निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद. मस्त माहिती. मी ही फुले पाहिली आहेत. पिवळ्या शेवंतीच्या फुलासारखी दिसतात ह्याची फुले आणि पाने.

वसंताच्या आगमनानंतर हे आमच्या बागेत तसेच सर्वत्र मोठ्या प्रमाणावर dandelion फुलतात. ह्याचे बहूगूण आजवर माहितच नव्हते. http://umm.edu/health/medical/altmed/herb/dandelion

cat ear flower
gavatphul.jpg

नलिनी, पण मला हे फुल डॅन्डेलियॉनचे नाही दिसत. ह्या फुलाच्या पाकळ्या फार बारीक असतात आणि फुलही फार मोठे नसते. परत एकदा खात्री कर. ह्याची पाने लांब असतात आणि मुळापासून आलेली असतात. फुल मधेच उगवते गच्च पानांच्या मधोमध.

व्वा सुंदर माहिती,,
नलिनी कीत्ती दिवसांनी!

काल अयप्पा मंदिरात जाणे झाले..
तिथल्या काही प्र.च..
templ.1.jpgtemp2.jpgtemple1.jpg

कौलारु, दाक्षिणात्य पद्धतीचे खुप सुंदर मंदिर. काळ्या पाषाणाचे देव.. तेवत्या समईच्या प्रकाशात देवाच रुपड
मनात खोलवर रुजत होते .. अगदी प्रसन्न शांत मनात अगदी खोलवर थंड गार वाटत होत>
का कोण जाणे तिथुन पाय निघत नाही लवकर...

temple.jpg

तिथलेच केळीचे झाड..
keli.jpgkeli2.jpg

आणि ही पिवळी फुलं कसली वाटेत भेटलीत...:)
y2.jpgyf.jpg

हा अजुन एक प्रकार पिव़ळ्या फुलांचा..
mf.jpg

मंदिरात चहु बाजुनी गुलाबाचे असे ताटवे फुललेले..:)
temple2.jpg

वावाआ, मस्त फोटो सगळ्यांचे.
नले, आता त्याला बोंडे आले कि, फुंकरा फुंकरीचा खेळ सुरु होणार !

वर्षू, ही खास उंच झाडाच्या आडव्या खोडावर वाढणारी झाडे. पाण्याचा सिक्रेट रीझर्व म्हणून मधे पाणी साठवून ठेवतात. एरवी झाडांना असे साठलेले पाणी आवडत नाही.

मी वर टाकलाय तो cat ear flower चा मॅक्रो मोडमधला फोटो. Dandelion आणि cat ear flower ह्यांच्यात कमालीचे साम्य. पानांमध्ये जरासा फरक असतो. मुळ फरक असतो देठांमधे. आमच्या बागेत बहूसंख्येने फुलतात ती Dandelions.

आता त्याला बोंडे आले कि, फुंकरा फुंकरीचा खेळ सुरु होणार !>> हो तर! तो आमच्या आवडीचा खेळ आहे. दादा, अरे मागचा दरवाजा उघडा ठेवला की हवेने ते घरभर पसरतात.
मी नव्याने मायबोलीवर आले तेव्हा तू कळम, कदंब ह्याबद्द्ल लिहिले होतेस. तेव्हा आपली कळम, कदंब, देवक ह्यावरून चर्चा झाली होती. तू अद्याप विसरला नाहीस.

सायली, वेळ मिळेल तसा वाचते धागा, एखाद्या विषयावर लिहिन म्हणते पण वेळ मिळेपर्यंत विषय मागील पानांवर गेलेला असतो, मग लिहायचे राहून जाते. आता नियमित येण्याचा मानस आहे.

पहिल्या फोटोत छोटे फुल cat ear flower आहे तर मोठे Dandelion. दुसर्‍या फोटोत Dandelion आहे पण त्याची पाने दिसत नाहीत.

flowerDifference.jpgdandelion.jpg

आपल्या एका जेष्ठ आणि जाणत्या सभासदाच्या एका वास्तव्याच्या ठिकाणचे Typical झाड...
IMG_20150720_193153770.jpg

आणि जुलै महिन्यातल्या एका संध्याकाळी त्याच परिसरातला सुर्यास्ताचा प्रचि....

_IMG_000000_000000_1.jpg

त्यांच्या पुन:प्रत्ययासाठी...
(Original Colours..... This is the Beauty and Power Of Nature..)

हा अजुन एक प्रकार पिव़ळ्या फुलांचा.. >>>>> पिवळी फुले - पुष्पगुच्छ असलेली ... Galphimia glauca

आमच्या बागेत आहे हे ..... Happy

सर्व माहिती व फोटो सुंदरच ....

पुरंदरे शशांक,खुप खुप धन्यवाद .

हा वॄक्ष सांताक्र्झ ला माझ्या कॉलनी जवळ आहे मी नेहमी याची फुले उचलते पण यालाच शाल वॄक्ष म्हणतात माहित नव्हते.

शशांक, Tristellateia australis बघणार का ?
ही वेल इथे बँगलोरला मिळते आणि भरभरुन फुलते.
Galphimia glauca आणि ह्याची फॅमिली सारखीच आहे.

सर्व माहिती आणि फोटो मस्त. गॅप पडली की असचं लिहावं लागत ( स्मित)

इथे पाऊस सॉलिड कोसळतोय आज. सूर्यदर्शन नाहीये आज.

आला का पाऊस एकदाचा.. तो संपेस्तोवर येतेच मी परत Happy
दिनेश, छान माहिती सांगितलीस मी टाकलेल्या फोटो बद्दल..
निरु गुलजार सुंदर फोटो!!

मस्त फोटो. मी अजुन डंडेलिओन बघितले नाहीयेत. पण इथे एक फुल येते (एकदांडीसारखेच पण थोडे वेगळे) त्यालाही डंडेलिऑनसारखी टिचकी मारुन त्याची सुकलेल्या बारिक पाकळ्या उडवता येतात.

निरु, कोण आहेत ते जुने सभासद? फोटो अतिशयच सुरेख आलाय.

निरु कसला मस्त फोटो! व्वा
वर्शु दी खुप क्लास फोटो..
मानुषी ताई या दिवसात बाभळी येता जाता लक्ष वेधुन घेते..
शशांक जी Galphimia glauca बद्द्ल आभार.. तुमच्या वावरात एक से एक फुल आहेत... Happy

सर्व माहिती आणि फोटो मस्त. गॅप पडली की असचं लिहावं लागत >> +१ Happy

मानुषी तुझ बाभुळच झाड आणि निरु गुलजार ने टाकलेला प्रचि कुंभमेळ्यात बिछडलेले भाउबंद वाटत आहे Wink

वर्षू नील, प्रचि मस्तच..

<<ही पिवळी फुलं कसली वाटेत भेटलीत... >> असे म्हणुन सायली ने ज्या फुलांचा फोटो दिलाय ती फुले कसली आहेत? इथे रस्त्यावर भरपुर आहेत. त्याच्या शेंगा घेऊन , गावात बिया रुजवल्या तर ती ही मोठी झाडे झालीत आणि छान पिवळी फुले येतात त्यावर.

Pages