
आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सायली, लग्नात देवक बसवताना
सायली, लग्नात देवक बसवताना कुलवृक्षाची फांदी लागते. किती सुंदर कल्पना आहे हि कि प्रत्येक कुलाचा एक कुलवृक्ष असावा. बहुतेक असे असेल का, कि एखादे कूळ दुसर्या ठिकाणी जाऊन स्थिर झाले, घर बांधले कि त्यांचा कुलवृक्ष लावत असावेत. मग अंगणातल्या झाडावरून बाहेरून आलेल्या माणसाला त्याचे लांबचे नातेवाईक सापडत असतील.. मग बादरायण संबंध जोडायची गरजच नसेल....... बहुतेक स्वप्नरंजन आहे माझे हे !!!
Dinesh da khup sundar vichar
Dinesh da khup sundar vichar aahet tumche..
दिनेशदा बादरायण संबंधाचं
दिनेशदा बादरायण संबंधाचं स्पष्टीकरण खासच!
प्रत्येक कुळाला असतो का असा कुलवृक्ष?
सायली, मी फोटो टाकलाय तो कापराच्या झाडाचा. कदंबाचा नाही. दर पावसाळ्यात कदंबाला फुलं आली की मी फोटो काढायचा प्रयत्न करते, पण कदंब हमखास पाऊस लागून राहिलेला असताना फुलतो, आणि त्यात झाड चांगलं उंच असल्याने खाली जमिनीवरून फोटो चांगला येत नाही. अजून कदंबाचा मनासारखा फोटो मिळाला नाहीये मला कधी.
व्हीटी२२०, मला अडेनियमच म्हणायचं होतं. पण आदिजो नी सांगितलंय तेच झाड वाटतंय ते! लेकीच्या शाळेत पाहिलंय हे झाड. पण उगाचच त्याला इतके दिवस अडेनियमच समजत होते. विकीपिडियावर त्याचं बंगाली नाव नागचंपा म्हटलंय!
आज पार्किंगमधल्या कचर्यात मला हे रानफूल दिसलं:
आधी मला अबोलीच वाटली ती, पण झाडाची उंची कमी होती, पानंही वेगळी होती.
गौरी, अच्छा ते कापराचे झाड
गौरी, अच्छा ते कापराचे झाड आहे होय.. आभार.
ते रान फुल कीत्ती गोड, हुबेहुब अबोलीच..
गौरी अबोलीचीच जात आहे ती.
गौरी अबोलीचीच जात आहे ती. माझ्या लेकीच्या शाळेत आहेत ही झाडे.
सुप्रभात.

आ हा हा! जागु इथ पर्यंत
आ हा हा! जागु इथ पर्यंत दरवळ....
गौरी माझ्या हाफिसात ये.
गौरी माझ्या हाफिसात ये. ५०-६० झाडे आहेत कदंबाची आणि सगळी वेगवेगळ्या वयातली.
एक फोटोफिचर करावे म्हणतेय आता
कळम हा काही कदम आडनावांच्या
कळम हा काही कदम आडनावांच्या लोकांचा कुलवृक्ष असतो>>>>>>.
नगरला कळमकर म्हणून आमदार आहेत. आता त्यांचा मुलगा/पुतण्या नगराध्यक्ष आहे.
साधना.........एक फोटोफिचर करावे म्हणतेय आता>>>>>>>>>> गुड आयड्या.
जागुले.......... तो कवटी चाफा आहे की कवठी चाफा?
मला वाटलं होतं की त्याचा वास थोडासा कवठसारखा असतो म्हणून कवठी.
पण एकदम कवटीशी साधर्म्य वाटायला लागलं.
साधना फोटो फिचर होऊनच जाऊ देत
साधना फोटो फिचर होऊनच जाऊ देत मग! सगळे कदंब फुलले असतील ना सद्ध्या?
जागू, या अबोलीचं झाड पहिल्यांदाच बघितलं. या फुलांच्या बिया मिळवून चांगल्या जागी लावायला हव्यात आता.
गोगलगायींचा बंदोबस्त कसा करायचा? या वर्षी लेकीनं जांभळ्या गोकर्णाच्या बिया लावल्या होत्या पावसाळ्याच्या सुरुवातीला. तीन आठवड्यांनी त्यातली एक आली, आणि दुसर्या दिवशी कुंडीतल्या छोट्या गोगलगायींनी तोडून टाकला कोंब! अगदी लहान गोगलगायी होत्या म्हणून मी दुर्लक्ष केलं होतं
मस्त गप्पा मस्त फोटो. इथे
मस्त गप्पा मस्त फोटो.
इथे कदंबावर चर्चा चाललीय आणि काल घरी जाताना अचानक समोर दिसला. इतका आनंद झाला. पाच मिनीटं थांबुन त्याची भेट घेतली. ख्याली खुशाली विचारली. इतके दिवस लक्ष नाही गेले म्हणून सॉरी ही म्हटलं ( स्मित) एवढे दिवसात त्या झाडाकडे कधी लक्ष गेले नव्हते आत्ता फुललाय तर नजरेत भरला. काय सुंदर गेंद लटकले आहेत.
हेमा ताई, खुप
हेमा ताई, खुप दिवसांनी.......
मस्तच, फोटो टाका ना प्लीज.
वा आज अगदी निरनिरळी फुले
वा आज अगदी निरनिरळी फुले बघायला मिळाली.
दिनेशदा, ती कॅम्फरची ट्रीची
दिनेशदा, ती कॅम्फरची ट्रीची लिंक मस्त आहे. त्यातून अजून नवीन लिंक मिळाल्यात बघायला. असे वाटते मी बॉटनी मधे मेजर करायला हवे होते. आयुष्यात रंग गोळा झाले असते मग.
गोगलगाय दिसली ना की सरळ पाय
गोगलगाय दिसली ना की सरळ पाय ठेवायचा तिच्यावर. कृर वाटते पण पर्याय नाही.
खरं तर बादरायण संबंध चा
खरं तर बादरायण संबंध चा संदर्भ फार वेगळा आहे. एकदा एका गावात बाहेरून आलेल्या पाहुण्याने एका घराच्या अंगणातील बोराच्या झाडाला बैलगाडी बांधली. त्या घरमालकाने खडसावल्यावर तो पाहुणा म्हणाला, माझ्या बैलगाडीचे आरे बोराच्या लाकडापासून केलेत आणि तूमच्या अंगणात बोराचे झाड आहे. म्हणून आपण मित्रच !
यावेळेला गावी व्हिसलींङ
यावेळेला गावी व्हिसलींङ वुड्सच्या हेमंत ओगल्यांशी गाठ पडली. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन नंतर टेल्को मध्ये थोडी वर्षे काम केले. त्यानंतर ते सगळे सोडून ते आता त्यांच्या मुळ गावी आंबोलीला सहकुटूंब राहताहेत. व्हिसलिंग वुड्स हे हॉटेल चालवतात आणि सोबत येणा-या लोकांना आंबोलीचे पर्यावरण दाखवुन ते आहे तसेच जपण्याविषयी आग्रहही धरतात.
पश्चिम घाटातला फेमस मलबार ग्लायडींग फ्रॉग आणि मलबार पिट वायपर साप त्यांच्या घराच्या बागेत भेटले. https://en.wikipedia.org/wiki/Malabar_gliding_frog
हिरव्या रंगाचे हे मलबार ग्लायडींग फ्रॉग अगदी कार्टुन मधले बेडूक वाटतात. हे बेडुक एका झाडावरुन दुस-या झाडावर उड्या मारतात, त्यांच्या पायांची रचना ग्लाईड करुन जाण्यासाठी योग्य अशी असते. झाडावरुन ते कधीही खाली उतरत नाही आणि कधी उडी चुकली तर त्यांचे पाय त्यांना वाचवतात. हे बेडुक झाडावरच घरटी बांढतात. अर्थात घरटी म्हटले की तुमच्या डोळ्यासर्मोर जे काही येते तसे हे घरटे नाहीय. घरटे म्हणजे एक पांढ-या फोमचा मोठा गोळा असतो ज्यात अंडी असतात. आपण कपडे भिजवण्यासाठी जसा फेस करतो तसा हा फोम दिसतो. कितीही धुवांधार पाऊस झाला तरी हा फोम काही विरघळत नाही. ह्या अंड्यात पिले तयार झाली की ती फोममधुन आपोआप खाली पडतात. यासाठी खाली तळे असणे आवश्यक आहे. कारण ही पिल्ले पाण्यात जगतात. जुन ते ऑगस्ट हा एवढाच काळ हे बेडूक दिसतात, त्यांचे प्रजनन होते. त्यानंतर ही मंडळी गायबतात ती थेट पुढच्या जुन पर्यंत.
हेमंत सांगत होता की मध्यंतरीच्या काळात हे बेडूक दिसणे अचानक बंद झाले. मग वनखात्याने जंगलात झाडांखाली जागोजागी पाण्याची छोटीशी तळी बांधलीत. हेमंतच्या घराच्या आजुबाजुलाच बेडकांसाठीची इकोसिस्टीम असल्याने तिथे बेडूक होते. मग त्या बेडकांची पिल्ले काढुन ती त्या तळ्यांमध्ये थोडी थोडी टाकत गेले आणी आता गेले दोन तिन वर्षे परत बेडूक दिसायला लागले. बेडुक नाहीसे व्हायचे एक लहानसे कारण म्हणजे पर्यटक बेडूक उचलुन घरी नेत होते.
त्याने आम्ह्ला आंबोलीचे कास पठारही दाखवले. आता सप्टेंबरात आम्ही तिथे फुले पाहायला परत जाऊ. आणि नंतर डिसेंबरात आकाशदर्शन कार्यक्रमासाठी. पण हे पठार तो सहसा कोणाला दाखवत नाही. कारण एकदा जनरल पब्ल्लिकला ते कळले की मग ते नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मीही ते कुठे आहे ते सांगु शकत नाही.
कोकणातल्या एका प्रसिद्ध नेत्याने या पठारावर रेसिंग कार्ससाठी रेसिंग कोर्स करायचे मनावर घेतले होते. (इतके प्रचंड विस्तिर्ण पठार आहे हे). नशिबाने हा नेता हा निवडणुकीत खुपच जोरात आपटला आणि हे पठार वाचले. पठाराचे नशिब अजुन काय!
प्रचंड मोठी मोकळी दगडी जागा. इथला काळा दगड वा-यापावसाच्या मा-याने निघुन त्याचे तुकडे सगळीकडे पसरलेत. आम्ही हे तुकडे उचलुन त्याखालचे आंबोली बेडूक ( https://en.wikipedia.org/wiki/Pseudophilautus_amboli केवळ इंचभर आकाराचे पुर्ण वाढलेले बेडूक जे फक्त आंबोलीत दिसतात. मी दोन मिमी आकाराचे बेडुकही पाहिले इथे), इल नावाचा फुटभर मासा, विंचु आणि अजुन काय काय खुप पाहिले. पण लोक चक्क हे दगड उचलुन घराच्या पायात घालण्यासाठी घेऊन जातात. त्यांना एकोसिस्टीमशी काही देणे घेणे नाही.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हेमंतने एका नविन फुलपाखराविषयी माहिती दिली. त्याच्या घरातल्या केळीवर हे फुलपाखरु आलेले त्याने पाहिले. आम्ही गेलो त्याच दिवशी सकाळी कोशातुन अळी बाहेर आली. हेमंत त्यासाठी रात्रभर जागा राहिला. एक रात्र अशी फुकट गेल्यावर दुस-या रात्री तो तासातासाने अलार्म लावुन उठत राहिला आणि शेवटी सकाळी सहा वाजता ही अळी बाहेर आली. बाहेर येताच तिने आधी स्वतचे कव्हर होते ते खाल्ले.
आपण फुलपाखराकडे अगडी प्रेमाने पाहतो. पण हे फुलपाखरु पेस्ट झालेय केळीबागांसाठी.
http://www.thehindu.com/news/cities/Mangalore/banana-growers-reel-under-...
मुळात भारताच्या पुर्वेकडुन म्हणजे मेघालय शिल्लाँङ इथुन आलेल्या केळींच्या नमुन्यामधुन ही फुलपाखरे आली. केरळातल्या केळीबागवाल्यांनी नविन लागवडीसाठी ही केळी आणली. तिथुन आलेल्या ह्या फुलपाखरांना केरळात नैसर्गिक शत्रु कोणीच नसल्याने त्यांची भराभर वाढ झाली. ह्याच्या अळ्या केळीची पाने गोल करुन त्यात राहतात. त्यामुळे त्यांच्यावर किटकनाशकेही फवारता येत नाही. सुरवातीला यांछ्याकडे लक्षच गेले नाही. आणि जेव्हा बागाच्या बागा साफ झाल्या तेव्हा कळले की याच्यामागे या फुलपाखराच्या अळ्या आहेत. हे फुलपाखरु आंबोलीला हेमंतच्या बागेतल्या एक्क्षॉटिक केळ्यावर आढळले. म्हणजेच या अळीला कुठल्याही प्रकारची केळी चालतात. (प्रत्येक जातीच्या फुलपाखराचे अंडी घालायच्या झाडाची जात ठरलेली असते. त्या-त्या जात त्याच प्रकारच्या झाडावर अंडी घातलात. दुस-या झाडावर घालत नाहीत हे ज्ञान हेमंतकडून मिळाले
) पण ह्या अळीला तोही अडथळा नाहीय. आणि आता ते आंबोलीत पोचलेय तर तेथुन पुढे कोकणात जाईल. कोकणात धंदा म्हणुन केळी लागवड फारशी नाही त्यामुळे फरक पडणार नाही. पण तिथुन पुढे ते जळगाव भागात गेले तर अनर्थ ओढवेल कारण तिथे केळीबागा खुप आहेत.
हेमंतने ह्या सगळ्यावर एक लेख लिहुन कोकणातल्या आनि महराष्ट्रातल्या केळीबागांना सावध करायचे ठरवलेय्.म्हणुन तो या अळीची जमेल तितकी माहिती गोळा करतोय.
साधना, सुंदर पोस्ट. उंच टेकाड
साधना, सुंदर पोस्ट.
उंच टेकाड असले आणि त्यावर कातळ असला कि तिथे वेगळीच फुले तयार होतात ( कास, अंबोली आणि रोरायमा ) कातळामूळे हि फुले वर्षाच्या काही काळच दिसतात, आणि उंचीमूळे त्यांचा इतर भागातील फुलांशी संकर होत नाही, त्यामूळे ती वेगळीच राहतात.
ते पेस्ट आणि वीड चे मात्र भयानकच असते. घाणेरी, जलपर्णी, गाजर गवत.. सगळीच याची उदाहरणे आहेत.
साधना, छान माहिती.
साधना, छान माहिती.
साधना छान पोस्ट!
साधना छान पोस्ट!
साधना, मस्त पोस्ट.
साधना, मस्त पोस्ट.
साधना ,मस्त पोस्ट.
साधना ,मस्त पोस्ट.
छान माहिती.
छान माहिती.
छान माहिती.
छान माहिती.
साधना,फार सुंदर पोस्ट.
साधना,फार सुंदर पोस्ट.
साधना.. वाह सह्ही आहे ..
साधना.. वाह सह्ही आहे .. सुंदर माहिती दिलीस..
फोटोफीचर ला सुरुवात केलीस कि नै अजून??
साधनाऽऽ -------- लग्गेच एक
साधनाऽऽ -------- लग्गेच एक पुस्तक लिहायला घे - हेमंतकडून माहिती आणि फोटो घेऊन......... फक्त आंबोली आणि आंबोलि.......
माझी १०० प्रतींची ऑर्डर आत्ताच नोंदवत आहे .......
.......
साधना, मस्त पोस्ट! तीनचार
साधना, मस्त पोस्ट! तीनचार वर्षापूर्वी वूडसला थांबलो होतो एक दिवस .... असो! आज दिलीप कुलकर्णींचा 'भुतान माहिती' पेरु गेट, भावे स्कुल येथे संध्याकाळी ६:३० वाजता आहे...
(No subject)
खुप दिवसांनी आली इथे.. सर्व
खुप दिवसांनी आली इथे..
सर्व पोस्टी मस्त.. साधना माहिती छानच
साधना मस्तं माहिती..
साधना मस्तं माहिती.. पुस्तकाचं खरच मनावर घ्या..
Pages