निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दसर्‍याचे औचित्य साधून या नवीन भागची सुरुवात करणारा फोटो आणि मजकूर सुरेख आहे जागू.

सर्वांना नवीन भागाच्या आणि दसर्‍याच्या खूप शुभेच्छा!!!

अरे वा, नवीन भाग आला तर ........

सर्वांचे मनापासून अभिनंदन ....

दसर्‍याचे औचित्य साधून या नवीन भागची सुरुवात करणारा फोटो आणि मजकूर सुरेख आहे जागू. >>> +१००..

हा आपटा - Bauhinia racemosa ( http://flowersofindia.net/ - या साईटवरुन साभार ...)
Common name: Bidi Leaf Tree • Hindi: कठमूली katmauli, झिंझेरी jhinjheri • Marathi: अपटा apta, सोना sona • Tamil: ஆத்தி atti, தாதகி tataki • Malayalam: അരംപാലി arampaali, കുടബുളി kutabuli, മലയത്തി malayaththi • Telugu: తెల్ల ఆరెచెట్టు tella arecettu • Kannada: ಅಪ್ತಾ aapta, ಅರಳುಕದುಮನ್ದರ aralukadumandara • Bengali: banraji, banraj • Konkani: आप्टो apto • Urdu: Gul-e-anehnal • Sanskrit: यमलपत्रक yamalapatrakah, युग्मपत्र yugmapatra
Botanical name: Bauhinia racemosa Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)

Bidi Leaf Tree.jpgBidi Leaf Tree-1.jpg

ही काही आमच्यापण बागेतली......

ही सिंगल कार्नेशन....

IMG_3990.JPG

हे आहे जॅकोबिनियाचे ब्रॅक्ट्स...

IMG_3995.JPG

हे ब्रॅक्ट्स असे थोडे मोठे होतात....

IMG_3994.JPG

आणि या ब्रॅक्ट्स मधून असे सुंदर तुरे बाहेर येतात....

IMG_3996.JPG

ही आहे पेंटॉस......

IMG_3991.JPG

आणि ही गाल्फिमिया ग्लाउका....बहुतेकवेळा कुंपणासाठी म्हणून ही ट्रॅफिक आयलंड मधे लावलेली दिसते..

IMG_3988.JPG

अशा अनेक रंगीबेरंगी फुलांनी फुलांनी फुललेली बाग बघितली की काय वाटतं हे शब्दांत नाही सांगता येणार.....:स्मित:

सध्याच्या काळात दसरा हा सण आपटा तसेच कांचन या झाडांच्या अक्षरशः मुळावर घाव घालणारा आहे - पाचगाव पर्वती वनविहार असो वा कुठेही शहरात वा शहराच्या जरा आसपासची ही झाडे - दसर्‍यानंतर पाहवत नाही इतकी भयाण दिसतात - त्यांचा पाला/ फांद्या लोकांनी अक्षरशः ओरबाडलेला असतो.

आणि गुढीपाडव्याला कडुनिंबाचे हेच हाल असतात - हे दोन सण (दसरा व गुढीपाडवा) आपण का अशा विचित्र पद्धतीने साजरे करतो याचा खरोखर गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे .

आपल्या कुटुंबात, नातेवाईकात, मित्रमंडळीं मधे आपण हे नीट सांगून काही विचार- परिवर्तन करु शकलो तरी काही अंशी मिळवलीच म्हणायची की ....

सर्वांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा - आपटा तसेच कांचन या झाडांच्या पानांचे वाटप न करता मनापासून शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करावा ही कळकळीची विनंती/ प्रार्थना.

शशांकदादा Happy
मी कागदाची आपट्याच्या आकारातली पानं बनवते
त्याला सोनेरी रंग देते आणि त्यावर शुभेच्छा लिहुन जवळच्या माणसांना वाटते Happy
बाकीच्या घरी येणार्‍या चिल्ल्या पिल्ल्यांना मोगर्‍याचं,जाईचं,बुचाचं किंवा पारिजातकाचं एक एक फुल देते Happy
उद्या भल्या सकाळी उठुन (ते उद्या हापिसात यायचं असल्याने करावंच लागणारेय ... पण बाकी वर्षीही दसर्‍याला) रस्त्याने पारिजातकाचा सडा शोधत फिरायचं, जाईची,बुचाची फुलं शोधत फिरायचं हा माझा अनेक वर्षाचा उद्योग Happy
पण रात्री पर्यंत पारिजातक पारच कोमेजुन जातो Sad मग पुन्हा संध्याकाळी पण फुलं शोधत फिरावं लागतं
(हे इतके वर्ष माहित आहे तरी मी सकाळी ही जातेच :फिदी:)
वह्या पुस्तकांवर झेंडूपेक्षा या फुलांची रास मस्त्त्त्त्त दिसते Happy

सगळ्या निगकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विजयादशमीच्या शुभेच्छा!

वा रिया - तुझा हा अभिनव उपक्रम वाचून खूपच आनंद झाला. आपण मनात आणले तर अशा किती तरी चांगल्या / विधायक गोष्टी करु शकतो - आणखी कोणाकडे असे अभिनव उपक्रम असतील तर इथे जरुर शेअर करावेत.....

सर्वांना दसर्‍याच्या शुभेच्छा - शुभेच्छातर सतत असतातच दसरा हे निमित्त ...

>>आपटा तसेच कांचन या झाडांच्या पानांचे वाटप न करता मनापासून शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करावा ही कळकळीची विनंती/ प्रार्थना.>>> +१००

नमस्कार! निसर्गाच्या गप्पांच्या पानावर त्यासंबंधी प्रश्न चालेल असं गृहीत धरून एक प्रश्न विचारते.

मी अलीकडेच घरी कुंड्यांमध्ये काही रोपं लावली आहेत. काही दिवसांपूर्वी माझी तुळस अचानक सुकून जाळून गेलि. तिला पाणी कमी पडला वगैरे अश्यातालाही भाग नाही.

आणि ह्या आठवड्यात अचानक मी लावलेलं जरबेराचं रोप जाळून गेलं. त्या कुंडीतली माती उकरून पाहिली तर त्यात काही बारीक बारीक किडे आणि पांढऱ्या अळ्या(?) दिसल्या. तुळशीच्या कुंडी मधली माती उकरली होती तेव्हा पण असेच किडे दिसले होते.

मला अशी शंका आहे की ही वाळवी असावी. तर ह्या वाळवीवर काय उपाय करता येईल?

सर्वांना दसर्‍याच्या शुभेच्छा!
ऑफिसला येताना पाहिलं की रस्त्यावर पाण्याचे ओहोळ वाहात होते Sad
किती पाणी वाया गेलं असेल Sad
असो!
काल रात्री १२ वाजता चतुर्श्रुंगी (हा शब्द अजुनही मला नीट टाईपता येत नाहीये Angry ) ला गेलेले देवीच्या दर्शनाला.
खुप गर्दी होती पण दर्शन मस्त झालं. मग घरी पोहचायला ४.३० वाजले त्यामुळे वाटलं की यावर्षी पानं बनवता येणार नाहीत. म्हणून नाराज होते तेवढ्या सकाळी ऑफिससाठी निघताना बहिणीने सांगितलं की तीने माझ्यासाठी पण पानं बनवुन ठेवलियेत Happy
गडबडीत असल्याने पानांचा फोटो काढायला वेळ झाला नाही. आता वाटुन आले Happy
ही लोकं जवळची असल्याने पानं जपुन ठेवतीलच Happy तेंव्हा संध्याकाळी फोटो काढुन इथे टाकेन Happy

पुन्हा एकदा सगळ्यांना विजयादशमीच्या खुप सार्‍या शुभेच्छा!

सगळ्यांना दसर्‍याच्या खूप खूप शुभेच्च्छा!
आपटा समजून कांचनाची झाडे ओरबाडली जातात, त्याच्या निषेधार्थ मीही कैक वर्षांपासून पाने आणणे बंद केले आहे (सुदैवाने घरच्यांनाही ते पटले आहे.) पण रियासारखी कल्पक आय़डिया मात्र नव्हती सुचली. त्याबद्दल तिचे अभिनंदन!

दसर्‍याच्या शुभेच्छा!!

आपल्या कुटुंबात, नातेवाईकात, मित्रमंडळीं मधे आपण हे नीट सांगून काही विचार- परिवर्तन करु शकलो तरी काही अंशी मिळवलीच म्हणायची की .... +१

मी स्वतः दसर्‍याला आपट्याची पाने, वटपौर्णिमेला वडाची फांदी, मार्गषिरशात गुरुवारी पत्री, सणावाराला आंब्याची पाने असे आणायचे टाळते. सुदैवाने बर्‍याच गोष्टी परीसरातच मिळतात. गणपती
श्रावणातली पूजा, गौरी-गणपती, नवरात्र, दसरा यासाठी आंब्याची पाने मिळावीत म्हणून सोसायटी आवारातच १५-२० आंब्याच्या कोयी टाकल्या होत्या. छान सोय झाली. एक कोय घरात लावली आहे. आत्ता त्यावर एकूण ८ पाने आहेत. बहुतेक दिवाळीच्या तोरणासाठी ४ पाने तरी मिळतील.
श्रावणातल्या पूजेला केळीचे खुंट वापरण्याऐवजी करदळीचे खुंट वापरले. सोसायटी आवारात हेही मुबलक असतात.
वटपौर्णिमा, मार्गषिरशात गुरुवार असे सण तर मनातच पुजले जातात.
दसर्‍याला फक्त तोंडी शुभेच्छा!!

परीसरात झाडे लावताना फक्त शोभेची न लावता सणावाराला लावतील अशी सुद्धा लावली जावीत. असे वाटते.

सर्वांना नवीन भागाबद्दल आणि सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा !

शांकली,
नवीन फुलांची माहीती आणि फोटो मस्तच.

आणि गुढीपाडव्याला कडुनिंबाचे हेच हाल असतात - हे दोन सण (दसरा व गुढीपाडवा) आपण का अशा विचित्र पद्धतीने साजरे करतो याचा खरोखर गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे .++१
शशांकजी,
++१.
मला वाटतं, निसर्गाबद्दल काहीच देणं-घेणं नसलेल माणसांच एक जग आपल्या सभोवताली आहे,या जगातील माणसांना निसर्गाची काळजी घ्यायला शिकवायलाच हवं,त्याच्या जीवनाशी त्याच महत्व किती आहे हे त्यातल्या प्रत्येकाला कळायला हवं, त्याला ओरबाडल्यावर होणारे परिणाम माणसालाच भोगायचे आहेत याची माहीती,जागृती या सगळ्यांना झाली तर नक्की सकारात्मक बदल होतील.

गावाकडच्या दसर्‍याची आठवण जरुर वाचा ....
http://www.maayboli.com/node/45789

मला पण आवडेल ह्या गप्पांमध्ये सहभागी व्हाय्ला..

मी घरी सदाफुली लावली आहे, तिच्या फांद्या खूप उंच झाल्यामुळे वाकल्या होत्या, त्या मी कट केल्या , आणी शेजारीच खोचुन ठेवल्या मातीमध्ये.... १ दिवस झाला पण अजुन सुकल्या नाही आहेत ... त्यांपासुन पण झाड येइल का?

Pages