निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही दिलेल्या लिंक मधला शेवटचा Consequences of Climate Change हा भाग वाचल्यावर जरा टेन्शनच आल मला..
last 80 million years पासुन या भुतलावर असणारे हे जीव २०४० पर्यंत नामशेष होईल असे म्हणतेय ती Laura Porras .. अरेरे. अश्यानं कस जमनं Sad

मला माहीत नव्हतं कि तामिलनाडूमधे क्रॉक फार्म आहे ते..

स्टिव आयर्विनचा कार्यक्रम पाहात नव्हतीस का? तो एकदा आलेला ह्या फार्ममध्ये असे मला आठवतेय.

टिना, धन्यवाद. मला मगर आणि सुसर एवढेच माहित होते. हे इंडिअन घरीयाल फक्त इंडियातच असतात काय?

http://www.crocodilehunter.com.au/crocodile_hunter/about_steve_terri/ste...

वर्षू, तु क्रोक लेदरबद्दल विचारलेस ना? हे वाच. किती योग्य लिहिलेय स्टिवने.

त्याने इतर जे काही लिहिलेय ते वाचुन अंगावर काटा येतो. वर टिनाला क्रॉक नष्ट होणार याचे दु:ख होतेय. मी पृथ्वीवरुन मानवजात कधी नष्ट होतेय आणि इथल्या मुळ रहिवाशांना कधी सुखाचे दिवस दिसताहेत याची वाट पाहतेय.

साधना, वाचून खरंच काटा आला अंगावर.. लेदर प्रेमींना लेदर वापरण्या आधी हा लेख वाचायला लावला पाहिजे.. Sad
मी तर लेदर वापरतंच नाही लहानपणापासून..

साधना, लिंक वाचून धक्काच बसला.. इट्स सो सॅड..

स्टीव चं म्हणणं अगदी बरोबर आहे,'If we can all refuse to buy, eat or purchase native wildlife products and express our disgust in the industry, then every single person can help slow down this incredibly disastrous wildlife atrocity.
NEVER PURCHASE NATIVE WILDLIFE PRODUCTS!!'

टीनी, फ्रेंच,पोर्तुगाल्,स्पेन मधे स्नेल्स चा भाव भारीये अगदी. पण ते इतके मोठे नसतात. ते लँड स्नेल्स (Escargot) खातात, मस्त चीज बरोबर बेक करून.. क्वाईट टेस्टी.. ( आता या पुढचा प्रश्न विचारू नकोस , Wink Proud )

वर्षू, मी TV शो मधे पहिलंय त्या स्नेल्सना उकळत्या पाण्यात टाकताना आणि वर ते निर्दयी फ्रेंच लोक त्याना तसेच त्यांच्या शंखासकट कुडूम कुडूम चावत खातात. मी TVच बंद करून टाकला.. Sad

मगरी सुसरींबद्दल माहिती वाचत असताना आणि प्रचि बघत असताना कातडीसाठी ज्या पद्धतीने त्यांना सोललय ते बघुन बापरे झाल मला...
इतक्यात जंगल बुक पण बघत असताना मोगलीला मनुष्य म्हणुन घेताना राग यायचा..त्यात चंदा नावाच्या पात्राच मस्त वाक्य आहे, "हम पेट भरने के लिए शिकार करते है पर मनुष्य अपने मौज के लीए इसिलीए हमे मनुष्योंसे नफरत है" अस ती म्हणते..किती बरोबर आहे ना..

हे इंडिअन घरीयाल फक्त इंडियातच असतात काय? >> साधना, ह्या गोष्टीचा खरतर अभिमान वाटायला हवा अशीच आहे हि..घरीयाल हि क्रॉकोडीलिअन जात फक्त भारतीय उपखंडातच आढळते.. गोड्या पाण्यात फलनेफुलनेवाली हि जात मुख्यत्वे मास्यांवर जगते. IUCN (International Union for Conservation of Nature) ने यांना Critically endangered सांगितलेल आहे..म्हणजे ज्या गोष्टी यांच्या जगण्यासाठी घातक आहेत त्या जर वेळीच थांबवल्या नाही तर ते समुळ नष्ट होऊन जातील.. Can you imagine घरीयाल सुद्धा डायनासोर च्या काळापासुन भुतलावर अस्तित्वात आहे. आणि डायनासोर च्या समुळ नाशाला ज्या गोष्टी कारणीभुत ठरल्या त्यातुनही हे जीव तग धरुन आहेत.. पण मानव जातीच्या सो कॉल्ड विकासाच्या संज्ञेत यांच जीवनमान बसत नसल्याने अख्खी च्या अख्खी जात नष्ट होण्यावर आहे..
खुप खेदजनक आणि त्रासदायक विचार आहे हा Sad Angry

वर्षू, क्वाईट टेस्टी हं .. क्या बात है.. मला जर्रा जर्रा डाऊट यायला लागलाय आता तेरेपे.. Wink

उजु, अबोलीचा रंग अबोली नै आहे का ? केशरी वाटतोय मला जरासा..

टीना, हाही अबोलीचा एक रंग आहे. माझ्याकडेही आहे ही. उजु, सेम पिंच.

हो गं वर्षू, जसे लिऑपॉर्ड आणि इतर काही प्राण्यांची फर वापरण्याचे मुद्दाम कमी केले गेल्यावर त्या प्राण्यांची हत्या थांबली तसे इतर प्राण्यांच्या बाबतीतही केले पाहिजे.

जागू, स्वागत गं नव्या भागाचे. आम्ही श्वास रोखुन वाट पाहतोय. Happy

मागे ट्रेवेल चॅनेलवर एक मोरक्को किंवा त्याच्या आजुबाजुच्या प्रांतातली एक जत्रा दाखवलेली. त्यात स्नेल सुप होते Happy

Pages