आप

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३

Submitted by मिर्ची on 26 November, 2015 - 10:51

२६ नोव्हेंबर २०१२ ला स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा आज तिसरा वाढदिवस. विश्वास उडावा आणि 'मरो ते राजकारण,सगळे एकाच माळेचे मणी' असं वाटण्यासारखं अजून तरी अरविंद केजरीवालांनी काही केलेलं नाही.
लगे रहो, लडाई लंबी है ! शुभेच्छा. Happy

अके आणि आप - भाग १
अके आणि आप - भाग २

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.

राजकारणातले व्यापारी

Submitted by उदयन.. on 8 September, 2014 - 09:18

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/aap-releases-a-sting-video...

दिल्लीमधल्या सरकारचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी भाजपाने सरळ सरळ आमदार विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे असे आप पक्षाने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधुन दिसुन येत आहे ज्या पक्षाला जनतेने विश्वास ठेवुन बहुमत दिले तो पक्ष दिल्लीत परत निवडणुका न घेता सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न जोडतोड करुन करत आहेत .. अरे रे रे काय वाईट दिवस आले आहे भाजपावर ?????????

विषय: 

अमीर खानच्या पोस्टरच्या निमित्ताने !

Submitted by vijaykulkarni on 10 August, 2014 - 09:07

नुकताच नेटवर आमीर खानने पीके चित्रपटासाठी केलेले पोस्टर पाहिले आणी धक्काच बसला ! पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला? परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन असलेली आपली संस्कृती खाऊजा च्या लाटेपुढे हतबल होत आहे का ? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. हाच ट्रेंड मराठीत आला आणी स्वजो ने असेच पोस्टर केले तर? त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर? अरेरे, कुठे ते अंगभर कपडे घालून वर निळा स्वेटर घालणारे आमच्या वेळचे नायक आणे कुठे हे खुदालाही डरवणारे आजकालचे नायक!

१ हेच का ते अच्छे दिन ?

द रिटर्न ऑफ नौटंकी! आप का क्या होगा?

Submitted by केदार on 27 May, 2014 - 10:55

तर एकदाच गंगेत घोड न्हाल अन केजरीवालांनी बॉन्ड भरला आणि ते जेल मधून बाहेर आले एकदाचे ! आणखी एक यु टर्न केजरीवालांनी मारला.

आता परत काही दिवसात आणखी एक नौटंकी सुरू होणार ह्याची खात्रीच जणू !

कुणावरही आरोप केल्यावर पुरावे द्यावे लागतात, हे त्यांना मुळी मान्यच नव्हते. मै केजरीवाल हूं, असे त्यांनी न्यायालयालाच त्या दिवशी सुनावले होते. न्यायालय म्हणाले की तुम्ही बॉन्ड भरा व निघा, तर ही पद्धतच चुकीची आहे (बॉन्ड वर परोल) आणि मी त्याविरोधात लढणार असे काहीसे म्हणून त्यांनी जेल मध्ये जाणे स्विकारले.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आप