Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक नवीन कळालं त्या निमित्तानी
एक नवीन कळालं त्या निमित्तानी की भाजक्या रव्याचेही दोसे / आप्पे करता येतात.
धन्यवाद इथे आवर्जून लिहिल्याबद्दल.
एक माहिती हवी आहे - हातसडीचा
एक माहिती हवी आहे - हातसडीचा तांदुळ व् कोकणात मिळणारा उकाडा तांदुळ यात काय फरक आहे मला माझ्या 7 महिन्या च्या लेकी साठी भरड व् खिचड़ीत वापरायला कोणता चांगला सध्या बासमती वापरतीये कृपया माहित असल्यास सांगा
सध्या बासमती वापरतीये कृपया
सध्या बासमती वापरतीये कृपया माहित असल्यास सांगा >>>>>> बासमती तांदूळ अजिबात वापरू नका त्याऐवजी पांढराशुभ्र नसणारा इतर तांदूळ वापरा.वैद्य राजीव कानिटकरांचा हा सल्ला वाचला आहे.शक्य असल्यास मालवणी मसाले मिळतात,त्या दुकानात गावचे तांदूळ मागा.लालसर रंगाचे छोटे दाणे असतात.सुरे तांदूळ म्हणतात.
बासमती तांदूळ अजिबात वापरू
बासमती तांदूळ अजिबात वापरू नका >> +१ बासमती पचायला जड असतो
थैंक्स , मग माझ्याकडे उकड़े
थैंक्स , मग माझ्याकडे उकड़े तांदुळ आहेत ते वापरू का????
ओह! वेगवेगळ्या प्रकारचे
ओह! वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ पचायला जड/ हलके असतात माहीत नव्हतं.
मग माझ्याकडे उकड़े तांदुळ
मग माझ्याकडे उकड़े तांदुळ आहेत ते वापरू का??>>> हरकत नाही.
धन्यवाद महत्वाची
धन्यवाद महत्वाची माहिती
दिल्याबद्दल
घरी अख्खी तूर डाळ पडली आहे,
घरी अख्खी तूर डाळ पडली आहे, त्याचं काय करता येईल ? उसळ घरी फारशी आवडली नाही कुणाला..
कारल्याची चिन्चगुळाची भाजी
कारल्याची चिन्चगुळाची भाजी कशी करतात? इथे एक आहे पण त्यात डाळ आणी पाणी घातलेय, तशी नकोय त्यापेक्षा वेगळि कुठली रेसिपि असेल तर सान्गा!
मी कारल्याची भाजी
मी कारल्याची भाजी खालिलप्रमाणे करते -
कारली हातात घ्यायच्या आधी चिंच भिजत घालते. साधारण पाव किलो कार्ल्याला सुपारिपेक्षा थोडीशीच जास्त चिंच पुरते.
मग कारली स्वच्छ धुवून, गोल कापुन, त्याच्य फक्त बिया काढुन त्यांना चमचाभर तेलात चांगली १५-२० मिनिटे परतुन घेते. बाजुलाच १ कांदा बारिक चिरुन त्याची मोहरी, जिरे, हिंग घालुन फोडणी करते, (हवेतर लसुण घाला, नसलेला बरा). कांदा शिजुन मऊ झाल्यावर त्यावर माझा नेहमीचा मालवणी मसाला, हळद टाकुन एक मिनिट ढवळून मग त्यावर चिंचेचा कोळ घालते (साधारण तिनचार चमचे होतो हा कोळ). वर चमचा-दोन चमचे किसलेला गुळ. हे मिश्रण थोडे पातळसर होते चिंचेच्या कोळामुळे. मिठ घालुन त्यावर परतलेली कारली घालायची, मस्त परतायचे आणि थोडा पाण्याचा शिडकावा मारुन एक वाफ काढायची. कोथिंबीर घालुन वाढायची. कारली आयुष्यात अजुन कधीही न खाल्लेल्यांनीही ही भाजी आवडीने खाल्ली आहे.
धन्स साधना,
धन्स साधना,
प्राजक्ता, कार्ल्याची
प्राजक्ता, कार्ल्याची पंचामृती भाजी मस्त होते. कारली धुवून चिरून हवं तर पाणी काढून फोडणीत परतायची. त्यात सुकं खोबरं+तीळ्+दाणे भाजून कूट करून घालायचं. चिंच गूळ गोडामसाला हवा तर थोडा गरम मसाला लाल तिखट घालून व्यवस्थित भाजी शिजवायची. वरून चिरलेली कोथिंबीर.
कारल्याला चिंचगूळ जरा जास्तच लागतं.
मंजूडी, भेंडीची पण अशीच
मंजूडी, भेंडीची पण अशीच पंचामृती भाजी करतात का ?
रावी, भेंडी, तोंडलीचीही अशी
रावी, भेंडी, तोंडलीचीही अशी भाजी करतात. तोंडली आधी शिजवून घ्यावी लागतात जरा.
मला सोया चंक्स घालून झटपट
मला सोया चंक्स घालून झटपट (सकाळी डब्याला) होणार्या पुलावाची किंवा तत्सम भाताच्या प्रकाराची रेसिपी हवी आहे. कृपया सांगा.
थॅन्क्स मन्जु! आता अशीही करुन
थॅन्क्स मन्जु! आता अशीही करुन बघेल.
शर्मिला -
शर्मिला - http://nishamadhulika.com/502-soya-chunks-pulao-recipe.html
मंजूडी थॅन्क्स. पण हाही
मंजूडी थॅन्क्स. पण हाही वेळखाऊ आहे. आदल्या रात्री भात शिजवून सकाळी त्यात भाज्या, आधी बनवलेला शेझवान वगैरे सॉस घालून मग त्यात सोया चंक्स किंवा ग्रॅन्यूल्स मिसळून करायला जितका वेळ लागतो तितक्याच वेळात काहीतरी झटपट वेगवेगळ्या चवीच्या पुलावांची किंवा भातांची गरज आहे. सकाळी सहाच्या आत घर सोडायचय मुलीला आणि तिला डोसे, इडल्या वगैरे सोडून फक्त भाताचा प्रकारच आवडतो डब्यात. त्यात काहीतरी पौष्टीक असावं या हेतूने सोया चन्क्स घालायचा विचार आहे. पण त्याची म्हणजे फक्त ते चन्क्सच घातलेली मधुलिकासारख्या पुलावाची चव तिला आवडत नाही. एरवी इतर ग्रेव्हीत मिक्स केले की खाते ती.
वेगवेगळ्या प्रकारच्या झटपट भात प्रकारांचा बीबी आहे का? मागे नंदिनीने कुठेतरी असे प्रकार लिहिलेले.
प्रोटीन सप्लिमेंट म्हणून हवे
प्रोटीन सप्लिमेंट म्हणून हवे असेल, तर भातासोबत डाळ पोटात जाईल असे खिचडी प्रकार चालणार नाहीत का? सोया चंक्स ऐवजी डाळीचे वडे, भाज्या इ. घातलेले फोडणीच्या भाताचे प्रकार आवडतील का?
चवीच्या आवडीचा प्रश्न आहे असे वाटले म्हणून सुचवून पाहिले.
शेजवान वगैरे सॉस घरी बनवता येत नाहीत, व कितीही चांगल्या कंपनीचे आणलेत तरी त्यात भरपूर प्रिझर्वेटिव्ज व एमेसजी असतेच.
हो भाज्या, डाळ घालून खिचडी हा
हो भाज्या, डाळ घालून खिचडी हा प्रकार आहे की. अगदीच घरचा त्यामुळे निसटला डोक्यातून. धन्यवाद.
आता त्यात जरा व्हेरिएशन्स शोधते.
डाळीचे वडे म्हणजे सांडगे किंवा पंजाबी बडियां असतील उपलब्ध तरी चालू शकेल असं वाटतं.
शेझवान सॉस घरी बनवण्याची रेसिपी मायबोलीवर वाचलेली आठवते.
शेझवानचा की इन्ग्रेडीयंट
शेझवानचा की इन्ग्रेडीयंट तिरफळं आहे
-भरपूर भाज्या आणि पनीर घालून
-भरपूर भाज्या आणि पनीर घालून पुलाव
-पालक च्या ग्रेव्हीत परतलेला पुलाव, पनीर/ टोफू/ छोले घालून
-चना दाल पुलाव, डाळ आणि तांदूळ २० मिनिटे भिजवून मग शिजवून
शर्मिला, मलाही डब्यात भात
शर्मिला, मलाही डब्यात भात न्यायला आवडायचा , अजूनही आवडतो. आई मला हिरवे/ब्राऊन चणे, भिजवलेले शेंगदाणे, मोड आलेली कडधान्ये सोबत भाज्यांचे (फरसबी, तोंडली, बटाटा) कॉम्बिनेशन करून मसाले भात द्यायची. डब्यात मसाले भाताच्या वरती लोणच्याची फोड आणि खार.
- दहीभात. वरून भरपूर मोहोरी आणि कडीपत्त्याची फोडणी. सोबत बटाटाच्या काचर्या.
माझ्याकडे भरपूर लिंबे आहेत.
माझ्याकडे भरपूर लिंबे आहेत. आईने झाडावरची लोणच्यासाठी दिली आहेत. पण लोणचे सोडून दुसरे काय करता येईल? रस काढून ठेवला तर किती टिकेल?
जागू, आमच्याकडे घरच्या झाडाला
जागू, आमच्याकडे घरच्या झाडाला लिंबं आली नि जास्त झाली की रस काढून त्यात विरघळणार नाही आता, इतकी प्रचंड साखर घालून ठेवतात माझ्या साबा. ती सावकाश विरघळते. पण ते मिश्रण फ्रिजात ठेवायला लागतं. खूप टिकतं. अडीनडीला वापरता येतं. तुझ्याकडे नक्की किती लिंबं आहेत कळत नाहिये म्हणून सहज सुचवलं.
किंवा लोणचं करायला वेळ नसेल तर नुसत्या फोडींना तिखट-मीठ, हवा तर मसाला घालून ठेवायचं एरवीच्या लोणच्याइतकंच. मग सावकाशीने फोडणी. घेताना लहान सटात काधून लागेल तशी साखर घालून घ्यायची.
जागू ......लीम्बान्चा रस
जागू ......लीम्बान्चा रस काढ. १ वाटी रस असेल तर त्यात अन्दाजे २ वाट्या साखर + १.५ टी स्पु मीठ + आवडत असल्यास थोडी पुदिना पाने कुस्करुन घाल. . हे सगळे मीक्सर मधे फिरव आणी डीप फ्रीझर मधील बर्फा च्या ट्रे मधे घालुन क्युब्स कर. हे क्युब्स काढुन झिप लॉक बॅग मधे घालुन परत डीप फ्रीझ मधॅ ठेव. लागेल तेवा एक क्युब एक ग्लास पाण्यात विरघळ्व. झट्पट ताजे ताजे लिम्बु सरबत तयार.
नीधप ह्यांची लेमन राइस,
नीधप ह्यांची लेमन राइस, ड्रायफ्रूट पुलाव रेसीपी आहे
अकु ची मोड आलेली धान्ये घालून केलेल्या पुलावाची रेसीपी आहे.
व्हेज फ्राइड राइस. व्हेज पुलाव वगैरे देता येइल.
फोडणीचा भात, बिसिबेले भात, दही भात झालेच पाच दिवस कामाचे.
शर्मिला, मी लेकीच्या
शर्मिला, मी लेकीच्या डब्यासाठी प्रेशर पॅनमध्ये जिरा राईस, मसालेभात (डाळींब्या/ तोंडली/मटार घालून), व्हेज पुलाव (फ्लॉवर/ गाजर/ फरसबी/ कांदा/ मटार इत्यादी उपलब्ध असतील त्या किंवा हाताला लागतील त्या भाज्या), मसुर/ मूग/ मटकी घालून पुलाव, आदल्या रात्रीचा भात उरवून फ्राईड राईस, कांदा/ लसूण घालून फोडणीचा भात, पालक किंवा कांद्यांची पात घालून फ्राईड राईस इत्यादी भाताचे प्रकार करते.
आधी तांदूळ धुवून टाकते, पुढची भाज्यांची/ फोडणीची तयारी करेपर्यंत भिजतात तेवढे पुरतात.
कडधान्य असतील तर कांदा-टोमॅटो-आलंलसूण पेस्ट फोडणीत परतून मग तांदूळ आणि मीठ, गरम मसाला घालून ढवळून दुप्पट पाणी घालून दोन शिट्ट्या. जिरा राईस/ पुलाव/ मसालेभात याप्रमाणेच. जिरा राईस/ पुलावाला खडा मसाला, मसालेभाताला गोडा मसाला + गरम मसाला. खिचडी असेल तर तांदूळाबरोबर मसूर डाळ/ मूग डाळ (सालीची/ बिन सालीची), तुरीची डाळ इत्यादी धुवून टाकणे.
पालक किंवा कांद्याची पात असेल तर आधी तांदूळ परतून मग पालेभाजी परतून मीठ, फ्लेवरसाठी किंचीत ग.म. किंवा चिंग्ज फ्रा.रा. मसाला, दुप्पट पाणी घालून दोन शिट्ट्या. डब्यात भरल्यावर वरून चीजक्यूब किसून घालते.
प्रज्ञा धन्यवाद ग. अग लोणचे
प्रज्ञा धन्यवाद ग. अग लोणचे कोणी खात नाही म्हणून नाही करत.
सुहास्य कसली भारी आयडीया आहे. धन्यवाद.
Pages