निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना मस्त महीती. आणि खरच पुस्तक काढ. हेमंत यांच कौतुक वाटत.

आत्मधनू खुप सुंदर दिसत आहे कैलाशपती.

सध्या हे झाड भरलय फुलांनी.

कैलासपती काय सुंदर आहे.
जागू अश्या फुलांनी झाड भरलंय? मस्तच!
रिमझिम पाऊस कित्येक दिवसांनी चालू झालाय इथे.

मस्तंय तो गुलाब.. अशी पावसाच्या पाण्यानी ओथंबलेली फुलं बघून मन तृप्त होतं अगदी..

जागु मस्त फोटो. माझ्या गावी असलेल्या झाडाची आठवण झाली. माझ्या आईच्या माहेरी तिच्या लहानपणापासुनचे एक गुलाबाचे झाड होते. ते कधी लावलेले हे तिलाही माहित नाही. अग्दी झाड या नावाला साजेसे साधारण ७-८ फुट उंच आणि डेरेदार पसरलेले. त्याच्यावर कायम १०० एक फुले आणि कळ्या असायच्याच. फुलाविना झाड असे कधी पाहिले नाही. आता ते झाड अगदी म्हाता-या माणसासारखे खुरटलेले झालेय. फुले यायचेही बंद झाले.

हेमंतने आपल्या सर्पमित्रांवरही खुप टिका केली. त्याच्या मते हे सर्पमित्र सर्प गोळा करतात आणि जंगलात नेऊन सोडतात. गावी साप निघण्याचे प्रमाण खुप असल्याने त्याने एका वेळी ५०-६० सापांनाही जंगलात सोडताना पाहिलेय. जंगलात कायम रहिवाशी साप वस्तीला असतात आणि त्यात या सापांची भर पडल्यावर तिथल्या उपलब्ध खाद्यावर ताण येतो. मुळ रहिवाशी सापांना या नविन सापांबरोबर स्पर्धा करावी लागते. तिथली इकोसिस्टीम यामुळे बिघडते. काही साप उपासमारीने मरतात तर काहींना स्थलांतर करावे लागते. काही सर्पमित्र घरी १५-२० साप बाळगतात आणि त्याचे अभिमानाने प्रदर्शन करतात. हेमंतच्या मते हेही बरोबर नाही. साप हा काही घरात पाळायचा प्राणी नाही.

हेमंतच्या मते तुम्हाला जर एखादा साप दिसला तर त्याला मारल्याने फारसे काही बिघडणार नाही. पण त्याला पकडुन नंतर कुठल्यातरी अनोळखी जंगलात सोडुन दिल्यामुळे त्या सापालाही त्रास होतो आणि त्या जंगलातल्या इतर सापांनाही त्रास होतो.

आहाहा कैलासपती, निसर्गानी काढलेली सुंदर रांगोळी....
जागु काय सुरेख रंगा आहे त्या फुलाच.. आणि पावसाच्या थेंबांमुळे अजुनच टवटवीत दिसतय.

ह्म्म. कैलाशपती कित्ती सुंदर दिसतोय.

मुळात साप दिसला की ठेचा ही वृत्ती आपण बदलायला हवी. Happy सगळे साप विषारी नसतात आणि जे विषारी असतात ते सहसा मनुष्यवस्तीकडे येत नाहीत.

आता माणुसच त्यांच्या वस्तीवर आक्रमण करायला लागला तर ते तरी काय करणर? जसे आमची बेलापुर टेकडी. इथे आठवड्याला एकतरी साप दिसतोच कारण ते मुळात त्यांचेच घर आहे. आम्ही तिथे अतिक्रमण केले Happy

मस्त माहिती आणि फोटो!
कैलासपती विदेशी झाड आहे आणि शाल वृक्ष अस्सल देशी ना?

नवीन भाग फारच प्रेक्षणीय ,वाचनीय झालाय. त्यात सर्वांनी घातलेली अनमोल माहिती व कुतूहल वाढवणारया निसर्ग प्रतिमांनी हा धागा रंगतदार झालाय. मानुषी यांची बारीक सारीक निरीक्षणाने युक्त प्रस्तावना ही आषाढगर्द मैफीलीची सुंदर नांदीच झालीय . हा धाग्याची निर्माणकर्ती खरी शिलेदार जागुला मनापासुन धन्यवाद....

आमचे घर २ बाजुनी पिंपळाच्या झाडांनी वेढलेले आहे. त्याला फुटलेली चैत्रपालवी...

IMG_20150719_124439678.jpg

काही दिवसांनी उगवतीच्या प्रकाशातली पिंपळपाने..
IMG_20150719_124506747.jpg

आणि पाऊस पडल्यावर आनंदाने शहारलेले आणि त्याचा थेंब धरून ठेवणारे ओलेते पिंपळपान...
IMG_20150719_124617663.jpg

आहा निरु..मस्त प्रचि.. पहिला तर कातील आला आहे..

काल अप्पा बळवंत चौकात गेली होती. विमाननगर मधुन निघताना छान हलक उन्ह होत आणि जशी येरवडा पोहच्च्ली तश्या आल्या न सर धावुन! वेगात गाडी चालवत होती त्यामुळे असे मुंग्या एकत्र डसतात/ चावतात तसे लागत होते..
सर्वांनी एकसाथ गाड्या रस्त्याच्या बाजुला घेऊन झाडाखाली आश्रय घेतला आणि मी..मस्त गाडीचा वेग कमी करुन अंगावर थेंब झेलत पुर्ण ओली झाली ..
खुप दिवसांनी वरुणदेव प्रसन्न होऊन बरसले..
आह ! पावसात भिजण्याचा आनंदच काही और असतो .. दिल पुकारे आ रे आ रे आ रे..

AddEmoticons04225.gif

पिंपळपानं सुरेख!
आज मी पण भिजले! लेकीला (आणि तिच्या मैत्रिणीला, तिच्या आईला) घेऊन टेकडीवर जाणं हा दर रविवारचा कार्यक्रम असतो. आज टेकडीवर पाऊस आला. लेकीने आणि तिच्या मैत्रिणीने पावसात नाचून घेतलं, चिखलात खेळून घेतलं ... दोघी "चहाचं डबकं" शोधून त्यात बसल्या आणि एकमेकींवर पाणी उडवत होत्या Biggrin Biggrin

कैलासपतीलाच शाल वॄक्ष म्हणतात ना? >>>>>> नाही...........

Common name: Sal • Hindi: साल Sal, Salwa, Sakhu, Sakher • Marathi: sal, guggilu, rala, sajara • Bengali: Sal • Oriya: Sargi gatcho • Urdu: Ral, Safed dammar • Assamese: Sal, Hal • Khasi: Dieng blei • Sanskrit: agnivallabha, ashvakarna, ashvakarnika
Botanical name: Shorea robusta Family: Dipterocarpaceae (Sal family)

------------------------------------------------------------------------------
कैलासपती - Common name: Cannon Ball Tree • Hindi: Nagalinga नागलिंग, Tope gola तोप गोला • Kannada: Lingada mara, Nagalingam • Marathi: Shivalingam • Bengali: Kaman gola • Tamil: நாகலிங்கம் Naagalingam
Botanical name: Couroupita guianensis Family: Lecythidaceae (Barringtonia family)

दोन्हींची माहिती - www.flowersofindia.net/ वरुन साभार .........

काय सुंदर माहिती वाचून जीव फुलून आला.. Happy

माझे जिथे ऑफीस आहे तिथला भाग हा जंगलानी वेढलेला आहे. इतक्या विपुल प्रकारच्या वनस्पती दिसत राहतात आणि भर दुपारी रातकिडे ओरडत राहतात. माझ्याकडे स्मार्ट फोन नाही म्हणून नाहीतर एक छान कलेक्षण करता आले असते मला.

इथे दोन तीन तळे आहे. तिथे अनेक कासव दुपारच्या वेळी जमीनीवर येऊन बसतात कारण दुपारी तिथला गाळ उपसला जातो पाल्यापाचोळ्याचा.

कुणाला Dandelion ला मराठीमधे काय नाव आहे माहिती आहे का? ह्याचा चहा करतात तो फुलांचा असतो की पानांचा असतो? धन्यवाद.

बी, मराठीत Dandelion ला कणफूल म्हणतात बहुतेक. पण ते मुळचे युरोप मधील असल्याने आपल्याकडे दुर्मिळ आहे. बहुदा हिमालयात उगवते. चहा करण्यासाठी कळ्या, फूले आणि ताजी कोवळी पाने वापरतात (हा चहा म्हणजे काढाच असावा Wink ).. युरीनरी डिसॉर्डर्स बर्‍या करण्यासाठी खूप उपयोगी असतो.

Pages