दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
आजच्या लोकसता अग्रलेखातील एक
आजच्या लोकसता अग्रलेखातील एक प्रश्न - योया आणि प्रभू यांच्यामागे एकही आमदार उभा नाही, कां???
केजरीवाल आणि मोदी यांची तुलना
केजरीवाल आणि मोदी यांची तुलना होऊ शकते ती या मुद्दय़ावर. पक्षाचे सुकाणू पूर्णपणे हाती येईपर्यंत मोदी यांनी जे काही केले ते केजरीवाल यांच्या कृत्यापेक्षा फार काही वेगळे होते असे म्हणता येणार नाही. लालकृष्ण अडवाणी वा मुरली मनोहर जोशी आदी ज्येष्ठांना खडय़ासारखे वेचून बाजूला काढणे आणि स्मृती इराणीसारख्यांना जवळ करणे हे यादव, भूषण यांना दूर करण्यापेक्षा आणि कुमार विश्वास यांसारख्या टिनपाटास जवळ करण्यापेक्षा वेगळे कसे? यांत फरक इतकाच की यादव आणि भूषण यांच्यापेक्षा अडवाणी आणि जोशी हे राजकीयदृष्टय़ा अत्यंत समंजस असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावरील अन्यायास वाचा वगरे फोडण्याचा प्रयत्न केला नाही
http://www.loksatta.com/sampadkiya-news/arvind-kejriwal-dispute-with-yog...
अतिशय योग्य लेख. जे मोदीचा उदोउदो करत आहे त्यांना चांगले उत्तर आहे
नाठाळ, सगळ्याच
नाठाळ, सगळ्याच सत्ताधार्यांना माहित असतं की एकदा निवडून आल्यावर पुढच्या निवडणूकीपर्यंत त्यांचं कुणीच काही वाकडं करु शकत नाही (हे मी आधीच्या सुरेख ह्यांना उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्येही लिहिलंय). केंद्रात व दिल्लीत बहुमताची सरकारं आहेत व त्यामुळे त्यांना काहिही फरक पडत नाही.
दिल्लीतले आमदार त्या दोघांना कशाला पाठिंबा देतील? पायावर धोंडा पाडून घेणार का ते? पक्षविरोधी हालचाली म्हणून कारवाई होईल त्यांच्यावर.
पक्षविरोधी हालचाली म्हणून
पक्षविरोधी हालचाली म्हणून कारवाई होईल त्यांच्यावर.>> या विधानाचा व्यत्यास पण खरा मानावा काय?
असू शकेल. खरं सांगू,
असू शकेल. खरं सांगू, राजकारणात कुणीच १००% खात्रीलायक व धुतल्या तांदळासारखं नसतं हे माझं ठाम मत आहे. म्हणूनच भाजपा, काँग्रेस, आआप ह्यापैकी कुणीही कसंही वागू शकतं आणि त्यामुळे मला धक्के बिक्के बसत नाहीत. 'ये तो होनाही था' असंच मनात येतं.
पटलेल्या मुद्द्याला पाठिंबा
पटलेल्या मुद्द्याला पाठिंबा देणार्या सर्वांचे आभार.
बेफिकीर ह्यांचे प्रतिसाद अतिशय वैयक्तिक आणि नीच स्तरावरचे आहेत. मी डुआयडीने लिहिते हे तुम्हाला माहीत नव्हतं? ओ रियली?? मिर्चीसेठ हे कोणी केलेलं नामकरण आहे मग? असो.
डुआयडीने लिहिण्याबद्दल आधीच्या धाग्यावरचा हा प्रतिसाद.
आणखी एक गोष्ट म्हणजे मी हा आपबद्दल लिहिण्याच्या उद्देशाने हा आयडी वापरत नव्हते. आधीपासून वाचणार्यांच्या लक्षात असेल. मी राजकारणावरची पहिली पोस्ट सातीच्या 'जागता पहारा' वर टाकली होती. तेव्हा निवडणूक संपली होती. ५ वर्षे मोदींचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही हे व्यवस्थित माहीत होतं. पण खोटं बोलून सत्तेवर आलेल्या मोदींचा उदोउदो अगदीच सहन होण्याच्या पलीकडे गेला तेव्हा मी तिथे काही मुद्दे मांडायला सुरूवात केली. अधिकृत आकडेवारी दिली. द्वेष-बिष काही नव्हता. चीड होती. फसवणूक करणार्या राजकारण्यांबद्दलची. अजूनही आहे. पण तिथे अके आणि आपचे विषय आणवून धागा भरकटायला लागला म्हणून मी ह्या विषयासाठी नवीन धागा उघडला.

आप स्थापन करणं जसं अकेंवर लादलं गेलंय तसं आपचा धागा उघडणं सुद्धा माझ्यावर लादलं गेलेलं आहे
पहार्याचा धागा वाहता करण्याचे उद्योग केले नसते तर मी भाजपा सरकारबद्दलसुद्धा आतल्या गोटातल्या अनेक बातम्या पुरवल्या असत्या. मला रोज आपच्या प्रचारसाहित्यासोबतच भाजपाच्या दुतोंडी कारभाराबद्दलचे तक्ते, राइट-अप्स, मॉर्फ्ड फोटोज, विनोदी(?) वाक्ये ह्यांचा साठासुद्धा पुरवला जातो !
मिर्ची, तुम्ही दिलेल्या
मिर्ची, तुम्ही दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुमच्या ह्या आयडीबद्दल तुम्ही कुणाला सांगितलंय ते दिसत नाहिये
तुमच्या ह्या ड्यु आयबद्दल मला सुरुवातीपासूनच माहित होतं की! आणि त्याचं कारण मला पटलेलंही होतं.
मिर्चीताई +१११
मिर्चीताई +१११
अश्विनी, डुआयडीची चर्चा तिथे
अश्विनी, डुआयडीची चर्चा तिथे वरदाने "यात इथे खर्या किंवा टोपण नावानिशी फुकट लिहिणार्या आयडीजना काहीच त्रास होणार नाही, पण उद्या खरंच ऑथोरिटीजकडून त्रास झाला, चौकशी झाली तर तो ही साईट स्वतःचे रिसोर्सेस वापरून आपल्यासाठी इतकं चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या आणि चालवणार्या लोकांना होणार" हे वाक्य लिहिलं होतं, त्यावरून चालू झाली होती. इथे वाचू शकाल.
स्क्रीनशॉट्मध्ये तुमचं नाव आलंय ते मेधा पाटकरांबद्दलच्या तुमच्या प्रतिसादामुळे. मेधाताई सोडून गेल्या म्हणून आता लोकांना वाईट वाटत असेल तरी इन जनरल लोकांचं मत आधी तसं होतं.
मेधाताईंनी पक्ष सोडला म्हणून मलाही वाईट वाटलं. पण मेधाताईंनी जे केलं त्याला असहमती म्हणता येईल, पक्षविरोधी कृत्य नाही. असहमती असणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यांचा आपमधील सक्रिय सहभाग बर्याच महिन्यांपासून कमी झालेला दिसत होता. पण म्हणून त्या आपविरोधी कारवाया करत बसलेल्या नव्हत्या. त्या पुन्हा जोमाने त्यांच्या कार्यात भिडलेल्या दिसल्या. आत्ता राजीनामा देण्यामागे प्रभु आणि योयांसोबत मिटींगमध्ये केलेला वाईट व्यवहाराबद्दलची चीड हे कारण त्यांनी दिलं आहे. त्या मिटींगबद्दल योया कसं आणि किती खोटं बोलले आहेत हे मी सप्रमाण दाखवून दिलंय. ते व्हिडिओज पाहूनही त्यांना असंच वाटतंय का ह्याची उत्सुकता आहे.
शिवाय अकेंबद्दलचं त्यांचं आधीचं हे मतही तसंच आहे का हेसुद्धा जाणून घ्यायला खरंतर आवडेल.
मिर्ची, मी पण कुणाला लिहिलंय
मिर्ची, मी पण कुणाला लिहिलंय ते शोधायला गेले होते. ते वाक्य डेलियाचं होतं हे शोधून परत येते तो तुझा प्रतिसाद दिसला
मेधा पाटकर आता १४ एप्रिलला होणार्या सभेत सहभागी होणार आहेत असं आजच्या पेपरात वाचलं.
कबीर., १. >> लालकृष्ण अडवाणी
कबीर.,
१.
>> लालकृष्ण अडवाणी वा मुरली मनोहर जोशी आदी ज्येष्ठांना खडय़ासारखे वेचून बाजूला काढणे आणि स्मृती
>> इराणीसारख्यांना जवळ करणे हे यादव, भूषण यांना दूर करण्यापेक्षा आणि कुमार विश्वास यांसारख्या टिनपाटास
>> जवळ करण्यापेक्षा वेगळे कसे?
अगदी बरोबर निरीक्षण आहे.
२.
>> यांत फरक इतकाच की यादव आणि भूषण यांच्यापेक्षा अडवाणी आणि जोशी हे राजकीयदृष्टय़ा अत्यंत समंजस
>> असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावरील अन्यायास वाचा वगरे फोडण्याचा प्रयत्न केला नाही
यावर मात्र असहमत. मोदी धूर्त आणि संयमी आहेत, तर केजरीवाल उतावळे वाटतात. मोदींच्या मागे १२ वर्षांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द उभी होती, तर केजरीवाल फक्त आंदोलक होते. शिवाय भाजप ज्येष्ठ नेते म्हातारे झाले होते, तर प्रभूयोया यांच्यात आजून जवानीचा जोश आहे.
त्यामुळे भाजप ज्येष्ठांचा समंजसपणा हा मुद्दा पटंत नाही. पण उर्वरित निरीक्षणास सहमती.
आ.न.,
-गा.पै.
१४ एप्रिलची कसली सभा?
१४ एप्रिलची कसली सभा?
१४ एप्रिलची कसली सभा?>>>
१४ एप्रिलची कसली सभा?>>> http://maharashtratimes.indiatimes.com/nation/yadav-bhushan-hint-at-form...
प्रभु आणि योयांनी खरंच दुसरा
प्रभु आणि योयांनी खरंच दुसरा पक्ष काढून स्वतःला सिद्ध करावं.
सोशल मिडियावर त्यांना सपोर्ट करणारे कोण होते हे माझ्यासारख्यांना चांगलं माहीत आहे. मी एक वर्षापासून ट्वीटर वापरतेय. आधी अवामला पाठिंबा देणारे अचानक योया आणि प्रभुंना पाठिंबा द्यायला लागले तेव्हाच चित्र स्पष्ट व्हायला सुरूवात झाली होती. आणि अवामला पाठिंबा/पैसा कोण देतंय ह्याबाबत स्वतःचं मत बनवण्याइतके पुरेसे दाखले माझ्याजवळ आहेत. त्यामुळे...लगे रहो.
प्रभु आणि योयांनी खरंच दुसरा
प्रभु आणि योयांनी खरंच दुसरा पक्ष काढून स्वतःला सिद्ध करावं.
<<
>>
अगदि, आम आदमी पक्षातील, अकेंवर नाराज असलेल्या किंव्हा त्यांना विरोध करणार्या प्रत्येकांने 'आप'आपला वेगळा पक्ष काढुन स्वतःला सिद्ध करावे. हाकानाका.
भाजप ज्येष्ठांचा समंजसपणा <<
भाजप ज्येष्ठांचा समंजसपणा << समंजसपणा हाच की त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला नाही आणि अडगळीत जाणं पसंद केलं. नाहीतर आडवाणींना पद्मभूषण मिळण्याऐवजी त्यांचा 'प्रशांत भूषण' झाला असता.
असे पक्ष निर्माण होणार की काय
असे पक्ष निर्माण होणार की काय आता?
आप (केजरीवाल)
आप (स्वच्छ)
आप (इमानदार)
आप (सुपर इमानदार)
वगैरे
वगैरे
त्या वरच्या लिष्टीत आणखी तीन
त्या वरच्या लिष्टीत आणखी तीन पक्ष अॅड करा, अप्पाकाका
आप (साले)
आप (कमिने)
आप (कमिन पंथी)
नाठाळ
नाठाळ
प्रसाद१२३, ते केले असते पण
प्रसाद१२३, ते केले असते पण उगाच अपशब्द नकोत म्हणून म्हटलं नको, जौद्या राव.
दिल्लीबाबत मोदीसमर्थकांची
दिल्लीबाबत मोदीसमर्थकांची अवस्था फारच बिकट झाली आहे.
लोकसभेत ७ च्या ७ जागा भाजपाला दिल्याबद्दल दिल्लीवाल्यांचं कौतुकही करायचं आहे आणि विधानसभेत फक्त ३ जागा दिल्याबद्दल त्यांना शिव्या सुद्धा द्यायच्या आहेत.
३ महिन्यांपासून पगार न दिल्यामुळे नगरनिगमच्या कर्मचार्यांनी संप केला, रस्त्यावर कचर्याचे ढीग मुद्दाम आणून टाकलेत. त्यामुळे गलिच्छ झालेल्या परिसराबद्दल केजरीवालला धोपटायचंही आहे आणि गेली ७ वर्षे नगरनिगममध्ये भाजपाच असूनही अशी अवस्था का ह्याचा बचावही करायचा आहे. महाकठीण काम. खूप सार्या शुभेच्छा.
"साले" शब्दावरुन हा लेख
"साले" शब्दावरुन हा लेख आठवला.
प्रसाद१२३, ते केले असते पण
प्रसाद१२३, ते केले असते पण उगाच अपशब्द नकोत म्हणून म्हटलं नको, जौद्या राव.
<<
>>
अपशब्द! काय सांगताय काय, अकेनी उच्चारलेले शब्द हे 'अपशब्द' असुच शकत नाहीत, दोनतीन चित्रपटांची उदाहरण देऊन स्वत: आशुतोष आणि मिर्चीताईंनी ही मान्य केलेय की वरिल शब्द संसदिय भाषेत बसणारे आहेत म्हणुन,
ह्म्म्म असेलही तसं.
ह्म्म्म असेलही तसं.
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/aap-mlas-clean-garbage-littered-streets-o...
आम आदमी पार्टी के कुछ विधायक और कार्यकर्ता सोमवार को सड़कों पर झाड़ू और फावड़ा लेकर निकले . यह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के स्वच्छता अभियान में हिस्सेदारी का प्रदर्शन नहीं था, बल्कि बीजेपी शासित एमसीडी के विरोध का एक तरीका था.
दरअसल बीजेपी नियंत्रित दिल्ली एमसीडी के सफाई कर्मचारी वेतन न मिलने के चलते हड़ताल पर चले गए हैं. AAP ने एक बयान में कहा, ‘बीजेपी शासित नगर निगम सफाई कर्मचारियों को वेतन देने में नाकाम रही है जिसके चलते वे हड़ताल पर चले गए हैं. बीजेपी शासित नगर निगम के गैर जिम्मेदाराना रवैये के कारण दिल्ली कचरे के ढेर में तब्दील हो गई है. पिछले कई दिनों में हालत और खराब हुई है लेकिन बीजेपी आंख बंद किए हुए है.’
योया आणि प्रभुंना खरोखरच मागे
योया आणि प्रभुंना खरोखरच मागे लाथ घालुन हाकलून द्यायला हवे होते. कमीने हा शब्द अगदी बरोबर आहे. केजरीवालांच्या त्या बोलण्यात आक्षेपार्ह असे काहीही वाटले नाही.
आणि त्या पाटकर बाई सोडुन गेल्या ते फारच बरे झाले. एक विधायक काम केले नाही त्या पाटकर बाई ने.
‘आप'च्या कुमार विश्वास
‘आप'च्या कुमार विश्वास यांच्यावर अनैतिक संबंधाचे आरोप
अरेरे काय हे? अरविंदा अजब तुझे सरकार.
अर्रर्रर्र
अर्रर्रर्र
इथून लक्ष वळवण्याची
इथून लक्ष वळवण्याची क्लुप्ती
http://www.maayboli.com/node/53323
आप'च्या कुमार विश्वास
आप'च्या कुमार विश्वास यांच्यावर अनैतिक संबंधाचे आरोप
अरेरे काय हे? अरविंदा अजब तुझे सरकार.
>>>>>>>>
ह्याच्याशी जनतेचा काय संबंध? उगाच काहीतरी प्रकरणे काढण्यात अर्थ नाही.
असली त्यांची लफडी तरी काही हरकत नाहीत. पैसे खातात की नाही ते महत्वाचे.
Pages