पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईल्ड राईस चे सूप आवडलेले. करून नाही पाहिलेले पण क्रीम, चिकन आणि थोडे बदाम काप घालून सूप मस्त लागते. खास हिवाळ्यासाठी तर उत्तम.

ही रेसेपी सापडली

http://allrecipes.com/recipe/18448/chicken-wild-rice-soup-i/

मी हल्लीच खिचडी केली, डाळ व भाज्या घालून. छान झाली. हे झाले भारतीय. पण मेक्सिकन सॅलड मधे वापर करता येइल, गम्बो सारखं काहीतरी.

तुम्ही अंबरनाथ ला असता का? पटवर्धनांच्या दुकानात मिळेल. बाकी बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे इथे कोणत्याही मराठी पद्धतीच्या पोळी-भाजी केंद्रात किंवा गृहोदद्योग दुकानात मिळायला हरकत नाही. बेडेकर ब्रँड च मेतकूट पण कोणत्याही दुकानांत मिळेल, ठीक असतं. एकदा अश्या मेतकूटाची चव घेऊन अंदाज आला कितपत खमंग हवं, बेसिक चव इत्यादी की मग कृतीने घरी करायला सोपे जाईल.

धन्स राजसी अन भरत

तुम्ही अंबरनाथ ला असता का? >>> नाही

मला खरतरं ऊतसुक्ता होती की हा काय प्रकार आहे ते जाणुन घ्यायची, सर्च ऑप्शन चालतं नाही म्हणुन ईकडे विचारले.
पण ती पाक्रु बघता असे वाटते की कदाचित मला नाही आवडणार.

करवंदाची आमटी / सार (किवा असच काहीतरी ) ची कृती कोणीतरी टाकली होती . त्याची लिंक मिळेल का . `शोध' ता येत नाहीये .

A_closeup_of_puffed_rice.JPG
मागे एका जत्रेत ह्या गव्हाच्या लाह्या मिळालेल्या. घरी खूप आवडल्या. लाह्या विकणाऱ्या मावशींनी सांगितले कि त्या भट्टीत करतात. घरी ओव्हनमध्ये करू शकतो काय? कोणाला काही कल्पना?

प्रोसेस वेगळी असावी.
मागे आम्ही पॉपकॉर्न मेकर मध्ये करायचा प्रयत्न केला होता.जळलेले गहू मिळाले ☺️☺️
बहुधा मध्ये एक स्टेप असेल, गहू भिजवून सावलीत वाळवणे वगैरे.
खान्देशी मंडळींना माहीत असेल.

ज्वारीच्या लाह्यांची पद्धत पाहिलेली, त्यात शेवटची स्टेज विस्तवावरची होती. पण कापड गुंडाळलेल्या दांडक्याने हलवाहलवी केली होती.

ह्या गव्हाच्या लाह्या? आमच्याकडे आजऱ्याला असेच दिसणारे तांदळाचे चुरमुरे मिळतात. बहुतेक उकडलेल्या तांदळाचे बनवतात, नक्की माहीत नाही.

वरच्या फोटोकडे पाहून मला त्या नक्कीच गव्हाच्या लाह्या वाटत नाहीयेत.. त्याच्या लाह्या वेगळ्या दिसतील. कोणीतरी चुकीचे सांगितलेय.

लाह्या बनवताना, मोठी प्रोसेस आहे. गरम पाण्यात उकळावून, मग लगेच कुटून वगैरे .. नक्की लक्षात नाही पण आजी करायची तांदूळाच्या लाह्या.

गव्हाच्या लाह्या आकाराने मोठ्या असतात अन थोड्याशा चिकट लागतात खाताना, ह्या फोटोतील मला तरी लाह्या नसुन तांदळाचे कुरमुरे आहेत असे वाटते.

फोटो क्लिअर नाहीये, पण गव्हाच्या लाह्या अश्या दिसतात

Untitled.png

एअर फ्रायर मध्ये होतील बहुते क . म्हणजे आधीची प्रोसेस फॉलो करून. आम्ही ज्वारीच्या अश्या करायचो. सकाळी गरम पाण्यात एक दोन तास ज्वारी भिजवून मग ते चाळणीत ठेवायचो. ह्याला उमले घालणे म्हण त. मग दुपारी तीन साडेतीन ला घमेल्यात वाळू घेउन स्टोव्ह वर मंद गॅस वर लाह्यांचे घाणे काढत असू. त्या सर्व खोली भर उडत. ते उचलून आणा यचे काम माझे होते. व उरलेले गणंग नंतर तपासून त्यात अर्धवट फुटलेले ज्वारीचे दाणे असतील तर ते शोधायचे. आय वॉज सच सिली किड लाइक अ पपी. हे हे.

Vb ने दिलेल्या फोटोत दिसताहेत तश्या लाह्या मी खूपदा सरस वगैरे प्रदर्शनात पाहिल्यात. पण त्या खाताना जी चव लागते व त्या लाह्यात न प्रोसेस झालेले जे काही सापडते त्यावरून गव्हाचा चीक करून त्याच्या वरील आकाराच्या शेवया करून वाळवतात. त्या तळल्यावर vb च्या फोटोत दिसतो तसा आकार येतो असे मला वाटते. मी प्रत्यक्ष करताना पाहिले नाही.

लाह्या ह्या शब्दाचा अर्थ उष्णतेमुळे धान्य फुटून आतला गर वगैरे जे असेल ते भाजून बाहेर पडणे. ज्वारी, ज्वारी, अख्खे तुसासकट तांदूळ (भात/धान), मका वगैरे एकदल धान्ये विशिष्ट तापमानाला विशिष्ट प्रकारे तापवली की ती फुटून आतले पीठ उलून बाहेर पडते. या लाह्या हलक्या होतात, त्याचे गुणधर्मही बदलत असावेत.

या व्याख्येत वर दिलेल्या गव्हाच्या लाह्या बसत नाहीत.

खाली दिलेल्या पाककृतीतून जो पदार्थ होईल त्याला नक्कीच गव्हाची लाही म्हणता येईल.
https://www.maayboli.com/node/34369

पहिला फोटो मुरमुर्‍यांचा आहे.
दुसरा फोटो नक्कीच गव्हाच्या लाह्या नाहीत. हा प्रकार गव्हाच्या आकाराचा अन भल्ला मोठा असतो. काहीतरी पोंगा पंडित सारखा प्रोसेस्ड आयटम आहे.
घरी पोहोचलो की गव्हाच्या लाह्यांचा फोटो टाकतो.
*
उमले घालणे अन गणंग हे दोन्ही शब्द खूप दिवसांनी ऐकले.

उमले घातल्याशिवाय अर्थात, आत मॉईश्चर असल्याशिवाय लाही फुटत नाही. लाह्या/फुटाणे/मुरमुरे भाजताना ते वाळूत भाजले जातात, किंवा कधी मिठात.

राजगिर्‍याच्या लाह्या वातीचा स्टोव्ह अन त्यावर तवा ठेवून फोडायच्या.

लहानपणी आजीसोबत भोईवाड्यात जाऊन लाह्या फोडुन आणलेल्या आठवतात. अजूनही एक भोईण मावशी दारावर विकायला येते, तिच्याकडून लाह्या फोडण्याचा व्हिडिओ काढून आणायला हवा.

इथे गव्हाच्या तिखटमीठ लावलेल्या लाह्या म्हणून ज्या मिळतात, त्या पहिल्या फोटोतल्यासारख्याच, पण चांगल्या मोठ्ठ्या आणि त्यांची टोकं गोलाकार दिसतात.

Vb
Tyaa kakadee / tarbujaachya biya ahet ka?

आरारा, कृपया टाका. बघायला आवडेल ही प्रक्रिया.
पुण्यात मंडईत अशा लाह्या भाजून्/फोडून देतात, खारे दाणे बनवून देतात (किंवा देत असत) हे माहित आहे पण कधी स्वतः जाऊन बघितलं किंवा करून आणलं नाही (मातोश्री की जय असल्याने).

त्या बाईंनी गव्हाच्या लाह्या म्हणतात असेच सांगितलेले. वाळूत भाजून वगैरे.खान्देशात करतात असं. त्या तळलेल्या नव्हत्या आणि खूप मस्त कुरकुरीत होत्या.

बाईंनी गव्हाच्या लाह्या म्हणतात असेच सांगितलेले. वाळूत भाजून वगैरे.खान्देशात करतात असं. त्या तळलेल्या नव्हत्या आणि खूप मस्त कुरकुरीत होत्या. >> "+१११११

देवकीताई त्या गव्हाच्या भाजलेल्या लाह्या आहेत. फोटो क्लिअर नाहीये म्हणून तसा वाटतोय.

Pages