निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधनाताई आपले दिनेशदा...
तो केनया, मसाइ मारा मधला फोटो आहे. ते तिथेच असतात किंवा आधी होते ना...?
प्रचि मधले झाड Acacia आहे.... मसाइ मारा मधली झाडे ह्या विशिष्ट छत्रीसारख्या Topiary आकारासाठी प्रसिद्ध आहेत आणि ह्या झाडाना असा आकार यायचे कारण म्हणजे जिराफानी त्यांच्या वयानुसार वेगवेगळ्या ऊंचीवरची खाल्लेली ह्याची पौष्टिक पाने.

निरु गुलजार Lol
Acacia बद्दल माहिती आहे.. टिव्ही वरुन आणि भुगोलाचा अभ्यास करताना सुद्धा वाचलय .. प्रचि मस्तच..

मानुषींच्या प्रचितल्या झाडाखाली ४ दिवस जिराफ बांधला की बिछडलेले जुळे भाऊ वाटतील...:हहगलो:
सावली छान उपक्रम.. खुप गोड दिसतात ती फुल आणि पानं सुद्दा..

निरू, मीच तो. !!!!. आधी केनयात होतो. तिथल्या बाभळींच्या अंगात नाना कळा असतात. मी त्यावर एक लेख, दोन भागात लिहीला होता.

बाभळी, गवत, हत्ती, जिराफ, माकडे, मुंग्या, हरणे, सिंह.. या सगळ्यांचे मिळून एक भव्य नाट्य तिथे सतत घडत असते.

माझ्याकडं जाई आहे आणि जुई पण आहे..
सायली कशी काय नै दिसली आजपावेतो काय माहिती..आत्ता कळल..ती तर नागपुरात असते ना Lol

टीनी.. तेरे कमेंट्स.. Lol मस्तयेत!!!

मी टाकलेल्या फुलांचं नांव अजून कुणी सांगितलं न्हाय?? दिनेश, शशांक्,शांकली>> हाजिर हो>>!!!! Happy

मी टाकलेल्या फुलांचं नांव अजून कुणी सांगितलं न्हाय?? दिनेश, शशांक्,शांकली>> हाजिर हो>>!!!! >>>>

Rhynchostylis gigantea var alba फॉक्स टेल्ड ऑर्किड - शांकलीने सांगितलंय - म्हणजे नक्की तेच असणार .... Happy

मागील पानावर एक पिवळ्या फुलाचे फोटो आहेत -त्याची एक पाकळी जरा लांबट आहे -

Gmelina asiatica Family: Verbenaceae (Verbena family) किंवा Parrot's Beak

मानुषी तुझ बाभुळच झाड आणि निरु गुलजार ने टाकलेला प्रचि कुंभमेळ्यात बिछडलेले भाउबंद वाटत आहे >>>>>> टिने.......:खोखो:
मानुषींच्या प्रचितल्या झाडाखाली ४ दिवस जिराफ बांधला की बिछडलेले जुळे भाऊ वाटतील... निरु Biggrin
फोटो कॅमेरा मुळे पण एवढे छान येतात का?>>>>>>>>>> ओ निसर्ग चक्र.... कॅमेर्‍याला नाही हं सगळं क्रेडिट,
वर्षूकी नजरको ज्यादा क्रेडिट हय... कृपया Light 1 घेणे!
वर्षू वरच्या सुप्रभात फुलांचा फार मस्त रंग आहे गं!

वा सगळे फोटो आणि सगळ्या कमेंट्स मस्तच.

आज मस्त पाउस पडतोय. ऑफिसला येताना गाडीची लाईट चालू ठेवावी लागली इतका मस्त पडत होता.

>>Rhynchostylis gigantea var alba फॉक्स टेल्ड ऑर्किड - >>
पण फोटोतली फुलं वेगळी दिसतायत आणि पानंही कर्दळीसारखी किंवा हळदीसरखी वाटत आहेत.

वर्षू नील , फोटू मस्तच..

आज मस्त पाउस पडतोय. ऑफिसला येताना गाडीची लाईट चालू ठेवावी लागली इतका मस्त पडत होता. >> वॉव.. मी असा पाऊस नै अनुभवला कधी..एवढा लाईट सुरु ठेवेपर्यंत तर नाहीच.. आपल वायपर वरच काम निभत.. AddEmoticons04261.gif

इथ सलग ३ ४ दिवस खुप, थोडा, रिपरिप, रिमझिम्, स्प्रे, सरी अशी झडसदृश्य परिस्थिति झाल्यावर आज जरा सुर्यदेवाने दर्शन दिलेय.. जराच दिलेय म्हणा पण एकंदर उघाड आहे पावसाला.. बघु सुर्याचा हेका कुठ्वर चालु देतो हा पाऊस ते..

पण फोटोतली फुलं वेगळी दिसतायत आणि पानंही कर्दळीसारखी किंवा हळदीसरखी वाटत आहेत. >>>>
अदिजो / अश्विनी - तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे - ही फुले या प्रकारातली आहेत का >>>

Globba winitii , Common Names: dancing ladies ginger, dancing girls ginger Family: Zingiberaceae (ginger Family) - थायलंड, विएतनाम येथील नेटिव ...

????????????????

ओह थांकु शशांक.. शांकली ने सांगितलेय म्हणून बरोबरच असेल Happy
अदीजो ,तुझी इन्फो काय आहे?? शेअर कर इथे!!
बाप्रे एव्हढ्या पावसात जागुकडे कोण कोण नाग्,साप आले असतील आश्रयाला??? ऊप्स!!!
मानुषी इस्पेसल ठांकु तुला Lol

प्लिज कुणीतरी सायलीने टाकलेल्या या फुलांचे नाव सांगा ना.

सायलीने टाकलेला फोटो

जागू, होना कालपासुन ठाण्यातपण असाच कोसळतोय मधेमधे. काल सकाळी हायवेवर ऑलमोस्ट सगळ्या गाड्यांचे ब्लिंकर, हेडलाईट्स सुरु होते. पण इतका पाऊस कोसळत होता की २०/२५ फुटांच्या पुढचे काही दिसत नव्हते.

प्लिज कुणीतरी सायलीने टाकलेल्या या फुलांचे नाव सांगा ना.>>>>>>>>>>>>>>>>

मागील पानावर एक पिवळ्या फुलाचे फोटो आहेत -त्याची एक पाकळी जरा लांबट आहे -

Gmelina asiatica Family: Verbenaceae (Verbena family) किंवा Parrot's Beak

ओह थांकु शशांक.. शांकली ने सांगितलेय म्हणून बरोबरच असेल स्मित
अदीजो ,तुझी इन्फो काय आहे?? शेअर कर इथे!! >>>>>>
वर्षुदी - इथे अदीजोंचे सूक्ष्म निरीक्षण केवळ दाद देण्याजोगे आहे - ही फुले फॉक्स टेल्ड ऑर्किडची नाही वाटत - Globba winitii , Common Names: dancing ladies ginger, dancing girls ginger Family: Zingiberaceae (ginger Family) - हीच असावित ती ...

हॅट्स ऑफ टू अदिजो .... Happy

1_187.jpg

>Globba winitii >
येस्स! हीच आहेत! कशी सापडली तुम्हाला? मी zingiberaceae, canna, orchid सगळीकडे शोधलं होतं...मला नाही मिळाली Happy
हॅट्स ऑफ टू शशांक! ... Happy

Pages