Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बँबिनो शेवया मिळतात तशा का?
बँबिनो शेवया मिळतात तशा का?
दुधात घलून खय्च्या शेवया परवा
दुधात घलून खय्च्या शेवया परवा इंग्रो मध्ये फेणी नावाने पाहिल्या. ब्रँड विसरले.
ड्रॅगन कंपनीच्या राईस शेवई
ड्रॅगन कंपनीच्या राईस शेवई मागा. तो फेमस ब्रेंड आहे. साऊथ इंडियन दुकान असेल तर शंभर टक्के मिळेल पण इतर ही दुकानात मिळतो. बँबिनो पेक्षा डबल साईज चं पॅकेट येतं क्वालिटी चांग ली असते. गरम पाण्यात काही वेळ भिजत घालुन मग चा़ळणीवर उपसायच्या. मग त्याचे वर लिहेलेले आय्तेम करु शकतो.
कॉटेज चीज पासुन कोणी पनीर
कॉटेज चीज पासुन कोणी पनीर बनवते का? कसे बनवता? कसे वाटते ते?
साऊथ इंडियन दुकान असेल तर
साऊथ इंडियन दुकान असेल तर शंभर टक्के मिळेल पण इतर ही दुकानात मिळतो.>> साऊथ इंडियन दुकानांत मागायच्या असतील तर "इडियप्पाम" नावानं मागा. बरोबर हव्या त्या शेवया मिळतील. पाचेक मिनिटं गरम पाण्यात भिजवल्या की शेवया रेडी टू इट होतात. मग नारळाच्या दुधात किंवा नुसत्या दुधांत वगैरे मिक्स करून खाता येतात
अरे वा, अश्या शेवया बे एरियात
अरे वा, अश्या शेवया बे एरियात कुठे आणि कोणत्या नावाने मिळतील ?
इडी अप्पम आमच्या इथे ओन्ली
इडी अप्पम आमच्या इथे ओन्ली कोकण मध्ये पण मिळ तात सुकवलेले. एक मिनिट गरम पाण्यात घातले व चाळणी वर टाकले की मग हवे तसे खाता येते. हा एक प्रकार.
हैद्राबादी सुतर फे णी हवी आहे का तुमच्या मैत्रीणीला? त्यात दोन प्रकार आहेत. एक प्लेन जे दूध साखर घालून त्यात भिजवून खातात. दुसरी अंगचीच गोड असते व त्यात केसर वगिअरे इतर मसाला टाकलेला असतो.
नुसते दूध घालायचे. जी पुल्ला रेड्डी दुकानात शुद्ध तुपातल्या मिळतात.
अदिती, सुमेरू चे फ्रोझन
अदिती, सुमेरू चे फ्रोझन इडीयाप्पम पाहिले आहे. पण कधी फ्रोझन खाल्ले नाही. सुमेरू चा फ्रोझन नारळ वापरला आहे, त्यावरून चांगली कंपनी असेल असे वाटते.
फोनवरून जे टाईप करतात,
फोनवरून जे टाईप करतात, त्यांच्यासाठी - ऑटोकम्प्लिटनंतर स्पेस हा पर्याय अनचेक करा.
अवांतराबद्दल सॉरी, हां.
वाणी आणि चान्गला?????
वाणी आणि चान्गला?????
धन्यवाद ग मैत्रीणीनो!
धन्यवाद ग मैत्रीणीनो!
धन्यवाद ग मैत्रीणीनो!
धन्यवाद ग मैत्रीणीनो!
>>कॉटेज चीज पासुन कोणी पनीर
>>कॉटेज चीज पासुन कोणी पनीर बनवते का? कसे बनवता? कसे वाटते ते?>
कर्डल झालेले मिल्कसॉलिड बारीक केलेले असते. त्यामुळे पुन्हा त्यातले पाणी काढून बांधून घट्ट स्लॅब करणे नीट नाही होत. त्यापेक्षा सरळ पनीर करणे सोपे. अर्ध्या तासात एक गॅलनचे करता येते. कापून पोर्शन्स फ्रीजरला टाकले की झाले.
मेथी पराठ्याची कणीक
मेथी पराठ्याची कणीक संध्याकाळी किंवा रात्री मळून ठेवली तर फ्रिजशिवाय सकाळपर्यंत टिकेल का? लसूण, ध-जि पूड, ओवापूड, तिखट-मीठ घालणार. लसूण मस्ट आहे.
लसणाचा दर्प फार उग्र होईल
लसणाचा दर्प फार उग्र होईल बहुतेक
योकु, खूप नही घालणारेय, पण
योकु, खूप नही घालणारेय, पण घालणार आहे. आणि डब्यात नकोयत, घरीच खायचेत. डब्याची गडबड आणि वेळ कमी म्हणून फक्त तयारी करता आली तर बरं.
प्र९! कणिक सैल होइल फर्मेन्ट
प्र९! कणिक सैल होइल फर्मेन्ट पण होईल, पराठे निट लाटता येणार नाही... त्याउलट रात्री पराठेच करुन ठेवलेस तर सकाळो चान्गले राहतील
९, पराठ्याची भिजवलेली कणिक
९, पराठ्याची भिजवलेली कणिक फ्रिजशिवाय टिकण्याची गॅरंटी फार कमी आहे. तरीही पुण्याच्या कोरड्या आणि सध्या पावसाने थंड झालेल्या हवेत कदाचित टिकू शकेल. कणीक भिजवून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेव आणि तसरा़ळ्यात पाणी घालून तो डबा त्यात ठेव.
तरीही पुण्याच्या कोरड्या आणि
तरीही पुण्याच्या कोरड्या आणि सध्या पावसाने थंड झालेल्या हवेत कदाचित टिकू शकेल. >> टिकण्याची शक्यता फार कमी आहे. कारण मेथीमुळे पीठ लवकर खराब होतं त्यापेक्षा रात्री पराठे करून ठेवले तर दुसर्या दिवशी नक्कीच चांगले राहतील.
लहानपणी घरात फ्रिज नव्हता
लहानपणी घरात फ्रिज नव्हता तेव्हा पिठ उरले असेल तर आई त्याला चारी बाजुने तेल लावायची (अगदी माखायची वगैरे नाही पण ब-यापैकी लावायची), मोठा टोप घेऊन त्यात हे तेल लावलेले पिठ ठेवायची आणि मग पिठ पुर्ण बुडेल इतके पाणी टोपात घालुन ठेऊन द्यायची. रात्रीचे पिठ सकाळपर्यंत चांगले राहायचे.
राईस शेवया मी डिमार्ट सारख्या दुकानातही मिळतात.
हां, तर झालं असं, की खूप
हां, तर झालं असं, की खूप दमल्यामुळे मी निवडलेली मेथी तशीच पिशवीत घालून ठेवली नि झोपले. रात्री काहीही तयारी केली नाही. सकाळी उठून ती मेथी चिरून कणीक भिजवली नि केले पराठे. आवरलं वेळेत. त्यामुळे नक्की काय केलं तर प्रयोग यशस्वी होईल ते मात्र समजलेलं नाही. पण मूठभरच होती, उरलेल्याची भाजी आधीच खाऊन झाली होती, त्यामुळे थोडी सुकली तरी खराब नाही झाली.
माझ्याकडे कुंडीत मिंट तुळस
माझ्याकडे कुंडीत मिंट तुळस आहे. पुष्कळ वाढलिये. या तुळशीचं एक पान जरी तोंडात टाकलं, तरी बराच वेळ घशात थंडावा राहातो. मला याची पानं कशात तरी वापरायची आहेत. एक कल्पना म्हणजे त्या पानांचा रस काढून बडीशेपेला मिंटी स्वाद द्यायचा.
यासाठी काय करता येईल?
साखरेच्या पाकात रस मिसळून बडीशेप पाकवावी का? बहुदा ती अगदी गोड मिट्ट लागेल.
सोया मिल्क चा चहा बनवता येतो
सोया मिल्क चा चहा बनवता येतो का?
अमी करुन पाहा की.
अमी
करुन पाहा की.
सोय मिल्क चा चहा सिंगापूरला
सोय मिल्क चा चहा सिंगापूरला मिळतो पण तो कोल्ड टी प्रकारात पिऊन पाहिला आहे. आवडला होता.
घरी कसे बनवता येईल ते मात्र सांगता येणार नाही.
हे मिळाले शोधुन पाहिल्यावर
http://www.marthastewart.com/343511/chai-tea-with-soy-milk
सोया मिल्क वाला चहा करताना
सोया मिल्क वाला चहा करताना थोडे सोया मिल्क, थोडा चहा एकत्र ढवळून मग परत थोडे सोया मिल्क, थोडा चहा घालून एकत्र ढवळणे असे करायचे म्हणजे दूध फाटणार नाही.
आधी प्यायला नसेल तर सोय
आधी प्यायला नसेल तर सोय मिल्कचा चहा आधी पिऊन बघा. गरम चहा (स्टारबक्स) मला अजिबातच आवडला नव्हता - पिठूळ चव वाटली होती. गार आईस्ड टी (थाय टी प्रकार - लोकल कॅफे) मात्र आवडला होता.
रवा दोस्याला किंचीत भाजलेला
रवा दोस्याला किंचीत भाजलेला रवा वापरला तर चालतो का? मी आत्तापर्यंत नेहेमी कच्चाच रवा घातलाय.
उद्या सकाळच्या डब्ब्यासाठी दोश्याची रिक्वेस्ट आलीये. आणि घरात थोडासा भाजलेला रवा, इडली रवा, तांदळाचं पीठ इ पदार्थ आहेत.
दुसरी शंका जर गनिमाला रवा दोसा आवडलाच नाही (नेहेमी पेपर दोसाच खायला आवडतो) तर त्याच पिठाच्या इडल्या किंवा गेला बाजार आप्पे तरी करता येतिल का?
आप्पे जमतीलच दोसा फसलाच तर.
आप्पे जमतीलच दोसा फसलाच तर.
बेश्ट ऑफ लक. करून पाहा. नाहीतरी डब्यापुरताच तर करायचंय.
हो डब्ब्यापुरतंच आणि ते पण
हो डब्ब्यापुरतंच आणि ते पण हाफ तिकिटाच्या डब्ब्यापुरतं करायचंय.
जमला रवा दोसा त्या भाजलेल्या रव्याचा मस्तपैकी. नुसतेच रव्याचे आप्पे आवडणार नाहीत म्हणून मी थोडीशी हरबर्याची डाळ भिजत घातली होती रात्री. डब्ब्याला रवा दोसा + रवा आणि हरबरा डाळीचे आप्पे देता आले.
Pages