अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

If you care so much, become volunteer, participate and then be a judge. But that would be too much to ask >>> ग्रेट लॉजीक ! मग रामलीला मैदानावर जे काही झालं. त्या निमित्ताने जी वक्तव्ये झडली त्याबद्दल काय ?

की आप करे तो प्यार और हम करे तो बलात्कार ? आँ ??
मग बरं होतं ना पहीलंच..

"आप लोगोंको काँग्रेसवाले, बिजेपीवाले वोट के लिये पैसे ऑफर करेंगें तो ले लेना, मना मत करना !!
अगर अभी तक नही किया, तो उनके ऑफिसमे फोन करके बोल दो, पैसे ले लो मगर व्होट सिर्फ मुझेही करना !! "

ईतर वेळेला सरकारी कर्मचार्यांने पैसे मागितले की कॅमेरा लगाओ स्टींग करो, करप्शन कम करना है,
सफाई करनी है अस म्हणणारा नेता आणि तोच नेता वरच्या सिच्युएशन मध्ये पैसे ले लो म्हणतो, हे कस काय
ज्जेल होत ?

>>>इथेच माझे अन केजरीवालचे रस्ते वेगळे होतात<<< Lol

काही म्हणा नताशा, तुमचा आत्मविश्वास फार आवडतो

>>> रमाकांत कोंढा | 30 March, 2015 - 20:35 नवीन

"आप लोगोंको काँग्रेसवाले, बिजेपीवाले वोट के लिये पैसे ऑफर करेंगें तो ले लेना, मना मत करना !!
अगर अभी तक नही किया, तो उनके ऑफिसमे फोन करके बोल दो, पैसे ले लो मगर व्होट सिर्फ मुझेही करना !! "

ईतर वेळेला सरकारी कर्मचार्यांने पैसे मागितले की कॅमेरा लगाओ स्टींग करो, करप्शन कम करना है,
सफाई करनी है अस म्हणणारा नेता आणि तोच नेता वरच्या सिच्युएशन मध्ये पैसे ले लो म्हणतो, हे कस काय
ज्जेल होत ?
<<<

मीही हे नोटिस केलं पण इथे नोंदवायची आठवण राहिली नाही. अगदी बरोबर! भाषणात मांडलेला हा मुद्दा ही एक गंमत किंवा मस्करी होती का? मस्करी तर खूप नेत्यांनी केलेली आहे भाषणांत! कोणी काळा पैसा आणणार म्हणाले, कोणी मेड इन कानपूर म्हणाले, कोणी मोदींना मोघल म्हणाले वगैरे! तसंच का हे? आणि हे तसंच असेल तर बाकीचे जसे सोडून दिले जात नाही तसे हे तरी का सोडून दिले जावे? Happy Uhoh

मिर्ची तै,आप चे हिरिरीने समर्थन करणार्‍या तुम्ही एकट्याच नाही आहात.
आप विषयी तुमच्या इतके मुद्देसुद दुसर्‍या कुणाला लिहता येणार नाही.एक लंवगी मिर्ची १०० पोपट्यां मिर्च्याना भारी
पडतिय एवढे खरे
.तेव्हा एक ही मिर्ची काफी है..

संवादकौशल्याचा उत्तम वापर करणे, योग्य वेळी योग्य ते संदर्भ सादर करणे अश्या बाबी मिर्चींचे चर्चेमधील कसब दाखवतात.

हे कसब त्या इतर धाग्यांवर दाखवताना दिसत नाहीत ह्याचे दोन अर्थ होतात, एक तर इतर कोणत्याही धाग्यावर त्यांना काहीही सेल करायचे नसते किंवा इतर धाग्यांवर जाणे हा त्यांच्या रोलचा भाग नाही हे त्यांना सांगण्यात आलेले आहे.

पण तरीसुद्धा त्यांनी दिलेली वैचारीक झुंज, फारच हवसे गवसे आल्यानंतरच गेलेला तोल हे सगळे स्तुत्य आहे.

मात्र एक गोष्ट मिस होत आहे.

भारतासारख्या देशात दिलदार, दिलखुलासपणे कोणी प्रतिवाद विचारात घेऊन स्वतःच्या मतांची योग्यायोग्यता पडताळत नसतो तर येथे मन आधीच कोणाला तरी बहाल केलेले असते. किंबहुना ह्या वास्तवाला स्वतः मिर्चीही अपवाद असतील असे वरील चर्चेवरून दिसत नाही आहे.

आणि भारतासारख्या देशात तरी का म्हणायचे? सगळीकडे असेच असेल की? हा बिझिनेस नाही. बिझिनेसमध्ये माणूस प्रतिकूल परिस्थितीची दखल घेऊन स्वतःचे विचार बदलून फायद्यात येऊ पाहतो. येथे कोणाला फरकच पडत नाही दिल्लीचे सर्वेसर्वा केजरीवाल आहेत का मोदी आहेत का सोनिया आहेत!

एकुणात, राजकारण, क्रिकेट आणि चित्रपट ह्याबाबत 'ठाम मते' बिल्ट इन स्वरुपात घेऊनच भारतीय मनुष्य जन्माला येतो हे खरे!

अडानी, अंबानी चे भले करण्यार्‍यापेक्षा वोटरच्याच भल्याचा विचार केला ना? आम्च्या सोसायटित एका मताचे ५०० रु दिले.घरी येऊन आम्ही ते घेतले व मत आमच्या पार्टीला दिले.:P

हे कसब त्या इतर धाग्यांवर दाखवताना दिसत नाहीत ह्याचे दोन अर्थ होतात, एक तर इतर कोणत्याही धाग्यावर त्यांना काहीही सेल करायचे नसते किंवा इतर धाग्यांवर जाणे हा त्यांच्या रोलचा भाग नाही हे त्यांना सांगण्यात आलेले आहे.>>
>>

काहिही!
मिर्ची यांनी अगोदरच स्पष्टं केलंय की हा आयडी फक्तं आपविषयी लिहायला काढलेला त्यांचा ड्यू आय आहे.
त्यांच्या खर्‍या आयडीने त्या इतरत्र लिहितही असतील.
असे अनेक ऑफिशीयल ड्यू आयडी आहेत लोकांचे माबोवर जे स्पेसिफिक कारणांसाठी घेतलेले आहेत.
असे असताना तुम्ही दुसर्‍या धाग्यावर का लिहित नाही असे म्हणणे चुकीचे आहे.
त्या सांगून सवरून फक्तं या धाग्यावर मुख्यत्वे लिहित आहेत.

>>>काहिही!
मिर्ची यांनी अगोदरच स्पष्टं केलंय की हा आयडी फक्तं आपविषयी लिहायला काढलेला त्यांचा ड्यू आय आहे.
त्यांच्या खर्‍या आयडीने त्या इतरत्र लिहितही असतील.
असे अनेक ऑफिशीयल ड्यू आयडी आहेत लोकांचे माबोवर जे स्पेसिफिक कारणांसाठी घेतलेले आहेत.
असे असताना तुम्ही दुसर्‍या धाग्यावर का लिहित नाही असे म्हणणे चुकीचे आहे.
त्या सांगून सवरून फक्तं या धाग्यावर मुख्यत्वे लिहित आहेत.<<<

हे मला खरंच माहीत नव्हते. सॉरी.

=========================

पण मग ड्यु आय कशाला काढायचा? नेमके कारण काय असावे? स्वतःच्या आय डी ने लिहावे की?

हा आणि ह्या आधीचा अख्खा बाफ ड्यु आय चा आहे होय?

अजून सगळं वाचलं नाहीये, वाचतोय. नंदिनी आणि मयेकरांची पोस्ट आवडली. बेफिकीर तुमची हिंदीतली पोस्टपण पटली. मिर्ची तुमच्या पोस्ट वाचून खेदाने हसू आलं. बीजेपी किंवा कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही उभा राहू शकत आहे हे नाही आवडलं.

>>>मिर्ची यांनी अगोदरच स्पष्टं केलंय की हा आयडी फक्तं आपविषयी लिहायला काढलेला त्यांचा ड्यू आय आहे.<<<

ह्या वाक्याचा एकमेव अर्थ असा की काही कारणाने आपची भूमिका पटवताना त्यांचे मानसिक संतुलन उद्ध्वस्त झाले आणि आय डी गेला तरी त्यांना मायबोलीवर येणे शक्य होत राहो.

संपूर्ण चर्चा फाट्यावर मारण्यात येत आहे.

-'बेफिकीर'!

<<मिर्ची, जेन्युइन प्रश्न अहेत, जेन्युइन उत्तराम्ची अपेक्षा आहे.
"आप" हा एक प्रयोग म्हणून सफल व्हावा अशीच माझीही इतर सामान्य भारतीयाप्रमाणे इच्छा आहे आणि ते मी बर्‍याच ठिकाणी लिहिलेही आहे. पण "जनलोकपाल", "मोहल्ला सभा" वगैरेला माझा विरोध आहे. कारण एका "इनएफेक्टिव्ह प्रोसेस" ला दुसर्‍या तितक्याच "इनएफेक्टिव्ह प्रोसेस"ने रिप्लेस करुन काही साध्य होत नाही, वेळ आणि रिसोर्सेस वाया जातात हा माझा अनुभव (अर्थात मॅनेजमेंटचा). त्यापेक्षा सध्या असलेल्या, ज्ञात (म्हणजे ज्याचे फायदेतोटे माहीत आहेत) अशा स्ट्रकचर्/प्रोसेस ला सुधारणे महत्वाचे. >>

नताशा, जनलोकपालबाबत तुमच्या शंका रास्त आहेत. लोकपालच करप्ट असला तर काय वगैरे. पण टीम अण्णांनी ड्राफ्ट केलेल्या लोकपालबिलातल्या मला आवडलेल्या तरतूदी -
लोकप्रतिनिधीसुद्धा कायद्याखाली येणार. अशांची चौकशी फास्ट ट्रॅकने होणार. दोषी आढळला तर तो पुन्हा निवडणूक लढवू शकणार नाही. जेवढा भ्रष्टाचार केला आहे ती रक्कम त्याच्या मालमत्तेतून वसूल होणार.

सध्याच्या कायद्याने काय होतंय ते आपण पाह्त आहोत. मोठमोठे घोटाळे करून तुरूंगात जाऊन आलेले लोक पुन्हा निवडणूका लढवून संसदेत बसत आहेत. सध्याच्या कायद्यात अमेंडमेंटस करून वरील बदल केले तरीसुद्धा चालू शकेल असं मला वाटतं. त्याला नाव काहीही दिलं तरी काय फरक पडतो?

दुसरा मुद्दा मोहल्ला सभा. मला ही कन्सेप्ट एकदम आवडली आहे. आमदारांचा लोकांशी थेट संबंध येतो. नुसते आमदार नाही तर वीज-पाणी सारख्या विभागांतील अधिकारी तिथे असतात. समोरासमोर लोकांना प्रश्नोत्तरे करता येतात. दिल्लीमध्ये गेल्या ८-१० महिन्यांत असंख्य मोहल्ला सभा झाल्या आहेत. मिडियाने पूर्ण ब्लॅकआऊट केलं होतं म्हणून अनेकांना हे माहीत नाही. कदाचित मध्यम किंवा उच्च वर्गाला ह्याचे फायदे लगेच जाणवणार नाहीत. पण निम्नस्तरात परिस्थिती सुधारत गेली की काही काळाने त्याचे फायदे सर्वांनाच दिसायला लागतील अशी अपेक्षा आहे.

कदाचित दोन्ही गोष्टी फसतील. आख्खा प्रयोगच फसेल. पण १-२ वर्षांपूर्वी वाचलेलं दादचं वाक्य आठवतं - "फळे येतील की नाही ह्या भितीने रूजवा करायचं का थांबवावं ?" अशा अर्थाचं. मला ते पटतं. Happy

आज मनापासून राजभौंची आठवण येते आहे. त्यांनी आधीच्या धाग्यावर लिहिलं होतं "बच्ची की जान लोगे क्या"
कालपासून खरंच तशी परिस्थिती चालू आहे. Lol
लोक्स, एकावेळी इतके प्रश्न आल्यावर मी उत्तरे लिहू शकणार नाही. इट इज ह्युमनली इम्पॉसिबल. एकेका वेळी एकेक मुद्दा घेऊन बोललो तर ती चर्चा होईल. नाहीतर नुसताच धुमाकूळ.

बाळू, तुम्ही विचारलेले प्रश्न उत्तम आहेत. मला उत्तरंही लिहायची आहे. पण एका दिवशी एक प्रश्न मांडाल का? एवढं एकदम झेपत नसल्याने मला प्रश्न नाईलाजाने स्किप करावे लागत आहेत. ह्याजन्मी कमी रॅमची सिस्टीम मिळाली आहे. पुढच्या जन्मी अपग्रेड करून येईन. Wink

विकु, आय अ‍ॅग्री. काही वाक्ये अनावश्यक होती. पण कालपासून इरिटेट झाले आहे.

हे जनरल सर्वांसाठी - आपसमर्थक म्हणजे सद्गुणांचा पुतळा, कधी रागवू नये, खिल्ली उडवू नये वगैरे अपेक्षा ठेवल्या जाऊ नयेत. असं असणं अशक्य आहे. आपबाबतही हेच केलं गेलं आहे. सर्वगुणसंपन्न असल्याचा कधीही दावा न करता तो त्यांच्यावर थोपला गेला आहे. असा दावा अकेंनी कधी केला म्हटलं तर कुणाकडेच काही दाखला नाही.
"हमारी नियत साफ है" एवढं वाक्य अके कायम ठासून म्हणत आले आहेत आणि त्याच्या विपरीत अजूनतरी दिसलेलं नाही.

रच्याकने, हे वाक्य मीही ठासून म्हणू शकते. आपविषयी लिहिण्याबद्दलही आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलही.
मी पेड प्रचारक आहे, दुसर्‍या धाग्यांवर लिहीत नाही कारण तसं मला सांगितलं गेलं आहे वगैरे तारे तोडायचं कार्य चालू द्या बिनधास्त. एका नवीन आशादायी प्रयोगाला हातभार म्हणून मी जमेल तितके दिवस योगदान देत राहणार.
साती, सांगून उपयोग नाही. पहार्‍यावरचाच प्रयोग चालू होता असं दिसतंय.

सुरेख Happy

पुढच्या वेळेस रक्कम वाढ्वन्यात येईल.ते काय हाय ना आम्ही गरिब लोक ५०० बी जास्त वाटले इथे तर देश विकणारे लोक आहेत हे ध्याणातच रहात नाही बघा.

मिर्ची तै माफ करा. धागा सुरळित चालु देत. ७३९ झाले.

जरा मागच्या पोस्टींवर लिहिते.

<<कामं करणे म्हणजे नक्की काय करणे? कामं आमदार करत नाहीत. त्यासाठी नोकरशाही आहे. लोकनिर्वाचित प्रतिनिधीनं त्यावर अंकुश ठेवणे आणि देखरेख ठेवणे हे अपेक्षित आहे. हे वैयक्तिक प्रत्येक वॉर्डासाठी किंवा मतदारसंघासाठी. पण प्रत्येक आमदार आणि खासदार यानं इतकंच करणं पुरेसं ठरत नाही. कारण पॉलिसी मेकिंग हा लोकनिर्वाचित प्रतिनिधींचा सर्वात मोठा कामाचा भाग आहे अणि या पॉलिसी मेकिंगसाठी विचारधारा असावी लागते. हा जो काही "कामांचा" मुद्दा धरून लावलेला आहे तो केवळ पॉलिसी इम्प्लीमेण्टेशनचा आहे. त्या इम्प्लीमेंट करून झाल्यावर पुढची धोरणे कशाच्या जोरावर ठरतील?>>

दिल्ली २०१५ निवडणूकीमध्ये पॉलिसी मेकिंगसाठी 'दिल्ली डायलॉग' नावाची समिती बनवली गेली होती. मोहल्ला सभा होत होत्या. त्यामध्ये कुठेही योया नव्हते. ते शेवटच्या टप्प्यात आले.
योयांचा पॉलिसी मेकिंगचा अनुभव अकेंनी लोकसभेसाठी वापरला. त्याचा परिणाम सर्वांना माहीतच आहे.

राहता राहिला प्रश्न योयांच्या राजकीय अनुभवाचा. दोन मुद्दे मांडते.
१. योयांनी समाजवादी जन परिषद नावाची एक पार्टी हरियाणामध्ये स्थापन केली होती हे कुणाकुणाला माहीत आहे? मला माहीत नव्हतं. तो पक्ष संपूर्णपणे फसला. अजित झा (परवा काढलेल्या ४ मेंब्रांपैकी १) सुद्धा योयांच्या सजप मध्ये होते.
२. हरियाणा हे योयांचं राज्य. लोकसभेसाठी तिथे निवडणूक लढवूनही योया केवळ ८०,००० मते घेऊन ४ थ्या क्रमांकावर आले. अमानत रक्कम जप्त झाली होती.

ह्याउलट देशभर लढायचा किंवा मोदींविरुद्ध लढण्याचा निर्णय मनाविरुद्ध लादला गेला असूनही एका उत्तम टीमप्लेअर प्रमाणे अके संपूर्णपणे नवीन अशा वाराणसीत २ महिने जाऊन राहिले. जीवतोड मेहनत केली आणि योयांसारखा दांडगा राजकीय अनुभव नसताना भाजपाच्या बालेकिल्ल्यात मोदींविरुद्ध ३ लाखांच्या वर मते मिळवून दाखवली.
झाल्या प्रकाराने खच्ची झालेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा हिंमत देऊन, त्यांचं मनोबल वाढवून अपुरा पैसा आणि इतर अनेक प्रतिकूल परिस्थिती असूनही अमेझ्झिंग विजय मिळवून दाखवला.

सारांश, उत्तम राजकीय विश्लेषक असल्याने उत्तम नेता होता येतंच असं नाही. योया गेले म्हणजे आपचा पॉलिटिकल ब्रेनच गेला वगैरे गोष्टींमध्ये फार तथ्य नाही. ह्या गोष्टीचं चर्वितचर्वण मिडियाबहाद्दरांना करू दे. त्यांची उपजीविका आहे ती.
योया गेले तरी आप काही निअरली हेडलेस निक होत नाही. जोपर्यंत हॅरी, त्याची फायरबोल्ट आणि डंबलडोरची सेना उभी आहे तोवर नवीन विजयाची संपूर्ण खात्री आहे Wink

भागो मिर्चीबेन भागो. भक्त भक्त चिल्लाते हुए दुष्मनों की सेना आ रही है....

>>>"हमारी नियत साफ है" एवढं वाक्य अके कायम ठासून म्हणत आले आहेत<<<

मग त्यांच्या मायबोलीवरील अनुयायांनी मूळ सदस्यनामाने लिहावे की?

कोणाचीतरी नीयत साफ आहे हे सदस्यनामाबाबत अजिबात नीयत साफ नसणारा अ‍ॅडव्होकेट करत आहे. व्वा!

तुम्ही दुसर्‍या धाग्यावर का लिहित नाही असे म्हणणे चुकीचे आहे. >> +१.. हे तेच आयडी धारक म्हणत आहेत जे (स्वतः लेखक असून) कधी दुसर्‍या (लेखकांच्या) धाग्यांवर/कथांवर जास्त लिहितपण नाहित किंबहुना वाचतही नाहीत. त्यांच्याच एका कथेतील भाग दुसर्‍या कथेमधे वापरले होते तरी यांना माहिती नव्हते आणि हेच दुसर्‍यांना विचारत होते की मला सांगितलं का नाही Happy

>>>भागो मिर्चीबेन भागो. भक्त भक्त चिल्लाते हुए दुष्मनों की सेना आ रही है....<<<

थोडंसं इतरांना बोलायला ठेवाल का? तुम्ही ड्यु आय घेऊन एका राजकीय पक्षाची प्रतिमा का सुधारत आहात? ती तुमची मूळ मते नाहीत का?

माफ करा. तुम्ही निव्वळ राजकीय पक्षाच्या प्रतिमा सुधारणेसाठी ड्युप्लिकेट आय डी घेतला आहेत हे ऑथेंटिक विधान वाचल्यानंतर निदान मी तरी प्रश्न त्याचबाबतीत विचारणार.

बेफिकीर, तुम्ही मागचा धागा वाचला असता तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं. हौशे, नवशे, गवसे का म्हटलेलं हे आलं का लक्षात? धागे न वाचताच तलवारबाजी करायचा उद्देश काय?

<<माफ करा. तुम्ही निव्वळ राजकीय पक्षाच्या प्रतिमा सुधारणेसाठी ड्युप्लिकेट आय डी घेतला आहेत हे ऑथेंटिक विधान वाचल्यानंतर निदान मी तरी प्रश्न त्याचबाबतीत विचारणार.>>

मग मी हे प्रश्न फाट्यावर मारणार.

मनीष,

नम्रपणे अनुल्लेख Happy

अवांतर - येथे उत्तमोत्तम प्रतिसादांनी चर्चा नटवणार्‍यांपैकी कोणाला जर असे वाटत असेल की ह्या चर्चेवर प्रतिसाद देऊन मी घाण करत आहे तर त्यांची नम्रपणे माफी मागून मी इतकेच लिहू इच्छितो की मी मायबोलीवर बहुतांशी सदस्य स्वतःच्या मूळ आय डी ने स्वतःची सर्व मते ठणकावून मांडताना पाहिलेले आहेत. केवळ एका राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी एक निराळा आय डी घेणे हे मला अज्जिबात समजू शकत नाही आहे आणि त्यामुळे माझे नम्र प्रश्न आधी त्याच विषयाबाबत येऊ लागले आहेत.

क्षमस्व.

>>>मग मी हे प्रश्न फाट्यावर मारणार.<<<

फाट्यावर मारणार असतात तर मला उत्तरच दिले नसतेत. कुठेतरी बोंबाबोंब आहे की आपण ड्यु आय आहोत हे डॉ. सातींनी सांगितल्यानंतर एक आय डी फक्त त्यावरच बोलू लागला आहे.

आपबाबत तुमची एक विशिष्ट भूमिका आहे ना? ती तुम्हाला मिर्ची ह्याच सदस्यनामाने मांडायची आहे ना? मग कोण तुम्हाला प्रतिबंध करू शकणार? पण मिर्ची हे सदस्यनाम ड्यु आय चे आहे हे ऑथेंटिकली जाहीर झाल्यानंतर हा प्रश्न मनात येणारच ना की तुमच्या मूळ आय डी चे आपबद्दल काय मत आहे?

तुम्ही जर इतक्या इन्टेन्सली आपची बाजू घेत आहात तर ड्यु आय डी हवाच कशाला?

आम्च्या सोसायटित एका मताचे ५०० रु दिले.घरी येऊन आम्ही ते घेतले व मत आमच्या पार्टीला दिले<<< हा गुन्हा आहे हे माहित आहे का? मत कुणाला दिले तो मुद्दा नाही, मत देण्यासाठी पैसे घेणे हा गुन्हा आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा विडा उचललेला असताना स्वतः असल्या चुकीच्या वृत्तींना खतपाणी घालणे कितपत नैतिक मानावे??

असो. मुद्द्याला उत्तरे म्हणून अजूनही काहीबाही लिंकाच मिळत आहेत. वर त्यालाच उत्तम प्रतिवाद वगैरे शाबासक्यापण मिळत आहेत. चांगलं चालू आहे. आम अरविंदपार्टीच्या सर्व समर्थकांना माझ्या शुभेच्छा.

या बीबीवरच्या चर्चेमधला इंटरेस्ट संपला. आम्ही काय पेड प्रचारक नव्हे. इतरही कामे आहेत. त्यामुळे इथं वाचनमात्र येत राहू!!! एंजॉय!!

>>>या बीबीवरच्या चर्चेमधला इंटरेस्ट संपला<<<

अगदी अगदी!

डॉ. सातींनी सत्य सांगितल्यानंतर तर आता काही अर्थच राहिलेला नाही.

अशांची चौकशी फास्ट ट्रॅकने होणार. दोषी आढळला तर तो पुन्हा निवडणूक लढवू शकणार नाही. जेवढा भ्रष्टाचार केला आहे ती रक्कम त्याच्या मालमत्तेतून वसूल होणार>>> हे आत्ताच्या कायद्यात बदल करुन करु शकत नाही का? त्यासाठी जनलोकपाल कशाला हवा?

मला बेसिकच कळत नाहिये. एखादा पाइप गळू लागला तर आपण त्याच्या भेगा भरतो की तो बदलून दुसरा त्याच्यासारखाच फुटका पाइप लावतो? आपण दोन्ही न करता तिसरा पर्याय म्हणजे दुसरा चांगला पाइप लावतो कारण तसा पाइप अव्हेलेबल अस्तो पण जर नसला तर जो आहे त्याच्याच भेगा भरतो. जनलोक्पाल हा तो तिसरा चांगला पाइप नसून दुसरा फुटका पाइप आहे. त्यामुळे "आपण काहीतरी करतोय" एवढं फक्त समाधान अन त्यासाठी पाइप बदलणे वगैरे कटकटी तेवढ्या पदरात पडतील. गळती कशी थांबेल?

मिर्ची, जौदे. आज तुला बर्‍याच लोकांचा सामना करायचाय अन माझा प्रश्न काही सध्याच्या परिस्थितीशी संबंधित नाही. तेव्हा आपण कधीतरी नंतर बोलू यावर.

आम्च्या सोसायटित एका मताचे ५०० रु दिले.घरी येऊन आम्ही ते घेतले व मत आमच्या पार्टीला दिले<<< हा गुन्हा आहे हे माहित आहे का? मत कुणाला दिले तो मुद्दा नाही, मत देण्यासाठी पैसे घेणे हा गुन्हा आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा विडा उचललेला असताना स्वतः असल्या चुकीच्या वृत्तींना खतपाणी घालणे कितपत नैतिक मानावे?? >>>>>हायला पैसे देणारे घेणारे दोन्ही गुन्हेगार का की फक्त घेणारे?
अजुन काय-काय गुन्हे असतात ते पण सांगा की खोटी आश्वासने देऊन त्याला जुमला म्ह्णने गुन्हा होत नाही का?
१५ लाख मिळतिल वाटलेल ५०० वर भागवल.

Pages