अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथल्या नमोभक्तांना "साला" आणि "कमिने" या शब्दावर आक्षेप असल्याचे बघुन फारच नवल वाटले
एक तर खाजगी संभाषणात रागात ते शब्द उच्चारले होते

परंतु

यांच्या भाजप्यांच्या साध्वीने तर जाहीर सभेत विरोधकांना अत्यंत नीचपातळीवर "हरा@#$दे" सारखे शब्द उच्चारले होते तेव्हा कुठल्या बिळात तोंड घालुन लपले होते ??????

भाजप्यांचा निर्लज्जपणाचा कळस यातुनच दिसुन येतो

एका महिला कार्यकर्त्यासोबत अमेठीमध्ये अनैतिक संबंध ठेवण्याच्या आरोपावर काल सीधी बात मध्ये राहुल कंवलने कुमार विश्वासांची उलटतपासणी केल्यावर ते काय म्हणाले - हा व्हिडिओ पहा. कुमार विश्वासांनी स्वतःहून विषय काढला आहे. ५:४० मिनिटाला पहा.
मुलाखत घेणार्‍या राहुल कंवलचं ट्वीट - "Newsroom 10pm. @DrKumarVishwas fights back. Dare anyone to produce tape of female volunteer levelling charges against me. Will quit politics"

विरोधकांना सुवर्णसंधी आहे कुमार विश्वासांना अरविंदपासून तोडायची. गो अहेड. डु इट. Happy

अप्पाकाका,
प्रशांत भूषणच्या केजरीवालांवरच्या प्रेमाचं कौतुक करायला पाहिजे. स्वतः प्रथितयश वकील असूनही इतक्या सॉलिड गोष्टी उघड न करता कसलेतरी दम नसलेले स्टिंग्ज उघड केले. प्रेम हो प्रेम. दुसरं काssही नाही.

स्वतः प्रथितयश वकील असूनही इतक्या सॉलिड गोष्टी उघड न करता कसलेतरी दम नसलेले स्टिंग्ज उघड केले.
<<
>>
अरे व्वा! ही तर नविनच माहीती दिसतेय,
म्हणजे अकेंबाबत उघड करायला आणखीही सॉलिड गोष्टी प्रशांत भूषण यांच्याकडे आहेत तर,

>>प्रशांत भूषणच्या केजरीवालांवरच्या प्रेमाचं कौतुक करायला पाहिजे. स्वतः प्रथितयश वकील असूनही इतक्या सॉलिड गोष्टी उघड न करता कसलेतरी दम नसलेले स्टिंग्ज उघड केले. प्रेम हो प्रेम. दुसरं काssही नाही.

मिर्ची तुम्ही उपरोधाने लिहिता तेव्हा उपरोध असे स्पष्ट लिहा.

इथून पुढे या बाफवर लिहिणार नाही असे काही सदस्यांनी ठरवलेले दिसते. कृपया तसे करू नये. "तुटे वाद संवाद तो हितकारी". हा बीबी मिर्चीताईंकडून वन वे ट्रॅफिक होऊ नये. आपले आक्षेप मिर्चीताई खोडून काढतील किंवा मग त्यांनाच आप चे दुर्गुण लक्षात येतील. कोणत्याही कारणाने एखादा सदस्य चर्चेतून उद्वेगाने बाहेर पडतो तेव्हा नुकसान आपल्या सर्वांचे होते.

इतके दिवस आप मध्ये डावे(पाटकर ) आणी उजवे यांचा समतोल होता. आता बरेच डावे बाहेर पडले आणी कुमार विश्वास फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पज भाजपावाले आहेत. आप उजवीकडे झुकेल का ?

अप्पाकाका, तुमच्या प्रतिसादांमध्ये मला राग आणवायचं पोटेन्शिअल नाहीये. हे मी तुमच्या पूर्वजन्मातही सांगितलं होतं. त्यामुळे निरनिराळ्या आयडींनी हसर्‍या बाहुल्या टाकून कशाला स्वतःचा वेळ वाया घालवता?

विकु,
अजून डोकं पूर्ण शांत झालेलं नाहीये. दोनचार टोमणे अजून मारावेसे वाटत आहेत. Lol
असो. डाव्या-उजव्यातलं मला फार काही कळत नाही. पण आप ह्यात पडेल असं वाटत नाही. दिल्लीत धडाक्याने कामं सुरू आहेत. ते बिजली-पानी-सडक-भ्रष्टाचार ह्यावरच लक्ष ठेवतील. ठेवावं अशी अपेक्षा.

योया/प्रभु बाहेर पडल्यामुळे आता आणखी बरेच समाजवादी किंवा पक्षाच्या मूळ धारणेशी संबंध नसतानाही पक्षात आलेले अनेक लोक बाहेर पडतील असा अंदाज आहे. मोठ्या भूकंपानंतर आफ्टरशॉक्स येत राहतात तसं. पण दुसरीकडे योयांवर नाराज असलेले अनेक लोक परत येण्याची लक्षणे दिसत आहेत. योयांनी प्रचाराच्या वेळी स्वतःचं नाव 'सलीम' असं सांगून काँग्रेससारखंच नेहमीचं धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला म्हणून बरेच लोक नाराज झाले होते आणि तटस्थ राहिले होते. परवाच्या प्रकारानंतर ते परत सक्रिय होतील असं दिसतंय. विशेषतः हरियाणामध्ये. तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये योयांबद्दल नाराजी आहे. मागच्या धाग्यावर एके ठिकाणी हा उल्लेख येऊन गेलाय. हरियाणामध्ये नवीन जयहिंद म्हणून एक आंदोलनांमध्ये सक्रिय असणारा नेता आहे. एकदम मुंहफट आणि सणकी. पण कार्यकर्त्यांशी थेट कनेक्ट असणारा तळमळीचा नेता. गेल्या वर्षीच त्यांची आणि योयांची वादावादी झाली होती. दोघांनी राजीनामे दिले होते. पक्षाने दोन्ही नामंजूर केले होते. नवीन जयहिंद तेव्हापासून सांगत राहिलाय की योया पक्ष तोडण्याचं षडयंत्र करत आहेत. दुर्दैवाने तेव्हा त्याच्यावर विश्वास न ठेवता 'नवीन जयहिंदलाच बाहेर हाकला' म्हणून आम्ही आपच्या नेत्यांना ट्वीट करत होतो. योयांच्या वक्तव्याची भुरळ. दुसरं काय.

मागच्या घटनांचा विचार केला तर योयांचा आपमधील प्रवेशाचा मूळ हेतूच आप ला संपवणं हा असावा असं आता वाटतंय. म्हणजे मिशन-आपविनाश साठीच पाठवला गेलेला सरदार. अर्थात हे म्हणजे 'कनेक्ट द डॉट्स' सारखं.
ह्या लिखाणावरून शिव्या पडणार आहेत हे माहीत आहे. पण तरीही.

१. काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये योया निरनिराळ्या २५ समित्यांमध्ये होते. काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांशी त्यांचा नजीकचा संबंध होता.
yoya 1.pngyoya 2.png

म्हणजे प्रस्थापित राजकारणाचे योया हे डायरेक्ट बेनिफिशिअरी होते.
अण्णा आंदोलनाच्या वेळची वागळेंनी घेतलेली योयांची एक मुलाखत पाहण्यात आली. त्यात टीम-अण्णांनी आता ताणून धरू नये, सरकारचं बिल मान्य करावं अशी भूमिका दिसली. मग केजरीवाल वेगळे झाले तेव्हा योया त्यांना सामील झाले.

२. अकेंना राजीनामा द्यायला लावायचा निर्णय योया वगैरेंचा होता असं काल कुमार विश्वासांच्या मुलाखतीत ऐकण्यात आलं. पण हे मी योयांच्या तोंडून ऐकलं नसल्यामुळे ह्या मुद्द्याला शून्य महत्व.

३. त्यानंतर देशभरात निवडणूका लढवायचा आत्मघाती निर्णय योया प्रभृतींचा. अके ह्याच्या विरोधात होते. हे मी निवडणूकांच्या आधीच्या मुलाखतींमध्ये स्वतः ऐकलं आहे. त्यामुळे खात्री आहे.

(मागच्या धाग्यावर नंदिनींनी ह्याच वेडपट निर्णयासाठी अकेंवर घणाघाती टीका केली होती. खरंतर भूमिकेशी कन्सिस्टण्ट रहाण्याच्या दृष्टीने आता त्यांनी योयांवर टीका करणं अपेक्षित आहे. पण योयांच्या समाजवादी जन परिषद आणि देशभरात निवडणूक लढवणं ह्या दोन्ही राजकीय पॉलिसीज अयशस्वी झाल्या हे वाचल्यावर अचानक त्यांचा ह्या धाग्यावरचा इंटरेस्ट संपला. असो.)

४. प्रचारादरम्यान आपबाबत झालेल्या प्रमुख कॉण्ट्रोवर्सीज -
- प्रशांत भूषणनी काश्मीरमध्ये रेफरेंडम घेतलं जावं असं विधान करणं
- योयांनी सलीम नावाचा वापर करणं
- शाझिया इल्मीने 'मुस्लिमांनी आता कम्युनल व्हायची गरज आहे' असं विधान करणं
तेव्हा ह्या गोष्टी त्यांची 'वैयक्तिक मते' वाटली होती. पक्षाने तसं स्टेटमेंटही दिलं होतं. पण आता ह्या तीनही घटना तितक्या बिनाइन नाही वाटत.

५. लोकसभेत हरल्यानंतर एकदाही त्यांनी जाहीरपणे ह्या निर्णयाची जबाबदारी घेतली नाही. उलट स्वतःच्या नाराजीचं पत्र लिहून मिडियात लीक केलं. हा सगळा पत्रं लीक व्हायचा सिलसिला तिथून चालू झाला.
आजकाल तर "आप ला लोकपाल ऐवजी लीकपाल नेमण्याची जास्त गरज आहे" असं लोक म्हणायला लागले होते Lol

६. गडकरी केसमध्ये 'बेल घेणार नाही' सांगितल्यावर 'पर्सनल बॉण्ड भरा' असं न्यायाधीशांनी सांगितलं. पण प्रभुंच्या सल्यावरून अकेने तोही न भरता तुरुंगवास घेतला. नेमकं तेव्हाच योयांना लोकसभेच्या पराभवाबद्दल रिव्ह्यु घेण्यासाठी पत्रकारपरिषद घ्यायची होती आणि नेमक्या तेव्हाच शाझियातै 'अंतर्गत लोकशाही' च्या शोधात पक्षाला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडल्या.

७. पंजाबमध्ये बायपोल्स लढवायला नकोत हे अकेंचं मत होतं. पण योया/प्रभु डॉमिनेटेड पीएसीने हा निर्णय घेतला आणि अजून एक पराभव आपच्या माथी आला.

८. कहर म्हणजे एवढं सगळं होऊनही आपने हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड वगैरे राज्यांमध्ये निवडणूका लढवायला हव्यात असा हट्ट धरून बसले. हरियाणासारख्या मोठ्या राज्यात प्रचारासाठी सुमारे १५० कोटीचं बजेट लागलं असतं. तितकेच महाराष्ट्रासाठी. लोकसभेत आपला देणग्यांमधून सुमारे ३५ कोटी मिळाले होते आणि दिल्लीसाठी ३० कोटीचं बजेट असताना १८ कोटीच जमा झाले होते. हरियाणा आणि महाराष्ट्रासाठी एवढा प्रचंड पैसा कुठून येणार होता???
म्हणजे मग पुन्हा तेच. नंदिनी म्हणाल्या तसं "ओ, आमच्या उमेदवाराला मत द्यायचं बर्का" म्हणत घराघरात फक्त पत्रकं फेकायची वेळ आली असती. पराभव तर १००%

९. दोन्ही-तिन्ही राज्यांमध्ये पराभव झाल्यावर उरलंसुरलं धैर्यही संपलं असतं आणि प्रामाणिक लोकांसाठी राजकारण करणं, सत्तेत येणं हे अशक्य आहे असा समज पक्का झाला असता.
दिल्लीमध्ये प्रचारासाठी कोण कार्यकर्ते पुढे आले असते आणि असल्या वेडपट निर्णय घेणार्‍या नेत्यांना कोणी मतं दिली असती??
म्हणजे आप पूर्णपणे संपली असती. मिशन अचिव्हड.

योया अशा हेतूने पक्षात आले असतील तर त्यांना बाहेर काढणं आवश्यकच होतं. पण जनमानसातील त्यांची चांगली प्रतिमा लक्षात घेतली तर ह्या निर्णयाने पुन्हा एकदा अकेवर घणाघाती टीका होणार हे अपेक्षित होतं. त्या दृष्टीने परवा घेतलेला निर्णय म्हणजे एक अतिशय जोखमीची शस्त्रक्रिया होती. ती यशस्वीरित्या पार पाडण्यात अके यशस्वी झालेत. योया आणि प्रभुंना बाहेर काढलं जाऊ शकतं तर पक्षविरोधी कारस्थानं करणार्‍या कुणालाही माफी मिळणार नाही असा कडक संदेश दिला गेलेला आहे.

योया/प्रभु बाहेर पडल्यामुळे आता आणखी बरेच समाजवादी किंवा पक्षाच्या मूळ धारणेशी संबंध नसतानाही पक्षात आलेले अनेक लोक बाहेर पडतील असा अंदाज आहे.>>> म्हणजे नक्की कोण? भ्रष्टाचार विरोध, पारदर्शकता याशिवाय पक्षाची अजून वेगळी मूळ धारणा काय? आणि या दोन गोष्टींचा समाजवादी लोकांशी संबंध नाही असं काही म्हणायचंय का तुम्हाला?

यो या या कमिटीज मध्ये होते ही काही माहित नसलेली गोष्ट नाहीये. ते काँग्रेसचे अ‍ॅडव्हायजरही होते की जनलोकपाल आंदोलनामध्ये आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये येण्याआधी. दुसरं जर काँग्रेस किंवा इव्हन भाजपाशी पूर्वी संबंध असलेले लोक पक्ष फोडायला आले होते असं तुम्हाला वाटत असेल तर मग दिल्लीतले सध्याचे बरेच आप आमदार पण बाहेर जातिल. आमचे हजारीलाल पण काँग्रेसमधूनच आलेत.

अल्पना +१

काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये योया निरनिराळ्या २५ समित्यांमध्ये होते. काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांशी त्यांचा नजीकचा संबंध होता. >>> हे केजरीवालला नव्हत का आधी ?? आधी अके म्हणत होते कॉन्ग्रेस , बीजेपी चोर है , मग तेव्हा कॉन्गेसवाल्या योयोना का घेतल ? का विश्भबर चौधरीनी म्हटल्याप्रमाणे गरज सरो आणि वैद्य मरो असे आहे ?

दिल्ली की अवैध कालोनियों में शुरू कराएंगे रजिस्ट्री : मनीष सिसोदिया

दिल्ली में आम आदमी पार्टी (आप) की सरकार बनने के बाद पार्टी ने अपने चुनावी घोषणापत्र में किए वादे पूरे करने की कवायद शुरू कर दी है।

हो आज ऐकली ही बातमी. पण डिटेल्स नाही ऐकले.
एमसीडी च्या सफाई कामगार संपाबद्दल पण राज्य सरकारनी काहीतरी निर्णय घेतलाय बहूतेक. राज्य सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेतला जाणार असं उडत उडत ऐकलं. (नक्की बातमी माहित नाही. उद्या सकाळी कळेलच.)

मिरची मी तुमास्नी राग यावा म्हनुनशान हितं लिवत नाइ, मला लइ हसायला येतं म्हनुनशान हसतो

अप्पाकाका, तुमच्या प्रतिसादांमध्ये मला राग आणवायचं पोटेन्शिअल नाहीये. --
पण हे सांगायला लागतं यातंच सारं आलं Biggrin

Again, thanks for the entertainment. Wink

चालुद्या. आता नाही येत to disturb your paradise Light 1

योगेंद्र यादव जर काँग्रेसच्या इतक्या समित्यांवर होते आणि काँग्रेस मंत्र्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते, तर आपमध्ये त्यांना घेताना केजरीवालन झोपले होते का?

केजरीवाल सुद्धा अरुणा रॉय यांच्या साथीने आरटीआय च ड्राफ्ट बनवण्याच्या काँग्रेस सरकारच्या कामावर होतेच की. त्यांचा पिंड आरएसएसचा. पुढे काँग्रेसच्या आरक्षणविरोधी मोर्च्याचे ते हरियाणा राज्याचे संघटक होते. १९९० मधे त्यांनी मोठं काम केलं आहे. पुढेही या संघटना त्यांनी चालूच ठेवल्या होत्या.

असीम त्रिवेदीची चित्रे आइएई ने वापरली, असीम त्रिवेदी स्टेजवर बसून होता तरीही तो आपचा सद्स्य असल्याचा पुरावा मागितला गेला तर योगेंद्र यादव काँग्रेसचे प्राथमिक सदस्य असल्याचा पुरावा मागावा काय ?

केजरीवाल सुद्धा अरुणा रॉय यांच्या साथीने आरटीआय च ड्राफ्ट बनवण्याच्या काँग्रेस सरकारच्या कामावर होतेच
<<
>>
असे काही लिहील्यावर त्यांच्याकडुन, तुम्हाला उत्तरे मिळणारच नाहीत. उलट आप मधुन बाहेर पडलेले सर्व लोक, आप मध्ये राहयला कसे एकजात नालायक होते/आहेत याबद्दलच स्पष्टीकरण मिळेल. तसेही आपमध्ये जे लोक आहेत ते 'साधु आणि बाकी सब सैतान' असा त्यांचा समज आहे.

काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये योया निरनिराळ्या २५ समित्यांमध्ये होते. काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांशी त्यांचा नजीकचा संबंध होता. >>

राजकिय घडामोडींवर लक्ष ठेवणार्‍यांना हे आधीपासून माहिती होते. हा शोध आत्ता लागलाय असे वाटतेय का?

योयांनी प्रचाराच्या वेळी स्वतःचं नाव 'सलीम' असं सांगून काँग्रेससारखंच नेहमीचं धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला म्हणून बरेच लोक नाराज झाले होते आणि तटस्थ राहिले होते. >>

मला आठवतंय तसं, माझ्या वाचनात तुमचीच पोस्ट आली होती आणि तुम्ही ह्याची स्तुती केली होती.

योया/प्रभु बाहेर पडल्यामुळे आता आणखी बरेच समाजवादी किंवा पक्षाच्या मूळ धारणेशी संबंध नसतानाही पक्षात आलेले अनेक लोक बाहेर पडतील असा अंदाज आहे.>

मूळ धारणा? ओ मॅन - अहो यादीचे नाव वाचून मी तुम्हाला लिहिले होते की खूप सारे लोकं काँग्रेस मधून आप मध्ये आले आहेत आणि ते आता निवडूनही आले. तेंव्हा तुम्हीच लिहिले होते की काँग्रेस भाजपा मध्ये चांगली लोकं नसतात का? ती आली तर काय बिघडले? आणि आज हे वरचे वाक्य :|

आक्षेप मिर्चीताई खोडून काढतील किंवा मग त्यांनाच आप चे दुर्गुण लक्षात येतील. <<< हा हा विकु, तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात. Happy

---------

आपचा पॅटर्न फारच चुकीचा आहे. पक्षात असले की तो देव आणि गेला की दानव. मग आधी असा होता, त्याने काय केले? तो त्यासाठीच आला वगैरे वगैरे.

अरे तुम्ही लोकांनाची यादवला मोठे केले ना? मग ? आणि काल शाजिया आणि बेदीलाही. आज ह्या फाउंडर मेंबरची अवस्था कुत्रे विचारणा, अशी आहे. काल तो गर्ग तुमचाच आमदार होता तेंव्हा शुद्ध, धुतल्या तांदळासारखा आणि आज मात्र बिकावू ! गंमत आहे.

परत एकदा माझी भुमीका सांगतो. - आप चा मला राग ना प्रेम. पण ते म्हणतात, आम्ही वेगळे आहोत. ते कसे वेगळे ते काही लक्षात येत नाही. विविध घटना ह्या इतर सगळ्या पक्षांसारख्याच होतात. तिकडे मोदीकडे एकाधिकार आहेत तर इकडे अरविंद केजरीवाल कडे. आणि काँग्रेस मध्ये सोनिया आणि राहूल कडे. आणि लालू, मुलायम, उद्धव / राजकडे. यादी मोठी आहे.

सो व्हेअर इज डिस्ट्रीब्युशन ऑफ पावर? मग नविन काय तुम्ही आणत आहात टेबलवर? मोहल्ला सभा? - आणि कोई मुझे काम करणे नही देता हे रडणे? की पेपरवर लोकपाल दाखवून जनतेची दिशाभूल करणे?

खरेतर मिडीयामुळे आप मोठी झाली आणि आज आपचे लोकं मिडियाला नावे ठेवतात. फनी !

मध्ये मध्ये का होईना मी ह्या धाग्यावर का येतो? तर असे विरोधाभास खोडायला.
समटाईम्स इटस जस्ट ओके टू से आय वॉज राँग अ‍ॅण्ड मूव्ह ऑन. पण आप वाले कधीच चूक नसतात असे दिसते. अ‍ॅन्ड देन वी हीट द वॉल.

<<दिल्ली की अवैध कालोनियों में शुरू कराएंगे रजिस्ट्री >>

म्हणजे नक्की काय करणार. परत घरे बांधुन देणार की नुसतच वीज पाणी देण्या पुरते ते अधीकृत करणार. मुंबईत दर ५ वर्षांनी अशा कॉलनीज अधिकृत करत असतात

या सगळ्या अनधिकृत कॉलनीज सर्व दृष्टीनी रीडेवलप करयच्या असतिल तर किती खर्च अपेक्षित आहे?

अपेक्षेप्रमाणे योगेन्द्र यादव यान्ना पक्ष प्रवक्ते पदावरुन मुक्त केले. आता पक्षामधुन बाहेर कधी काढले जाणार का तेच पक्ष सोडतात हे काही दिवसात बघायला मिळेल.
http://indianexpress.com/article/cities/delhi/aap-continues-purge-yadav-...

<<म्हणजे नक्की कोण? भ्रष्टाचार विरोध, पारदर्शकता याशिवाय पक्षाची अजून वेगळी मूळ धारणा काय? आणि या दोन गोष्टींचा समाजवादी लोकांशी संबंध नाही असं काही म्हणायचंय का तुम्हाला? >>

"इतके दिवस आप मध्ये डावे(पाटकर ) आणी उजवे यांचा समतोल होता. आता बरेच डावे बाहेर पडले " ह्या विकुंच्या वाक्यातले डावे ह्या अर्थाने समाजवादी शब्द वापरला आहे. नो ऑफेन्स मेण्ट. तसं वाटलं असल्यास सॉरी. Happy
मला कुणीतरी डावे, उजवे, समाजवादी ह्या शब्दांच्या व्याख्या संक्षिप्तात सांगितलंत तर बरं होईल. म्हणजे असे गोंधळ होणार नाहीत.

<<पक्षाच्या मूळ धारणेशी संबंध नसतानाही पक्षात आलेले>>

नवीन राजकीय पक्ष आहे तर पदं/तिकीट मिळण्याची चांगली संधी आहे ह्या हेतूने पण भ्रष्टाचाराशी लढ्यामध्ये स्वारस्य नसलेले लोक. बरेच असणार आहेत असा अंदाज आहे. विशेषतः दिल्लीबाहेर.

<<यो या या कमिटीज मध्ये होते ही काही माहित नसलेली गोष्ट नाहीये. ते काँग्रेसचे अ‍ॅडव्हायजरही होते की जनलोकपाल आंदोलनामध्ये आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये येण्याआधी. दुसरं जर काँग्रेस किंवा इव्हन भाजपाशी पूर्वी संबंध असलेले लोक पक्ष फोडायला आले होते असं तुम्हाला वाटत असेल तर मग दिल्लीतले सध्याचे बरेच आप आमदार पण बाहेर जातिल. आमचे हजारीलाल पण काँग्रेसमधूनच आलेत.>>

योया काँग्रेसचे सल्लागार होते एवढं ऐकून होते. बाकी कमिटीजबद्दल माहीत नव्हतं. त्यांच्या समाजवादी जन परिषदबद्दलही माहीत नव्हतं.

काँग्रेस किंवा भाजपामधून आलेले सर्वच लोक पक्ष फोडायला आले आहेत असं म्हणायचं नाहीये. अलका लांबासुद्धा काँग्रेसमधून आल्या आहेत. जस्ट लुक अ‍ॅट हर. अकेंनी राजीनामा दिला तेव्हा त्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी पक्ष जॉइन केला. त्या दिवसापासून ती व्यक्ती अखंड मेहनत करत आहे. हा त्यांचा ट्वीटर आयडी - @LambaAlka स्वतः जाऊन पहा. पेन्शन असो, राशन घोटाळा असो, पोलिसांशी मिटींग्ज असोत, दिल्लीला तिचं आधीचं हेरिटेज महत्व पुन्हा मिळवून देण्याचे प्रयत्न असोत, कुठल्या दिवशी त्या कुठल्या जागी सर्व लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील हे सुद्धा ट्वीटरवर टाकतात. त्यांच्यावर पक्ष फोडण्याचा आरोप का करू??
'अपने मुंह मियां मिठ्ठु' आहेत, कामं करत आहेत तर ढिंढोरा कशाला पिटायचा असं कुणाचं म्हणणं असेल तर सॉरी. मला मान्य नाही. लोकप्रतिनिधी कामं करत आहेत की नाही हे मतदारांना कळायलाच हवं.

पुढचा प्रश्न असा असेलच की अल्का लांबा जोवर आपमध्ये आहेत तोवर चांगल्या, समजा त्या बाहेर पडल्या तर त्यांच्यावरही योयांसारखं आरोपसत्र लागेल, त्या काँग्रेसमधून आपमध्ये वाईट हेतू धरून आल्या होत्या असं मी म्हणणार का?
उत्तर --- जर आप (आप=केजरीवाल ह्या गोष्टीवर समर्थक आणि विरोधक दोघेही सहमत आहेत असं मानायला हरकत नाही) ...जर आप/अकेंनी भ्रष्टाचार केला नाही, लोकांसाठी काम करायचं बंद केलं नाही, बलात्कारासारखे गंभीर आरोप असणार्‍यांना पदराखाली घातलं नाही तर अलका लांबांना आप सोडायचं कारणच काय?
जर त्या 'पार्टी में स्वराज ही नहीं है' असलं कारण देऊन पक्ष सोडत असतील तर मी त्यांची बाजू घेणार नाही. अकेंचीच बाजू घेईन. भक्त म्हणा किंवा काहीही. दुर्दैवाने देशामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा सध्यातरी एकच पक्ष आणि एकच मुख्यमंत्री आहे. त्याच्या लढ्यात साथ द्यायची सोडून त्याउलट असली चंपक कारणं देऊन जर तुम्ही त्याला दुर्बल करायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या हेतूवर शंका येणार आणि येणारच.

अकेने भ्रष्टाचार केला, कलंकित लोकांना आमदार म्हणून ठेवलं तर लगेच लिहा इथे. तुमच्याआधी मी विरोध करीन. आय विल लिटरली हॉण्ट हिम...मीच नाही, माझ्यासारखे अनेक लोक त्याला सळो की पळो करतील. केजरीवाल हे आप पक्षाचे मालक नाहीत. आप हा पक्ष कार्यकर्त्यांच्या कष्टातून, देणग्या देणार्‍यांच्या घामाच्या पैशातून आणि माझ्यासारख्या लष्करांच्या भाकर्‍या भाजणार्‍या समर्थकांच्या श्रमांतून बनला आहे. आम्ही हे करत आहोत कारण मूळ तत्वांना आमचा पाठिंबा आहे. त्याच्याशी प्रतारणा जोवर होत नाही तोवर पक्षात कोण राहिलं, कोण आलं, कोण गेलं ह्याच्याशी माझा सूतराम संबंध नाही. संबंधित व्यक्ती कोणीही असो. आज मी ज्यांची तारीफ करतेय त्या अलका लांबा असोत किंवा आज मला ज्यांच्याबद्दल फारसं माहीत नाही ते हझारीलाल चौहान असोत. पक्षविरोधी कारवाई करून हा प्रयोग दुबळा बनवण्याचा हक्क कोणालाच नाही. अकेला स्वतःला सुद्धा नाही.

<<आधी अके म्हणत होते कॉन्ग्रेस , बीजेपी चोर है , मग तेव्हा कॉन्गेसवाल्या योयोना का घेतल ? का विश्भबर चौधरीनी म्हटल्याप्रमाणे गरज सरो आणि वैद्य मरो असे आहे ?>>
<<योगेंद्र यादव जर काँग्रेसच्या इतक्या समित्यांवर होते आणि काँग्रेस मंत्र्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते, तर आपमध्ये त्यांना घेताना केजरीवालन झोपले होते का?>>

कमॉन गाईज, इज इट रिअली दॅट डिफिकल्ट टु अण्डरस्टँड????
पुन्हा आणि शेवटचं लिहिते.
काँग्रेस आणि बीजेपीमधले सगळे लोक वाईट आहेत असं अकेंनी कधीही म्हटलेलं नाही. उद्या तुम्ही, मी, अप्पाकाकांचे सगळे डुआयडी किंवा अगदी राहुल गांधी जरी आपमध्ये येतो म्हणाले तर अके त्यांना नाकारणार नाहीत. का नाकारतील? भ्रष्टाचार, जातीय तेढ निर्माण करणं आणि चारित्र्याविषयी गुन्हे नसतील तर कोणीही आपमध्ये जाऊ शकतं...आधी कुठल्याही पक्षात असाल तरीही. रामायण-महाभारतातील कौरव, पांडव, घटोत्कच, भीष्म, वाली, सुग्रीव सुद्धा जाऊ शकतात. प्रश्न पुढे चालू होतो. आपमध्ये जाऊन जर तुम्ही गैरप्रकार करत असाल तर तुम्हाला दया दाखवली जाणार नाही. नॉमिनेशनच्या आदल्या संध्याकाळी सुद्धा तिकीटं रद्द करण्याचं, २८ च जागा असताना त्यातूनही एक आमदार काढून टाकण्याचं धैर्य अकेंनी दाखवलं आहे.
(ठळक केलेलं वाक्य मी सिग्नेचर म्हणून लावून घ्यायच्या विचारात आहे. म्हणजे मग कुठलीही पोस्ट टाकली की आपोआपच हे वाक्य उमटेल !)

Pages