दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
किमान पक्षातल्या जेष्ठांसाठी
किमान पक्षातल्या जेष्ठांसाठी खोटी आसवे गाळुन नंतर त्यांचे नाव लिस्ट मधुनच गायब करणे असली नाटक तर केली नाही ना ?
मग ठिक आहे
नहीं सुनने को मिलेगा आडवाणी का भाषण
लालकृष्ण आडवाणी समापन भाषण नहीं देंगे. बैठक में समापन भाषण के लिए जिन वक्ताओं की सूची तैयार की गई है, उसमें लालकृष्ण आडवाणी का नाम नहीं है. पार्टी भी इस मामले पर अभी कुछ बोलने से बच रही है. जब बुधवार को पार्टी के नेता शाहनवाज हुसैन से इसके बारे में पूछा तो गया था तो उन्होंने कोई भी स्पष्ट जवाब नहीं दिया. माना जा रहा है कि आडवाणी मोदी सरकार के अभी तक के कामकाज पर कुछ तल्ख टिप्पणियां कर सकते हैं इसलिए वक्ताओं की लिस्ट में उनका नाम शामिल नहीं किया गया.
और भी... http://aajtak.intoday.in/story/pm-narendra-modi-will-addres-bjp-national...
.
.
ग्रामीण दिल्लीमधल्या जमिनींचे
ग्रामीण दिल्लीमधल्या जमिनींचे तपशील ६ महिन्यांत ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. इंद्रप्रस्थ भूलेख डॉट कॉम ह्या संस्थळावर सरकार सगळे तपशील उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. जमिनीच्या कागदांच्या पडताळणीसाठी सरकारी कार्यालयांत चकरा माराव्या लागणार नाहीत. शिवाय जमीन खरेदी-विक्रीमध्ये होणार्या गैरप्रकारांना आळा बसेल.
एक क्लिक से मिलेगी प्रॉपर्टी की पूरी जानकारी
"To break the monopoly of a section of babus managing land records of the city's 356 villages, empower property owners with authentic, digitally-signed documents and end harassment of buyers at the hands of a burgeoning mafia, the Delhi government is preparing to go public with Indraprastha Bhulekh, a detailed online database of land records of each and every property in a village."
जमिनमाफियाला हेडऑन टक्कर. व्हेरी गुड.
अकेंचे असले उद्योग तर नको
अकेंचे असले उद्योग तर नको आहेत विरोधकांना म्ह्णुन तर गरळ ओकने चालु आहे.
बाकी अकेनां खुप खुप शुभेच्छा!
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/yadav-bhushan-hint-at-form...
रणजित चितळे +१ नाटकीपणा हा
रणजित चितळे +१
नाटकीपणा हा स्थायिभाव आहे!
http://www.esakal.com/Tiny.as
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=RFJLK
योगेन्द्र यादव आणि प्रशांत
योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या अवस्थेवरुन 'सामना' मधल्या ओळी आठवल्या,
देई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्यहे त्याच्या गळी साजे
अडवाणीला काय मस्त बकरा बनवला
अडवाणीला काय मस्त बकरा बनवला . निमंत्रण दिले पण बोलायलाच दिले नाही. बिचारे पीएम इन वेटींग छान गुरुदक्षिणा दिली. शिष्याला देखील असेच मिळनार आहे
<<कितीही आश्वासनं दिली तरी
<<कितीही आश्वासनं दिली तरी ती पूर्ण करणं हा आर्थिक व्यवहरांचा भाग आहे हे जाणवायला लागते. दिल्लीत राज्यकर्ता म्हणून यशस्वी व्हायचं तर हे असं ‘प्रगल्भ’ होणं अनिवार्य आहे हे आता केजरीवालांना समजलं असावं. म्हणूनच, ‘लोकपाल असो की मोहल्ला कमिट्या आणि निर्णयासाठी लोकांकडं जाण्याची भूमिका’ असं आदर्शवादी तेवढं सारं मागं पडलं आहे, उरलं आहे ते राजकारणातलं लोकानुनयाचं वास्तव. >>
ऊप्स.
जनलोकपालबिल पुढच्या असेंब्ली सेशनमध्ये मांडलं जाणार आहे अशी बातमी आहे आणि मोहल्ला सभा तर ११ विधानसभांमध्ये बजेट बनवण्यासाठी मदत करणार आहेत !
नंतर काय मुद्दे राहतील बरं असले लेख लिहिणार्यांकडे ?? :विचारमग्नः
"Residents of the area
"Residents of the area unearthed the illegal business run by the BJP leader and Chairman of the South MCD standing Committee Sahilender Singh Monti and his wife.
RTIs filed by local residents showed that Mr. Monti and his wife first encroached a huge chunk of land belonging to the DDA and erected an illegal structure in the year 2012. Later it was converted into a hotel with the name “The Rose”.
After four days of persuasion, vigilance department of the BSES raided the above mentioned premises at T-40, Hauz Khas Village and found a hotel The Rose running in the premises illegally. The raiding team discovered that the electricity connection was taken for residential purpose and not commercial and consumption was beyond sanctioned load."
म्हणजे डीडीएकडून आधी जमीन बळकवायची, मग तिथे वीजेचा दुरूपयोग करायचा, शिवाय हॉटेल चालू करून त्यातून पैसाही कमवायचा !
मिडियाने ह्या विषयावर चर्चा करणं अपेक्षित आहे. खरं-खोटं जे काही असेल ते बाहेर आणायला हवं.
१०३१ हेल्पलाइनच्या लॉंंचच्या
१०३१ हेल्पलाइनच्या लॉंंचच्या निमित्ताने 'आप्टर्डस'च्या कल्पनाशक्तीला उधाण आलंय.:हाहा:
- यह केजरीवाल हम सबको भूखा मारेगा ! न खाएगा न खाने देगा
-शीलातै - बाप रे #AAPHelpLine
AAPTard हा शब्द आला कुठुन आणि
AAPTard
हा शब्द आला कुठुन आणि याचा अर्थ काय ? कोणी सांगु शकेल का ?
'आज से दिल्ली का हर आदमी
'आज से दिल्ली का हर आदमी इंस्पेक्टर'
http://www.bbc.co.uk/hindi/india/2015/04/150405_delhi_govt_launch_1031_a...
१०३१ हेल्पलाइन लॉंंच बद्दल काय मत आहे पब्लिकचे?
मिर्ची तै,लवकरच तुम्हाला
मिर्ची तै,लवकरच तुम्हाला अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३ चालू करावा लागनार.
एक अंधभक्त का ख़त मोदी के
एक अंधभक्त का ख़त मोदी के नाम
आदरणीय मोदी जी,
बड़े छुपते छुपाते ये पत्र लिखा, सार्वजनिक ना होजाए।
अब तो बाहर क्या घर के बरामदे में भी खड़े होते शर्म आती है, ऐसा लगता है हर राह चलती निगाह मुझे खिल्ली भरे अंदाज में घूरती है, आखिर आपका अंधभक्त हूँ।
रात रात भर जाग के आपके पेजों के प्रयोजित पोस्ट बिना रुके किये, स्वामी जैसे अमिरीकी दलाल के पोस्ट चलाये, सिर्फ इसलिए की वो आपके समर्थन में है।
जसोदा जी के मामले में आपकी हरकत घटिया लगी फिर भी आपको बोद्ध कहा।
विरोधियों के पोस्ट्स में घुस गया, सबकी माँ बहन की, अपने निजी मित्रों तक से सम्बन्ध बिगाड़े।
मंदिर पर आपकी शौचालय वाली बात से दिल मसोस कर पहले ही रह गया, आपने समझाया 370 ही दुखों की जड़ है, कैसा कैसा गरियाया था सही बताने वालों को अब आपने ही उसे सही कह दिया।
महंगाई भी सहन कर गया, रेल किराया वृद्धि को जस्टिफाई किया, आपने रेल,रक्षा,बीमा सब बेच दिया पर मैंने उसे विकास ही प्रचारित किया।
पर आपने शरीफ को गले लगाया तो हैरत में रह गया।
आपने साडी की बात को ट्विट कर ख़ुशी जाहिर की तो दिल पर सांप तो बहुत लौटे, की क्या मैं ही बेवकूफ था ? पर कभी जग जाहिर नहीं किया। पर अब तो सहन करना असंभव हो गया।
जिस अमेरिका ने आपको 12 साल दुत्कारा उसके 1 बुलावे पर ही आप "जी साहब आया" अंदाज में तैयार हो गए, मैं तो आपको स्वाभिमानी शेर समझा था।
अब लोग खिल्ली उड़ाते हैं |
रोज सैनिक शहीद होते हैं पर आप तो मोन जैसे निंदा से भी कतराते हैं, उधर आप चाइना से गले मिले, इधर चीनी सैनिक देश में घुस गए।
अरे आपकी उस दहाड़ को क्या हुआ ?
फिर समझाता हूँ दिल को की, इसमे भी कोई राज होगा। पर विरोधियों को क्या मुहं दिखाऊ? मै अच्छा फंसा। हालांकि मै समझ गया की वो बाहें चढ़ा चढ़ा, वो उंगली दिखा दिखा आपने हम भक्तों को ही नहीं, पुरे देश को खुले आम कहकर बेवकूफ बनाया है उसमे भी कुछ देश का भला ही होगा।
पर आप अपने भक्त को कमजोर मत हुआ समझना। आज भी उम्मीद जिन्दा है की जैसे आपने पूरे देश को बेवकूफ बनाया वैसे अमेरिका, चाइना, पाकिस्तान सबको उल्लू बना दोगे और भारत एक दिन जरूर विश्व गुरु होगा। ये भी जानता हूँ की आप फिर दहाड़ोगे अगले चुनाव में और सबकी बोलती बंद कर दोगे। पर मेरी इज्जत के लिए एक बार नकली ही दहाड़ दो आगले चुनावों से पहले, तो ही अपने दोस्तों को शक्ल दिखाने लायक बचूंगा !
-आपका एक अंधभक्त।
बाळू भौ,तुमची गल्ली चुकलीय
बाळू भौ,तुमची गल्ली चुकलीय का?
अकेंच्या धाग्यावर अकें बद्दल पण काहीतरी लिवा ना..
<< AAPtard हा शब्द आला कुठुन
<< AAPtard हा शब्द आला कुठुन आणि याचा अर्थ काय ? कोणी सांगु शकेल का ?>>
कबीर, माझ्या माहितीप्रमाणे हिंदुश्रेष्ठ सुब्रमण्यम स्वामींनी तो शब्द आमच्यासारख्यांना बहाल केला आहे. हे संबोधन ट्वीटसमध्येसुद्धा ते बर्याचदा वापरत असतात.
AAP ला समर्थन देणारे लोक Retard आणि/किंवा Bastard असतात असा त्याचा अर्थ आहे म्हणे. खखोस्वाजा. आप्टर्डच्या डिक्शनरी अर्थासाठी हे पहा.
<<मिर्ची तै,लवकरच तुम्हाला अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३ चालू करावा लागनार.>>
सुरेख, डोकं न वापरता करावी लागणारी कामे (घर आवरणं, इस्त्री करणं, भांडी घासणं) करताना जे फ्लीटिंग थॉट्स चालू असतात ते आपोआप लिहून काढणारं मशिन असतं तर आत्तापर्यंत किमान ५ धागे तरी निघाले असते. माबोकर थोडक्यात बचावले
जोक्स अपार्ट, मी इथून एक मोठ्ठा ब्रेक घेण्याचं गेले कित्येक दिवसांपासून ठरवतेय. घेणार आहे.
पॅराजंपे, पत्र लीक केलंत की ओ. तेसुद्धा चुकीच्या लोकांच्या हातात पडू दिलंत. जशी योया गटांची पत्रे झीन्यूज, इंडिया टीव्ही अशा आपच्या 'लाडक्या' चॅनेल्सवर लीक झाली तसंच निराश मोदीभक्ताचं पत्र आपच्या धाग्यावर.
सध्या प्रभु सगळ्या चॅनेल्सवर
सध्या प्रभु सगळ्या चॅनेल्सवर अकेगटासाठी एक-दोन शब्द वारंवार वापरतात - गुंडाईझ्म, लंपुनिझ्म करणारे लोक.
काल तालकटोरामधल्या भाषणात अकेने प्रभुंचे शब्द सिद्ध केले. फुल्ल टु गुंडा अॅटिट्युड, दबंग भाषण.
"मुझे ब्लॅकमेल करने वाला अभी तक पैदा नहीं हुआ"
"अधिकारियो, विधायको और मंत्रियों को गलतियों से डरने की जरूरत नहीं है. गलती हुई तो मैं आपके साथ चट्टान की तरह खडा रहूंगा. लेकिन अगर किसीने बेईमानी की तो मुझसे बुरा कोई नहीं होगा, जहण्णूम तक उसका पीछा नहीं छोडूंगा"
छ्याछ्याछ्या. मुख्यमंत्र्याच्या तोंडी असली भाषा आणि असला राऊडी आवेश शोभतो का?
मुमंनी/पंप्रंनी कसं हसत हसत संदिग्ध बोलायला पाहिजे. ते प्रो-करप्शन आहेत की अँटी-करप्शन हेच अधिकार्यांना आणि जनतेला कळण्यात ५ वर्षे निघून जायला पाहिजेत
अकेचं कालच्या कार्यक्रमातील पूर्ण भाषण. शंभर 'मन की बात' ला एक भाषण भारी पडतंय.
वरच्या भाषणात एक वाक्य कट
वरच्या भाषणात एक वाक्य कट झालंय (की केलंय?) -
"हम जो कहते है, वो करके दिखाते है. हम जुमलें नहीं खेलते"
आजतकच्या साइटवरसुद्धा पूर्ण भाषणाचा व्हिडिओ आहे. पण त्यात मिडियाला उद्देशून बोललेली वाक्ये कापली आहेत म्हणे. मी पाहिला नाहीये.
केजरीवाल हे प्रामाणिक वाटतात
केजरीवाल हे प्रामाणिक वाटतात ते जे राजकारण बदलायची इच्छा ठेवतात त्यात त्यांना सर्वाधिक विरोध हा भाजपचाच होईल
त्या चिरकुटाला इतका भाव देउ
त्या चिरकुटाला इतका भाव देउ नये.
<<केजरीवाल हे प्रामाणिक
<<केजरीवाल हे प्रामाणिक वाटतात ते जे राजकारण बदलायची इच्छा ठेवतात त्यात त्यांना सर्वाधिक विरोध हा भाजपचाच होईल>>
नाही. भ्रष्टाचारात सामील असलेले सगळे पक्ष ह्या 'सत्कार्यात' एकजूट होतील असा अंदाज आहे.
<<<<केजरीवाल हेच अस्सेच करणार हे माहितच होते पण जनतेने आधीचे विसरून परत चांस दिला हे तो लक्षात ठेवेल आणि थोड़ी वर्षे निट काढेल असे वाटलेले. असो.
मी जनतेची सेवा करायला राजकारणात आलोय असे कोणी म्हणायला लागला की हां आता किती कोटींचा दल्ला मारायला सेवा करतोय हाच विचार मनात येतो. अति झाले आणि हसू आलेय, बाकी काही नाही. राजकारण आणि स्वच्छ माणूस हां विरोधाभास आहे. >>
असे ठाम विचार असणार्यांसाठी अकेने काय हेच आणि अस्सेच केले ह्याची एक छोटीशी यादी आज प्रसिद्ध झाली आहे.
मोबाईल सोबत घेऊन कोणालाही सरकारी ऑफिसमधील कुठल्याही अधिकार्याला (मुख्यमंत्र्यांनासुद्धा) भेटता येईल असे फलक दिल्लीतील ऑफिसेसमध्ये लावण्याचे आदेश दिले जाणार आहेत असं कालच्या भाषणात अकेंनी सांगितलं.
(आणि हे ऐकल्यावर - भेटायला येणार्या कोणालाही कॅमेरा, फोन तर सोडाच, पण पेन सुद्धा घेऊन जाण्यावर मोदींनी घातलेली बंदी आठवली. ही गोष्ट तेव्हाच खटकली होती आणि विरोध केला होता. वाईट काम करत नसाल तर स्टिंग होईल म्हणून का घाबरायचं??)
जगभरातील ५ सर्वात जास्त 'बिझनेस फ्रेण्डली' शहरांच्या यादीमध्ये दिल्लीला आणून ठेवायचा संकल्पसुद्धा काल अकेने बोलून दाखवला आहे. सध्या भारत ह्यामध्ये १३४ व्या क्रमांकावर आहे.
दिल्ली अकेच्या हातात आहे, देश मोदींच्या हातात आहे. दोन्ही नेत्यांनी आपापली आश्वासने पूर्ण करावीत. कोणाचा का कोंबडा आधी आरवेना, पहाट होणं जास्त महत्वाचं.
"डोंबलाचा चमत्कार. मनात आणलं
"डोंबलाचा चमत्कार. मनात आणलं तर तुमच्या घरी सकाळच्या नाश्त्याला काय बनवलं होतं हे फोटोसहित मी दाखवू शकते किंवा vice versa. अश्मयुग संपलं केव्हाच
"
नंदिनीला उत्तर देताना मी जेव्हा वरील वाक्य लिहिलं होतं तेव्हा अनेकांना हे आवडलं नव्हतं. चमत्कारिक दर्पोक्ती वाटली होती. पण ह्या वाक्यातील 'किंवा vice versa' हा भाग कोणाच्या लक्षातच आला नाही का???
मी जे करू शकते ते मनात आणलं तर नंदिनी किंवा दुसरं कुणीही करू शकतं असं सुचवताना मला स्वतःचा अहंकार नाही तर टेक्नॉलॉजीचं महत्व दाखवून द्यायचं होतं.
जनगणमन हे जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत घोषित झालं किंवा गोमूत्र पिल्याने कॅन्सर बरा होतो असल्या भाकडकथा पसरवण्याच्या पलीकडेही इंटरनेटचा वापर करून घेता येतो हे माबोकरांना सांगायची अजिबातच गरज नाहीये ह्याची मला जाणीव आहे.
दिल्लीत घडणार्या गोष्टी मला आधी किंवा जास्त प्रमाणात कळल्या तरी मी दिल्लीत नाही म्हणून त्या कमी विश्वासू आणि अल्पना किंवा मंदार दिल्लीत आहेत म्हणून त्यांना असलेली मर्यादित माहितीच खरी किंवा पारदर्शक आहे असं मत असणार्या सर्वांसाठी फुकटचा सल्ला - आजपासून त्यांनी इमेल्स वापरायचं बंद करून माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी घोडेस्वार पाठवावेत, उंटाच्या गळ्यात लखोटे बांधून पाठवावेत किंवा कबुतराच्या पायाला पत्रं बांधून पाठवावीत. उसगावातल्या दोस्तांना निरोप पाठवायचा असेल तर एखादा डॉल्फिन पाळायला हरकत नाही !
(आय नो आय अॅम बिईंग रूड)
मी फेसबुक वापरत नाही. आपबद्दल टीव्ही चॅनेल्समधून फक्त निगेटिव्ह गोष्टींवरच फोकस केलं जातं आणि पक्षपाती वागणूक दिली जाते ह्याचे अनेक दाखले स्वतः पाहिल्यानंतर मी ट्वीटरवर अकाऊंट उघडून आप ला आणि बर्याचशा टीव्ही चॅनेल्सच्या ट्विटर हॅण्डल्सना फॉलो करायला सुरूवात केली. दिवसातून २-३ वेळा १०-१५ मिनिटे नजर टाकली तरी काय घडतंय ह्याची कल्पना येते. मग गरजेनुसार पूर्ण बातम्या वाचते, व्हिडिओज पहाते. प्रो-आप आणि अँटि-आप दोन्ही.
मी फॉलो करत असलेल्यांपैकी काही हॅण्डल्स -
१. आम आदमी पार्टी @AamAadmiParty
२. दिल्ली डायलॉग कमिशन @DelhiDialogueCo
दिल्ली मंत्रीमंडळ -
१. अरविंद केजरीवाल @ArvindKejriwal Chief minister
२. मनिष सिसोदिया @msisodia Education, Urban Development and Finance
३. गोपाल राय @AapKaGopalRai Transport, Labour, Rural Development
४. सत्येंद्र जैन @SatyendarJain Health, Industries, Irrigation&Flood Control,PWD, Power
५. जितेंद्र सिंग तोमर - Law and Justice, Tourism, Art and Culture, Home
६. संदीप कुमार - Women and Child, Social Welfare, Language, SC & ST
७. असीम अहमद खान - Food & Supply, Environment and Forest, Election
शेवटचे तिघे ट्वीटरवर दिसत नाहीत. कार्यकर्ते त्यांच्या बातम्या शेअर करत असतात.
दिल्ली आमदार -
१. अलका लांबा - चांदनी चौक @LambaAlka
२. सौरभ भारद्वाज - ग्रेटर कैलाश @Saurabh_MLAgk
३. सोमनाथ भारती - मालवीय नगर @attorneybharti
४. संजीव झा - बुरारी @Sanjeev_aap
५. जर्नेल सिंग - तिलकनगर @JarnailSinghAAP
६. कपिल मिश्रा - करावल नगर @kapil_change
७. गुलाब सिंग - मटियाला @GulabMatiala
८. दिनेश मोहनिया - संगमविहार @dineshmohaniya1
बाकीचे आमदार ट्वीटरवर फारसे दिसत नाहीत. त्यांच्यासोबत काम करणारे कार्यकर्ते फोटो आणि बातम्या टाकत असतात अधूनमधून.
आपचे काही नेते -
१. कुमार विश्वास @DrKumarVishwas
२. संजय सिंग @SanjayAzadSln
३. दिलीप पांडे @dilipkpandey
४. आशिष खेतान @AashishKhetan
५. आशुतोष @ashutosh83B
६. राघव चड्ढा @raghav_chadha
७. प्रिती शर्मा-मेनन @aapkipreeti
८. भगवंत मान @bhagwantmann
९. मयंक गांधी @mayankgandhi04
१०. अंजली दमानिया @anjali_damania
ह्यापैकी मयंक गांधी योयागटाचे आहेत किंवा नाही ह्याविषयी मला खात्री नाही. तळ्यात-मळ्यात वाटतं. आणि अंजलीताईंच्या अकाऊंटवर 'ट्वीट'च्या कळेऐवजी 'क्विट'ची कळ कधी दाबली जाईल ह्याची खात्री त्या स्वतः सुद्धा देऊ शकत नाहीत ! मिडियाच्या आणि विरोधकांच्या जाळ्यात फार चटकन फसतात त्या. तेवढी गडबड सोडली तर त्यांच्या प्रामाणिकपणा आणि धाडसाबद्दल मला खूप कौतुक आहे.
ह्यांच्याव्यतिरिक्त बाकी असंख्य लोक आहेत जे वेळात वेळ काढून सोशल मिडियावर आप ला मदत करत असतात. कार्टुनिस्ट्स, ग्राफिक डिझायनर्स, काँप्युटर गीक्स, कवी, लेखक, डॉक्टर्स, इंजीनियर्स, पत्रकार, गुप्तहेर (:डोमा:) वगैरे वगैरे. काहींना मी पर्सनली ओळखते. काहींची ओळख सोशल मिडियावरच झाली. जशी माबोकरांची झाली तशीच.
खर्या आयडीचाच प्रोफाईल फोटो लावून आणि कळणारसुद्धा नाही असा बेमालूम बदल नावात करून अनेक खोटी अकाऊंटस ट्वीटरवर अफवा पसरवून किंवा अब्युज करून धुमाकूळ घालत असतात. त्यांच्यापासून सावध.
I am AK असं चित्र लावून आप्टर्ड असल्याचं भासवत अकेलाच घाणेरड्या शिव्या देणारे किंवा भाजपा नेत्यांच्या टाइमलाइनवर जाऊन गचाळ भाषेत काहीबाही लिहून येणारे अगणित अकाऊंटस आहेत. असह्य झालं की मी स्वतःच त्यातले कित्येक ब्लॉक केले आहेत.
तर अशाप्रकारे माझ्या 'आतल्या गोटाचे'
ग्रिफिण्डॉर हाऊसचे पासवर्ड्स मी तुम्हाला दिले आहेत. हॅरी आणि डंबलडोरची सेना नेमकं काय करतेय हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर एक ट्वीटर अकाऊंट उघडून वरचे अकाऊंटस फॉलो करायला सुरू करा. ज्यांना आपच्या १० पैकी ९ चांगल्या कामांची दखल घेण्यापेक्षा एखाद्या चुकीबद्दल डोंगरभरून चर्चा ऐकायची असेल त्यांच्यासाठी टीव्ही चॅनेल्स आहेतच ! एन्जॉय विथ देम.
गेल्या महिन्याभरात आपमध्ये घडलेल्या महाभारतानंतरही वैकल्पिक राजनिती आणि भ्रष्टाचारमुक्त भारत देण्याची आपची ताकद बिलकुल कमी झालेली नाही. (वैकल्पिक राजनिती हा हिंदीमय मराठी शब्द नव्हे, खास योयांच्या तोंडातून नेहमी ऐकलेला हिंदीच शब्द आहे, जो मी त्यांच्यासाठी वापरला होता ! - cc नंदिनी )
आणि काही काळासाठी आपल्या सर्वांचा निरोप घेते __/\__
कोणाला आवडो किंवा न आवडो, पण अरविंद केजरीवालने भारतातील प्रस्थापित राजकारण्यांची पाळंमुळं हलवलेली आहेत. भारतातील काही लोक त्यांना ह्युमिलिएट करत असले तरी जग त्यांना एका रिवोल्युशनरीच्या भूमिकेतच बघत आहे. सगळे पूर्वग्रह काढून टाकून ह्या व्यक्तीकडे आणि त्याच्या कार्यकालाकडे पहावं अशी प्रामाणिक विनंती आहे.
एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते
गुडबाय आणि गुडलक म्हणणार नाही. परत येईन नंतर.
. आराम कर थोडे दिवस. आणि मग
;).
आराम कर थोडे दिवस.
आणि मग नव्या दमाने ये.
फारश्या आवडत्या नसलेल्या व्यक्तीबद्दल का असेना पण छान आणि मुद्देसूदपणे बोलणारं कुणी इथे मिळाल्याचा आनंद तुझ्यामुळे मिळाला.
मिर्चेी, मी तुमच्या धाग्यावर
मिर्चेी, मी तुमच्या धाग्यावर लिहिणार नाही असं सांगितलेलं आहे कारन माझे आधीचे प्रतिसाद तुम्ही इग्नोर मारलेत... तरी माझं नाव घेऊन हा प्रतिसाद बरा दिलात!! उत्तम!!
मी जे करू शकते ते मनात आणलं तर नंदिनी किंवा दुसरं कुणीही करू शकतं असं सुचवताना मला स्वतःचा अहंकार नाही तर टेक्नॉलॉजीचं महत्व दाखवून द्यायचं होतं. >>> डोंबल टेक्नॉलॉजीचं महत्त्व. सोशल मीडीया कसा वाकवायचा आणि कुठून वाकवायचा याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही असं दिसतंय. केवळ ट्विटरवरोन तुम्हाला इतकी माहिती मिळत असावी यावर माझा विश्वस कधीच बसणार नाही. (फॉर दॅट मॅटर तुम्ही आपचे पेड /नॉनपेड प्रचारक असलात तरी मला त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. मी हार्डकोअर पब्लिक रिलेशन्समध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे त्यात लपवण्यासारखं वगैरे काहीच नसावं. उलट तुम्हाला प्रचारक म्हटलं की तुम्हीच भडकताय. असो!!)
दिल्लीत घडणार्या गोष्टी मला आधी किंवा जास्त प्रमाणात कळल्या तरी मी दिल्लीत नाही म्हणून त्या कमी विश्वासू आणि अल्पना किंवा मंदार दिल्लीत आहेत म्हणून त्यांना असलेली मर्यादित माहितीच खरी किंवा पारदर्शक आहे असं मत असणार्या सर्वांसाठी फुकटचा सल्ला - आजपासून त्यांनी इमेल्स वापरायचं बंद करून माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी घोडेस्वार पाठवावेत, उंटाच्या गळ्यात लखोटे बांधून पाठवावेत किंवा कबुतराच्या पायाला पत्रं बांधून पाठवावीत. उसगावातल्या दोस्तांना निरोप पाठवायचा असेल तर एखादा डॉल्फिन पाळायला हरकत नाही !
(आय नो आय अॅम बिईंग रूड)>>> नो. दॅट्स जस्ट स्टुपिड. तुम्ही "मीडीयम" "मेसेज" आणि "कम्युनिकेशन" या सर्वांमध्ये घोळ घालत आहात. ईमेल, घोडेस्वार, डॉल्फिन हे मीडीयम आहेत. मेसेज नव्हेत-- जेव्हा आम्ही तुम्ही युएसमधे असून "आपच्या आतल्या गोटातली माहिती" लिहिता तेव्हा तुम्हाला माहिती मिळालेल्या मीडीयमवर नव्हे तर त्या मेसेजच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत असतो. आणि जेव्हा अल्पना किंवा मंदार तिथल्या प्रत्यक्ष "फिल्डवर" लिहत असतात तेव्हा आम्हाला ते पटतं कारण, ते तिथे प्रत्यक्ष आहेत.
प्रत्यक्ष फिल्डवर असणारेच कधीही व्यवस्थित आणि आंखोदेखा हाल (रीगार्डलेस ऑफ द परसेप्शन) देऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सोशल मीडीयालाच एकमेव "कम्युनिकेशन मीडीया" मानत आहात. दुर्दैवाने अजूनही सोशल मीडीया सर्वत्र चालत नाही. त्याला फेसटूफेस कम्युनिकेशनच लागतं. अन्यथा दिल्लीमध्ये मोहल्लासभेऐवजी गूगल हँग आऊट्स नसते का घेतले??
त्यातही तुम्ही अल्पनाचे नाव घेतलेच आहे म्हणून सांगते. राजकीय आणि सामाजिक बाबतींंमध्ये तिची समज तुमच्यापेक्षा कैकपटीने अधिक आहे. तिची मते माझ्यासाठी आपच्याच बाबतीत नव्हे तर इतरही वेळी कायम बहुमूल्य राहतील.
मिर्ची तै,सांगुन टाकाना की
मिर्ची तै,सांगुन टाकाना की तुमचा मराठीतला धागा वाचुन अके तुम्हाला माहिती पुरवतात.:P
पण जौ दे डॉ.साती म्हणतायत तस
आराम कर थोडे दिवस.
आणि मग नव्या दमाने ये.
साती <<राजकीय आणि सामाजिक
साती
<<राजकीय आणि सामाजिक बाबतींंमध्ये तिची समज तुमच्यापेक्षा कैकपटीने अधिक आहे. तिची मते माझ्यासाठी आपच्याच बाबतीत नव्हे तर इतरही वेळी कायम बहुमूल्य राहतील. >>
ठीकेना. विरोधात असूनसुद्धा अल्पनाबद्दल माझंही मत अजूनही एकदम चांगलं आहे. त्यांनी मतं मांडली आहेत, मुद्दे मांडले आहेत. दोघींना एकमेकींची मतं पटली नसली तरी मी त्यांच्यावर किंवा त्यांनी माझ्यावर उगीच आगपाखड केलेली नाही.
पण तुमच्या राजकीय आणि सामाजिकसमजाबद्दल पहिल्या दिवसापासूनच शंका आहे आणि मी हे पहिल्याच दिवशी लिहिलं आहे.
"नंदिनी,
राजकारणाविषयीच्या आपल्या दोघींच्या बेसिक मतांमध्येच जमीन-अस्मानाचा फरक आहे !
> हे तुमचं मत आहे , तर <<प्रस्थापित राजकारण आणि राजकारणी ह्यांना पाहून मला मळमळतं..अतिशयोक्ती नाही. ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे, स्वार्थासाठी पक्ष बदलत राहणे, जनतेशी खोटं बोलत राहणे. मला तरी हे समर्थनीय वाटत नाही.>> हे माझं मत आहे."><<उत्तम राजकारणी होण्यासाठी तो अत्यंत आवश्यक गुण आहे. त्यामध्ये काही चुकीचे नाही. खोटं बोलणं हा तर राजकारणाचा पाया.>> हे तुमचं मत आहे , तर
<<प्रस्थापित राजकारण आणि राजकारणी ह्यांना पाहून मला मळमळतं..अतिशयोक्ती नाही. ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे, स्वार्थासाठी पक्ष बदलत राहणे, जनतेशी खोटं बोलत राहणे. मला तरी हे समर्थनीय वाटत नाही.>> हे माझं मत आहे.
आता असं दोन ध्रुवांवर उभं राहून आपल्यात चर्चा कमी आणि कण्ठशोषच जास्त होणार असं दिसतंय. पण तरी देते उत्तरं. बघा पटतायेत का."
पहिल्या धाग्याच्या पहिल्या पानावरचा परिच्छेद आजही तितकाच व्हॅलिड आहे. त्यामुळे आपण दोघी हा विषय पूर्णपणे बाजूला ठेऊया . हम से ना हो पायेगा...
पुढच्या प्रतिसादांचा अनुल्लेख केला जाईल.
(खरंतर आत्ता लिहिलेल्या प्रतिसादातील अनेक वाक्यांचं rebuttal करायची ऊर्मी मनात दाबून ठेवावी लागत आहे. पण तेच बरं.)
हो हो सुरेख, आत्ता माझी
हो हो सुरेख, आत्ता माझी स्काईपवर मिटींग आहे अकेंसोबत. धाग्याचा अपडेट द्यायचा आहे.
पुढच्या प्रतिसादांचा अनुल्लेख
पुढच्या प्रतिसादांचा अनुल्लेख केला जाईल.>> आतदेखील माझे नाव घेऊन प्रतिसाद लिहिण्याची गरज नव्हती. मी मागेच या बीबीवर लिहिणार नाही हे सांगितलं होतं. असो!! आता वेळ खरंच नाही. चालू द्या तुमची अरविंदभक्ती.
Pages