अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोक खेमकाच्या ४४ बदल्यांच्या वेळेला मिर्चीताई तुम्ही कुठे होता ? >>>

हा प्रश्न म्हणजे त्यांनी शेण खाल्लं आता आम्ही काहीही खाऊ, तुम्ही विचारू नये या धर्तीचा वाटतो. यांनाही शेणच खायचं असेल तर एक तर निवडणुकीच्या आधी जाहीर करायचं होतं, टीका कशाला करायची ?

दिल्ली राज्यसरकारचे दोन निर्णय जे वादग्रस्त ठरू शकतात.

१. किनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१० लागू करणार. >>> मला याविषयातलं फारसं कळत नाही. त्यामूळे डॉ. किंवा इतर कन्सर्न मंडळी योग्य-अयोग्य सांगू शकतिल.

२. बीआरटीएस स्क्रॅप करणार. >>>>> दिल्लीतला बीआरटीएस प्रकल्प अगदी सुरवातीपासून डिझाइन मधल्या चुका/कमतरता, कमी वापर आणि इतर बर्‍याच बाबींमूळे वादग्रस्त होता. मी बीआरटीएस कॉरिडॉर्स असलेल्या भागातून कधीच प्रवास केला नाही. त्यामूळे त्यामूळे या कॉरिडॉर्समूळे खरंच वाहतुकीची कोंडी उलट वाढली आहे का यावर कमेंट करू शकत नाही. पण ट्रांस्पोर्ट प्लानर्स आणि एक्स्पर्ट्स बीआरटीएस स्क्रॅप न करता त्यामध्ये सुधार करायला हवा असं मत मांडताना दिसले आहेत. मला स्वतःला दिल्लीमध्ये आणि एकूणच सगळ्याच शहरांमध्ये पब्लिक ट्रांसपोर्ट सिस्टिम अजून सक्षम असणं खूप आवश्यक आहे हे पटतं. एकटी मेट्रो हे काम दिल्लीत करू शकत नाही हे सुद्धा खरं आहे. दिल्लीमध्ये पब्लिक ट्रांसपोर्ट गेल्या कित्येक वर्षांपासून सिएनजी वर चालू आहे. पण प्रायव्हेट व्हेइकल्सची संख्या वाढतच असल्याने प्रदुषणाचं प्रमाण भयानक वाढलंय. असं असताना पब्लिक ट्रांसपोर्ट सक्षम करण्याऐवजी बीआरटीएस स्क्रॅप करून अजून कमकुवत करणं योग्य ठरेल का?

>>>> पण असं बॅन घालून लोक तंबाखू खायचं खरंच थांबवतील का?? >>>>
मला वाटते की लोक तुळशीच्या ऐवजी तंबाखुचे रोपटे लावतील दारात ... Proud

अल्पना तै, तुम्ही भारी अवघड प्रश्न विचारता...... Wink

<<मला वाटते की लोक तुळशीच्या ऐवजी तंबाखुचे रोपटे लावतील दारात ...>>

अशी रोपटी लावणारे सहा महिने ते ७ वर्षांसाठी तुरूंगात जातील किंवा दोन लाखांपर्यंत दंड भरतील....तुळशीचं रोपटं गुडघ्यापर्यंत आलंय की कमरेपर्यंत ह्यावरून शिक्षा ठरेल बहुतेक. निर्मितीवर सुद्धा बंदी आहे लिंबुभौ. Wink

अल्पनाने मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा वाचायला आवडेल.
बीआरटी विषयावर प्राइमटाइमवरची चर्चा पाहत होते. अर्धीच पाहणं शक्य झालं. उरलेली आज-उद्या पाहीन. त्यात सरकारतर्फे आमदार सौरभ भारद्वाज मुद्दे मांडत आहे.

हो मी पण ती चर्चा बघतेय. मी पण अर्धीच बघितली आहे. माझ्या कॉलेजातल्या एका सिनिअरनी त्या चर्चेत भाग घेतला होता फोनवरून, रुतुल जोशी - अर्बन प्लानर आणि ट्रांसपोर्ट एक्सपर्ट. त्याच्या फेसबुक टाइमलाइनवरूनच त्या चर्चेबद्दल कळालं. (रुतुल गुजराती वर्तमानपत्रांमध्ये अहमदाबदच्या वाहतुक समस्येबद्दल वेळोवेळी लिहित असतो.)

अजून एक चांगली बंदी शीला दिक्षितांच्या कार्यकालात घातली गेली होती. प्लास्टिक पिशव्यांवरची. यांच्या पण निर्मितीवर बंदी होती. पण नंतर प्लास्टिक निर्मिती करणारे उद्योजक कोर्टात गेले आणि कोर्टाने यावर स्टे दिलाय.

भ्रष्टाचाराची प्रकरणे रेकॉर्ड करणं सोपं व्हावं म्हणून दिल्लीसरकार 'स्टिंग अ‍ॅप' बनवत आहे. रेकॉर्डिंग चालू केल्यावर लगेच ते एका सुरक्षित सर्वरवर जोडलं जाणार. रेकॉर्डिंग चालू आहे हे समोरच्या व्यक्तीला कळणार नाही. फोन डॅमेज झाला/करण्यात आला तरी त्यावरील डेटा सर्वरवर जमा झालेला असेल.
येत्या महिन्याभरात हे अ‍ॅप कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

लॉन्च झाल्या-झाल्या योया आणि कंपनीच्या फोन्सवर हे अ‍ॅप डाऊनलोड करून द्यायला हवंय. सगळ्यांनाच सोप्पं पडेल. Proud

<<अजून एक चांगली बंदी शीला दिक्षितांच्या कार्यकालात घातली गेली होती. प्लास्टिक पिशव्यांवरची. यांच्या पण निर्मितीवर बंदी होती. पण नंतर प्लास्टिक निर्मिती करणारे उद्योजक कोर्टात गेले आणि कोर्टाने यावर स्टे दिलाय.>>

अल्पना, दोनच दिवसांपूर्वी दिल्ली सरकारने प्लास्टिक बंदी चालू करण्यासाठी पुन्हा उच्चन्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Govt moves high court to enforce plastic bag ban

प्रशांत भुषणचे केजरीवालनां खुले पत्र :

http://timesofindia.indiatimes.com/india/Full-text-of-Prashant-Bhushans-...

बरच खरमरीत तिखट पत्र लिहीलय प्रशांत भुषणनी आणि पत्राचा समारोप

Goodbye and good luck, ने केलाय,

तो '४९' चा नतद्रष्ट आकडा टळला शेवटी Proud
ज्या वेगाने कामं चालू आहेत त्यात ५ वर्षांत ३ वेळा 'विकास' होईल असं वाटतंय.

हॉस्पिटल्स बांधण्यासाठी खाजगी कंपन्यांना डीडीएने सुमारे ५० एकर जमीन सवलतीच्या दरात दिली आहे. त्या गोष्टीला आता १५ ते ४४ वर्षे उलटली आहेत पण अजून त्या जागांवर हॉस्पिटल्सचा पत्ता नाही. सध्या ही जागा केवळ जाहिरातींचे फलक लावण्यासाठी वापरली जात आहे. त्यामुळे हे जागावाटप रद्द करून ही ५० एकर जमीन डीडीएने दिल्लीसरकारला द्यावी म्हणजे सरकार तिथे हॉस्पिटल्स उभारेल असा प्रस्ताव आरोग्यमंत्रींनी केंद्रसरकारपुढे मांडला आहे.

आप चे अरविंद केजरीवाल -

डाव्या विचारसरणी असणारे, ज्याला आपण cheap popularity म्हणू अशा साठी काहीही करणारे राजकारणी आहेत असे माझे मत आहे.

योयांचा राग आला असला तरी अजूनही प्रभुंबद्दल आदर होता. हे पत्र वाचल्यावर तोसुद्धा संपला. (आपचे ज्येष्ठ नेते म्हणून असलेला आदर)

अकेच्या 'coterie' पैकी आशुतोषची खुली पत्रे -
१. प्रशांत भूषणसाठी
२. योगेंद्र यादवांसाठी

चितळे,
तुमच्या मताच्या पुष्ट्यर्थ दाखले द्या. म्हणजे तुमच्याशी सहमत व्हायचं का ते आम्हालाही ठरवता येईल.

Goodbye and good luck, म्ह्णुन पुन्हा अकेच नाव घेऊ नये म्हणजे झाल.
नाहि तरी पुन्हा अकेच्या घरी डाळ भात कसा शिजवतात चे स्टिंग करुन मिडियाला पुरवायचे.

केजरीवाल, इतिहास तुम्हाला माफ करणार नाही!; भूषण यांचा हल्लाबोल

आम आदमी पार्टीचं तुम्ही जे काही करताय, त्याबद्दल देव आणि इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही असेच वागत राहिलात, तर स्वच्छ राजकारणाचं आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचं आपण पाहिलेलं स्वप्न कधीच साकार होणार नाही, असा घणाघाती हल्ला 'आप'मधील बंडखोर नेते प्रशांत भूषण यांनी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर चढवला आहे.

'आप'च्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आलेले ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण यांनी केजरीवालांना खुलं पत्र लिहिलंय. या पत्राच्या शेवटी त्यांनी 'गुड बाय' आणि 'गुड लक' म्हटल्यानं ही चिठ्ठी नसून 'सोडचिठ्ठी' असल्याचं बोललं जातंय. अर्थात, 'आप'च्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं भूषण यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं नाही.

मिर्ची ताई,

त्या गोष्टीला आता १५ ते ४४ वर्षे उलटली आहेत पण अजून त्या जागांवर हॉस्पिटल्सचा पत्ता नाही

याचा अर्थ समजला नाही, ४४ वर्ष जागा असुनही हॉस्पिटल बांधल नाही अस तुम्हाला म्हणायच आहे का ?
अस का बर झाल असाव ?

"आम आदमी पार्टीचं तुम्ही जे काही करताय, त्याबद्दल देव आणि इतिहास तुम्हाला माफ करणार नाही."

हाऊ आय रिमेम्बर समवन सेईंग - "पार्टी जरूरी नहीं है, देश जरूरी है ! मैं कोई नेपोलिअन नहीं हूं जो केवल हर राज्य जीतने के लिए राजनिती में आया हूं"

सुरेख +१

<<याचा अर्थ समजला नाही, ४४ वर्ष जागा असुनही हॉस्पिटल बांधल नाही अस तुम्हाला म्हणायच आहे का ?
अस का बर झाल असाव ?>>

ह्याचं उत्तर आलटून-पालटून सत्तेत आणि विरोधात बसलेल्या काँग्रेस आणि भाजपाला जास्त चांगलं माहीत असेल. Happy

हा हा हा ,

करा की कबुल !!

काँग्रेसची बी टीम असल्याने सरळ सरळ टीका करता येत नाही !!

त्या मुळे आडुन आडून बिजेपीवर वार करत असता !!

गेल्या १० वर्षे विकासाची दूहाई देणार सरकार होत तिथे !! आणि देशात ६० वर्ष !! पाच पाच वर्ष आलटुन पालटुन
राज्य केल ईतक तरी खोट्ट बोलु नका !!

प्रशांत भुषण केजरीवाल ना खुल पत्र लिहीलय,

तेंव्हा तुम्हाला काय काय आठवत त्याचा ईथे काही संबंध नाहीय !!

केजरीवाल उत्तर देउ देत,

नाही दिल तर आम जनतेला कळेल की ते कामात खुप बिझी आहेत त्यामुळे उत्तर बित्तर
देणार नाहीत.

मिर्ची जेव्हा परसेप्शन तयार होते तेव्हा स्वतःचे मत बनते. म्हणून मी माझे मत असे दिले आहे. मी दिल्लीत पोस्टेड होतो जेव्हा अरविंदने नाटके करायला सुरवात केली तेव्हा. मी अनारकीस्ट आहे पासून त्यांच्या घरा पर्यंत. माझे पुष्कळ ब्लॉग्स आहेत त्या बद्दल.

बोलघेवडा ह्या ब्लॉग मध्ये ब-याच गोष्टी लिहील्या आहेत. Rashtravrat ह्या इंग्रजी ब्लॉग मध्ये सुद्धा लिहीले आहे.

टोचा | 1 April, 2015 - 04:18
मिर्चीताई - तुम्ही ह्या धाग्यावर केजरीवाल सरकार काय चांगले काम करते आहे त्याचेच डीटेल्स फक्त लिहीत जा. योया, टोया .... आणि बाकीच्या आरोपांबद्दल उत्तरे देवु नका. दुसर्‍या कुठल्याच गोष्टीबद्दल लिहू नका.
फक्त आज दिल्लीत काय चांगले घडले आणि काय निर्णय झाले ह्या बद्दल लिहा. तसेच भ्रष्टाचार्‍यांवर काय काय कारवाई झाली ते लिहा.

जर केजरीवाल सरकार खरेच काही चांगले काम करत असेल आणि तुम्ही आरोप प्रत्यारोपांच्या वादात न पडता फक्त ती चांगली कामे सांगत राहीलात तर आप चा फायदा होइल.>>>>+१११११

सुरेख, मान्य.
कसलेही दाखले न देता लोक नुसतीचं मतं लिहितात आणि आरोप करतात तेव्हा राग येतो. पण आता अशा गोष्टींना प्रत्युत्तर न देणंच बरं असं वाटतंय.
मुद्दा लिहा, उत्तर मिळेल.

चितळे, तुमच्या मतांचा आदर आहे. पण 'अरविंद नाटकं करतो' ह्या मताशी मी अजिबात सहमत नाही. लेट अस अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री.

कसलेही दाखले न देता लोक नुसतीचं मतं लिहितात आणि आरोप करतात तेव्हा राग येतो >>>याचे कारण समजले तर राग पण येणार नाही.
अके यांनी खुप जणांना धुळ चारली आहे,स्वप्न भंग झाल्याने अके विरुध्द बरळने एवढेच त्यांच्या हाती आहे.

मिर्ची आपल्या मतांचा आदर करतो. मी दिल्लीला जे पाहिले ते लिहिले. माझे परसेप्शन असेच बनले. सगळी नाटके. राजपथावर केलेली व अजून सुद्धा बघीतली. अगदीच लहान मुला सारखे वागणे. प्रगल्भता नाही.

Pages