पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_20180612_221624.jpg
कोनले शंका व्हई तं आठे ई जात. पोटभर खावाडसु.
हाई पचाले भलती हलकी ऱ्हास आन सालसंकट शे म्हणून बठ्ठा फायबर बियबर इंटेक्ट र्हातस.

आरारा, पण मी जीच्याकडून विकत घेते, ती मी जो फोटो दिलाय त्याला गव्हाच्या लाह्या-कुरमुर्या बोलते.
आम्ही त्याची सुकी भेळ करून खातो, छान लागते

आरारांशी सहमत.

बाकी पदार्थ छान लागायचा व आपण जे समजतो तेच तो असायचा काही संबंध नाही.

बाजारात कुरकुरेसारख्या पॅकमध्ये एक smiley मिळतो, नाव माहीत नाही. तो घ्या व त्या पदार्थाचे कंपोसिशन व या तुम्ही लाह्या म्हणताय त्याचे कंपोसिशन तपासा, आकार व थोडीफार चव हे सोडले तर बाकी बरेच साम्य आढळेल.

धन्यवाद आरारा.
मी म्हणतेय त्या लाह्या ( भडंग म्हणू हवे तर) नक्कीच वेगळ्या आहेत. माझ्याकडे एक फोटो होता,सापडल्यास टाकते. अमा नी दिल्याप्रमाणे किचकट कृती असेल तर अर्थात पास त्या कृतीला.

ट्युलिप तुम्हाला गव्हाच्याच लाह्या हव्यात तर मी दिलेली लिंक पहा, तीही थोडी खटाटोपची आहे.

नाहीतर फुल गॅसवर कुकर ठेवा, म्हणजेच जाड बुडाचे भांडे ठेवा.

कुकरचा फक्त खालचा भागच वापरायचा हे लक्षात घ्या, शिटीवाले झाकण दूर ठेवा. त्याचा उपयोग नाही.
.

कुकरात चांगला तापला की मूठभर गहू घालून पोकळ झाकण ठेवून झाकणातून लाम्ब दांड्याच्या कलर्थ्याने हलवत राहा. लाह्या फुटतील. आई अशाच ज्वारी वगैरेंच्या लाह्या काढायची. थोडेसेच करायला ही पद्धत बरीय.

कुकर चांगला तापायला हवा व तापल्या भांड्यावर टाकलेल्या धान्याच्या लाह्यांच ताडकन फुटतील हे लक्षात घ्या.

गव्हाच्या छोट्या फुलवलेल्या लाह्या आणि हा लसूण पाकळी सारखा दिसणारा गव्हाच्या लाह्या म्हणून विकला जाणारा प्रकार दोन्ही खाल्ले आहे.
मला तो मोठा प्रकार लसूण पाकळ्या टाईप दिसतो म्हणून आवडत नाही.(किराणा मध्ये पोत्यात खूप मोठ्या प्रमाणावर विकायला असतो.)
हे बहुधा बॉबी सदृष प्रोसेसिंग करुन बनलेले प्रॉडक्ट असावे.

घोसाळी गिलके ची भाजी करताना त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्या. कढई मध्ये तेल गरम करून जिरे मोहोरी व बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे नंतर त्यामध्ये काळा मसाला / कांदा लसूण तिखट टाकून गिलक्याच्या फोडी टाकून चांगल्या परतून घ्याव्या. नंतर त्यात भिजवलेली हरभरा डाळ व मीठ टाकून परतून कढई वर झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी. शिजत आली की थोडे दाण्याचे कूट व कोथिंबीर टाकावे. ही भाजी लोखंडी कढईत केल्यास खूप छान लागते.

हा माझा मायबोलीवरील पहिलाच प्रतिसाद होता. अल्पना यांनी घोसाळ्याच्या भाजीबद्दल विचारलेल्या प्रश्नास उत्तर म्हणून प्रतिसाद दिला आहे, परंतु तो शेवटच्या पानावर येतो हे माहित नव्हते. मायबोलीवर मी नवीन आहे. येथे कसे लिखाण करावे आणि इतर गोष्ष्टी शिकून घ्यायचा प्रयत्न करत आहे, चुकीबद्दल क्षमस्व.

चुकीच्या जागी चुकीचा प्रतिसाद. प्रकाटाआ

नो प्रॉब्लेम सुप्रिया अभिजीत! अश्यावेळेला, आधी त्या व्यक्तीचं नाव लिहिलं तर त्यातल्यात्यात समजायला आणि संदर्भाला सोपं पडेल... Happy

@ सुप्रिया अभिजीत
अशा वेळी खालील प्रमाणे प्रतिसाद देत जा.
>>>>
नवीन Submitted by सुप्रिया अभिजीत on 14 June, 2018 - 10:48

ज्याला प्रतीसाद द्यायचा आहे त्याची लिंक वरीलप्रमाणे डकवायची आणि खरडायचे.

व्हीबीने दिलेला फोटो मला ते गव्हले वगैरे शेवयांचा प्रकार असतो तसा वाटतोय. हे प्रकार भीमथडी जत्रा वगैरे ठिकाणी पाहिले आहेत. लाह्या म्हटल्यावर जो आकार/प्रकार डोळ्यासमोर येतो त्यात आरारा ह्यांनी दिलेला फोटो बरोबर वाटतो.

राजगिरा घरी मिक्सरमध्ये दळला जात नाहीये, थोडा भाजून घेतला होता आधी. काय करावे ?>>>>सणसणीत तापलेल्या तव्यावर त्याच्या लाह्या बनवून मग गुळाच्या पाकातले राजगिऱ्याचे लाडू बनवता येतील ..
सविस्तर कृती मिळेल तुनळी वर ..

गरम दुधात राजगिरा टाकून खीर Happy उत्तम पर्याय अंजली Happy
राजगिरा दळण्याची काही वेगळी पद्धत असते का ?
गोल गोल फिरतोय तो मिक्सि मध्ये नुसताच Lol

शिंगाडा पीठाचे लाडू पण छान होतात, मी पूर्वी केलेले दोन तीनदा. बेसन लाडू करते तसेच केलेले, पिठीसाखरेचे.

गुळ घालून करून नाही बघितले, पण लागतील चांगले. शिंगाडा पीठ जास्त तुपात खमंग भाजून मग पिठीसाखर घालून केलेले, सोबत वेलची पूड, सुका मेवा तुकडे, बेदाणे घातलेले.

Pages