आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
टीना, वॉव. मला वाचायचंय ते
टीना, वॉव. मला वाचायचंय ते पुस्तक.. मी काही पानंच वाचली आहेत..
अदिजो, म्हणजे माझ्या फोटोतली निळवंतीच आहे बहुतेक
कारण माझी आजी त्या वेलीला गारवेल असावी असे म्हणायची..
पुर्वी ती निळी फुले खुप
पुर्वी ती निळी फुले खुप दिसायची. मॉर्निंग ग्लोरीसारखाच आकार पण पाने त्रिशूळासारखी ( कदाचित ५ भागाची पण असावीत ) शाळेच्या कुंपणावर पण होती आमच्या.
आला रे आला रे.. पाऊस परत
आला रे आला रे.. पाऊस परत आला..
कसा आहे सांगु..
ओले कपडे वाळायला टाकतो त्यावेळी ते झटकल्यावर जसा शिडकावा येतो ना तसा..
Seems like देवानं आज धुण काढलयं ..
सुदुपार... आज सकाळी
सुदुपार...



आज सकाळी वेचलेली...
त्यात एक ४ पाकळीचा देव चाफा पण मिळाला....
टीने ..
टीने ..
टीना, तू मस्त उपमा देतेस
टीना, तू मस्त उपमा देतेस
काहिही हं आश्विनी ,
काहिही हं आश्विनी ,

इथे गारवेलीची चर्चा वाचुन हा
इथे गारवेलीची चर्चा वाचुन हा फोटो टाकावासा वाटला.

नेटवर गारवेल असे सर्च केल्यावर अशीच फुले दिसताहेत. हिची पाने बघा. गारवेलीची पाने अशी पाच्/सात एकत्र प्रकारची ( संयुक्त?) असतात.
नेटवर मॉर्निंग ग्लोरी असे सर्च केल्यावर फुलांची रचना अशीच, रंग मात्र गडद आणि पानांचा आकार वेगळा असलेली वेल दिसते.
अधिक शोधल्यावर गारवेल हा मॉर्निंग ग्लोरीचा एक प्रकार आहे त्याला कैरो मॉर्निंग ग्लोरी , माइल अ मिनट, अशीही नावे आहेत.
मॉर्निंग ग्लोरी (Ipomoea)
कैरो मॉर्निंग ग्लोरी (Ipomoea cairica morning glory)
हिरा, तुम्ही अशी फुलं म्हणताय का? ती मॉर्निंग ग्लोरी आहे, कुंपणावर सोडली असते. तिला नीळवंती म्हणतात का ते मात्र माहित नाही.
मी आठवण काढली होती ती याच
मी आठवण काढली होती ती याच फुलांची. या फुलाला देठापासून पाकळीपर्यंत एक छेद देऊन आम्ही त्याला साहेबिणीचा झगा म्हणत असू. वर्णन करणे कठीण आहे पण कुणी करून बघितले, तर सहज लक्षात येईल.
टीना, तुझ्या उपमा वाचून तो
टीना, तुझ्या उपमा वाचून तो ईश्वरही खदखदून हसत असेल.
सायली मस्त माहिती. मला माहिती
सायली मस्त माहिती. मला माहिती नव्हतं 'देवचाफा' कोणाला म्हणतात ते.
गारवेल मस्त. ही दिसते पण नाव माहिती नव्हतं मला.
ही मला पाचगणीला सक्काळी
ही मला पाचगणीला सक्काळी सक्काळी भेटलेली मॉर्निंग ग्लोरी:
सायली सोनचाफा मस्तच ग.. सावली
सायली सोनचाफा मस्तच ग..
सावली प्रचि नेटवरचा आहे का ? मला वाटल पहिले कि तुझ्याच घरचा कि काय
गौरी मस्त प्रचि .. फ्रेश एकदम..
सद्ध्या निळाई चा मौसम असल्यासारखे प्रचि येत आहेत सगळे..
अन्जू
सुप्रभात ............ खूप
सुप्रभात ............




खूप गडबडीत आहे.मस्तच चाललंय इथे.
आमच्याकडे बहुतेक वरुणराजाने कपडे भिजू घातलेत.(टिनास्य उपमा:).....(टिने खायचा उपमा नाही बरं! :फिदी:) वरूणराजांचा बेत दिसतोय धुण्याचा.
दिनेश म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गारवेलीचा दांडा काढून वरचा भाग फ्रॉकचा घेर म्हणून वहीत ठेऊन मस्त गुळगुळीत सुकवायचो. आणि ग्रीटिन्ग कार्डावर बाहुलीला चिकटवायचो. मस्त दिसायचं.
आधी काल हे एकच होत. छोटं आणि त्यावर डिझाइनही अजून यायचं होतं.
आणि आज सकाळी हे सगळे कुंडीत एकदम उभेच! मी आश्चर्यचकित. यावरचं डिझाइइनही एका रात्रीत आलं.
वाह, कसल्या गोडडूल्या छत्र्या
वाह, कसल्या गोडडूल्या छत्र्या आहेत. मला ती डिझाइन येण्याआधीची मऊ, गुळगुळीत, बाळाच्या हातासारखी मश्रूम आवडते
गौरी मस्त, फ्रेश प्रचि
गौरी मस्त, फ्रेश प्रचि आहे.
गारवेल आपोआप ऊगवते बहुतेक, कारण कोकणात खूपदा mseb च्या पोलवर लपेटलेली दिसते..
भूछत्र गोड. आमच्याकडे कधी
भूछत्र गोड.
आमच्याकडे कधी वरूणराज कपडे धुवायला येतोय, आम्ही वाट बघतोय. किंचित शिडकावा झाला मगाशी.
टीना, फोटो मी काढलेला आहे.
टीना,
फोटो मी काढलेला आहे. त्यावर माझा वॉ मा आहे.
Morng gloey supprb... Bhu
Morng gloey supprb...
Bhu chatrya khupch cute...
Savali tya velachi pane dekhil kitti god..
Tina to sonchafa nai devchafa aahe.
किती मस्त आहेत मश्रुम्स..
किती मस्त आहेत मश्रुम्स.. माझ्या लहानपणी त्याला नको ते नाव आणि नको तो संदर्भ होता. मश्रुम खाद्यपदार्थ म्हणून मी फार नंतर वापरू लागलो.
Halli rastyachya kadela
Halli rastyachya kadela chinche chi zada baharleli dustat...



Hi itukali pitukali phula. .......
Neeri road war kadamb itka
Neeri road war kadamb itka baharalay...
Asankhya pullani aachhadalela vruksha....
Ani tyavar asankhya ful pakhare bagadat hoti...
Khup majja ali baghayala....
Kadambache ankhi photo ahet
Kadambache ankhi photo ahet nantar takte .
Mobile varun upload karayala tras hotoy.
Seems like देवानं आज धुण
Seems like देवानं आज धुण काढलयं >> टीना सही आहे हे.
सायली पांढर्या चाफ्याची फुलं आत्ता कुठे मिळाली तुला? इथले सगळे चाफे पालवले आता. टीना अग ह्याच झाडं जनरली देवलाजवळ असत, म्हणून याला देवचाफा म्हणतात.
गारवेल सुंदर. आणि मानुषी, कावळ्याच्या छत्र्याही अप्रतिम. फोटो झकास आलाय. डिझाईन अगदी स्पष्ट दिसतेय.
कदंबाचे गेंद मस्त दिसतात. अगदी चेंडू सारखे. पण मुंबईला हे ही साधारण एप्रिल मध्येच फुलतात. चिंच पण मस्त फुललेय. फुलं खायला ही आंबट आंबट मस्तच लागतात.
गारवेल नाहीये पण ही एक निळाई माझ्याकडून
Hema tai ekde khup bahaealay
Hema tai ekde khup bahaealay dev chafa..
Chinch phulala kay mhantat ? Madhe jipsy yani
Khup chhan photo takle hote. Dinesh da ni tevha sangitale hote yachi chatani pan kartat..
सर्व फोटो छान आहेत.. छत्र्या
सर्व फोटो छान आहेत.. छत्र्या तर महा क्यूट आहेत..
नमस्कार लोकहो, मागच्या
नमस्कार लोकहो,
मागच्या आठवड्यात आम्ही पंढरपुरला गेलो होतो. तिथे गोपाळपुर येथे देवाला वाहायला फुले-हार घेतले. त्यात एक वेगळाच पाला होता.
त्या पाल्याविषयी फुले विकणार्या बाईला विचारले तर तिने सांगितले की हा चंदनाचा पाला आहे.
हा त्याचा फोटो. हा खरंच चंदनाचा पाला आहे का?
पंढरपुरला शेगावच्या गजानन
पंढरपुरला शेगावच्या गजानन महाराज मठात एक झाड पाहिले. त्याला कदंबासारखीच पण लहान फुले होती.
त्या झाडाची फळे लांबुन रुद्राक्षासारखी दिसत होती. पण फळं असलेल्या फांद्या ७-८ फुटांवर होत्या, त्यामुळे हात पोहचत नव्हता.
ही त्या झाडाची पाने.
मला आधी वाटले होते की हे झाड रुद्राक्षाचे असावे, पण नेटवर सर्च केल्यावर कळले की रुद्राक्षाची फळे वेगळी असतात.
ह्या झाडाविषयी कुणाला काही माहिती आहे का?
निळवंती म्हणजे गारवेलच
निळवंती म्हणजे गारवेलच असावे. म्हणजेच रेल्वे क्रीपर का? Ipomoea Palmata ?
पण गारवेलीच्या पानांच्या कडा सरळ असतात ना? कडा आत शिरून पानाचे तीन किंवा पाच भाग नाही होत ना?
गमभन, कळम म्हणून एका झाडाची
गमभन,
कळम म्हणून एका झाडाची फुले अशीच असतात. पण झाड वेगळे असते वाटते.
Pages