अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी के यांनी माझ्या प्रतिसादांतील वाक्ये उचलून मिर्ची यांच्याबद्दल वैयक्तिक टिप्पण्या केल्या आहेत. अशा टिप्पण्या इथे वा कोणत्याही धाग्यावर अनावश्यक आहेत असे माझे मत आहे.

काँग्रेसचे विरोधक वा बदलासाठी उत्सुक लोकही आम्ही भाजपचे समर्थक नाही असे पुन्हा पुन्हा सांगत इथे लिहीत असतात, त्यानेही कोणताही फरक पडत नाही.

अन्य सोशल साइट्सवरून आपापल्या आवडत्या पक्षाचे /विचारधारेचे संदेश सहज शेअर केले जातात. मायबोलीवर स्वतः काही लिहिण्याची आणि ते वाचले जाण्याची सोय असल्याने माहिती गोळा करून व मिळत असल्याने ती कोणी लिहिली तर त्याने काहीही फरक पडू नये.

यानंतर मी केवळ मिर्ची यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेमध्ये आहे.>>>> जरा वाट बघ. दिल्लीतल्या मित्रांकडून मटेरियल आलं की प्रतिसाद तयार होईल आणि मग तुला मिळेल. सगळ्या खडानखडा बातम्यांचा सोर्स 'दिल्लीतील आतल्या गोटातील माहिती' असा सांगितला जात होता. आता तू प्रश्न विचारल्यावर तुझ्या घरी नाश्त्याला काय बनतं हे इंटरनेटवर कळू शकतं असं उत्तर मिळतं, म्हणजे दिल्लीत प्रत्यक्ष आपचं काम करणार्‍यांना जे माहित नाही ते इंटरनेटवर आहे असा अर्थ होतो.

किंवा, तुझ्या प्रश्नांमध्ये किंवा प्रतिसादामध्ये 'मुद्दा'च नाही असा शोध लागलेला तुला कळेल. असं कळल्यावर तू निमुट बस, अजून अडचणीचे प्रश्न विचारु नको.

अरविंद केजरीवालच्या धाग्यावर केजरीवालला सपोर्ट करणारे काँग्रेसचे छुपे कार्यकर्ते आताशा त्या धाग्यावर येत
नाहीत. !!

:G:

प्रशांत भुषण, योगेंद्र यादव आणि अन्य दोन केजरीवाल विरोधकांना ज्या कोअर कमिटीच्या बैठकीत कार्यकारणी मधून लाथ मारून बाहेर काढले(प्रोफेशनल बॉऊनसर्सना बोलावून बर्रका असं कोणत्याही पक्षात विरोधकांबरोबर झाल्याचे माहित नाही). >>>>>असे केजरीवाल विरोधक म्हणत आहेत.(विरोधक तर असे म्हणनारच ना?म्हटले म्हणुन सिध्द झाले का?)
समर्थक म्हणत आहेत असे काही झालेच नाही.

मिर्ची यांनी टाकलेले "तुमच्या घरी नाश्त्याला काय बनतं हे इंटरनेटवर कळू शकतं" हे वाक्य वैयक्तिक असल्याचे काही जणांना दिसत नसेलच. Wink

अश्विनी के यांनी माझ्या प्रतिसादांतील वाक्ये उचलून मिर्ची यांच्याबद्दल वैयक्तिक टिप्पण्या केल्या आहेत. अशा टिप्पण्या इथे वा कोणत्याही धाग्यावर अनावश्यक आहेत असे माझे मत आहे.>>>> भम, ह्यात वैयक्तिक टिप्पण्णी नाही. जे धाग्यावर दिसत आलं आहे तेच लिहिलं आहे. ते तुम्ही त्या वाक्यांमध्ये नीट लिहिलंय म्हणून ती वाक्यं घेतली. बाकी काहीच हेतू नाही. माहिती शेअर करणं चालतंच पण प्रश्न विचारल्यावर उत्तरा दाखल अशी कार्ड्स फेकणं ह्याबद्दल मी लिहिलंय.

अरविंद केजरीवाल आणि कंपनी ही अँडी फ्लॉवर / इसीबी आणि प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव हे केव्हीन पीटरसन ही अ‍ॅनॉलॉजी कशी वाटते?

असे केजरीवाल विरोधक म्हणत आहेत.(विरोधक तर असे म्हणनारच ना?म्हटले म्हणुन सिध्द झाले का?)>>>
सुरेख१, जर समर्थक म्हणत आहेत असे काही झालेच नाही. तर कंसातील वाक्यात विरोधक शब्दा ऐवजी समर्थक शब्द वापरला तर तेच तत्व समर्थकांनासुध्दा लागू होते.

मुळ मुद्दा होता तो हा की जर ती बैठक ज्या विषयासंबंधी बोलावण्यात आली होती त्या विषयावर काही निर्णय/रणनीती पक्षाने ठरवली का? पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे पक्ष ज्या उद्दिष्ठांसाठी स्थापन केला आहे त्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर ते पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी हितकारक ठरणार आहे का?

प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार और अजीत झा ला पार्टी च्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बाह्रर काढल्यावर दिल्लीतिल जनतेने याचा काही विरोध का नाही केला?रस्त्यावर उतरुन काही प्रतिक्रिया व्यक्त का नाही केल्या?
शपथविधी सोहळ्याला लाखो लोक उपस्थित होते या चौकडिच्या समर्थाना साठी काही हजार तरी येउ शकले असते की.

हायला, सुटलेत सगळे इथे. दुष्मनों, निकाल लो पुरी भडास !

<<हे तर इथेही पुर्वीपासूनच दिसत आहे. प्रचारक आहेत म्हटल्यावर (असं इथेच कुठेतरी वाचलं होतं, स्क्रीनशॉट्स घ्यायची सवय नसल्यामुळे पुरावा देऊ शकत नाही) जश्या डायरेक्शन्स असतील तसंच आणि मुरलेलं बोलणार ना? सुटेबल वाटेल तेव्हा प्रतिप्रश्न करत हुकुमाची उतारी केल्यासारखं धबाधब विनोदी(?) मॉर्फ्ड फोटोज, लिंका सहजच टाकल्यासारख्या करत "ह्यावर काय म्हणणं आहे?" टाइप लिहिणं आणि सुटेबल नसेल तेव्हा इतरांच्या प्रश्नांना वेळ नाही किंवा इतर सबबी सांगून पास देणं, जंप मारणं हे कशाचं लक्षण आहे? बाकीचे लोक असा कुठला हेतू ठेवून लिहित नाहियेत इथे त्यामुळे फरक असणारच. अल्पनासुद्धा आपबद्दल सॉफ्ट कॉर्नर असला किंवा राजकारण घरातच बघत आली असली तरी बिगरराजकारणीच प्रतिसाद देत असे. तिच्या कुठल्याही प्रतिसादातील मटेरियल हे खास प्रचारासाठी पुरवलं गेलेलं मटेरियल कधीच वाटलं नाही.>>

अश्विनी, तुम्ही हा आरोप माझ्यावर दुसर्‍यांदा केला आहे. तुम्हाला खुलं आव्हान देते की आपच्या कुठल्याही टीमची मी मेंबर आहे किंवा जे लिहितेय ते मला खास पुरवलं जातंय हे सिद्ध करा. करता येणं शक्यच नाही. कारण हे असं नाहीये. तेव्हा बिनबुडाचे आरोप करणं बंद करा. मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यांनी करा. अर्थात तुम्ही इथे फक्त अशावेळी येता आणि अशा गोष्टीच लिहिता (१-२ अपवाद सोडून) ह्यातच सगळं आलं.
मागच्या धाग्यावर साधनाच्या प्रतिसादाने जसं डोक्याचं शॉर्ट सर्किट झालं होतं तसं तुमच्या प्रतिसादांनी व्हायच्या बेतात आहे. Angry
इथून पुढे तुमच्या प्रतिसादांचा अनुल्लेख करण्यात येईल. तुम्हाला त्याच्याने फरक पडणार नाही हे माहीत आहे. सांगायची अजिबात गरज नाही.

>>>मग इतर पक्ष जे काय करत आहेत त्याचा इथं संबंध कुठं येतो?<<<

नंदिनींच्या ह्या मताशी सहमत!

तेच केव्हापासून म्हणत आहे.

एका पक्षाची स्तुती करण्यासाठी दुसर्‍या पक्षावर टीका करावीच लागणे हे फार वैयक्तीक स्वरुपाचे वाटते.

कोणत्याच पक्षाच्या पाठिराख्यांच्या संभाषणात संतुलित असे काहीच वाचायला मिळत नाही.

श्यॅ. योयांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला २४ तासांत एकही उत्तर न आल्याने आज माझी मतं लिहायला आले तर इथे तर धुमश्चक्री चालू आहे. धाग्यावर कधीही न फिरकलेले हवसे, नवसे, गवसे सगळेच टपल्या मारून घेत आहेत.:हाहा:

अश्विनीतैंनी पद्धतशीरपणे डोस्कं फिरवलेलं आहे. शांत झालं तर आज लिहीन. नाहीतर उद्या. बाय. तोवर चालू द्या तुमचं. तोवर मी दिल्लीच्या गोटातून प्रचारासाठी आणखी राइट-अप्स, तक्ते येतात का बघते. क्रॅप. Angry

सुरेख, मला वाटतं एकदा निवडून दिल्यावर काही गोष्टी जनतेच्या हातात रहात नाहीत आणि हे अगदी सगळ्या राजकिय पक्षांना चांगलंच माहित असतं व त्याचा फायदा घेतला जातो. फारतर निवडणूक जवळ आल्यावर असं काही घडतं तेव्हा मतांवर परिणाम होतो. नाहीतर भाजपा सरकारमधल्या त्या आचरट साक्षी महाराज व इतर कुणी कुणी बरळलं होतं तेव्हा जनतेच्या हातात असतं तर त्या लोकांना जनतेनेच नसतं का हाकलून काढलं? जनतेच्या हातात फक्त सोशल मिडियामधेच निषेध व्यक्त करणं उरतं. आणि तसं जनता करत असते.

बाकी ते 'तुझ्या घरी सकाळी नाश्त्याला काय होते हेही सांगू शकेन' हे विधान खटकले. अधिक वैयक्तीक भांडणे व्हायला नकोत म्हणून काहीच म्हणालो नाही. त्या विधानात चमत्कारीक दर्पोक्ती भासली.

दुष्मनो, निकाल लो भडास - काही काही वाक्यांसाठी वेगवेगळे धागे वापरायला हवे आहेत. इथे वैयक्तीक भडासी कोणी काढत असेल असे वाटत नाही. त्यामुळे हे विधान पंधराशे सदुसष्टवरचे वाटते.

एका पक्षाची स्तुती करण्यासाठी दुसर्‍या पक्षावर टीका करावीच लागणे हे फार वैयक्तीक स्वरुपाचे वाटते. >>> हे मी धागा १ पासूनच लिहितेय. पण त्याने लोकांच्या डोक्याला शॉट बसतो Lol साहजिकच आहे. स्वतः चौखूर लिहित सुटतात, भडास काढत राहतात तेव्हा लोकं शांत राहून वाचत राहतात व कधीतरीच अती झालं की बोलतात हे त्यांना दिसत नाही. मग अश्या वेळीच येता आणि अश्या गोष्टीच बोलता वगैरेच लिहिलं जातं. चालायचंच.

>>>श्यॅ. योयांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला २४ तासांत एकही उत्तर न आल्याने आज माझी मतं लिहायला आले तर इथे तर धुमश्चक्री चालू आहे. धाग्यावर कधीही न फिरकलेले हवसे, नवसे, गवसे सगळेच टपल्या मारून घेत आहेत.हाहा

अश्विनीतैंनी पद्धतशीरपणे डोस्कं फिरवलेलं आहे. शांत झालं तर आज लिहीन. नाहीतर उद्या. बाय. तोवर चालू द्या तुमचं. तोवर मी दिल्लीच्या गोटातून प्रचारासाठी आणखी राइट-अप्स, तक्ते येतात का बघते. क्रॅप<<<

तोल जात आहे असे वाटते.

मिर्ची,

लोकसभेनंतर आपची मते वाढली होती तर रसातळाला गेलेल्या पक्षाला केजरीवालनी वर कसं आणलं हे सांगाल का कृपया?

बेफि, मला बोलणं ह्यात काहीच विशेष वाटलं नाही. त्यांच्या बाजूने बोलणार्‍या कुणी केजरीवाल किंवा आपबद्दल प्रश्नचिन्ह उत्पन्न केल्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्या बघून तर मला बोलणं अगदीच आश्चर्यकारक नाहिये.

लोकसभेनंतर आपची मते वाढली होती तर रसातळाला गेलेल्या पक्षाला केजरीवालनी वर कसं आणलं हे सांगाल का कृपया?
>>>

श्श्श.......असं नस्तं हो विचारायचं Wink Proud

Thanks for the entertainment everybody. टा.

. योयांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला २४ तासांत एकही उत्तर न आल्याने<<< माझी पोस्ट वाचली नाही का Uhoh की पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलेली आहे. इथं धुमश्चक्री चालू करण्याचे चिन्हे तथाकथित आपसमर्थकांकडूनच चालू आहेत. तुमच्याच पोस्टमध्ये क्रॅप वगैरे शब्द वापरले गेले आहेत. आश्चर्यकारकरीत्या अनेक "विरोधक" सुसूत्ररीत्या मुद्दे मांडत आहेत.

आता तू प्रश्न विचारल्यावर तुझ्या घरी नाश्त्याला काय बनतं हे इंटरनेटवर कळू शकतं असं उत्तर मिळतं,<< याची एक गंमत असते... मला माझ्या घरी नाश्त्याला काय बनलंय हे लोकांना काय कळू द्यायचं आहे ते माझ्याच हातात आहे!!! सोशल मीडीया, इंटरनेट आणि एकंदरीक कम्युनिकेशन चॅनल्स (म्हणजे न्युज्चॅनल्स नव्हेत) कशी काम करतात याचा एखादा अंदाज असेल तर हे फारसं कठिण नाही. एखादी गोष्ट व्हायरल अथवा ट्रेण्डिंग कशी बनवायचे याचे व्यवस्थित प्लान तयार असतात. असो!! इथे टँजंट मारायला नकोत.

मिर्ची, तुम्हाला आपच्या टीमचे मेंबर म्हटल्यावर इतका राग का येतोय? आपसाठी काम करताय ना? मग ते पेड असो वा नॉनपेड. यानं तुम्हाला काय फरक पडतो. तुम्ही ज्या रेटने फटाफट न्युज, व्हिडीओ , आणि इतर माहिती टाकती ते पाहता केवळ "हौस" इतकंच हे प्रकरण नाही हे कुणालाही मान्य असावं. तुम्ही याहीआधी आपच्या प्रचार मटेरीअलमधलं मटेरीअल इथं शेअर केलं आहे- त्यात वावगं काही नाही. पण ते तसं तुम्ही टाकलंय म्हटलं तर इतका राग कशाला येतो?

गंमत अशी आहे की, तुम्ही प्रत्यक्ष फिल्डवर नाही. तुम्ही देशात नाही (हे तुम्हीच म्हटलंय. अन्यथा तुम्ही कुठं आहात याच्याशी मला देणंघेणं नाही) असं असताना केवळ "इंटरनेट" या एकमेव माध्यमामधून तुम्ही माहिती गोळा करताय. त्यातही हरकत नाही पण तुम्ही सीलेक्टीव्ह माहितीच ग्रास्प करता आणि इतर तुमच्या मतां विरोधात जाणारी माहिती "खोटी" अथवा "कन्स्पिरसी थेअरी" म्हणून बाजूला टाकता!! तुम्ही लिहिलंय की तुम्हाला राजकारणात्लं फारसं कळत नाही, तुम्ही २०१० नंतर राजकारण फॉलो करताय तरी तुम्ही १९९० च्या बातम्या कशाकाय इतक्या सटासट सांगू शकता? एक तर तुम्हाला या संदरभातलं बरंच माहित हवं किंवा तुम्हाला संदर्भ देणारं कुणीतरी असावं. असलं तरी मला वैयक्तिकरीत्या काही फरक पडत नाही. पण तुम्ही असं केलंय म्हटलं की इतक्या कशाला चिडता? खास प्रचारासाठी बनवलेलं मटेरीअल इतक्या शिताफीनं इथं टाकत असाल आणि कुणालाच ते समजत नसेल असं वाटत असेल तर तुम्ही naive आहात किंवा आम्हाला मूर्ख समजताय!!
दोन्ही सनारीत्योमध्ये आय डोण्ट केअर.

बट, अ‍ॅक्सेप्ट द फॅक्ट दॅट येस, आय वर्क फॉर आप. (मे बी अ‍ॅज अ व्होलण्टीअर!!) काय त्यात इतकं भडकण्यासारखं आहे काय??

मिर्ची, बिनबुडाचे आरोप तर तुम्हीच कित्येक नेत्यांवर करता. कुठेही काही डिसिजन घेतला गेला की लागलीच तुमचं सुरु होतं की ह्यात अमक्याचा फायदा असेल आणि तमक्याचा फायदा असेल. तुम्हाला आपशिवाय इतरांच्या चांगलं काही दिसतच नाही कारण चष्माच तसा लावलेला आहे. राहता राहिलं 'प्रचारक'चं. ते मी तुम्ही कुठे सहज बोलून गेलात ते शोधून काढलंय. पण तुम्ही त्यावर 'मी मजेत म्हटलं होतं' असं म्हणालच म्हणून इथे देत नाही आणि मला हे सगळं वाढवायचंही नाही. तुम्हाला मिळणार्‍या बित्तंबातम्या ह्या तुम्ही नेहमीच दिल्लीतल्या खात्रीलायक सुत्रं, किंवा असेच काही सोर्सेसकडून येतात असंही सहजच बोलून जाता. आता ह्या तुमच्या बोलण्यात सिरियसनेस नसेल तर ठिक आहे. आणि माझ्यासाठी तुम्ही काय करता हे खरंच महत्वाचं नाहीच आहे. फक्त दुसर्‍यांवर मिडियाचा आधार घेऊन चिखलफेक करताना किती मजा येत होती आणि तेच स्वतःला आवडणार्‍या पक्षावर आल्यावर किती राग राग होतोय हे दिसल्यामुळे अश्यावेळी बोलावंसं वाटलं. असो...

माझी पोस्ट वाचली नाही का की पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलेली आहे. >>> दुसरा पर्यायाची अपेक्षा अधिक आहे. एवढ्या पोस्ट्स पडून देखील मुद्दा काय हाच प्रश्न परत त्या विचारतील याची खात्री आहे.

फक्त दुसर्‍यांवर मिडियाचा आधार घेऊन चिखलफेक करताना किती मजा येत होती आणि तेच स्वतःला आवडणार्‍या पक्षावर आल्यावर किती राग राग होतोय हे दिसल्यामुळे अश्यावेळी बोलावंसं वाटलं. असो... >> हे सगळ्यांनाच सगळ्यावेळी अ‍ॅप्लिकेबल असावं Happy Wink

हे सगळ्यांनाच सगळ्यावेळी अ‍ॅप्लिकेबल असावं स्मित डोळा मारा >>> अगदीच मान्य आहे मनीष Happy म्हणूनच पहिल्या धाग्यापासूनच मी तसं सांगत होते. इथेच नाही, तर मनमोहनसिंगांचं अभिनंदन करायच्या धाग्यावरही माझी निषेधाची पोस्ट दिसेल तुला. नमोंच्या सरकारातील वाटेल ते बरळणार्‍या होपलेस लोकांनाही काढून टाका असं मी २-३ वेळा तरी बोलले असेन. इथे जरा विरोधी बोलल्यावर 'क्रॅप' सारखे शब्द येतात.

>>>इथे जरा विरोधी बोलल्यावर 'क्रॅप' सारखे शब्द येतात.<<< Happy

जाऊदेत केश्विनी, अचानक हवसे गवसे नवसे टपला मारू लागल्यामुळे तोल गेला असेल. तिकडे केजरीवालांचाही तोल गेलाच की?

पक्षातले लोकपाल अ‍ॅडमिरल - रामदास यांची ही गच्छंती झाली. आधी भाजपमधे गेलेले जनरल व्ही के सिंह बाहेर पडले. त्यांना अण्णा हजारे यांच्या समोर राळेगण ला अपमानित करण्यात आले.

आता ( लोकशाही ? ) पध्दतीने अ‍ॅडमिरल रामदास यांची हकालपट्टी झाली.

एका माजी सनदी अधिकार्‍याला आधी किरण बेदी, मग व्ही के सिंग आणि आता अ‍ॅडमिरल रामदास बाहेर काढावे लागले याच अर्थ काय घ्यावा ?

अश्विनी तै,

++++++ फक्त दुसर्‍यांवर मिडियाचा आधार घेऊन चिखलफेक करताना किती मजा येत होती आणि तेच स्वतःला आवडणार्‍या पक्षावर आल्यावर किती राग राग होतोय हे दिसल्यामुळे अश्यावेळी बोलावंसं वाटलं.++++++

ते काही खास धाग्यावर करताना त्यांना फार फार आनंद होत होता,

Pages