क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"इतक्या कांटेकोरपणे फलंदाजीचे क्रमांक, टीमचं कपोझिशन, ठरवणं खंच शक्य व हितावह आहे का ? त्यापेक्षा, याबाबतीत लवचिकता ठेवणंच, मला वाटतं, अधिक योग्य" - गेल्या काही दौर्यात हाच प्रयोग राबवला गेलाय. ओपनर्स, मधली फळी, गोलंदाज रोटेट करून प्रत्येकाची क्षमता तपासली गेलीये. थोडेफार फ्लोटर्स वगळता, बाकीच्यांचा रोल / रोल्स ठरवले गेले असण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ पडझड झाली आणी टारगेट सेट करायचय, मग धोनी चौथ्या क्रमांकावर येईल, नाहीतर पाचव्या / सहाव्या वगैरे बदल वगळता फर्स्ट चॉईस इलेव्हन ठरले असतील असं वाटतं. काही रिप्लेसमेंट्स पण ठरल्या असतील. उदा. रायडू - पंत, ओपनर्स - राहूल, जाधव / पंड्या / शंकर वगैरे, असा माझा अंदाज आहे.

*थोडेफार फ्लोटर्स वगळता, बाकीच्यांचा रोल / रोल्स ठरवले गेले असण्याची शक्यता आहे.* मी तर याच्याही पुढे जावून म्हणेन कीं पहिलं षटक कुलदीप टाकेल व बुमराह सलामीला फलंदाजीला येईल , इतक्या टोकाची लवचिकता घेवूनच विश्वचषकाला उतरावं. ही लवचिकता किती धूर्तपणे, कल्पकतेने व धाडसाने वापरावी, ही खरी कसोटी ठरेल. जेंव्हा सर्वच संघ इतर संघांचा सखोल अभ्यास करूनच व डांवपेंच ठरवूनच खेळायला उतरतात, तेंव्हा surprise elementला आत्यंतिक महत्व असतं. लिंबूटिंबू गणले गेलेले संघ या surprise elementमुळेच तर पूर्वी विश्वचषक जिंकूनही गेले !!
कसोटी सामन्यांची मानसिकता सोडून, निवडलेल्या प्रत्येक खेळाडूने विश्वचषकासाठी या मानसिकतेची तयारी करावी, हे महत्वाचं.

इंग्लंड च्या खेळपट्ट्या, रायडू+पंत च्या गेल्या काही मॅचेस मधल्या खेळी, माजी खेळाडूंनी लावून धरलेली बाजू यामुळे अजिंक्य रहाणे चा पर्याय पुढे येऊ शकतो. तो वर्ल्ड कप साठी टिम मधे असावा असं मनापासून वाटतं.
रोहित-धवन दोघे किंवा दोघांपैकी कोणीही एक, जरा टिकला तर मॅचचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता असते. पण गेल्या काही मॅचेस मधे दोघेही तू हो पुढे, मी आलोच अश्या पद्धतीने विकेट्स फेकतायत !

आतां तर शेन वाॅरन, पाॅटींगही भारताची टीम काय असावी यावर सल्ला देताहेत !! चेतेशवर पुजारा, अय्यर, रहाणे.....!!!! निवड समितीला माझाही सल्ला- ऐकावे जनाचे, करावे मनाचे ! पण अंतिम निवड झाल्यावर मात्र प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करेल, असा सराव व मानसिकता तयार करण्यावर भर देणं महत्वाचं.

अ‍ॅक्च्युअली, आजच डोक्यात आलं होतं की एक लेफ्ट फिल्ड चॉईस म्हणून रहाणे ची वर्णी पण लागू शकते - विशेषतः गेल्या काही मॅचेस मधली पडझड बघता.

अख्या क्रिकेट विश्वाला आज एकच प्रश्न भेडसावतोय - भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण ? जणूं त्यावरच भारत विश्वचषक जिंकणार कीं नाहीं हें 100% अवलंबून आहे ! माझ्या मतें, मर्यादित षटकांच्या स्पर्धेत अशी क्रमांकनिषठ निवड हा इतका महत्वाचा मुद्दा होणंच चुकीचं आहे .

मांजरेकरचं विश्लेषण बव्हंशी नेमकं आहे. इंग्लंडमधे चेंडूची ' लॅटरल मूवहमेंट ' गृहीत धरूनच फलंदाज निवडणं हिताचं. चेतेशवर पुजारा व रहाणेचा , निवड म्हणून नव्हे पण पर्याय म्हणून विशलेषणात उल्लेखही नसावा, हें खटकलं.
प्रत्येक खेळाडूचा कल जरी विशिष्ट पद्धतिने खेळण्याकडे असला, तरीही प्रसंगानुरूप व खेळाच्या फाॅरमॅटला सुसंगत खेळ करतां येणं हें खरं तर जागतिक दर्जाच्या खेळाडूचं लक्षण आहे. आपल्याकडे फलंदाजीचे किती पर्याय उपलब्ध आहेत यापेक्षा हया निकषाला त्यातले किती उतरतात, हे महत्वाचं. आतां तें उघड होतंय !!!

"प्रसंगानुरूप व खेळाच्या फाॅरमॅटला सुसंगत खेळ करतां येणं हें खरं तर जागतिक दर्जाच्या खेळाडूचं लक्षण आहे." - +१

मला 'मी असाच खेळतो' हे स्पष्टीकरण कधीच पटत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना, परिस्थितीनुरूप (ह्यात, मॅच सिच्युएशन, पीच कंडीशन, प्रतिस्पर्धी संघाचं बळाबळ वगैरे सगळं आलं) खेळता आलं पाहीजे असं माझं मत आहे. उगाच प्रतिमेत अडकू नये. आणी हे फक्त बॅट्समेन ना च नाही, तर बॉलर्स आणी फिल्डर्स ना सुद्धा लागू आहे. दुर्दैवानं ह्या व्याख्येत बसणारे फार थोडे खेळाडू आहेत - म्हणूनच ते लिजंड्स आहेत. Happy

इंग्लंडमधे चेंडूची ' लॅटरल मूवहमेंट ' गृहीत धरूनच फलंदाज निवडणं हिताचं. >> परत ब्रोकन रेकॉर्ड वाटेल पण मला अजिबात वाटत नाही कि अशी काही मूवहमेंट काही चुकार सामने वगळता असेल. शेवटी हा वर्ल्ड कप आहे जिथे बॅटींगधार्जिण्या खेळपट्ट्या असतील. इंग्लंडचा स्वतःचा संघ अशा मूवहमेंट ला गंडतो. त्यामूळे आफ्रिका, किवी नि ऑसीज च्या (कदाचित पाकिस्तान च्या) मूवहमेंट असेल तेंव्हा जबरदस्त सरस ठरू शकणार्‍या बॉलिंगला खतपाणी घातले जाईल असे वाटत नाही. मला वाटते कोहली नि शास्त्रीचा चौथा कोण ह्याचा निर्णय झालेला आहे त्यामूळे फारसे वेगळे काही दिसएल असे वाटत नाही. दिड महिन्याने कळेलच.

यंदाच्या IPL मधे मावी किंवा नागरकोटी पुढची स्टेप घेतील असे वाटलेले पण दोघेही नेमके injured आहेत. Sad

"पण मला अजिबात वाटत नाही कि अशी काही मूवहमेंट काही चुकार सामने वगळता असेल. " - पिचेस फ्लॅट बनवता येतील रे, पण वातावरणाचं काय? वर्ल्ड-कप समर च्या सुरूवातीला आहे, जेव्हा हवा चुकार असते (थंड, दमट), ज्यामुळे बॉल स्विंग होतो. पिचेस सुद्धा कितीही फ्लॅट बनवली, तरी मातीचा गुणधर्म असतोच. त्यामुळे इंग्लंड मधली समर च्या सुरूवातीची फ्लॅट पिचेस, अगदीच कानपूर / अहमदाबाद दर्जाची नसतील. भक्कम बचाव असलेले बॅट्समेन चमकतील ह्या वर्ल्ड कप ला असा माझा अंदाज आहे - १९९९ च्या वर्ल्ड कप सारखं

"यंदाच्या IPL मधे मावी किंवा नागरकोटी पुढची स्टेप घेतील असे वाटलेले पण दोघेही नेमके injured आहेत." - हो ना. ते दोघं आणी गिल-शॉ कडून खूप अपेक्षा आहेत.

पण वातावरणाचं काय? वर्ल्ड-कप समर च्या सुरूवातीला आहे, जेव्हा हवा चुकार असते (थंड, दमट), ज्यामुळे बॉल स्विंग होतो. >> गवत कापतील रे त्यामूले स्विंग एकदम कमी होईल.

गिल-शॉ कडून खूप अपेक्षा आहेत. >गिल ला परत एक फर्म position मिळाली तर मजा येईल. शॉ नि अय्यर धमाल करतील असे वाटतेय मुश्ताक अली मधून

आयपीएल च्या नादात इतर क्रिकेट कडे फारसे लक्ष जात नाहीये सध्या पण आज्ची बातमी भारी आहे. विंडीज च्या ओपनर्स नी वन डे मधे आयर्लण्ड विरूद्ध विक्रमी ३६५ ची भागीदारी केली.

मधे बरीच वर्षे हा विक्रम सचिन-सौरव च्या नावावर होता. आत्ता यांनी कोणाचा मोडला लक्षात नाही.

"विंडीज च्या ओपनर्स नी वन डे मधे आयर्लण्ड विरूद्ध विक्रमी ३६५ ची भागीदारी केली." - वर्ल्डकप चे पडघम वाजू लागले. सगळ्या संघांनी सराव सुरू केलाय. भारतीय संघ आयपीएल मधे अडकलाय. गेले काही वर्ल्डकप्स हेच चित्र आहे. आयपीएल चा वर्ल्डकप च्या तयारीवर प्रतिकूल परिणाम होऊ नये. केदार जाधव इंज्युअर झालाय, तो लवकर बरा होवो आणी बाकी कुठलीही इंज्युरी, फटीग वगैरे न होता ही आयपीएल संपो अशी अपेक्षा आहे.

मधे बरीच वर्षे हा विक्रम सचिन-सौरव च्या नावावर होता. आत्ता यांनी कोणाचा मोडला लक्षात नाही. > >तोही विंडीज च्या ओपनर्स च्याच नावे होता.

पाकड्यांच्या नावावर. काल नंतर पाहिले इथे
http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283609.html

यांच्या आयर्लण्ड प्रमाणे पाकड्यांचा ही झिम्बाब्वे च्या विरूद्ध होता. त्यामानाने तरंगा आणि जयसूर्या ची भागीदारी जबरी होती. इंग्लंड विरूद्ध आणि लीड्स ला, त्यांच्या बालेकिल्ल्यात.

आयसीसीच्या नियमात महत्वाचा बदल!
सामन्या दरम्यान एखादा खेळाडू जायबंदी झाल्यास येणार्‍या बदली खेळाडूस गोलंदाजी/ फलंदाजी करता येईल..
१ ऑगस्टपासून हा नियम लागू होणार म्हणे.

सामन्या दरम्यान एखादा खेळाडू जायबंदी झाल्यास येणार्‍या बदली खेळाडूस गोलंदाजी/ फलंदाजी करता येईल..>> म्हणजे शेवटचा बॉल टाकला की प्रत्येक गोलंदाजने मुद्दाम पडायचं आणि लागल्याचं नाटक करायचं म्हणजे आपली फलंदाजी आली की सगळे 11 च्या 11 बॅट्समन

*येणार्‍या बदली खेळाडूस गोलंदाजी/ फलंदाजी करता येईल.* -

म्हणजे तुझं क्रिकेट करिअर संपल्यातच जमा ! राखीव खेळाडू व्हायलाही आतां थोडी तरी फलंदाजी किंवा गोलंदाजी आवश्यक होईल ना !! 20190102_225036.jpg.

I love to hate Smith!! कसला चिवट खेळाडू आहे!! >>> परफेक्ट! टोटली.

त्याचे ते ऑफ साइडला शिफ्ट होणे अजून कोणत्याच बोलर ने कसे टार्गेट केले नाही माहीत नाही. कोणी त्याचा लेग स्टंप किंवा वेगात पायावर बॉल टाकून एलबीडब्ल्यू वगैरे करताना दिसत नाही.

विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आदी फलंदाजांना गुरुजी म्हणून तब्बल १३ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या व कसोटीत १३ धावांची सरासरी असलेल्या विक्रम राठोड ह्याची संघाचे फलंदाज गुरुजी म्हणून निवड!!!

अ‍ॅशेस कसली जबरदस्त चाललीय!! काल वाटलं होतं की इंग्लंड आता ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणणार. पण आज परत एकदा ऑस्ट्रेलिया च आघाडीवर आहे.

काल रहाणे मस्त खेळला, पण दोन वर्षाचा सेंच्युरी चा दुष्काळ संपवायची सुवर्णसंधी त्याने घालवली. आज सकाळी इशांत - जडेजा छान खेळले.

त्याचे ते ऑफ साइडला शिफ्ट होणे अजून कोणत्याच बोलर ने कसे टार्गेट केले नाही माहीत नाही. कोणी त्याचा लेग स्टंप किंवा वेगात पायावर बॉल टाकून एलबीडब्ल्यू वगैरे करताना दिसत नाही. >> अरे त्याने मागच्यच्या मागच्या अ‍ॅशेस मधे हे अति शफल होणे सुरू केले नि धावांची टाकसाळ उघडली. तो असा सरकला तरी त्याचे डोके खेळताना स्थिर असते (बहुधा तो फास्ट सरकतो फार नि hand eye co-ordination perfect असावे) त्यामूळे तू म्हणतो तसे टारगेट करणे शक्य झाले नाही. आर्चरचा बॉल सुद्धा लॉर्ड्स च्या स्लोप मूळे अँगल बदलला गेला नि अंदाज चुकवला असे वाटतेय मला. इतर पिचेस वर लागला नसता असा अंदाज आहे.

राहणे ची इनिंग शतकामधे मोजू नये असे मला वाटते. त्याने नुसती पडझड थांबवली नाही तर विहारीला पण सांभाळून घेतले.

राहणे ची इनिंग शतकामधे मोजू नये असे मला वाटते. >> टोटली. होप त्यालाही कॉन्फिडन्स आला असेल आता. फिर सेन्चुरी दूर नही!

बाय द वे, हे वाचा आणि पाहा. इण्टरेस्टिम्ग आहे Happy
https://www.espncricinfo.com/story/_/id/27445273/crash-course-cricket

Pages