Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो. लोणचं पर्याय थोड्या
हो. लोणचं पर्याय थोड्या फ्लॉवरसाठी बरोबर आहे.
हॅ? माझ्या लोणच्याला चार
हॅ? माझ्या लोणच्याला चार दिवसांनंतर तार येते. (फोडणी कमी पडत असेल. माझ्या हातून काही केल्या सढळ तेल पडत नाही ते एक आहेच.) पण त्यामुळे आम्ही 'खराब होईल, खराब होईल' करत ओरपतो चक्क भा.लो आणि संपवूनच टाकतो!
अगो, सगळ्या फ्लॉवरचं लोणचंच कर असं नव्हे. ज्या काय दोन चार कृती करशील त्यात एक लोणचंही कर असं म्हणायचं होतं मला.
नीरजा!
पूनम, लाईट जात येत असतील तर
पूनम, लाईट जात येत असतील तर असं होऊ शकतं नाहीतर फ्रीजमध्ये टिकतं आठ दिवस. नंतर मात्र तार येते माझ्याकडे. मसाला मी नेहेमी थोडा जास्त घालते. विकतचाच पण त्यावर जे प्रमाण दिलं असेल त्यापेक्षा थोडा जास्त घालते.
एकावेळी पाव किलो गाजर आणि पाव किलो फ्लॉवर घेते. मटार घातले तर चार दिवसात संपवायला लागतं म्हणून नाही घालत.
पूनम, विल्हेवाट लावणे म्हणजे
पूनम, विल्हेवाट लावणे म्हणजे कमीतकमी खटाटोपात, एकाच रेसिपीत दोन्ही फ्लॉवरचा फडशा पाडणे असा अर्थ मी घेतला
रच्याकने, तंदूरी गोभीत पण पाहिजे तितका फ्लॉवर आरामात खपेल.
रच्याकने, विल्हेवाट, फडशा,
रच्याकने, विल्हेवाट, फडशा, खपवणे- आपण खायच्या पदार्थांबद्दल कसं आणि कायकाय बोलतो!
फ्लावरच्या तुर्यांच्या
फ्लावरच्या तुर्यांच्या फ्लॅट १/२ सेमी जाड चकत्या करायच्या. हिंग, हळद, तिखट मीठ, (असल्यास) थोडा मालवणी मसाला, थोडा लिंबाचा रस लावून , रवा लावून तव्यावर मंद आचेवर शॅलो फ्राय कराय च्या. माणशी एकेक तवा भरुन फोडी मस्त खपतील.
भजी नाही सुचवली कोणी अजून? ताजा, कोवळा फ्लावर असेल तर भजी बेस्ट
थोडं लोणी व किसलेलं आलं
थोडं लोणी व किसलेलं आलं यांसोबत फ्लॉवरचे तुरे वाफवायचे. नंतर त्यांवर मीठ, मिरपूड भुरभुरून नुसते किंवा व्हाईट सॉस / चीज सॉस बरोबर, ब्रेडच्या संगतीनं खायचे. सोबत एखादं हेल्दी सूप. पोटभरीचं जेवण होईल यात. हवं असेल तर केचपचा हलकासा शिडकावा. किंवा एखादं चक्का + पुदिना / अव्होकाडो वगैरे डिप बनवून त्यासोबत. कमी कष्ट.
खव्याचे गुलाबजाम करायचे आहेत.
खव्याचे गुलाबजाम करायचे आहेत. कधी ही न चुकणारी पाकक्रुती आहे का?
http://www.maayboli.com/node/9112
ही पाकक्रुती सापडली पण त्यावर बिन खव्याच्या गुलाबजाम वर चर्चा आहे.
या विकांताला करणार आहे. तो पर्यंत कुणीतरी detailed recipe योजाटा.
मी आज्ची आरतीची recipe
मी आज्ची आरतीची recipe पाहिलीच नाही. साध्या खव्याचे या recipe ने होतिल ना? तिकडेच हा प्रश्न विचारते.
पण मला अजुन ते राळे पुण्यात
पण मला अजुन ते राळे पुण्यात कुठे मिळाले ते समजलेच नाहिये << मंगळवार पेठेतील दुकानात मी पाहिले आहे
फुले मंडईत सुद्धा मिळत असणार
स_सा, योकुने पत्ता दिला आहे,
स_सा, योकुने पत्ता दिला आहे, पण तो लांबचा आहे, मला विपुमधे मंगळवारातल्या दुकानाचा पत्ता देणार का ?
मला विपुमधे मंगळवारातल्या
मला विपुमधे मंगळवारातल्या दुकानाचा पत्ता देणार का ?<< आज विचारतो त्याच्या कडे आहे का ते घरी जाता जाता
बाबुराव सणस कन्या शाळे जवळ, हॉटेल पद्मकृष्ण च्या बाजुला महाविर प्रो. स्टोअर
ओके, धन्यवाद.
ओके, धन्यवाद.
अगो तुला बरोब्बर समजल
अगो तुला बरोब्बर समजल बघ!
लोणच साउण्ड्स गूड. तन्दूरी करून निम्मा सम्पवला. सूप करीन थोड्याच.
PracheeS .. माझ्या आईनेही खवा
PracheeS .. माझ्या आईनेही खवा पाठवुन दिलाय.. त्यात २-३ चमचे मैदा नि चिमुटभर बेकिंग पावडर घालुन मळून ठेव म्हणाली फ्रिजात.. करायच्यावेळी रुम टेंपरेचरला आणुन गोळे करुन मग तळायचे असं सांगितलं आहे
मी शुक्रवारी ट्राय करेन बहुतेक
इथे बिसीबेळेअन्नाची रेसिपी
इथे बिसीबेळेअन्नाची रेसिपी आहे का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/25804
आणखीही असतील रेसिपीज्.
रुचिरामध्ये आहे ख्व्याच्या
रुचिरामध्ये आहे ख्व्याच्या गुजांची कृती. त्यांनी दिलेल्या पद्धतीनं पाक मात्र बिघडला होता माझा. अर्थात मी काही तरी चुकवलं असणार.
Gulkand ghalun coconut barfi
Gulkand ghalun coconut barfi karata yete ka?recipe Kay aahe?Gulkand sampavayacha aahe..thnx in advance
नवीन बीबी काढा की. अॅपल
नवीन बीबी काढा की.
अॅपल सायडर व्हेनेगर लिहिलेली एक बाटली आली आहे. कशाकशामध्ये कसं वापरता येईल? (मी व्हिनेगर जास्त वापरलेलं नाही)
केया, रेसिपी काही वेगळी नाही.
केया, रेसिपी काही वेगळी नाही. नेहेमी नारळाच्या वड्या करतो तशाच करायच्या. फक्त गुलकंदाचे प्रमाण पाहून साखर घाला. साखर कमी लागते.
Ok...pan andaje kiti gulkand
Ok...pan andaje kiti gulkand ghalu eka vatila n coconut barobarch ghalayacha ka or nantar?
पायनॅपल शिरा कसा करायचा
पायनॅपल शिरा कसा करायचा ?
ताजा अननस नाही मिळाला तर टीन मधला अननस वापरुन करता येइल का ?
३० लोकांसाठी साधारण काय प्रमाण लागेल...?
कोणाकडे रेसिपी असेल तर शेअर करा प्लीज
मला जरा अर्ध्या किलो
मला जरा अर्ध्या किलो रव्याच्या शिर्याची प्रमाणासकट, अजिबात डोकं न चालवावी लागणारी पाकृ द्या कृपया.
तो शीरा किती लोकांना पुरेल ?
स्मिता .. फेबुवर अन्न हे
स्मिता .. फेबुवर अन्न हे पुर्ण ब्रम्ह नावचं पेज आहे त्यात आलेली रेसिपी -
अननस शिरा – १ वाटी रवा असेल तर एक वाटी टीनमधल्या अननसाचे बारीक तुकडे, हे तुकडे पाकवलेले असतात म्हणून अर्धी वाटी साखर वापरा. तूप गरम करून रवा चांगला खमंग भाजा. नंतर त्यात अडीचपट पाणी घाला. झाकण ठेवून तो चांगला फुलू द्या. मग साखर घाला. साखर विरघळली आणि शिरा चांगला मऊ झाला की त्यात बारीक चिरलेले अननसाचे तुकडे आणि केशर घाला. वरून परत थोडं साजूक तूप घाला. ताजा अननस वापरू नका. कडवट होईल
www.shecooksathome.com वरही तुम्ही बघू शकता.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.
- सायली राजाध्यक्ष
स्मिता श्रीपाद या रेसिपी पहा,
स्मिता श्रीपाद या रेसिपी पहा, पहिल्या रेसिपीने मस्तच झाला होता शिरा.
http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5488372680499381855...अननसाचा शिरा
http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5700260151803682163...अननसाचा शिरा
चिंच खजूराची चटणी उरलीय..
चिंच खजूराची चटणी उरलीय.. मसाले भात , वांग्याची भाजी वगैरेत वापरून झालीय.
नाल के लिये घोडा असे उपाय नकोत.
झंपी, उरलेली चटणी आईस क्यूब
झंपी, उरलेली चटणी आईस क्यूब ट्रे वापरून फ्रीज करून ठेवू शकता. ही युक्ती मायबोलीवरचीच (बहूतेक संपदाची) आहे.
त्या अॅपल साईडर व्हेनगार
त्या अॅपल साईडर व्हेनगार बद्द्ल सांगा की.
खटट कोफ्ते / हांडवो / दही
खटट कोफ्ते / हांडवो / दही वडा
मसालेभात -
बाजरी वडा/कोथींबीर वडी
मोदक
ही डीश ठरविली आहे.. मित्र मैत्रीणींना बोलवणार आहे. किमान ४०-५० लोक होतील.
मला प्रमाण सांगा ना.
मसालेभात - १ मध्यम आकाराच्या वाटीची मुद देनार आहे. तांदुळ किती घेऊ ???
दही वडा जर करायचा झाला तर मध्यम आकाराचे वडे करण्यासाठी किती उडीद डाळ लागेन ??
Pages