Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोरीनी मॅच छान खेंचून आणली
पोरीनी मॅच छान खेंचून आणली होती पण शेवटच्या 4 षटकांतलं रन-रेटचं गणित फसलं असावं. त्यामुळे, शेवटचं षटक व शेवटचा चेंडू यावर निर्णय गेला. बॅड लक !
हा बाफ बंद झालाय की काय???
हा बाफ बंद झालाय की काय???
नो कमेंट्स ऑन लास्ट टी२० आफ्टरवर्ड्स्...
श्रीलंकेने आफ्रिकेत पहिली
श्रीलंकेने आफ्रिकेत पहिली कसोटी १०व्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करून रंगतदार सामन्यात जिंकली.
दुसर्या कसोटीत आता त्यांना १३७धावा हव्या आहेत, ८ गडी बाकी आहेत, आणि ३ दिवस शिल्लक आहेत!
हा सामना जिंकून लंका आफ्रिकेत मालिक २-० खिशात घालणार की काय?
काल पोरींची मॅच पाहिली
काल पोरींची मॅच पाहिली इंग्लंड विरुद्ध. आपली बॅटिंग बुडली, पण बॉलिंग पूर्ण बघता आली. एकता बिश्त ने ओव्हर हॅट्रिक करत मस्त फिरवली मॅच. त्या आधी छोटा स्कोर डिफेंड करताना जितकी टाइट बॉलिंग पाहिजे, तितकी होत नव्हती . पण ठराविक अंतराने विकेट्स काढत दबाव ठेवला होता.
श्रीलंका जिंकली की!! भारताने
श्रीलंका जिंकली की!! भारताने आस्ट्रेलियात आणि आता लंकेने आफ्रिकेत विजय मिळवला, भारतीय उपखंडातल्या देशांचे हे पहिले विजय या दोन देशात
अरे पुढे विकेट्स पडल्याच
अरे पुढे विकेट्स पडल्याच नाहीत? २ विकेट्स होत्या तेवढ्याच दिसत आहेत.
पहिल्या मॅच मधली ती परेराची बॅटिंग आज पाहिली. जबरी खेळलाय.
*भारतीय उपखंडातल्या देशांचे
*भारतीय उपखंडातल्या देशांचे हे पहिले विजय या दोन देशात* - पूर्वीची आंकडेवारी निकाल ठरवत नाही तर निकाल आंकडेवारी बनवत व बदलत असतात ! आणि क्रिकेटची हीच खरी शान आहे !!!
कांगारुना जिंकण्यासाठी 127
कांगारुना जिंकण्यासाठी 127 धाव 20 षटकात.
कूल धोनीची कूल खेळी..
जबरी झाली मॅच शेवटपर्यंत!
जबरी झाली मॅच शेवटपर्यंत!
कूल धोनी अलिकडे (म्हणजे २०१७
कूल धोनी अलिकडे (म्हणजे २०१७ पासून) कोल्ड धोनी झालाय
काल बॉलर्स ने मॅच खेचली होती आणी शेवटी एका बॉलर नेच (उमेश यादव) घालवली. उमेश यादव ने पदार्पणात प्रचंड अपेक्षा निर्माण केल्या होत्या. इतका फीट, कन्सिस्टंटली १४०+ च्या स्पीड ने बॉलिंग करू शकणारा, चांगली फिल्डींग करणारा फास्ट बॉलर मिळणं म्हणजे कमाल होती. पण नंतर तो अजिबातच लौकिकाला जागला नाही. तो बॉलिंग ला आला की बॅटींग टीमपेक्षा बॉलिंग टीम ला च धडकी भरते. काल अजून एखादा बॉलिंग ऑप्शन असता (विजय शंकर?), तर त्याला अधे मधे वापरून कदाचित शेवटची ओव्हर उमेश ला द्यायची वेळ आली नसती.
धोनी आज स्वतःच्या लौकिकाला
धोनी आज स्वतःच्या लौकिकाला जागलाय. मस्त खेळतोय तो आणी कोहली. पंत चं गणित कधी बरोबर येणार कुणास ठाऊक? चांगला खेळाडू आहे. अशा प्रकारच्या अपयशानं कारकिर्द खुंटायला नको.
रोहितला का विश्रांती आज??
रोहितला का विश्रांती आज??
रोटेशन. राहूल आणी पंत ला अधिक
रोटेशन. राहूल आणी पंत ला अधिक गेम टाईम द्यायचं धोरण आहे असं मागच्या वेळी कोहली म्हणाला.
धोरणे गेली खड्ड्यात. आधी
धोरणे गेली खड्ड्यात. आधी मॅक्सवेल ला उडवा! नाहीतर धोरण उत्तम, सामना हरलो असे व्हायचे!
कौल नि मॅक्सवेल छान जोडी!
कौल नि मॅक्सवेल छान जोडी!
आता काय म्हणायचे? कौल ला अनुभव मिळाला, त्यातून तो शिकेल.
आता धोरणे नका करू, फलंदाजी नि गोलंदाजीचा सराव करा!
"धोरणे गेली खड्ड्यात. आधी
"धोरणे गेली खड्ड्यात. आधी मॅक्सवेल ला उडवा!"
"आता धोरणे नका करू, फलंदाजी नि गोलंदाजीचा सराव करा!"
झक्की, हे मेसेजेस, नक्की कुणी कुणाला द्यायचे आहेत आणी ह्यात माझा रोल नेमका काय आहे?
* नाहीतर धोरण उत्तम, सामना
* नाहीतर धोरण उत्तम, सामना हरलो असे व्हायचे! * +1. सर्वोत्तम संघ तयार करायला कांहीं प्रायोगिक बदल आवश्यक असले तरीही त्यामुळे दोन देशांमधील अधिकृत सामन्यांचं अवमूल्यन करून त्याना प्रदर्शनीय सामन्यांचं स्वरूप येणं अयोग्यच. त्यापेक्षा, दोन्ही देशांनी त्याकरतां friendly सामने खेळावे.
दोन्ही देशांनी त्याकरतां
दोन्ही देशांनी त्याकरतां friendly सामने खेळावे. >> कसलेही वादविवाद न होता खेळताहेत म्हणजे friendly च म्हणायला हवे हे ही सामने. आज मॅक्सी काय भरमासाठ खेळला राव. मजा आली बघायला. चहल ला नि कौलला पार धुतला. पाच्बॉलर घेऊन खेळायची कल्पना फारशी पाटली नाही. एकही बॅकप बॉलर नव्हता. एक जरी ठोकला गेला कि बॉलिंग वर प्रेशर येणार हे उघड होते.
" पाच्बॉलर घेऊन खेळायची
" पाच्बॉलर घेऊन खेळायची कल्पना फारशी पाटली नाही. " - त्यातही बुमराह आणी चहल सोडले तर बाकी तिघांत काही मॅच-विनिंग पोटेन्शियल नव्हतं. कौल तर पूर्णपणे आयपीएल स्टार आहे. कृणाल आणी शंकर सुद्धा सहावे-सातवे बॉलिंग ऑप्शन्स वाटतात.
इंग्लंड- विंडीज मॅच पण मस्त चाललीये.
इंग्लंड- विंडीज मॅच पण मस्त
इंग्लंड- विंडीज मॅच पण मस्त चाललीये. >> अरे मस्त काय दोघांनीही जवळजवळ चारशे मारले. काहीच्या काही. Number of sizes scored seems obscene. बॅटींग बॉलिंग मधे काहीच बॅलॅन्स नाही
या सगळ्या गोंधळात लियाम
या सगळ्या गोंधळात लियाम प्लंकेट ने ८ ओव्हर्स ५ च्या सरासरीने टाकल्या
*कसलेही वादविवाद न होता
*कसलेही वादविवाद न होता खेळताहेत म्हणजे friendly च म्हणायला हवे हे ही सामने. * - अधिकृत सामने गंभीरपणे व जिद्दीने पण खिलाडू वृत्तीने खेळणे आणि 'friendly सामने ' खेळणे यात फरक आहे, असं आपलं मला वाटलं .
237 करणं कठीण जावूं नये कोहली
237 करणं कठीण जावूं नये कोहली अँड कं.ला !
100-4 नंतर धोनी - जाधवची धमाल
100-4 नंतर धोनी - जाधवची धमाल भागीदारी! 173 -4 , 39 षटकं.
<<<हे मेसेजेस, नक्की कुणी
<<<हे मेसेजेस, नक्की कुणी कुणाला द्यायचे आहेत आणी ह्यात माझा रोल नेमका काय आहे?>>

मला वाटते एकदा तुम्ही, असामी, भाउ यांनी एकत्र चर्चा करून ठरवा की काय करायला पाहिजे नि ते भारतातल्या क्रिकेट च्या प्रमुखाला, जो "धोरणे" ठरवतो, खेळाडूंची निवड करतो त्याला सांगा.
ऐकले नाही तर क्रिकेट पहाणार नाही, वाचणार नाही नि त्यावर लिहीणार पण नाही असे स्पष्ट सांगा.
मायबोलीच्या अधिकार्यांकडून काही दबाव आणता आला तर बघा.
शिवाय लाचहि (चुकलो, "देणगी") द्या.
बोलून चालून शेवटी खेळणे, धोरणे हे पैशासाठीच ना? हरणे, जिंकणे जे होईल ते होईल!
जिंकावं तर असं ! ग्रेट
जिंकावं तर असं ! ग्रेट भागीदारी !! अभिनंदन!
*.......जो "धोरणे" ठरवतो,
*.......जो "धोरणे" ठरवतो, खेळाडूंची निवड करतो त्याला सांगा.. * - पण त्याला समजते ती भाषा बोलणं फक्त तुम्हालाच जमतं, हा वांधा आहे ना !
Jadhav doesn't get due
Jadhav doesn't get due recognition I think , may be because he is my namesake
But seriously averaging 45 at 105 SR is not bad at all.
His bowling is ridiculous though. I feel I better than him
तुम्हीच ते क्रिकेट खेळणारे
तुम्हीच ते क्रिकेट खेळणारे जाधव असे मला वाटत होते. मग तुम्ही काही आतली बातमी इथे द्याल असे वाटले म्हणून मी वाचत होतो.
तुम्हीच ते क्रिकेट खेळणारे
तुम्हीच ते क्रिकेट खेळणारे जाधव असे मला वाटत होते. मग तुम्ही काही आतली बातमी इथे द्याल असे वाटले म्हणून मी वाचत होतो. >
Pages