क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ, भारीच!! Lol

राहुल ची शक्यता कमी वाटते पंड्याला कदाचित खेळवतील..

*,,, कामामुळे. मॅच बघताच आली नाही, त्यामुळे काय लिहीणार?* - फेफजी, मीं निवृत्तीला सरावल्यामुळे माझ्या हें लक्षात येत नाहीं. साॅरी .
*आज सुर्यप्रकाशामुळे खेळ थांबला! ऐसा भी होता है!* -
आजच वाचनात आलेली माहिती- सूर्यप्रकाश तडक डोळयावर येवूं नये म्हणून खेळपट्टी दक्षिण-उत्तर अशीच बनवली जाते. नेपियर येथील खेळपट्टी तशी नसावी म्हणून तिथे हा त्रास जाणवतो. असाच 'सनब्रेक ' इंग्लंडमधे 1995ला इंग्लंड- वे.इंडीज कसोटीत , 2006ला काउंटी सामन्यात व पाकिस्तानमधे 1996ला पाकिस्तान- न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यात घेण्यात आला होता .

काल विंडीजने इंग्लंडच्या पहिल्या डावात धुव्वा उडवला... बर्‍याच दिवसांनी विंडीजला सामना जिंकायची संधी मिळाली आहे केमार रोच मुळे.

विंडीजची ही टीम बरीच बरी आहे असं इथले तज्ज्ञ म्हणत होते, मॅचच्या आधी. विशेषतः होल्डरचं खूप कौतुक केलं होतं!.

*विशेषतः होल्डरचं खूप कौतुक केलं होतं!.* हो, प्रथमपासूनच त्याच्याकडे नेतृत्वाचे गुणही असल्याचं निश्चितपणे जाणवतं . कुणी सांगावं, लाॅईडसारखं हयाची कारकिर्द वे.इंडीजचा सुवर्णकाळ ठरेलही !

पण विंडिजची हिच टीम आपल्या विरुद्ध अ‍ॅव्हरेज खेळली एकदम. >> actually हिच टीम नव्हती पूर्णपणे. रोच नि अजून एक बॉलर नव्हता. फक्त गॅब्रियल होता बहुतेक. परत हि सिरीज ते विंडीजमधे खेळत आहेत हा मुख्य फरक आहे. इंग्लंडने चक्क दोन स्पिनर्स घेताना ब्रॉड नि वोक्स ला वगळले. अँडरसन नि कुरन दोघेही ब्रॉड नि वोक्स पेक्षा स्लो आहेत नि ह्या पिचवर पेसने फरक पडला असता हे गॅब्रियल , रोच नि जोसेफच्या बॉलिंङ वरून काल स्पष्ट झाले.

आयसीसी क्रमवारीत ऑलराऊंडर म्हणून होल्डर पहील्या क्रमांकावर- इंग्लंड विरूद्ध द्विशतक ( आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येवून ) व महत्वाचे बळी ! वे.इंडीजचे चांगले दिवस परत येण्याचे संकेत !

मस्त खेळले आज पण!
पोस्ट मॅच सेशन मधे गावसकरांचा एक मुद्दा पटला . भारताबाहेर आपली टीम यशस्वी होत असल्याचं एक प्रमुख कारण म्हणजे दमदार बॉलिंग अ‍ॅटॅक. टी-२०, वन डे आणि टेस्ट सगळीकडे आपल्या बॉलर्सचा दबदबा दिसला. मग ते फास्ट बॉलर्स असोत किंवा स्पिनर्स.
ह्याच मुद्द्याला धरुन पुढे बोलायचं तर विकेट किपिंग मधे सुद्धा एवढे पर्याय एकाच वेळी उपलब्ध असल्याचं यापूर्वी कधी पहायला मिळालं नाही! धोनीला पर्याय सापडणं कठीण आहे हे माहित असलं तरी (आजच्या मॅच मधे सुद्धा टेलर-लेथम ची पार्टनरशीप तुटत नव्हती तेव्हा धोनीची उणीव लगेच जाणवली) , त्याची जागा घ्यायला पंत, कार्तिक, पार्थिव पटेल तयार आहेत.
बॅटिंग च्या बाबतीत देखील सुरुवात करताना रोहित-धवन एकदा क्लिक झाले की पुढच्यांचं काम बरंच सोपं होऊन जातं.
...आता फक्त असेच खेळत राहिले तर वर्ल्ड कप साठी आपण एक स्ट्राँग टीम ठरु !

मस्त जिंकले. वेल प्लेड इंडिया!

धोनी नव्हता आणी मॅच ४३ ओव्हर्स मधे संपली.

काल कार्थिक ने सुद्धा ४ कॅचेस घेतले. बॉलर्स ना सुचना देत होता. पण आज कुठे काही त्याची ‘बातमी’ नाही झाली. मलासुद्धा ह्या धोनी न्यूज हा मार्केटींग चा प्रकार असण्याची शंका यायला लागलीये.

मलासुद्धा ह्या धोनी न्यूज हा मार्केटींग चा प्रकार असण्याची शंका यायला लागलीये. >> फे फे धोनीच्या जागेवर शंका असल्यामूले त्याचे चाहते अशा क्लिप्स फेमस करणे साहजिक नाहि का ? कार्थिक मूळातच धोनीची replacement आहे नक्की कि सहावा बॅट्समन हेच नक्की नाहिये त्यामूळे त्याची बातमी कशी होईल ?

किवी ज विरुद्ध जे काही चालले आहे ते खरच आश्चर्य वाटण्यासारखे आहे. दृष्ट लागण्यासारखा ओपनिंग स्पेल असतो आपला नि त्यानी काम खोख बजावले कि चहल नि यादव येऊन खातमा करतात. रायुडू परत क्लिक व्हायला लागलाय. IPL मधे सगळे साम्ने खेळवा त्याला म्हणजे World Cup मधे रस्टि नसेल.

कोहलीच्या जागी गिल ला खेळवतील कि कार्थिक खेळेल ?

*मलासुद्धा ह्या धोनी न्यूज हा मार्केटींग चा प्रकार असण्याची शंका यायला लागलीये.* मध्यंतरी धोनी विरूद्ध रान उठवलं गेलं, तेंव्हा मलाही अशाच प्रकारची शंका होती ! Wink

Pages