पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लहानपणी ऐकलंय, कोकणातल्या लोकांकडून की राळं खुप वर्ष टिकणारं धान्य, आणि फार पुर्वी त्याचा भात वगैरे केला जायचा.

ते जास्त करुन साठवुन ठेवायचे आणि एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर उपयोगात आणायचे. मी बघितलं कधीच नाही. पण असं फार पुर्वी म्हणजे ब्रिटीशकाळात करायचे, असं ऐकलं.

राळ्याचे तांदुळ हा प्रकार माहित होता, आमच्याकडे त्याचे लाडु करतात, नागपंचमीला असतात.

योकु, हा राळे प्रकार पुण्यात बघितला का ? मी पुण्यात शोधत आहे, पण अजुन कुठे मिळाला नाही.

होय रश्मी, आम्ही मूळचे बॉर्डर साईडचेच आहोत आणि आता पुण्यात आत्ता नागपंचमीच्या आधी नेहमीच्या वाण्याला या तांदळाबद्द्ल विचारले होते, पण तो पण माहित नाही म्हणाला.

नेटवर राळ्याचा भात व राळ्याच्या पिठापासून बनवलेले लाडू असे दोन उल्लेख मिळाले.
राळ्याचा भात कुकरमध्ये साध्या भाताप्रमाणे, चवीला जरा मीठ घालून शिजवावा, डायबेटिसवाल्यांनाही खाता येतो असे म्हटले आहे.
राळ्याचे डिचके, तंबिट (लाडू) असेही उल्लेख मिळाले.

मला फक्त 'काळे राळे, गोरे राळे, राळ्यात राळे मिसळले.' हे टंग ट्विस्टर माहीत आहे Happy
वरच्या पोस्ट्स वाचून ज्ञानात भर पडतेय.

राळ्याचा भात पचायला हलका म्हणून लहान मुलांना देतात म्हणे. बाकी पौष्टिक घटक काय आहेत ते माहिती नाही.

भवानी पेठ, रविवार पेठ वगैरे भागांत धान्यांची होलसेल दुकाने आहेत. तिथे किंवा महात्मा फुले भाजी मंडईजवळील पूना शुगर डेपोसारख्या दुकानांत चौकशी करायला लागेल बहुतेक.

दोन मोठ्ठे फ्लॉवर्चे गड्डे आहेत ,( का आहेत ह्याची कहाणी फार मोठी आहे ) त्याची कशी विल्हेवाट लावावी. रस्सा अन परतलेली भाजी सोडून .

कॉलिफ्लॉवर रोस्ट कर. महान लागतं. पण रेसिपी माहित नाही Proud

फ्लॉवरचे पराठे, किंवा कोबीची कच्ची किसून कोशिंबीर करतो तशी कोशिंबीरही छान लागते.

गोभी का पराठा (सावधान ! सारण बाहेर यायला येक नंबर असतात ते.)
उकडून मॅश करुन पावभाजीत खपवणे. नुसतेच तुरे काढून झिपलॉकमध्ये येखाद आठवडा राहतात.
कॉलीफ्लावर आणि स्प्रिंग अनियन सूप.
चिनी (इंडियन चायनीज) कायतरी. कॉलीफ्लावर शेजवान वगैरे नाव देऊन. जरा सॉस बीस लावून.
शेजार्‍यांना देणे. Proud (सूप नाही. एक गड्डाच. )

फ्लॉवरचं लोणचं कर की! म हा न लागतं. ऑल्सो नोन अ‍ॅज भाज्यांचं लोणचं. कृती आहे इथे बहुतेक मानुषीकाकूंची. फक्त दोन-तीन दिवसात संपवायला लागतं ते, इतकंच. पण संपतं. Happy

तंदुरी गोबी, गोबी मंचुरियन, गोबी पकौडे, गोबी की कढी, गोबी का पराठा, आलु-गोबी, गोबी -गाजर-शलगम का आचार.... या पंजाब्यांना दिवसरात्र गोबी खायला सांगितलं तरी खातिल. Proud

आई करते भाज्यांचं लोणचं. १०-१२ दिवस आरामात टिकतं ते.

पूनम, इतक्या फ्लॉवरचं केवढं लोणचं होईल. शिवाय ते लवकर संपवायचं आहे.

इन्ना, नेहेमीची परतलेली भाजी नको पण फ्लॉवरची साबुदाणा खिचडी स्टाईल भाजी चालेल का नीधपने लिहिलेली ? ती नुसतीही खाता येते खिचडीसारखी. आरामात खपतील दोन गड्डे.
नाहीतर मग कॉलिफ्लॉवर हलवा कर Proud बाकीही एक दोन रेसिपीज दिसल्या नेटवर पण त्यात फ्लॉवरइतका किंवा त्याच्या दुप्पट खवा, पेढे काय काय आहे. ही कृती साधी आहे त्यामानाने.

फ्लॉवरची बर्फी कर. बंगालात त्याला कोबीसंबर्धन बर्फी म्हणतात. (हे ज्ञान सायली राजाध्यक्षकडून मिळाले). आपल्या टोकन बंगाली वरदाला विचार रेसिपी.
फ्लॉवरची बर्फी खाऊन झाल्यावर जगली वाचलीस तर इथेही रेसिपी शेअर कर. Wink

Pages