अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनामिका पंतप्रधानाला पप्पू बोलत आहे. लाज बाळगा जरा..व्यक्ती भले सन्मानाच्या पात्रतेचा नसेल पण पदाचा तरी सन्मान ठेवा.

राहुल गा ला पाठिंबा देणारे फक्त मायबोलीवरच दिसतात. अमेरीकेतून बहुतेक.
इकडे कोण विचारत नाही हो रागा ला. २०१९ ला डिपॉसीट जप्त होऊन राहील त्याचे. फक्त आणि फक्त मोदीच देशाला तारू शकतात.

देशाला ताळा ठेकू शकतात असे म्हणायचे असेल Wink

बाकी धागा आप वर आहे. फेकू मोदी वर नाही हे लक्षात घ्या Wink 60 वर्ष तुघलकाने तारलेला का? काहीही
फेकायची पण काही लिमीट.. सकाळी सकाळी हास्याचे फव्वारे उडाले

२०१९ ला डिपॉसीट जप्त होऊन राहील त्याचे. फक्त आणि फक्त मोदीच देशाला तारू शकतात. >>>>>>>>>>>>>>> २०१४ च्या टेप्स परत परत. बास करा आता. बरी होती त्या अर्थव्यवस्थेचे आधीच वाटोळे केले आहे. अजुन काय वाटोळे करायचे! मोदीचे तारणे म्हणजे खर्या अर्थाने वाट लावने आहे.

तारे जमीन पर आहे नुसता.>>>>>>>>>>>> आमचा पप्पु तर विमानात असतो. ना जमिनीवर ना आकाशात. एका मागुन एक देश. निवडणुका आल्या की मग भाष्णे! उअरलेल्या वेळेत पकोडे लावणार

Pages