निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, आपण काही वर्षांपुर्वी गेलो होतो त्या नंतर आज गेले मी येऊरला.

साध्या मोबाईलमधून काढले आहेत फोटो.

कपबशीच्या झाडावरचा ज्वेल बग -

DSC_0118.JPGDSC_0117_0.JPGDSC_0116.JPG

रानद्राक्ष -
DSC_0135.JPG

केशरी रंगाचं मश्रूम -
DSC_0115.JPG

वरचे झाड कळम आहे.

अश्विनी, मस्त गं. फेबुवरचा तुझा फोटो पाहुन आपला "चलो येऊर" उद्योगच आठवलेला... सोबत झोपाळा आणि झोपाळागाणेही Happy

ते निळे रत्न लगेच अंगठीत बसवुन घ्यायचे ना.
सध्याच्या दिवसात कपबश्या खुप फुलतात. रानद्राक्षाचे वेल पाहिलेले पण द्राक्ष आज पहिल्यांदा पाहिली.

.

तिकडे अजून ३-४ झोपाळे होते. एक मुलगी तर नागपंचमीला झाडाला झोपाळे बांधतात आणि झोके घेतात तसे उंच झोके घेत होती. माझी हिंमत नाही झाली...झोपाळा तुटून खाली ओढ्यात पडायला होईल म्हणून :खोखो:. पाणी अगदी कमी होतं पण जाम ओबडधोबड दगड होते खाली.

अरे वा, अश्विनी मस्तच Happy

अरे दोन तीन आठवड्यापूर्वी जांभळाच्या तीन बिया तिन वेगवेगळ्या छोट्या कुंडीत लावल्या होत्या.
काही दिवसापूर्वी दोन कुंड्यामधुन कोंब फुटला, आता दोन तीन इंच वाढलीत रोपं.
पण आश्चर्य म्हणजे एका कुंडीत एकच बी लावली असुन दोन रोपं आलीत आणि एकातुन चक्क तीन रोपं आलीत. ( तिसरीतुन आता रोप येईल)
बहुधा शेंगदाण्यासारखे जांभळाच्या बीच्या कवचाच्या आत दोन तिन दाणे असणार असं वाटतय. एक उरलेली बी कापुन पाहिली पण तसे काही लक्षात आले नाही.

अश्विनी खुप सुरेख प्र.ची.. कपबशी खुप्पच गोड.:)
हे कदंबच ना!
की गमभन, दाखवले ते कमळ?
कोणी उलगडा करेल का?
KADAMB1.jpgKADAMB2.jpgKADAMB.jpg

काल एका कवठी चाफा शोधत शोधत दोन तीन नर्सर्‍यांना भेट दिली..
त्यात एके ठीकाणी पाच फुटाच पपई च झाड फळांनी लदबदलेलं दिसलं..:)
तो सांगत होता फळ अगदी साखरे सारख गोड आहे..
तायवान हुन आणलय म्हणे..
PAPAI.jpgpapai2.jpg

पुन्हा मोगरा ट्प्पोरी फुलं देऊ लागला..
mogra.jpg
आणि हे तर अगदी कमळा सारखेच वाटत होते...
खुप प्रसन्न वाटले देवाला वाहातांना आणि सध्या वातावरणात गारवा असल्याने ते संध्याकाळ पर्यंत टवटवीत होते...:)
mogra1.jpg

सायली, पपई मस्तच. नकाशात बघितला तर एवढुस्सा देश आहे पण तिथेही खास झाडे आहेत. तिथेच कापूराची पण खुप झाडे आहेत असे वाचले होते.

जाणकार, तुमच्यासाठी, माझ्या वडीलांचा एक प्रश्न आहे.

प्रश्न. : बेलाच्या झाडाला काटे असतात. तसेच काट्याशिवाय पण बेलाचे झाड असते का?

कारण : आमच्या सोसायटीच्या बागेत, बेल म्हणून कोणीतरी दोन फांदया लावल्यात. त्याला काही पाने त्रिदल, तर काही चौदल, तर काही पाचदल असलेली आहेत. पण दिसतात बेलासारखीच. म्हणून वडीलांनी तुम्हाला हा प्रश्न विचारायला सांगितला आहे.

द्या आता उत्तर! Happy

सायली, तो कदंब नक्कीच नाही.
धावडा असू शकेल, पण पाने वेगळी वाटताहेत.
शोभा१, फोटो टाकता येतील का त्या झाडाचे? पाच पानी बेल असतो.

नक्की माहिती नाही शोभा ताई.. पण बेलाच्या झाडाला काटे असतातच..
जरी ४ आणि ५ पानी बेल असला तरी.. कदाचित झाड कोवळं असेल म्हणूनही काटे दिसत नसतील.
पान तोडुन खाऊन बघा बेला सारखीच चव आहे का? नाही तर त्यासारख दिसणार दुसर झाड असेल..
बाकी जाणकार सांगतीलच..

अनोळखी झाड असेल तर पानांची चव बघू नका. बेलाला तीनच पाने असतात. अगदी क्वचित चौदल दिसते आणि ते दुर्मिळ असल्याने पूज्य मानले जाते.

हे कापूराच्या झाडाचे वर्णन

http://plants.ifas.ufl.edu/node/101

Description

A quick and easy method of identifying camphor is by crushing the leaves or peeling a twig or bark. This will release oils and the scent of camphor. Camphor is an evergreen tree with oval to elliptical leaves, arranged alternately on the stem. Slender twigs are initially green but change to reddish brown. Buds are sharply pointed, roughly 1/2 inch in length. Camphor tree bark is variable, from scaly to irregularly furrowed with flat topped ridges. The camphor tree habit ranges from small to medium (25 to 40 feet tall), but some specimens have attained over 100 feet. Leaf margins are entire, but can be wavy with a shiny, dark green color. Fragrant flowers are greenish white to pale yellow, borne on panicles about 3 inches long. The fruit is dark blue to black, fleshy and approximately 1 to 1.5 cm in diameter. These are produced in large quantities during the winter and spring months in central and north Florida.

https://en.wikipedia.org/wiki/Cinnamomum_camphora इथे फोटो आहेत.

आणि ते कदंब नाही. कदंबाचे फूल चांगलेच मोठे म्हणजे साधारण ४ ते ५ सेमी व्यासाचे असते. दाड असते. त्याचेच मग फळ होते. ते पण साधारण तेवढ्याच आकाराचे असते. चवीला आंबट गोड लागते. कदंबाची पाने मोठी असतात आणि ती चुरडली तर आयोडेक्स सारखा वास येतो.

इथे याला ईपे असे म्हणतात. मी पहिल्यांदाच फोटो लोड करते आहे.लहान करतांना फारच लहान झाला.टाबेबुआ या कुटुंबातला आहे.सध्या एथे अनेक झाडे फुलली आहेत.

हायला! मी मोडके तोडके काढलेले फोटो सगळ्यांना आवडले! थँक्स Happy

मी बरेचवेळा ऑफिसजवळच्या स्कायवॉकवर लंच सुरु होताना फेरी मारते. उंचावर असल्याने दोन्ही बाजूस झाडांची सोबत असतेच. झाडावर घरटी, पक्षी असतातच. काल एका झाडावर हे पक्षी होते. ८-९ तरी होते. त्यातले ३ फोन कॅमेर्‍यात टिपू शकले. हे झाड व पक्षी कोणते?

skywalk bird.JPG

Pages