पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिंचभात, मिंट राईस, कोथंण्बीर राईस, बिशीबेळेअन्ना, मुग-मसूर-तूर खिचडी, राजमा - छोले-चणे-राईस, सांबार राईस, टोमॅटो राईस, कर्ड राईस, जीरा पुलाव, मटार पुलाव, कॅरट पुलाव, पालक पुलाव, बीट राईस, लेमन राईस, घी मुळगापोडी राईस. चित्रान्ना, मसालेभत, वांगीभात, वरण्भात.

अचारी छोले पुलाव सुद्धा मस्त होतो. उकडलेले चणे अन तयार भात हीच काय ती पूर्वतयारी. वेळेवर कांदा, थोडा टोमॅटो (सॉस ही चालेल); हे दोन्ही टाळायचं तर मॅगीचा तयार ग्रेव्ही मसाला घालून चणे घालावेत, भात मोकळा करून घालावा. मीठ, तिखट अ‍ॅडजस्ट करावं, पाण्याचा शिपका देऊन दणदणीत वाफ काढावी. वर दोन टे.स्पू. कैरीचं तयार लोणचं, मिक्स्ड पिकल, किंवा अजून कुठलं तिखट लोणचं घालावं. परतून लगोलग डब्यात. Happy

करून पाहा, संजीव कपूर च्या कुक-स्मार्ट मधून पाहिलेली रेसीपी आहे. जबरदस्त होते.

मूगडाळ व तांदूळ एकत्र शिजवून तयार होणार्‍या भातात दूध + तूप व चवीपुरते मीठ घालून तयार होणारा भात ऑस्सम चवीचा होतो. मूगडाळीचा व तांदळाचा गोडवा, दूध-तूपाची स्निग्धता, मीठाने रुची - हे सर्व एकत्र करून तयार होणारी चव मला खूप आवडते. सोबत लिंबाचे क्रश लोणचे / रसलिंबू / लिंबाचे तिखट लोणचे किंवा मग कैरीचे लोणचे. हा भात गरम किंवा गार, दोन्ही छान लागतो. फक्त व्यवस्थित आणि जरा सैलसर कालवलेला हवा. थंड झाल्यावर आळतो.

वरण-भात-तूप-मीठ-लिंबू व्यवस्थित व सैलसर कालवून नेले तर तेही मस्त लागते. अगदी गारसुद्धा. किंवा सांबार भात - त्यात तूप व लिंबू पिळून कालवून न्यायचा. काहीजण सांबार-भात कालवून त्यावर सुकी मिरची-हिंग-मोहरी-कढीपत्ता यांची खमंग फोडणी देऊन खाताना पाहिलेत.

नेहमीचा भात व थोडे घट्टसर धानसाक.

बहिणीचा बड्डे झाला का? किवी क्रशमध्ये स्प्राईट/ लेमोनेड घालून मस्त सॉफ्ट ड्रिंक तयार होतं. बहिणीच्या मैत्रिणींना देता येईल.

नाही झाला अजुन Happy
छोले कुल्चा आणि पेप्सी/ स्प्राईट हे ठरालंय गं ऑलरेडी . आणि त्यात बदल नको म्हणे Uhoh

स्प्राईट मधे घालून एकदा पिऊन बघते.पण मोठी बाटली आहे. संपणार नाही इतक्यात.

दहीभातच प्रवासात बेस्ट हे माझं मत.
अजिबात आंबट न होण्याकरता एक करून पाहा. भात शिजवून झाला की त्यात भरपूर दूध घालून फ्रिझमध्ये टाकून गार करायचा. व्यवस्थित गार झाला पाहिजे. यातच आता फोडणी टाकून नीट कालवून मीठ घालून चव अ‍ॅडजस्ट करून ठेवायची. यात अगदी अर्धा चमचा दह्याचं विरजण लावायचं. + वेगळं दही सोबत न्यायचं.

जास्त वेळ राहाणार असेल तर भात फार पातळ न कालवता त्यात बर्फाची एक वाटी घालायची. (वाटीत बर्फ करून तो दगड भातात ठेवायचा) असा खडक बर्फ बराच वेळ राहातो कारण भातही थंडगार असतो. वेळेवर त्यात हवं असेल तर अजून दही घालून गार दहीभात खाता येतो.

प्रवासात ते पराठे, दाण्याची चटणी, सुक्या भाज्या-ऊसळी यासोबत गार स्निग्ध दहीभातच बेस्ट लागतो. Happy त्यातही एसी असेल तर नाही होणार आंबट.

दहीभातावर तळलेली सांडगी मिरची चुरडून... वाह! तळलेल्या सांडगी मिरच्या सेपरेट न्यायच्या. Happy किंवा मग लिंबू मिरची लोणचे.

चिकन च माहित नाही पण गर्लिक टोस्ट साठी अमुलचा गार्लिक बटर येतो .
म्हणजे कदाचित तुम्हाला माहितही असेल पण नसेल तर वेळ वाचवण्यासाठी ... Happy .

जागु, माझ्याकडे खूप लिंबं आली की मी त्याचा रस काढून तो आईस ट्रे मधे घालून त्याचे क्यूब्ज करुन ठेवते. साखर नसल्याने स्वयंपाकात कशातही वापरता येतात.

तिरंगी सॅंडविचची पाकृ माहित आहे का?
लेकीला वय वर्षे ५, शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगी सॅंडविच आणायला सांगितला आहे.
गेल्यावर्षी नेटवर पाककृती शोधुन बनविला होता पण एव्हढा कलरफुल दिसत नव्हता आणि चवपण नव्हती.
प्लीज झटपट आणि सोपी रेसीपी असेल तर सांगा ना. सकाळी ७.३० पर्यंत तयार झाली पाहिजे.

हिरवी चटणी - भरपूर कोथिंबीर, लिंबू, आवडत असेल तर पुदिना, ओलं किंवा सुकं खोबरं किंवा भाजलेले शेंगदाणे किंवा पंढरपुरी डाळे किंवा याचं आवडेल ते प्रमाण. पण कोथिंबीर भरपूर हवी रंगासाठी. चवीला मीठ-साखर-जिरेपूड. (मुलगी तिखट खात असेल तर थोडी हिरवी मिरची)

पांढरा लेअर - नुसत्या नारळाची चटणी, किंवा नुसतं चीज किसून/ चीज स्लाईस. पण लेअर दिसायला हवा म्हणजे चीजही बर्‍यापैकी घालायला हवं.

केशरी चटणी - गाजर आदल्या रात्री किसून कुकरच्या डब्यात नुसतं वाफवून ठेवता येईल. सकाळी ते हातानेच मॅश करून गोड किंवा तिखट-आवडेल त्या चवीचं व्यंजन करता येईल.

शेजवान फ्राइड राईसची रेसिपी हवी होती. नेहमीच्या फ्राईड राइसमधे फक्त एक्स्ट्रा शेजवान सॉस घालणे हे एव्हढेच करायचे की अजुन काही बदल आवश्यक आहेत? पा. कृ. विभागात नाही मिळाली रेसिपी. या धाग्यावर आधी येऊन गेलीये का?

राळं म्हणजे नक्की काय?
दिसायला कसं असतं?
त्याचं काय काय करता येतं?

आज वाण्याकडे मोहोरी/ नाचणीसारखं (अगदी लहान लहान पर्ल्स) पण रंगानी फिक्या पिवळ्या रंगाचं एक धान्य पाहीलं. त्याला विचारलं तर म्हणाला 'राला'. बहुतेक राळंच असेल ते पण तरी खात्रीकरता पुन्हा विचारतोय इथे. त्याच्या काही कृती असतील तर त्याही योजाटा किंवा लिंका द्या कृपया.

**धूपामध्ये वापरायची राळ वेगळी असते. Wink

https://en.m.wikipedia.org/wiki/Foxtail_millet

राळा (p. 693) [ rāḷā ] m Panic seed, Panicum Italicum. Used plurally, राळे.
इति मोल्सवर्थ बाबा.

मी आतापर्यंत मोहरी व राळे एकच समजायचे. "काळे राळे गोरे राळे राळ्यांत राळे मिसळले," हे वाक्य लहानपणी न चुकता भराभर म्हणायचे एवढाच राळ्याशी संबंध आठवतोय.

त्याच लिंक मध्ये हे सापडले..

In Europe and North America it is planted at a moderate scale for hay and silage, and to a more limited extent for birdseed.

Bird food is food (often varieties of seeds) eaten by birds. The most important use of bird feed globally, is as feed for domesticated poultry. However (especially in developed countries), people also make or buy bird food to feed to pet birds or use in birdfeeders for wild birds. Birdfood can be natural or commercial. The choice of what to use as birdfood depends on the species of bird being fed. Bird food can also potentially attract rodents.

--------------------------
योकुं नी डोळे फिरवल्यामुळे मला एकदम वाटले मी काहितरी खुपच विचित्र सांगितले की काय Happy
पण बरोबरे..तो ही एक उपयोग आहे

योकू आमच्याकडे राळ्याचा भात सासूबाई श्रावणात कुठल्या तरी सणाला करतात. माझ्या आता लक्षात येत नाहीये कुठल्या ते. घरचे राळे असतात त्यामुळ असेल कदाचीत करण्याची पद्धत.
वरीच्या भातासारखा लागतो. मला वाटत खिचडी पण करता येईल.

अठरा उपधान्यें (p. 013) [ aṭharā upadhānyēṃ ] n pl The eighteen inferior grains; viz. सजगुरा, भादली, वरी, नाचणी, बरग, कांग, खपले- गहूं, मका, करडई, राजगिरा, मटकी, पावटा, मूग, वाल, कारळा, देवभात, सातू, अंबाडी. Others reckon them thus--सजगुरा, नाचणी, वरी, मका, मटकी, राजगिरा, शिरस, पांढरफळी, जिरा, मेथी, वेणु- बीज, देवभात, कमलबीज, पाकड, अंबाडी, भेंडीबीज, गोवारी, कुढ्याचें बीज, and to these some add two others, making twenty, viz. खसखस & पांढराराळा.

अठरा धान्यें (p. 013) [ aṭharā dhānyēṃ ] n pl The eighteen superior grains; viz. गहूं, साळ,तूर,जव,जोंधळा,वाटाणा, लांक, चणा, जवस, मसूर, मूग, राळा, तीळ, हरीक, कुळीथ, सावा, उडीद, चवळी, as per Shlok, गोधूम शालि तुवरी यव यावनाल वातान लंक चणका अतसा मसुराः ॥ मुद्ग प्रियंगुतिल कोद्रवकाः कुलित्थाः श्यामाक माष चवला इति धान्यवर्गः ॥ 1 ॥

या यादीतले लांक, राळा, हरीक, सावा हे कसे असतात काहीच माहीत नाही. सजगुरा, भादली, बरग, शिरस, पांढरफळी, वेणु-बीज, पाकड हेही माहीत नाहीत. :|

श्राध्दादी विधींमध्ये तसेच होमहवनात कदाचित वापरत असतील.

Pages