अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश,

>> ... पहिल्या निवडणुकीच्या वेळेस यांनी कॉन्ग्रेस बरोबर हातमिळवणी न करता भाजप बरोबर केली असती
>> किंवा अन्य काही सेटिन्ग केले असते असे वाटते.

पहिल्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसबरोबर सेटिंग केलं हे तुम्हांस मान्य आहे. तर मग आआप ही टीम बी आहे हे मान्य करायला काय अडचण आहे? केजरीवाल विकाऊ माणूस आहे. आज काँग्रेसला इमान विकलं तर उद्या भाजपला. काय फरक पडतो?

आ.न.,
-गा.पै.

देश विकला, पैसा नेउन ठेवला स्विस बँकेत !!
आणि आता म्हणताहेत, आणा तो लौकर आणि भरा माझ्या अ‍ॅकाँउंट मध्ये !!
गेले ६५ वर्षे हेच चाललय !!

मिर्ची तै ! क्षमा करा, पण उत्तर आम्हाला पणच द्यावच लागत !

पण एका दिवशी एक प्रश्न मांडाल का? >>>

एकेका जन्मात एकेक प्रश्न मांडला होता. लाँग जंपने त्याचा बॅकलॉग झाला. आता हाय जंप मारल्यावर काय करायचं ? राहू द्या Lol

ज्या मिर्चीला मी ओळखतो, ती पुन्हा थोडी थोडी दिसली. कालची खूपच अनोळखी होती, इतकी की हक्काने या धाग्यावर येण्याचं प्रयोजन संपलं असं वाटलं होतं. पण ते असो. काल तुमचा वॉटर्लू झाला..

योगेंद्र यादव नि प्रशांत भूषण ह्यांची हकालपट्टी करून अरविंद केजरीवाल ह्यांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे. योगेंद्र यादव हे जर आपचे ब्रेन असतील तर त्यांनी दुसरा पक्ष काढून आप हून मोठे यश मिळवून दाखवावे . एक साधी गोष्ट आहे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आहेत हे स्पष्ट आहे परंतु बर्याच जणांना केजरीवाल ह्यांना यश हे फक्त आपल्या मुळेच मिळाले असे वाटतेय त्यांना आता त्यांचे कर्तुत्व दाखवण्यास संधी मिळेल. अरे मोदी सारख्या राजकारण्याला दिल्लीत उलटा पालटा करून आपटणारा केजरीवाल योगेंद्र यादव नि भूषण ह्यांना आटोपेल शक्यच नाही. परंतु आप मध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्याचा फायदा त्या पक्षाला होईल. असंतुष्ठ जेवढे जातील तेवढे चांगले..

मिर्ची हा इथल्याच एका आयडीचा ड्यू आयडी असला तरीही त्यात काहीही आक्षेपार्ह नाही. विशेषतः त्यांनी तसे आधीच जाहीर केले असताना. असे त्यांना का करावेसे वाटले असावे याची अनेक कारणे असतील, ती सांगायला त्या ( किंवा तो) बांधील नाहीत. कदाचित त्यांचे सासर कट्टर भाजपा किंवा कॉंग्रेस असेल, आपले नाव जाहीर करून फेसबूक वर उगीचच फ्रेंड रिक्वेस्ट चा सामना करावा लागू नये हे कारन असेल. दगड नी माती. मी फक्त या शक्यता व्यक्त केल्या आहेत, मिर्ची चा मूळ आयडी कोणता ,त्या स्त्री आहेत की पुरुष हे सारे माझ्या मते इर्रेलेव्हंट आहे.

तुमचे खरेखुरे नाव सांगा नाहीतर आम्ही चर्चेला येणारच नाही हा बालहट्ट आहे.

त्या फक्त राजकीय चर्चेतच भाग घेतात हाही असाच गैरलागू मुद्दा आहे. काहीजण फक्त गझलावर प्रतिसाद देतत. काही फक्त पाककृतीवर, काही फक्त क्रिकेट वर. जिसकी जो मर्जी. माज्या समजूतीप्रमाणे इथल्या एकाने केवळ टेनीस चर्चेसठी एक आयडी घेतला आहे आणी त्यात काहीही वावगे नाही.

गामा, आपने पहिल्या वेळा कॉंग्रेसचा बाहेरून आपल्या अटींवर पाठिंबा घेतला तो फक्त पुन्हा निवडणूका लागू नयेत म्हणून. त्यात विकाऊपणा काय? आणी जर तसे केले नसते तर पुन्हा निवडणूकीचा भुर्दंड घातल्याबद्दल आपलाच शिव्या मिळाल्या अस्त्या.

त्या हिरिरीने किल्ला लढवत आहेत. त्यांचा किंवा आपला एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर लेट अस मूव्ह ऑन. त्या आपच्या सदस्या नाहीत असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले असताना पुन्हा पुन्हा त्या पेड किंवा अनपेड मेंबर आहेत असे सूचीत करण्यात काय हशील ?

कबीर, विषयाशी संबंध नसलेल्या एका वाक्याच्या पोस्टी टाकल्या नाहीत तर फार बरे होईल.

>>>अरे मोदी सारख्या राजकारण्याला दिल्लीत उलटा पालटा करून आपटणारा केजरीवाल योगेंद्र यादव नि भूषण ह्यांना आटोपेल शक्यच नाही<<<

अगदी अगदी!

काँग्रेस हा पक्षही प्रचंड जागा जिंकून अज्ञातवासात गेला.

तूर्त आप फुटली आहे.

केजरीवालला तरी कोण ओळखत होतं एनजीओ शिवाय ?
अण्णांच्या उपोषणाने ते प्रसिद्ध झाले. त्यांनी झोपायचं होतं ना आडवं. पण अण्णांनाही दूर सारलंच की. वाद फक्त पार्टी काढण्यावरून नव्हताच. देणग्यांवरूनही वाद झाले होते राव..

जे काही केलं ते अण्णांनी केलं. केजरीवालांनी काय केलं माईक हातात घेण्याशिवाय ?

ये वही लॉजिक है..

हे मस्त बरं का विकु:

>>>मिर्ची हा इथल्याच एका आयडीचा ड्यू आयडी असला तरीही त्यात काहीही आक्षेपार्ह नाही. विशेषतः त्यांनी तसे आधीच जाहीर केले असताना. असे त्यांना का करावेसे वाटले असावे याची अनेक कारणे असतील, ती सांगायला त्या ( किंवा तो) बांधील नाहीत. कदाचित त्यांचे सासर कट्टर भाजपा किंवा कॉंग्रेस असेल, आपले नाव जाहीर करून फेसबूक वर उगीचच फ्रेंड रिक्वेस्ट चा सामना करावा लागू नये हे कारन असेल. दगड नी माती.

तुमचे खरेखुरे नाव सांगा नाहीतर आम्ही चर्चेला येणारच नाही हा बालहट्ट आहे.

त्या फक्त राजकीय चर्चेतच भाग घेतात हाही असाच गैरलागू मुद्दा आहे. काहीजण फक्त गझलावर प्रतिसाद देतत. काही फक्त पाककृतीवर, काही फक्त क्रिकेट वर. जिसकी जो मर्जी. <<<

हे सगळे संकेतस्थळाच्या धोरणांबरहुकुम आहे.

पण मला एक माणूस एका राजकीय पक्षाच्या वाटचालीच्या निव्वळ समर्थनार्थ दुसरे सदस्यनाम घेतो हे व्यक्तीशः पटत नाही व तो माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यामुळे मी संपूर्ण चर्चा आणि विशेषतः मिर्ची ह्या सदस्यनामाने दिले गेलेले सर्व प्रतिसाद नुसते दुर्लक्षित करत नाही आहे तर त्यांचा तिरस्कार करत आहे.

ह्याचा अर्थ असा नाही की मी ह्या धाग्यावर येणार नसल्याची मी घोषणा वगैरे करत आहे.

माझा प्रत्येकवेळी प्रश्न हाच राहील की तुमच्या मूळ आय डी चे काय मत आहे?

जर सासरी विरोध होत असेल आणि 'आप' इतका लव्हेबल वाटत असेल की सतराशे साठ प्रतिसादांवर गेले कैक महिने प्रतिवाद करण्याची हिम्मत मनात आहे तर घटस्फोट घेऊन मोकळ्या व्हा की, असे म्हणण्याचे 'फक्त' मनात येते.

बाकी तुम्ही ह्यात का पडताय काही समजले नाही.

या धाग्यावर अनेक लिंक्स दिल्या आहेत. रामलीला मैदानावर तमाशा सुरू होण्याच्या आधी वर्ल्ड कप आणि आयपीएल च्या मधे जंतर मंतर वर अण्णांनी एक दिवस उपोषण केलं होतं. त्या आधी निरनिराळ्या टीव्ही चॅनेल्सवरून मुलाखती झडत होत्या. या सर्व विसरले का लोक्स ? बरं.

१६ ऑगस्ट ला जे आंदोलन सुरू व्हायचं होतं त्याच्या आधी आयपीएलचा तमाशा संपल्याबरोबर अण्णा निरनिराळ्या लोकप्रिय टीव्ही शोजला भेटी देऊ लागले. अगदी लहान मुलांचं सारेगमप सुद्धा. त्यात अण्णा जज्ज होते Lol त्यांचं एक्स्पर्ट मत विचारलं जात होतं आणि ते स्वतःबद्दलची माहीती देत अच्छा गाया बेटा तुमने हां, अयसेही गाते रहो म्हणत होते. ये अरविंद है ना इसने मेरा साथ दिया , नऊकरी भी छोड दी है उसने अस्सं अण्णां सांगत होते. त्या पूर्वी आताच्या नमोभक्तांकडून हू इज अण्णा असे ईमेल्स आले होते. मग सोळा ऑगस्ट उजाडला आणि सगळीकडे देशभक्तीची गानी सुरू झाली. जणू स्वातंत्र्याची पहाट उजाडली. स्वातंत्र्यसैनिक जंतरमंतरकडे जाऊ लागले. बातमी आली जंतरमंतर नाही राजघाट. मग तिकडे जाऊ लागले. बातमी आली अण्णा आले अण्णा आले.... मग अटक, मग तुरुंगाबाहेर कॅमेरे. लाईव्ह टेलीकास्ट. शेकडोंचे हजारो झाले, रामदेवबाबा आले. मग तीन दिवसांनी सुटका. मग रामलीला.

हा सर्व घटनाक्रम. किती तरी वर्षं आधी नियोजन होतं. विषय होता भ्रष्टाचार निपटून काढण्याचा आणि त्यासाठी राजकारणात न पडण्याचा. सर्व मुलाखतीत केजरीवालच अण्णांची भूमिका जास्त वेळ सांगत होते.

मग राजकारणात पडण्याचा निर्णय हा यू टर्न नाही का अण्णांसाठी ?

की याच साठी डाव लावला होता हा प्रश्न होता तो. अगदी सर्व संदर्भासहीत मांडलेला होता. कुणाला हवं असल्यास मागे जाऊन पाहू शकता. त्याचं आता जंपिंग ग्रास झाल्याने मेहनत नाही घेत. एकाच धाग्यावर एव्हढं विस्मरण... हाय रे कर्मा !

बाळू यांच्या पोस्ट्सवर भलं बुरं कुणी म्हणावं यासाठी बाळू लिहीतच नाहीत,

हम न होते तो किसी और के चर्चे होते
ख़िल्क़त-ए-शहर तो कहने को फ़साने माँगे

ऐ ख़ुदा हिन्दोस्ताँ को बख़्श ऐसे आदमी
जिनके सर में मग़ज़ हो और मग़ज़ में ताबिन्दगी

कसाब वर सुद्धा प्रचंड चर्चा झाली होती.

बेफि, नेहमीप्रमाणे टँजंट कशाला मारताय? नसेल करायचं नाव उघड, त्यात काय मोठी गोष्ट आहे? इथे अनेक लोक स्वतःचं नाव वापरत नाहीत, त्याची कारणं काहीही असोत. त्यांना त्यांची प्रायवसी काही कारणानं जपायची असेल तर तुम्हाला एवढा थयथयाट करायचं कारणच नाही.

जर सासरी विरोध होत असेल आणि 'आप' इतका लव्हेबल वाटत असेल की सतराशे साठ प्रतिसादांवर गेले कैक महिने प्रतिवाद करण्याची हिम्मत मनात आहे तर घटस्फोट घेऊन मोकळ्या व्हा की, असे म्हणण्याचे 'फक्त' मनात येते. >> निषेध.. angry.gif बेफि.. दुसर्‍यांना व्यवस्थित चर्चा करायचे सल्ले द्यायच्या आधी जरा स्वतः ते करून बघा..

>>जर सासरी विरोध होत असेल आणि 'आप' इतका लव्हेबल वाटत असेल...<<
फक्त मनात येउन सुद्धा इथे प्रकट शब्दात लिहिलंत - इट्स टोटली अनकाॅल्ड फाॅर.

आता सगळ्यांनीच थोडा ब्रेक घ्यावा असं वाटतंय...

बेफिकीर निषेधाच्या पलीकडे गेलेले आहेत. कोणाशी ना कोणाशी काही ना काही कारण शोधून वाद घालणे ही त्यांची गरज झालेली आहे, ही गेल्या काही महिन्यांत लक्षात आलेली गोष्ट आहे. त्यांच्या फक्त मनात आलेलं आमच्या स्क्रीन्सवर आपोआप उमटलेलं दिसावं ही तंत्रज्ञानाची कमाल म्हणायला हवी.

मिर्चींनी तो आपला डु आय आहे हे स्वतःच्या सदस्यत्वाच नोंदवलेलं आहे. त्यावर प्रश्न विचारायचा हक्क कोणालाही नाही.

धाग्याचा विषय आप हा पक्ष आहे. मिर्चींनी डु आय का काढला, त्या आपच्या सदस्य किंवा मायबोली-प्रवक्त्या किंवा पेड प्रचारक आहेत हे मुद्दे इथे पूर्ण अस्थानी आहे.

ठीक आहे, ह्यापुढे राजकीय किंवा इतर कोणत्याही वादग्रस्त बनू पाहणार्‍या धाग्यांवर प्रतिसाद देणार नाही. इतरांना माझ्यामुळे मनस्ताप नको व्हायला.

विकुंच्या ह्या वाक्याला उत्तर होते ते:

>>>कदाचित त्यांचे सासर कट्टर भाजपा किंवा कॉंग्रेस असेल, आपले नाव जाहीर करून फेसबूक वर उगीचच फ्रेंड रिक्वेस्ट चा सामना करावा लागू नये हे कारन असेल<<<

अधिक स्पष्टीकरण देणे म्हणजे उगाचच स्वतःची बाजू सावरत बसल्यासारखे होईल.

आता एक माझा प्रश्न जो मिर्छिताइना नाहीय तर सग्ल्यानाच आहे.

लोक इथे डुप्लीकेट आइडिने का लिहितात? स्वताच्या खर्या नावाने लिहिले तर लोक हसतील अशीभीती असते का की आपण हे लिहिले हेचारचौघात स्वीकारने शरमेचे वाटते?

बाकी फेस्बुकासाराखता ठिकाणी खरी नावे आणि जिथे वाद विवाद करायचे तिथे ड्यू आय........

मयेकर, लोकसभेच्या वेळेस भाजपा सपोर्टर्स ना सरसकट माबोवर पेड आर्मी म्हटलं जात होतं ते सुस्थानी होतं का? तेव्हा तर ते लोक गाईड समोर ठेवून पोस्टी लिहितायत आणि दुसर्याला निरुत्तर केल्याचा आव आणतायत असंही त्यांच्या पोस्टिंवरुन वाटत नव्हतं.

काही लेखक टोपणनाव घेऊन का लिहितात?

आपल्या राजकीय विचारप्रणालीचा परिणाम अन्य क्षेत्रांतील वावरांवर होऊ नये असे वाटणे हे एक कारण असू शकेल. गेल्या काही महिन्यांत राजकीय मतभेदांचा परिणाम व्यक्तिगत संबंधांवर होऊ लागल्याचे एक सार्वत्रिक चित्र दिसते. त्यामुळे त्यात काही वावगे आहे असे वाटत नाही.

ड्यू आयडीने लिहायची प्रथा काही जालावरच सुरू झाली नाही.
कितीतरी वृत्तपत्रीय लिखाण ड्यू आयडीने केले जाते.
कित्येकदा त्यामागील व्यक्ती उघड केली जात नाही किंवा उशीरा उघड करतात.
ठणठणपाळ, तंबी दुराई ही चटकन आठवलेली उदाहरणे.
स्वतःच्या खर्‍या नावानेच लिहिणे अभिप्रेत असते तर सगळ्या संस्थळांनी नावापेक्षा वेगळा आयडी घ्यायला परवानगी दिली नसती.

असो.
त्याबद्दल चर्चा दुसर्‍या धाग्यावर करता येईलच.

डु आय डी वरुन एवढा गदारोळ. पॅराजंपेंच्या मते आआप हाच कोणत्या तरी पक्षाचा डु आयडी आहे ना?

सध्या तरी आआप ला काहीही धोका दिसत नाही. यो या आणि प्रभु जेवढा बोट्चेपा स्टॅंड घेतिल तितके ते कमजोर दिसायला लागतिल.

Pages