Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्टोक्स भन्नाट खेळी!
स्टोक्स भन्नाट खेळी!
फिर सेन्चुरी दूर नही! >>> !!!
फिर सेन्चुरी दूर नही! >>> !!! दोन दिवसांत
मस्त खेळले रहाणे आणि विहारी. शेवटी रन्स फोर्स करण्याच्या नादात आउट झाले दोघे - पंत आणि विहारी.
तिकडे इंग्लंड १५/२ बघून नाद सोडून दिला होता. बघायला हवी होती स्टोक्स ची इनिंग. आता बोथम शी तुलना होईल खूप.
मी पाहिली .
मी पाहिली .
As good as Stokes played , Australia themselves lost it . Didn't have any game plan , giving single every 5th 6ht ball.
Last run out miss and rubbish review were icing on cake
रहाणेचं शतक ! वे. इंडीजचा
रहाणेचं शतक ! वे. इंडीजचा धुव्वा!! बुमराह - सलाम!!!
विंडीज फारच ढिसाळ खेळले ९ बाद
विंडीज फारच ढिसाळ खेळले ९ बाद ५० नंतर त्या रोश ने ४-५ फटके मारल्याने १०० झाले नाही तर मोठी नामुष्की!!
अजिंक्य रहाणे ने जमिनीलगतच खेळावे द्रविडचा आदर्श पुढे न्यावा खूपच धावा करेल!
बुमराह ने पहिल्या डावाची भरपाई केली दुसर्या डावात ७ धावा देऊन ५ बळी!!
स्वतःचे अंपायर असताना फुटबॉल
स्वतःचे अंपायर असताना फुटबॉल खेळणार्या प्रथितयश खेळाडूंना आउट न देउन व अनेक वेळा इतरांच्या महत्वाच्या खेळाडूंना आउट देउन (आठवा गावस्कर, तेंडूलकर) अनेक कसोटी सामने व मालिका जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला शिक्षा मिळाली याला न्याय म्हणतात. मला भयंकर आनंद झाला.
अत्यंत बिनडोक नेतृत्व, गचाळ क्षेत्ररक्षण, नको तेंव्हा घेतलेला डिआरएस यामुळे ऑस्ट्रेलिया हरले. (१० मिनिटात २ रन आउट व एक कॅच सोडणे हे ऑस्ट्रेलियन ऑल टाइम रेकॉर्ड असेल). हे लिहितानापण आसुरी आनंद होतोय.
स्टोक्स भारीच खेळला. गटस. नथिंग टू लूज. कोपर्यात सापडलेले मांजर जसा शत्रू कितीही बलाढ्य असला तरी जिवाच्या आकांताने हल्ला करते अगदी तसाच त्याचा आवेश दिसला. दैव बलवत्तर. देव तारी त्याला कोण मारी. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापासूनच स्टोक्स करामत दाखवतोय.
पुन्हा एकदा एक अविस्मरणीय सामना.
आपणही मस्त जिंकलो. रहाणे आउट
आपणही मस्त जिंकलो. रहाणे आउट झाल्यावर झोपलो. मॅच कालच संपेल अस वाटल नव्हत. वेल प्लेड रहाणे , भूमरा.
रोहीतला किती वेळ बाहेर बसवणार.
काल वाचलेली बातमी.
विराटला पॅविलियनमध्ये Detox your ego हे पुस्तक वाचतानाचा फोटो मिडियावर वायरल झाला होता. त्यावर एकाची कॉमेंट - परममित्र रोहित ने दिलेले दिसतेय भेट म्हणून.
विक्रम राठोडला जर संजय
विक्रम राठोडला जर संजय बांगरच्या जागी आणायचा होता अन बाकी कॉन्ट्रॅक्ट्स रिन्यू करायची होती तर बाकी अॅप्लिकेशन्स वगैरे फार्स कशासाठी?
जॉन्टी र्होड्स पेक्षा आर. श्रीधर चांगला फील्डिंग कोच ??
“R. Sridhar is one of the best fielding coaches in the world. Unfortunately in the World Cup, we had three wicket-keepers in the side and the combination was like that. Otherwise, he transformed the fielding unit so there is no second thought on that,” Prasad said at the press conference after the completion of the shortlisting procedure.
“We don’t see Jonty fitting in there because those roles are more for India A levels and for NCA,” he added.
फील्डिंग कोचचा रोल जर ए टीम अन एनसीए साठी आहे तर वर्ल्डकपचं उदाहरण कशासाठी?
आणि वर्ल्डकपमधे ३ कीपर्स कुणी निवडले? तूच ना? आणि जर तू त्या गोष्टीला अनफॉर्च्युनेट म्हणतोयस, तर ती तुझ्याकडून चूक झाली (अन पर्यायानी वर्ल्डकप न मिळण्याचा कलंक तुझ्या माथी ) हे कबूल करणार का?
प्रसादबुवा काय खाऊन असतात??
मुळात मेन कोच सीएसी निवडणार, अन सपोर्ट स्टाफ सिलेक्शन कमिटी हे लॉजिक काय आहे?
जर प्रसादबुवांच्या म्हणण्यानुसार फील्डिंग कोच ए टीम अन एनसीए सोबत काम करणार असतील तर ए टीम कोच अन एनसीए डिरेक्टरचा या सिलेक्शनमधे समावेश का नसावा???
याच विक्रम राठोडला काही महिन्यांपूर्वी इंडिया ए / अंडर १९ टीमसाठी द्रविडचा सहाय्यक म्हणून नेमण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्याचा मेव्हणा आषीश कपूर अंडर १९ टीमचा सिलेक्टर असल्याच्या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमुळे ते शक्य झालं नाही. सीनियर टीमच्या बॅटिंग कोच पदाची अपॉइंटमेंट ही त्याची भरपाई आहे का?
मुळात संजय बांगरनी अशी काय चूक केली की ज्यामुळे त्याला रिन्यू केलं नाहे, अन बाकीच्या सपोर्ट स्टाफनी अशी काय गोष्ट केली की ज्यानी त्यांना रिन्यू केलं???
फारंच प्रश्ण पडायला लागलेत.
(तरी काल ५०/९ असताना जडेजाला बोलिंग द्यायची कल्पना कुणी आणली हे विचारत नाहिये)
परत एकदा स्टोक्सच्या इनिंग्जचे हायलाइट्स पहावेत झालं...
तरी काल ५०/९ असताना जडेजाला
तरी काल ५०/९ असताना जडेजाला बोलिंग द्यायची कल्पना कुणी आणली हे विचारत नाहिये>>>>
मी सकाळी हाच विचार करीत होतो ९ बाद ५० झाल्यावर कोहलीला लाज वाटली का लवकर सर्वबाद करायची जडेजाला पुन्हा २ षटके दिली ती!
काल - आज संपलेल्या तीनही
काल - आज संपलेल्या तीनही टेस्ट्स जबरदस्त झाल्या. खरं सांगायचं तर दोनच. आपली आपण जिंकलो ह्याचा आनंद आहेच - रहाणे, विहारी, बुमराह, इशांत, जडेजा (ह्या दोघांचं ट्रान्सफॉर्मेशन जबरदस्त आहे) ह्यांचा खेळ बघून खूप छान वाटलं - पण बाकीच्या दोन टेस्ट्स मधे थरार खूप जास्त होता. पावसाने वेळ वाया गेल्यावर सुद्धा टेस्ट्स निकाली करण्याचं स्किल, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणी न्यूझिलंड कडे आहे.
स्टोक्स सद्ध्या ड्रीम फॉर्म मधे आहे. आता त्याला 'सरकी' मिळायला हरकत नाही. (अॅलिस्टर कूक 'सर' आहे!!). पण ऑस्ट्रेलिया मोक्याचा क्षणी इतक्या बेसिक चुका करताना बघवत नाही. ज्या संघाने अनेक वर्षं प्रतिस्पर्ध्यांना प्रेशर मधे आणून, त्यांच्या अर्ध्या - पाव चुकांतून मॅचेस जिंकायचे राजमार्ग बनवले, त्या संघाला मोक्याचा क्षणी असं तोंडघशी पडताना पाहून क्रिकेट मधली आणखीन एक ताकद (वेस्ट इंडीज नंतर) ढासळते की काय असं वाटलं.
न्यूझिलंड चा कमबॅक अफाट आहे. पहिली मॅच हारल्यावर आणी दुसर्या मॅच मधे पावसाचा मोठा व्यत्यय आल्यावर, केवळ एकदा बॅटींग करून, लंकेच्या होम ग्राऊंडवर लंकेच्या २० विकेट्स काढून मॅच जिंकणं अविश्वसनीय होतं.
ज्या संघाने अनेक वर्षं
ज्या संघाने अनेक वर्षं प्रतिस्पर्ध्यांना प्रेशर मधे आणून, त्यांच्या अर्ध्या - पाव चुकांतून मॅचेस जिंकायचे राजमार्ग बनवले, >>> सही!
फेफ त्या तिसर्या मॅच ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. ती विसरलोच होतो. किवीज लंकेत जिंकतील बिंकतील असे वाटलेच नव्हते
"किवीज लंकेत जिंकतील बिंकतील
"किवीज लंकेत जिंकतील बिंकतील असे वाटलेच नव्हते" - खरय. पहिली मॅच हारल्यावर आणी दुसर्या मॅच मधे पहिल्या दिवशी पाऊस पडल्यावर तर अजिबात वाटलं नव्हतं की किवीज जिंकतील.
>>> न्यूझिलंड चा कमबॅक अफाट
>>> न्यूझिलंड चा कमबॅक अफाट आहे. पहिली मॅच हारल्यावर आणी दुसर्या मॅच मधे पावसाचा मोठा व्यत्यय आल्यावर, केवळ एकदा बॅटींग करून, लंकेच्या होम ग्राऊंडवर लंकेच्या २० विकेट्स काढून मॅच जिंकणं अविश्वसनीय होतं. >>>
Couldn't agree more
ज्या संघाने अनेक वर्षं
ज्या संघाने अनेक वर्षं प्रतिस्पर्ध्यांना प्रेशर मधे आणून, त्यांच्या अर्ध्या - पाव चुकांतून मॅचेस जिंकायचे राजमार्ग बनवले, त्या संघाला मोक्याचा क्षणी असं तोंडघशी पडताना पाहून क्रिकेट मधली आणखीन एक ताकद (वेस्ट इंडीज नंतर) ढासळते की काय असं वाटलं. >>> परफेक्ट...
विंडीजच्या अधोगतीचं वाईट वाटतं.... कांगारू हरल्यावर का कोण जाणे पण प्रचंड आनंद होतो ....
"कांगारू हरल्यावर का कोण जाणे
"कांगारू हरल्यावर का कोण जाणे पण प्रचंड आनंद होतो" -
फक्त ते इंग्लंड च्या विरूद्ध नको वाटतं. ते एक तितकेच माजुरडे आहेत. 'आम्ही भारी, आमचं कौंटी क्रिकेट भारी, आमच्या परंपरा भारी' प्रकरण वैतागवाडी असतं. मॅच कुठलीही असो, इंग्लिश बॅट्समन विषयी, इंग्लिश कॉमेंटेटर बोलताना, 'मागे एकदा यॉर्क्शायर वि. ससेक्स च्या मॅच मधे....' अशी सुरूवात करून बोलायला लागले की कान बंद करावेसे वाटतात. थोडक्यात म्हणजे शिवाजी-अफझलखान भेटीकडे औरंगजेब जितक्या त्रयस्थ नजरेनं पहात होता, तितक्याच त्रयस्थपणे अॅशेस कडे बघायचा मी प्रयत्न करतो 
ऑन अ लायटर नोटः ह्या बाबतीत इंग्रजांची नाळ मुंबईकरांबरोबर जुळते (भाऊ: क्षमस्व!) - मुंबैचे खरे राजे इंग्रजच हे काही खोटं नाही. जगात गावसकर, वेंगसरकर, तेंडुलकर वगैरेंनी (प्राण गेला तरी मांजरेकर चं नाव घेणार नाही
) कितीही रन्स काढू देत, पण 'अरे एकदा सुनील कांगा लीग ला त्या पॅडीसमोर काय खेळला होता' सुरू झालं की, त्याच्या ३५ सेंचुरीज ची सुद्धा फारशी किंमत उरत नाही. 
पण 'अरे एकदा सुनील कांगा लीग
पण 'अरे एकदा सुनील कांगा लीग ला त्या पॅडीसमोर काय खेळला होता' सुरू झालं >>>> अगदी अगदी....
तसच तो क्लब क्रिकेट खेळायला आंतरराष्ट्रीय दौर्याहुन येताना विमानतळाहुन लगेच शिवाजी पार्कलाच आला ह्याचं विंडीजसमोर २ २ दिवस उभा राहिला पेक्षा जास्ती कवतीक
तसेच एका कुठल्यातरी सामन्यात गावसकर स्पिन स्मोदर करायला डावखुरा खेळलेला (बहुधा मुंबई वि. कर्नाटक) ह्याची लंबी कहानी मी ठाणे ते छ.शि. टम्रिनस प्रवासात वारंवार ऐकली आहे.....
>>> तसेच एका कुठल्यातरी
>>> तसेच एका कुठल्यातरी सामन्यात गावसकर स्पिन स्मोदर करायला डावखुरा खेळलेला (बहुधा मुंबई वि. कर्नाटक) >>>
कर्नाटकचा डावखुरा फिरकी गोलंदाज रघुराम भट्ट
समोर त्याने जवळपास २ तास डाव्या हाताने फलंदाजी केली होती. भट्टने त्या सामन्यात १३ बळी (८ + ५) घेतले होते.
<२० लाख सामने, ७००० विकेट्स…
<२० लाख सामने, ७००० विकेट्स… ८५ वर्षांचा क्रिकेटपटू ‘या’ तारखेला होणार निवृत्त>
https://www.loksatta.com/krida-news/cecil-wright-west-indies-pacer-decla...
मी बराच हिशेब केला तरी ८५व्या वयापर्यन्त २० लाख सामने कसे खेळले असतील?
अगदी २ लाख जरी टाईप करायचे असेल लोकसत्तावाल्यांना तरी २ लाख देखिल जास्त होतात वयाच्या १० व्या वर्षी सुरुवात केली तरी ७५ वर्षात २ लाख म्हणजे सरासरी रोज ७-८ सामने खेळायला हवेत! (बातमीत २ लाख सामने ६० वर्षात लिहलयं म्हणजे रोज ९ सामने किमान)
सेसिल राईट यांच्यावरचा मूळ
सेसिल राईट यांच्यावरचा मूळ इंग्लिश लेख वाचला. त्यांत ' The Daily Mirror, who estimated that he had played in over two million games.' असा उल्लेख आहे. मलाही अशक्य वाटतं.
विहारीचे शतक, इशांत अर्धशतक
विहारीचे शतक, इशांत अर्धशतक तर बुमराहचा हॅट ट्रीकसह षटकार!
पंत परत चुकीच्या शॉट वर आऊट
पंत परत चुकीच्या शॉट वर आऊट झाला. अचानक स्कॅनर खाली आलाय तो. संजू सॅमसन ला संधी मिळू शकेल का?
संजू सॅमसन ला संधी मिळू शकेल
संजू सॅमसन ला संधी मिळू शकेल का? >> संजू सॅमसन च्या आधी इशान किशनचा नंबर लागेल. संजू सॅमसन, कोहली, धवन, रोहित एकाच्पठडी मधे खेळतात. पंत ज्या जागेवर खेळतो तिथे डॅशर हवाय.
ऑन अ लायटर नोटः ह्या बाबतीत इंग्रजांची नाळ मुंबईकरांबरोबर जुळते >> जोक जाउ दे पण कांगा लीग मधे धावा काढणे खरच कौतुकास्पद होते रे. ओल्या दमट मॅटींग वर बॉल स्नेक डान्स करतो रे.
*जोक जाउ दे पण कांगा लीग मधे
*जोक जाउ दे पण कांगा लीग मधे धावा काढणे खरच कौतुकास्पद होते रे* - शिवाय, मैदानात उभं राहून, अगदीं जवळून पाहिलेल्या या ग्रेट लोकांच्या खेळाचा मनावरचा प्रभाव टिव्हीवर पाहिलेल्या खेळापेक्षां अधिक असतोच. तो समजून घेण्याचा विषय आहे, जोकचा नसावा!
आज जाॅटी रहोडसने स्मिथच्या आतांच्या खेळाला ugliest centuries म्हणून विराटचं कौतुक केलंय. इतकं टोकाचं लिखाण स्मिथवर अन्यायकारक असलं, तरीही उपखंडातील खेळाडूंचा खेळ हा सर्वसाधारणपणे अधिक शैलीदार व प्रेक्षणीय असतो, हेंही खरं !
आज जाॅटी रहोडसने स्मिथच्या
आज जाॅटी रहोडसने स्मिथच्या आतांच्या खेळाला ugliest centuries म्हणून विराटचं कौतुक केलंय. >> स्मिथ च्या प्रशिक्षकाने म्हटलय कि स्मिथ भारतीय असता तर त्याचे टेक्निक सर्वमान्य झाले असते. गावस्कर, तेंडुलकर, सेहवाग, कोहली सगळ्यांचे वेगळे टेक्निक असूनही त्यांच्यावर (भारतीयांनी) कधीच प्रश्नचिन्ह घेतले नाही . ह्याउलट ऑसी मधे वेगळे टेक्निक असणे फॉल्ट धरला जातो. नव्या खेळाडूला नॉर्म मधे बसावे लागते. वगैरे वगैरे. ..... ह्यात पहिली दोन नावे भारतीय नावे बघून मला आश्चर्य वाटले. एक वेळ तेंडूलकर पण समजून घेऊ कि तो १००% शास्त्रशुद्ध खेळत नसे पण गावस्कर ?
"कांगा लीग मधे धावा काढणे खरच
"कांगा लीग मधे धावा काढणे खरच कौतुकास्पद होते रे." - निश्चितच!! ते अमान्य नाहीच करता येणार.
"तो समजून घेण्याचा विषय आहे, जोकचा नसावा!" - भाऊ, कुणालाही दुखवण्याचा उद्देश नव्हता. क्षमस्व!
इशान कितपत परिपक्व आहे ह्याचा मला अंदाज नसल्यामुळे किंवा थोडी साशंकता असल्यामुळे मी संजू चं नाव घेतलं. गेल्या काही दिवसातल्या ए टीम्स पाहिल्या तर संजू, भारत आणी साहा सातत्यानं खेळतायेत.
खर तर पंत ज्या तर्हेने
खर तर पंत ज्या तर्हेने धूमधडक्यात खेळू शकतो तसे खेळू शकणारे भारतीय फलंदाज हाताच्या बोटांवर मोजण्याएव्हढे आहेत त्यातही कीपर असलेले अजूनही कमी. संजू, इशान, भारत, मनदीप, साहा ह्यांच्यात त्यातल्या त्यात ह्या बाबतीमधे त्याच्या जवळपास जाउ शकेल असा फक्त इशान वाटला मला. संजूचा problem हा असणार आहे कि तो बॉल सॉफ्ट झाला कि स्लो होतो आणि नेमके त्याला अशाच जागेवर खेळावे लागणार आहे. तो धवन किंवा रोहितच्या जागी सलामीला येण्याची शक्यता फारच कमी वाटते नि कोहलीच्या जागेला कोणी हात लावू नये.
एक वेळ तेंडूलकर पण समजून घेऊ
एक वेळ तेंडूलकर पण समजून घेऊ कि तो १००% शास्त्रशुद्ध खेळत नसे पण गावस्कर ? >>. टोटली! गावसकर तर सोडाच, पण सचिनबद्दलही लाँग हॅण्डल सोडले तर कसोटी मधल्या त्याच्या बॅटिंग मधे काय शास्त्रशुद्ध नाही?
*स्मिथ भारतीय असता तर त्याचे
*स्मिथ भारतीय असता तर त्याचे टेक्निक सर्वमान्य झाले असते* - मला वाटतं क्रिकेटमधे ' टेक्निक' आत्मनिष्ठ असणं हें गैर नाहीं व अपवादात्मकही नाहीं. जाॅटीची शेरेबाजी खरंच स्मिथच्या वेगळ्या टेक्निक वापरणयाबद्दल होती कीं तें टेक्निक सफाईदार व कलात्मक वाटत नाहीं म्हणून होती ? त्याने ugliest शब्द वापरलाय !
( *भाऊ, कुणालाही दुखवण्याचा उद्देश नव्हता. क्षमस्व!* अहो, प्लीज, असलं कांहीं मनातही आणूं नका. मैदानावर अगदीं जवळून पाहिलेल्या खेळाचा व खेळाडूंचा मनावरचा ठसा दाट असतो, एवढंच अधोरेखित करायचं होतं मला. टपल्या मारलेल्या उलट आवडतात मला ! आणि या बाबतीत तर टपलीला आमंत्रणच दिलं होतं मीं !!
)
रोहितने गाजवला पहिला दिवस..
रोहितने गाजवला पहिला दिवस..
रोहित ने संधी साधली. फक्त हे
रोहित ने संधी साधली. फक्त हे शॉर्ट-लिव्ह्ड असू नये. कारण भारतात, तुलनेने दुबळ्या द. अफ्रिकेविरूद्ध हे शतक आहे. असो. जे आहे, ते चांगलं आहे आणी त्याचं कौतुक आहे.
मला तरी साहाला टेस्ट मधे विकेटकीपर म्हणून खेळवण्याचा निर्णय आवडला. टेस्ट मधे विकेटकिपींग हा स्पेशलाईझ्ड जॉब आहे आणी साहाइतका उत्तम विकेटकिपर भारताकडे नाही. पंत needs time to get his mind in right place.
Pages