Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला इथल्या चर्चेत भाग घ्यायची
मला इथल्या चर्चेत भाग घ्यायची इच्छा नाही. कुठल्याही पक्षाची त़ळी उचलून धरायचीही इच्छा नाही. पण खालील पोस्ट वाचून विचारात पडले. पोस्ट फक्त एकच उद्धृत केली असली तरी बेजबाबदारीने लिहिणार्या सगळ्यांना उद्देशून विचारते आहे
<<विचारवंत | 15 June, 2014 - 22:16
I am taking screenshots of this thread. Will be sent to appropriate places. स्मित>>
इथे बेजबाबदारपणे नथूराम (बहुदा हे दुसर्या कुठल्यातरी बीबीवर आहे), जेनोसाईड वगैरे गोष्टी प्रक्षोभक भाषेत लिहिणार काही जण, काही जण त्याचे स्क्रीन शॉट्स वगैरे काढून 'योग्य' त्या ठिकाणी वगैरे पाठवणार (म्हणजे कुठे माहित नाही)....
यात इथे खर्या किंवा टोपण नावानिशी फुकट लिहिणार्या आयडीजना काहीच त्रास होणार नाही, पण उद्या खरंच ऑथोरिटीजकडून त्रास झाला, चौकशी झाली तर तो ही साईट स्वतःचे रिसोर्सेस वापरून आपल्यासाठी इतकं चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या आणि चालवणार्या लोकांना होणार. त्याचं कुणालाच काही गांभीर्य वाटू नये/ कळू नये का??
निदान परवा परवाच फेसबुकवरच्या फालतू पोस्ट्समुळे झालेले दंगे तरी लक्षात घ्या...
हीट एन रन च्या केस चे झाले
हीट एन रन च्या केस चे झाले काय शेवटी
६ करोड़ च्या गाडीचा चुरडा झाला ते ठीक आहे पण बाकीच्यां नुकसानाचे काय?
वरदा, ते धमकी देण्यात पटाईत
वरदा, ते धमकी देण्यात पटाईत आहेत.
उलट परवा तेच सगळीकडे आवाहन करत होते, पूण्याच्या इंसिडंसमुळे इथे नीट लिहा.
गंमत अशीय की या अश्या आततायी विचारवंतांमूळे आम्हाला सिरीयसली चर्चा करायची तर दहा वेळा विचार करावा लागतोय.
आणि उद्या माबोला पॉलिटिकल धागेच बंद करावे लागतील.
काँग्रेस भाजप , भाजप आप
काँग्रेस भाजप , भाजप आप संबंध, आप मीडीया संबंध हे वर्णन करायला शब्द खूप अपुरे पडताहेत.....
बोलका पोपट परदेशी बसून काहीही
बोलका पोपट परदेशी बसून काहीही बोंबलत बसला तर चालते?
त्याचे तर सगळेच स्क्रीनशाट आहे
साती, मी विचारवंत किंवा आणखी
साती, मी विचारवंत किंवा आणखी कुणा आयडीची बाजू घेऊन लिहितेय असं तुला वाटतंय का? मी एकुणात माझं मत सांगितलं.
आपण फुकट जे व्यासपीठ वापरतो त्याला, ते चालवणार्या लोकांना आपल्या लिखाणामुळे, किंवा या असल्या स्क्रीनशॉट्स पाठवण्यासारख्या कामांमुळे निष्कारण त्रास होईल हे कळून न घेणं हा शुद्ध खोडसाळपणा, नतद्रष्टपणा आहे.
आणि इतकीच खुमखुमी असेल तर फेसबुकवर जाऊन हे उद्योग करावेत, तिथे पोलिस किंवा संबम्धित अधिकार्यांना काय ती व्यवस्थित कारवाई नावानिशीवार करता येते. इथल्या निनावीपणाचा फायदा घेऊ नये..
असो. मला कितीही राजकीय चर्चा करायला आवडत असली तरी एक ठराविक ५-१० आयडी सगळीकडे जे घाऊकपणे पोस्ट्स टाकून तेच ते दळण दळतात त्याने कधीही असल्या धाग्यांवर भाग घ्यावासा वाटत नाही. माझ्यासारखे आणखीही असतील माबोवर.
काय चालायचं ते चालूद्यात, उगाच मला कोण धमकी देतंय आणि कोण सीरियसली चर्चा करायला जातंय हे सांगू नका. मी निवाडा करायला बसलेली नाही आणि कोण काय करतंय हे कळण्याची कुवत माझ्याकडे आहे. तेवढी माबो घडली आहे मला. धन्यवाद.
हेमाशेपो
हेडक्वार्टर कडून आदेश आले
हेडक्वार्टर कडून आदेश आले बहुतेक...
वरदा, मी तुमच्या पोष्टला
वरदा, मी तुमच्या पोष्टला दुजोरा दिलेला आहे.
का चिड्ताय माझ्यावर?
मा़झ्या लिखाणाचे पैसे
मा़झ्या लिखाणाचे पैसे भरण्याची माझी तयारी आहे. झुक्याने किंवा त्याच्यातर्फे कधीही कुणीही तुम्ही फुकटेपणा करता असा निरोप मला पाठवलेला नाही. या धाग्यावर एक सोडली तर बेजबाबदारपणा करणारी पोस्ट आढळली नाही. चांगली रंगत आली होती...
साती, काय करूयात पुढे लिहूयात की बंद करूयात ?
मला दोन्ही परिस्थितीत फरक पडत नाही.
अहो, इथे 'मोदी जिंकले पुढे?'
अहो, इथे 'मोदी जिंकले पुढे?' अशी स्पर्ध आहे म्हणे.
तिथे फक्त 'अच्छे दिन आरेले है रे बाबा' अस्स ं म्हणत मोदी गुणगान अपेक्षित आहे.
चुकून एक दोन वाक्यं विरोधात लिहिली तर आपले स्क्रीनशॉट नाही का जायचे!
आपण तर बुवा स्पर्धेतून आधीच कटाप.
कोण सुखाचा जीव दु:खात घाला.
हम्म पण मग ज्यांना त्या
हम्म
पण मग ज्यांना त्या विषयात ज्यांना रस नाही आणि इच्छा नाही, वाचण्यासाठी वेळही नाही त्यांनी मुद्दाम हजेरी लावून लिहीणारे लोक काय करताहेत असा लसावि काढणे अपेक्षित आहे का ? असो.
यांचे बिंग फुटायला लागले की
यांचे बिंग फुटायला लागले की असा रडी चा डाव खेळतात
>>अहो, इथे 'मोदी जिंकले
>>अहो, इथे 'मोदी जिंकले पुढे?' अशी स्पर्ध आहे म्हणे. <<

नाही, हा तुमच्या धाग्याचा एक्स्टेंशन आहे असं समजा; किंवा पहार्यावर पहारा असं समजा.
raaaj
raaaj
नाही मनिष, प्रगती अजिबात झाली
नाही मनिष, प्रगती अजिबात झाली नाही असं नाही म्हणायचं मला. पण फार धीम्या गतीने चालू आहे. किंवा खरंतर उल्ट्या गतीने जातेय की काय असं वाटण्यासारखं चित्र आहे. >> हे थोडं अजून विस्कटून सांगणार काय? धीमी गती म्हणजे नेमकं काय? आणि तुम्हाला प्रगती म्हणजे काय अपेक्षित आहे तेही सांगा.
भाजपाने FDI च्या निमिताने इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये घेतलेला एक मोठ्ठा यु-टर्न मी बघितला. असं असेल तर काय अर्थ आहे पॉलिसी असूना आणि नसून? >> भाजपाने रिटेलमधे FDIला विरोध केला होता (अजूनही आहे बहुतेक). संरक्षण क्षेत्रात FDI आणायचा त्यांचा विचार आहे. हा काही यु-टर्न नाहिये. मला स्वतःला संरक्षण क्षेत्रात FDI चा काय परिणाम होइल हे माहिती नाही त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही. पण, कालानुरूप, परिस्थितीनुरूप सरकारच्या धोरणांमधे बदल तर होतच राहणार (खरंतर झालेच पाहिजेत, हे झाले नसते तर १९९१ मधे आपली अर्थव्यवस्था खुली झाली नसती. धोरण बदललं नसल्यामुळंच २जी घोटाळ्यात अडकले). जोपर्यत हे बदल देशासाठी, जनतेसाठी फायद्याचे आहेत तोवर त्यात काहीच वाइट नाही.
वीजेची बिलं कमी केली तर तिजोरीवर ताण पडेल असं आपल्याला वाटतं ना. पण आपल्या कल्पनेपेक्षा प्रचंड जास्त पैसा ह्या खादी नेत्यांच्या दिमतीत आणि भ्रष्टाचारात खर्च होतो. तो वाचवला तर सबसिडीज देणं शक्य आहे. >> भ्रष्टाचार कमी झालाच पाहिजे यात दुमत नाही. पण सरसकट सबसिडीचं धोरण चुकीचं आहे. वीजेचं बील कमी का केलं पाहिजे? नागरिकांनी वापरलेल्या वीजेचं बील सरकारनं का भरावं? उलट वीजबीलात सुसुत्रता आणून (जेणेकरून वीजग्राहकांनाही भुर्दंड नाही पडणार) वीजकंपनी किंवा सरकार तोट्यात जात नाही हे पहाणंपण तेवढंच महत्त्वाचं आहे. लोकांना फुकट/स्वस्तात दिलेल्या गोष्टींची किंमत नाही राहत. पैसे पडत असतील तर लोक पण वीज जबाबदारीनं वापरतील. हे फक्त वीजेलाच नाही पाणी आणि इतर गोष्टींना पण लागू आहे. (तुम्ही भारताबाहेर आहात. पाश्चात्य देशात आहात असं समजून लिहितोय. तिथे किती गोष्टी सबसिडाइज्ड आहेत ते तुम्हीच बघा आणि सांगा)
निम्म्या दिल्लीला नळातून पाणी येत नाही (पेपरमधल्या बातम्यांनुसार). दिल्लीत ७५०लीटर पाणी प्रत्येक घरी फु़कट देण्यापेक्षा दर थोडे कमी करून देणं जास्त सयुक्तिक झालं असतं. 'आहे रे' वर्गातल्या लोकांनाच या फुकट पाण्याचा फायदा होणार होता कारण 'नाही रे' वर्गाकडे नळाचं कनेक्षनच नाही. ते पाणी(टँकर) माफियावरच अवलंबून आहेत (परत बातम्यांनुसार). फुकट न देता पाण्याच्या बिलातून जो पैसा मिळतो तो 'नाही रे' वर्गाला नळजोडण्या देण्यावर खर्च करता आला असता. पाणी फुकट देउन दोन्हीकडून नुकसान. तीच गोष्ट ३५०० रिक्षा परवाने देण्याची. त्यांनी ४९ दिवसांत जे काही निर्णय घेतले तेपण असे अगम्य होते जे भारतीय राजकारण बदलण्याची भाषा करणार्या, सो-कॉल्ड नेटसॅव्ही/इंटलेक्चुअल बेस असलेल्या पक्षाकडून मला अपेक्षित नव्हते.
या सगळ्या गोष्टी जर माझ्यासारख्या सामान्याला समजतात तर आआपच्या लीडरशीप टीमला (मुख्यत्वे केजरीवालना जे आयआयटीमधून बीटेक झालेत) का समजू नयेत?
(No subject)
http://anotherangryvoice.blog
http://anotherangryvoice.blogspot.in/2013/03/death-hugo-chavez-2013.html
http://www.quora.com/Is-Arvin
http://www.quora.com/Is-Arvind-Kejriwal-another-Hugo-Chavez
http://anotherangryvoice.blog
http://anotherangryvoice.blogspot.in/2011/09/great-neoliberal-lie-auster...
lokayat.org.in/content/englis
lokayat.org.in/content/english-booklets/India-becoming-Colony-again-2nd-edi-12oct10.pdf
lokayat.org.in/content/englis
lokayat.org.in/content/english-booklets/Globalisation-or-Recolonalisation_Complete-Booklet.pdf
इथे ज्या लिंक दिलेल्या आहेत
इथे ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या फक्त अस्तित्वात असणा-या वेगवेगळ्या विचारसरण्या विचारात घेण्यासाठीच. कुठल्याही एका विचाराच्या मागे जाऊन भारतासारख्या देशातल्या सर्व घटकांचं कल्याण होऊ शकत नाही. देशात २०१२ पासून जे काही चालू आहे त्याकडे थोडं वेगळ्या नजरेतून पाहण्यासाठी जगात काय चालू आहे हे पहावं लागेल. देशात १९९१ पासून ज रिफॉर्म्स लागू झाले त्याचा फायदा प्रत्यक्षात किती जणांना झाला, नवे रिफॉर्म्स लागू करण्यापूर्वी निवडणुकीत नरसिंह रावांनी लोकांना विश्वासात घेतले होते का ? हे सर्व तपासून पहावे लागेल.
त्यासाठी लोकायत प्रकाशनाची छोटी पुस्तके उपयुक्त आहेत.
एक भक्त की तपस्या से खुश होकर
एक भक्त की तपस्या से खुश होकर प्रभु बोले, बोल
""बच्चा क्या चाहिये?"
भक्त बोलाः "प्रभु धरती से आसमान तक सडक
बना दो।"
प्रभुः "मुश्किल है, कोई और वर मांगो।"
भक्तः "प्रभु पत्नियों को समझदार, सुशील और
शांत बना दो।"
.
..
....
......
........
प्रभुः "सडक सिंगल बनाउ या डबल?"
*****************************************
देशातील जनतेपुढे अशाच प्रकारे फक्त दोनच पर्यात ठेवण्यात येताहेत.....
मिर्चीताई तुमचं आपाख्यान चालू
मिर्चीताई
तुमचं आपाख्यान चालू राहू दे. मी विचारत असलेल्या प्रश्नांना सवडीने केव्हांही उत्तरे दिली तरी चालू शकतात. ज्या ज्या घटना जशा क्रमाने आठवताहेत तशा नोंदवणे मला जरुरीचे आहे. कारण विसरलं की पुन्हा आठवत नाही. आपची निर्मिती किंवा अण्णांचं आंदोलन या गोष्टी संशय निर्माण करणा-या आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यामागे कोण आहेत, त्यांना नेमकं काय करायचं आहे याबद्दल संशय आहे. संशयाच्या पडद्यापेक्षा उघड शत्रू केव्हांही बरा. कारण त्याचे इरादे माहीत असतात. केजरीवालांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांचे खायचे दात कोणते, दाखवायचे कोणते याबद्दल संभ्रम आहे. अण्णांचा ज्या पद्धतीने वापर करून घेतला त्यावरून नीतीबद्दल संशय आहे. जर त्यात अनैतिक काही वाटत नसेल तर जनतेला दिलेली आश्वासने फिरवण्यात त्यांना चूक वाटणार नाही यात नवल नाही.
त्यांचं आरोपसत्र, ४९ दिवसांचा कारभार आणि कोलांटौड्या हे त्यांना जज्ज करण्यासाठी लोकांपुढे आहे. त्यांना अजून संधी देऊन पहायची की या भांडवलावरून लांबच ठेवायचं हा निर्णय होत नाही. देशातल्या ज्या जनतेला १९९१ पासून मेनस्ट्रीम पासून फेकलं गेल्यासारखं वाटतंय त्यांच्या अपेक्षांचं जनआंदोलन अरविंद केजरीवालांच्या विदूषकी आंदोलनामुळे उभं राहू शकणार नाही. कारण अशा जनआंदोलनांकडे लोक संशयाने पाहणार आहेत. आयआयटीतून शिकलेल्या, आयएएस उत्तीर्ण झालेल्या माणसाला केंद्राने पास केलेल्या बिलाला राज्य सरकारचं बिल पर्याय देऊ शकत नाही एव्हढं साधं कळत नाही यावर विश्वास बसत नाही. आपण जे राज्य ताब्यात घेण्यासाठी निवडणूक लढवतो आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे निवड्णूक लढवण्यापूर्वी अशा माणसाला माहीत नसेल यावर विश्वास बसत नाही. युनियन टेरीटरी ते मर्यादीत राज्य हे स्वरूप का दिलं गेलं, एकाच ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार असेल तर केंद्र सरकारकडे पोलीस दल का आहे हे माहीत नसेल यावरही विश्वास बसत नाही.
या पार्श्वभूमीवर केजरींनी जे काही नाट्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याकडे दिल्लीच्या लोकांनी कसं पाहीलं असेल ?
इथे केजरीवाल की भाजप की काँग्रेस हा मुख्य प्रश्न नसून देशातल्या मूठभरांचंच भलं पहायचं की सर्वांना बरोबर घ्यायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाही अशा धाग्यातून विचार करता येईल. अण्णांच्या आंदोलनामधून अशाच प्रकारची भाषणं होत होती. त्यातून जे स्वप्नरंजन झालं त्या बेसवर केजरींना जज्ज केलं जाणार आहे. यू टर्न अलाउड नाही.
रात्रीतून बरंच काही घडून
रात्रीतून बरंच काही घडून गेलेल्म दिसतंय.

विचारवंत, तुम्ही असे का आहात हो????
वरदा,
तुम्ही मला उद्देशून थेट काही लिहिलेलं नाही. तरी जिनोसाइड ह शब्द माझ्याकडून आला म्हणून स्पष्टीकरण देतेय.
'साहेबांनी'च जिनोसाइड केलं असं मी कुठेही म्हटलेलं नाही. तसं म्हणणारी मी कोण?
त्यांच्यावर तो आरोप आहे हे सर्वश्रुत आहे. त्यात मी नवीन काय लिहिलं. फार जुनी नाही, गेल्याच महिन्यातली बातमी आहे - 'कोअॅलिशन अगेन्स्ट जिनोसाइड' ही संस्था मोदींविरुद्ध जिनोसाइडविषयक प्रचार चालू ठेवणार.
इच्छुकांनी हे पण वाचा - 'नाइन मिथ्स अबाऊट द गुजरात जिनोसाइड २००२'
हे आर्टिकल शहजाद पूनावाला काँग्रेस पार्टीशी संलग्न आहेत म्हणून हा लेख बायस्ड आहे म्हणण्याला काही अर्थ नाही. कारण जोवर बोललेल्या वाक्यांसोबत दाखले/पुरावे/आधार दिले जात आहेत तोवर 'कोण बोलतंय' ह्याने फरक पडू नये असं वाटतं.
असो.
पण तरीही अॅडमिनला त्या वाक्यामध्ये काही वावगं वाटत असेल तर ते वाक्य उडवून टाकीन किंवा त्यांनी उडवल्यास हरकत नाही.
मिडिया निष्पक्ष आहे आणि जनहितासाठीच दिवसरात्र राबत आहे असं वाटणार्यांनी राजस्थानमधल्या ८० वर्षांच्या शेतकरी जोडप्याला खांबाला बांधून घरावर नांगर चालवला ही बातमी का उडवली गेली ह्याबद्दल त्यांचं मत मांडलं तर बरं होईल.
<<अंबानींवर आरोप केले म्हणून मेडीया बिथरला हे म्हणणं पण चुकीचं आहे. >> आब्र, आरोप वेगळे, एफ आय आर वेगळी !
आरोप तर अनेक लोक, संस्था करतच असतात (कुत्रे भुंकत असतात ह्या चालीवर वाचावे)
त्याने त्यांना काही फरक पडत नाही...नसावा.
मनिष, लिहिते जरावेळाने
आब्र, आरोप वेगळे, एफ आय आर
आब्र, आरोप वेगळे, एफ आय आर वेगळी >>>> माझ्या पोस्टमधे आधीही तीन चारदा हेच आरोप केले होते त्या वेळी मेडीया का बिथरला नाही हा प्रश्न विचारलेला आहे. मेडीय बिथरण्याची मेडीयानेच दिलेली कारणे आणि केजरीवालांचे एका खा़जगी पार्टीतले वक्तव्य पाहीले, ऐकलेले आहे...
आपाख्यान आब्र, (ब्र आ पेक्षा
आपाख्यान
आब्र, (ब्र आ पेक्षा आब्र सोप्पं पडतंय. (मज)आठवले ब्रह्मांड!)
लिहिते जरावेळाने.
आणखी एक शंका.
"यात इथे खर्या किंवा टोपण नावानिशी फुकट लिहिणार्या आयडीजना काहीच त्रास होणार नाही,"...हे कळलं नाही. माबोवर वर्गणी आहे का? मला माहीत नव्हतं.असेल तर कृपया सांगा. मी द्यायला तयार आहे.
I am taking screenshots of
I am taking screenshots of this thread. Will be sent to appropriate places >> screenshots ची गरज नाही. इथे प्रामाणिकपणे लिहिणारे लोक आपले प्रतिसाद बदलणार नाहीत. आणि जे पडद्याआडून लिहितायेत ते आधीच घाबरून लपलेले आहेत , हे उघडच आहे.
राजकीय विषयावर सुद्धा ड्यु आय न घेता , प्रामाणिक मते लोकांना लिहिता येत नाहीत , हे बघून खंत वाटते.
मिर्ची, मला तुमचा चुलत जुळा
मिर्ची, मला तुमचा चुलत जुळा भाऊ समजा.
मला साती यांचा निषेध करू
मला साती यांचा निषेध करू द्या.
त्यांनी ज्यांना लिहीण्याची इच्छा नाही, वाचण्याची तर मुळीसुद्धा इच्छा नाही अशा लोकांना त्यांच्या मर्जीविरुद्ध पोस्ट लिहीण्यासाठी भाग पाडले असावे अशी शंका येतेय. त्यांच्या ढुंकून सुद्धा न पाहण्याचा अधिकारावर अशा प्रकारे गदा आणल्यावर आणखी दुसरे काय वाचायला मिळणार त्राग्याशिवाय ?
आणखी एक शंका आहे. या धाग्यावर आशय पहायचा आहे की अधून मधून निकाल द्यायला येणा-या न्यायाधिशांच्या कलाने कुणी , काय आणि कसं लिहायचं हे अपेक्षित आहे ? आतापर्यंत ९९% पोस्ट्स मधे काही खोट होती का ? जनर्लाईज्ड कमेण्ट्स कोण कुणाला उद्देशून करतोय हे कळण्यास मार्ग नाही.
Pages