पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी कधी स्वैपा़क करायला अजिबात वेळ आणि इच्छा नसते, अशावेळी मी घरात काही रेडी मिक्स पा़इटं ठेवते, त्यातल्या त्यात संजीव क. ची बरी असतात, पण कालचं त्याचं पनिर बटर मसाला फलतू निघालं, कोणता ब्रँड बरा आहे, आपल्या भाज्या टाकून मसाला मात्रं पुर्ण पॅकेटच्या स्वरुपात ह्या प्रकारातलं?

हो..हो.. एकदा कशाबरोबरतरी सं.क.च्या पनीर-बटर-मसालाचं पाकीट फ्री मिळालं होतं. म्हणून पनीर आणून ते केलं. पण ते अत्यंत सुमार दर्जाच्या चवीचं आहे Uhoh

भारी झालेला बुंदी रायता.
पण माहीतीये का हलदीरामच्या खार्‍या बुंदीसोबत रायत्याचा मसाला पण मिळतो Uhoh
मी तोच नाही टाकला. तो नंतर पाहिला पॅकेट फेकून देताना Proud

रसोई, सुहानाचे रेडी मिक्स भाज्यांचे मसाले आतापर्यंत वापरले आहेत व अनुभव चांगला आहे. मराठा दरबारचेही अनेक मसाले बाजारात बघितलेत पण अनुभव घेतलेला नाही.

..

महाराष्ट्रीयन पद्धतीनं, फ्लॉवर-बटाटा-मटार रस्सा कसा करायचा? पूर्वी लग्नकार्यात असायची अशी भाजी.

अंजली, तू रेसिपी विचारते आहेस ह्यावर विश्वास बसत नाही Happy Wink

अगदी सोपी रेसिपी म्हणजे गोडा मसाला वापरून. मोहोरी, हिंग, हळद ह्या फोडणीत भाज्या घालून परतायच्या, एक वाफ आली की जेव्हढा रस हवा असेल त्याप्रमाणे पाणी आणि सोबत मीठ, गोडा मसाला, लाल तिखट आणि गूळ घालायचा. रस्सा शिजला की ओलं खोबरं घालायचं म्हणजे रस मिळून येतो. आणि मग सर्व्ह करताना वरून कोथींबीर. ही एकदम बेसिक रेसिपी.

ह्यात तर्‍हेतर्‍हेची वाटणं घालता येतील सुकं खोबरं, धणे, जीरे भाजून वाटून, ओलं खोबरं कोथींबीर, मिरच्या, लसूण, आलं वाटून वगैरे.

मला फ्लॉ-ब-म रश्श्यात गोडा मसाला घालायला आवडत नाही. तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद, आणि हिरवी मिरची+आलं+लसूण+ कढिपत्ता+कोथिंबीर खलबत्त्यात एकत्र वाटून हा ठेचा फोडणीत किंवा बटाटा, फ्लॉवर परतल्यावरही चालेल. हा सगळा मालमसाला घालून बर्‍यापैकी पाणी घालून शिजवून मीठ, साखर, ओलं खोबरं, कोथिंबीर घालून ओरपायचं. ह्यात पाणी कमी करून आणि थोडं नारळाचं दूध घालूनही मस्त लागतं.

कांदा, टोमॅटो, काळा मसाला घालून पण अगदी सिंपल पण टेस्टी रस्सा होतो.
सायो मी तुझ्या पद्धतीचा पण करते कधी कधी, फक्त आलं नाही घालत , नुस्ता लसूण. तोही रस्सा छान लागतो.

चा, सुप, भाज्यांवर, ब्रेडला लावून, खोबर्‍याच्या वड्या किंवा कुठल्याही लाडू प्रकार. क्रिम, तेवढाच चक्का व तेवढीच साखर घालून वड्या करता येतील.

मला भरपूर ओव्याची पाने मैत्रिणीने दिलेली आहेत. त्याचे भजी सोडून काय पदार्थ करता येईल?

तसेच तिच्या बाल्कनी मध्ये ओव्याचे रान माजलय, मी एक काठी माझ्या कुंडीत लावायला वापरणार आहे. मी काय केले म्हणजे तो ओवा फक्त कुंडीतच राहील , इकडे-तिकडे पसरणार नाही. तिला तीच एक झाड पूर्ण बालकनीभर कसं पसरले कळले नाही. मला बागकामाची काहिच माहिती नाही. मदत करा. Happy

राजसी,
ओव्याची पानं बारीक चिरुन टाकून मिक्स पीठाचे पराठे /पुर्‍या,
फोडणीत थोडी पानं चुरडून (कसुरी मेथी सारखी),
चकली भाजणीत वाटून घालून चकल्या
कदाचित विड्याच्या पानात पण चांगलं लागेल एखादं पान (ट्राय नाही केलेलं)

राजसी माझ्याकडे पण ओव्याचं रोप आहे आणि लावून किमान ३ महिने झालेत, पण माजलं वगैरे नाहिये. माजलं तर कापत रहा, वाटत रहा. नाहितर उरलेलं फेकण्याशिवाय पर्याय नाही. सोसायटीत खूप मोठी जागा रिकामी असेल तर तिथे लावून टाका. सगळ्या सोसायटीला मिळेल मग ओवा.

Pages