॅच. पण शिवम दुबेचा इम्पॅक्ट जास्त होता. पहिलीच गेम करीयर मधली. २ ओव्हर्स झाल्यावर त्याने २३ रन्स देउन एकही विकेट काढलेली नव्हती. बांगलादेश जोरात होते आणि मॅच व सिरीज दोन्ही भारत हरेल अशी चिन्हे होती. त्यानंतर १५-२० मिनीटांत दुबेच मॅन ऑफ द मॅच होईल अशी अवस्था झाली इतकी मॅच फिरली! नंतर चहर ने आणखी काढल्या नसत्या तर कदाचित दुबेच झाला असता.
हॅट्रीक पण झाली ना चहारची!
हॅट्रीक पण झाली ना चहारची!
मस्त झाली ही सिरीज. रोहितच्या केप्टनसी बद्दल पण बराच बोलले कुंबळे आणि लक्ष्मण.. रोहित आणि विराटच्या केप्टनसी तल्या फरकाबद्दल कोणीतरी लिहा इथे..
जबरदस्त झाली कालची मॅच.
जबरदस्त झाली कालची मॅच. बांग्लादेश च्या बॅटींग च्या १२ व्या ओव्हरला मॅच गेली असं वाटत असताना, मस्त फिरवली मॅच. दुबे आणी चहर - दोघांनी कमाल केली. अय्यर - राहूल पण छान खेळले. पंत ला लागलेली पनवती काही हटत नाही. इतक्या फालतू बॉल ला आऊट झाला!
वूमन्स क्रिकेट मधे स्मृती मंधाना ला सुद्धा स्ट्राईक रेट मधे मागे टाकणारी १५ वर्षाची शफाली वर्मा पाहिली का कुणी? जबरदस्त टॅलेंट आहे!
पंत ला लागलेली पनवती काही हटत
पंत ला लागलेली पनवती काही हटत नाही. >> पनवती शब्द बरोबर वाटतो.
अय्यर ला चौथा नंबर फिक्स करायला हरकत नाही. पुढच्या सिरीज मधे बहुधा राहुल ओपन करेल असे वाटते.
रोहित आणि विराटच्या केप्टनसी तल्या फरकाबद्दल कोणीतरी लिहा इथे.. >> एक मह्त्वाचा फरक मला जाणवतो तो म्हणजे रोहित स्पिनर्स नि अन ऑफ बॉलर्स जबरदस्त वापरतो. एकदम योग्य वेळी ते आणतो आणि रोटेट करतो. बहुएक वेळा स्पिनर्स असताना तो आक्रमक फिल्डींग लावतो ( मुंबई इंडियन्स च्या मॅचेस बघा) तेच पेसर्स बरोबर सहज पणे जमत नाहि त्याला.
"तेच पेसर्स बरोबर सहज पणे जमत
"तेच पेसर्स बरोबर सहज पणे जमत नाहि त्याला." - मला हे त्याला विराट सारखा पेस अॅटॅक मिळाल्यावर टेस्ट करायला आवडेल. खलील अहमद ला काय डोंबलाची अॅटॅकींग फील्डींग लावणार!
अरे मुंबई इंडिअयन्स च्या
अरे मुंबई इंडिअयन्स च्या मॅचेस मधे बघ ना. बुमरा, मुस्तफिजुर, जॉह्न्सन, मॅक्ल्शान, साऊदी, रिचर्डसन वगैरे होते ना गेल्या ३-४ वर्षांमधे.
खलील डावखुरा आहे ह्यापलीकडे तो कसा काय येत राहतो टीम मधे देव जाणे.
"खलील डावखुरा आहे ह्यापलीकडे
"खलील डावखुरा आहे ह्यापलीकडे तो कसा काय येत राहतो टीम मधे देव जाणे." - +१
त्याला वर्ल्डकपसाठी तयार करण्याचे पण प्रयत्न झाले होते. नशीब तो गेला नाही.
"अरे मुंबई इंडिअयन्स च्या मॅचेस मधे बघ ना." - ह्यावेळी जरा नीट बघीन.
भारताची जोरदार सुरूवात. उमेश
भारताची जोरदार सुरूवात. उमेश यादव, इशांत, शामी आणी अश्विन ने कमाल बॉलिंग केली.
जरा इकडे चक्कर टाका मंडळी
जरा इकडे चक्कर टाका मंडळी:
https://www.maayboli.com/node/72503
तुमच्यासाठीच (आणि तुमच्या भरवश्यावरच) उघडलाय तो धागा!
आयपीएल २०२० मधे सर्वात जास्त
आयपीएल २०२० मधे सर्वात जास्त किमतीत निवडला गेलेला खेळाडू हा बोलर आहे! पॅट कमिन्स. इण्टरेस्टिंग डेटा.
प्रवीण तांबे - हा एक मूळचा मुंबईचा खेळाडू ४८ वर्षांचा आहे, आयपीएल मधे निवडला गेलाय.
तांबे बरीच वर्षे खेळतोय रे.
तांबे बरीच वर्षे खेळतोय रे.
पॅट कमिन्स च्या गुणवत्तेबद्दल शंकाच नाही पण कलकत्त्याने घेतले हे थोडे ऑड वाटले. गार्डन्स स्पिन ला सहाय्य करते आयपील मधे नि कमिन्स लिमीटेड ओव्हर्स मधे स्टार्क सारखा एक हाती जिंकून देत नाहीये अजून.
अंदाजापेक्षा विंडीज चे खेळाडू कमीच पैशात गेले. मॅक्सी न मॉरिस जरा जास्तीच पैशांमधे गेलेत.
"पण कलकत्त्याने घेतले हे थोडे
"पण कलकत्त्याने घेतले हे थोडे ऑड वाटले. गार्डन्स स्पिन ला सहाय्य करते आयपील मधे " - कमिन्स आणी फर्गसन - दोन जेन्युइन फास्ट बॉलर्स आहेत त्यांच्याकडे. प्रसिध कृष्ण, शिवम मावी, नागरकोटी वगैरे धरले तर ६-७ फास्ट बॉलर्स आहेत त्यांच्या स्क्वाड मधे.
हो ना म्हणूनच त्याच्यावर
हो ना म्हणूनच त्याच्यावर एव्हढे पैसे घालवणे कळले नाही. रसेल पण आहे विसरू नकोस.
पंतचे यष्टीरक्षण बघणे म्हणजे
पंतचे यष्टीरक्षण बघणे म्हणजे एक शिक्षा!!!
किती दांडगा वशिला असावा त्याचा!!
Pages