अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार,
मी आधीही लिहिलं आहे की मी ह्याआधी कधीही राजकारणात रस घेतलेला नाही. खोटं बोलणारे, पक्ष बदलत राहणारे राजकारणी पाहिले की मला मळमळतं. माझा तिटकारा इथपर्यंत आहे की मी घरच्यांना पांढर्‍या रंगाची कारही घेऊ देत नाही, कारण ती नेते लोक वापरतात Lol आय नो, इट इज इन्सेन. पण आहे हे असं आहे.
त्यामुळे योयांच्या समित्यांबद्दल मला माहीत असणं शक्य नाही. हे रेट्रोस्पेक्टिव नॉलेज आहे.

<<मला आठवतंय तसं, माझ्या वाचनात तुमचीच पोस्ट आली होती आणि तुम्ही ह्याची स्तुती केली होती. >>

हो खरंय. सलीम नाव वापरलं त्यावरून टीका झाली होती. ह्याबद्दल्ल मी हे लिहिलं होतं.

yoya salim.png

तसं तर जेव्हा ट्वीटरवर विरोधक "YoShaziaSoSexy" ट्रेण्ड करत होते तेव्हा 'कोणाचाही वैयक्तिक अपमान करणं योग्य नाही' असं म्हणत शाझियातैंची बाजूही सांभाळली आहे आम्ही.पण आता शाझियातै त्याच लोकांमध्ये स्वराज शोधायला गेल्यात. काय करणार.

<<आक्षेप मिर्चीताई खोडून काढतील किंवा मग त्यांनाच आप चे दुर्गुण लक्षात येतील. <<< हा हा विकु, तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात. >>

सो अ‍ॅम आय. पॉझिटिव्ह राहणं चांगलं असतं. तुम्ही ही राहून बघा. Wink

<<अरे तुम्ही लोकांनाची यादवला मोठे केले ना? मग ? आणि काल शाजिया आणि बेदीलाही. आज ह्या फाउंडर मेंबरची अवस्था कुत्रे विचारणा, अशी आहे. काल तो गर्ग तुमचाच आमदार होता तेंव्हा शुद्ध, धुतल्या तांदळासारखा आणि आज मात्र बिकावू ! गंमत आहे.>>

कुत्रे विचारेना अशी अवस्था त्यांची त्यांनी करून घेतली आहे. गर्ग आमदार होता, पण मतदारसंघात लोकांसाठी कामं केली नाहीत म्हणून त्याला तिकीट दिलं नाही. हा महाभाग स्वतःच्या लीडरचे फोनकॉल्स टॅप करत बसला होता. तिकीट द्या, नाहीतर हे मिडियाला देतो म्हणून ब्लॅकमेल करत होता. हा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आधी भासला असेल तरी आता राहिला का ??

संतोष कोळी लक्षात आहे? २८ व्या वर्षी संशयास्पद पद्धतीने अपघात होऊन तिचा मृत्यू झाला. दिल्लीतल्या राशनमाफियाशी लढत होती ती. फायनल मरण्याआधी ९ वेळा तिच्यावर हल्ले झाले होते. तिच्या मृत्यूनंतर तिच्या भावाला तिकीट दिलं होतं. पण त्यानेही लोकांसाठी काम केलं नाही. उलट मिरवणूकीच्या वेळी एका महिलेशी काहीतरी छेडछाड केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता. केजरीवालांनी त्याला तिकीट दिलं नाही. ह्यावरून टीका होणार हे माहीत असूनही.
देशातील पहिली इ-रेशन कार्ड सुविधा चालू करून अकेंनी संतोष कोळीचा योग्य तो सन्मान केला आहे. मग ह्यावरून अकेंना दोष देणार की धर्मेंद्र कोळीला?
नंतर धर्मेंद्र कोळी भाजपाला जाऊन जॉइन झाला.

लोक्स, अरविंद केजरीवाल हा आपच्या तंबूचा मध्यवर्ती खांब आहे. जोपर्यंत ते काही वावगं करत नाहीत तोपर्यंत तुम्ही आपचं जनरलायझेशन करून टीका का करत आहात?
आप=केजरीवाल हे नाकारता न येणारं सत्य आहे. माझ्यासारखे असंख्य लोक केजरीवालांमुळेच आपकडे आकर्षित झाले आहेत. इन फॅक्ट विरोधकांनाही हे समीकरण मान्य आहे. नाहीतर देशभर लढण्याच्या योया-डॉमिनेटेड पीएसीने घेतलेल्या निर्णयावरूनही अकेवर टीका आणि दिल्ली सोडून कुठलीही निवडणूक सध्या लढवायची नाही ह्या अके-डॉमिनेटेड पीएसीच्या निर्णयावरूनही अकेवरच टीका हे तुम्ही केलं नसतं. पटतंय का?

<<सो व्हेअर इज डिस्ट्रीब्युशन ऑफ पावर? मग नविन काय तुम्ही आणत आहात टेबलवर? मोहल्ला सभा? - आणि कोई मुझे काम करणे नही देता हे रडणे? की पेपरवर लोकपाल दाखवून जनतेची दिशाभूल करणे? >>

केदार, एक महिन्यात दिल्लीत काय काय कामं झाली हे तुम्हाला माहीत आहे का? माहीत असेल तर तुम्ही 'अके रडत आहेत' असं का म्हणत आहात? आणि माहीत नसेल तर अज्ञानात असूनही कुठल्या तर्काने हे ठाम मत मांडत आहात?

<<खरेतर मिडीयामुळे आप मोठी झाली आणि आज आपचे लोकं मिडियाला नावे ठेवतात. फनी !>>

मिडिया ! मिडियाच्या #@$*पणाचे आणि दुटप्पीपणाचे दाखले तर द्यावे तितके कमी आहेत. मिडियाने आपला पाठिंबा फक्त काँग्रेसला हरवेपर्यंतच दिलाय. त्यानंतर मिडिया जीवावर उठला आहे अके आणि आपच्या. ह्या सध्याच्या परिस्थितीबद्दलचे ४-५ मुद्दे देते.
१. सध्या अकेला हिटलरच्या पोषाखात दाखवून 'केजरीवाल की तानाशाही' अशा सनसनीखेच चर्चा चालू आहेत. किती चॅनेल्सने सांगितलं की देशभरात निवडणूका लढवायचा निर्णय अकेचा नाही तर योयांचा होता???
२. योया गेले म्हणजे आपची राजकीय विचारधारा संपली, आता आप संपला हे ओरडून सांगणार्‍या चॅनेल्सनी योयांच्या 'समाजवादी जनपरिषद' ह्या असफल पक्षाबद्दल सांगितलं??? आजवर त्यांचे कोणते राजकीय डावपेच यशस्वी झाले आहेत ते तपशीलात सांगितलं?? पंजाबमध्ये बायपोल्स लढवायचा निर्णय त्यांचा होता हे सांगितलं?? महाराष्ट्र, हरियाणामध्ये आपने निवडणूका लढवणं म्हणजे आत्महत्या करणं हे येड्यागबाळ्यालाही स्पष्ट कळत असूनही योया हा हट्ट का करत आहेत ह्यावर चर्चा करवून आणली??
३. 'द हिंदू' मध्ये अके आणि आपबद्दल निगेटिव लेख छापून आला होता. त्यासाठी चुकीची माहिती पुरवली होती योयांनी. 'असं का' हे विचारल्यावर योया पीएसीमध्ये २-३ वेळा खोटं बोलले. म्हणून पुरावा देण्यासाठी आपकार्यकर्त्याने त्या पत्रकाराचा कॉल रेकॉर्ड केला. त्यात ती पत्रकार सांगत आहे की 'मला हे सगळे फॅक्ट्स योगेंद्र यादवांनी सांगितले' . इथे ऐका तो ऑडिओ.
नंतर जेव्हा योयांचं खोटं पकडलं गेलं तेव्हा योया आणि वागळेंनी 'पत्रकाराचं स्टिंग करणं हा किती निंदनीय प्रकार आहे आणि आपने कसा राजकारणात New low प्रकार आणला आहे' वगैरे वगैरे निषेध केला.
त्या महिला पत्रकाराला काढून टाकलं असं ऐकलंय.
हे दाखवलं का कुठल्या चॅनेलने?? का नाही दाखवलं?
४. आपच्या मिटींगमध्ये कशी मारपीट झाली ह्याचं खोटं वर्णन करणारी योयांची पत्रकार परिषद पुन्हा-पुन्हा दाखवली. केजरीवालचं भाषण दाखवलं का??? कुठल्या चॅनेलने दाखवलं?
५. कबीरने वर अग्रलेखाची लिंक दिली आहे. सखेद आश्चर्य वाटतं असे लेख वाचून. भंपक, विकाऊ ही विशेषणे तुम्ही बहुमताने निवडून आलेल्या मुख्यमंत्रासाठी वापरता??? केजरीवाल विकाऊ असल्याचे काय पुरावे आहेत त्यांच्याकडे?? आहेत तर स्पष्टपणे दाखवत का नाहीत वाचकांना?? पुरावे नसतील तर असे शब्द वापरण्यामागे कसली मनोवृत्ती आहे??
काय म्हणे, कुमार विश्वासांसारखा 'टिनपाट' माणूस....मग कोण आवडतं ह्यांना? ट्रिपल मर्डर केसमध्ये तडीपार होऊन तुरूंगाची हवा खाल्लेला 'भारदस्त' माणुस का???

चीड येत नाही का तुम्हा कोणाला खरंच ह्या प्रकाराची? नावाजलेल्या वृत्तपत्राच्या अग्रलेखांमध्ये एक तुमच्या-आमच्यासारखा एक सामान्य माणूस 'टिनपाट' म्हणून उल्लेखला जातो ते का बरं? 'प्रचलित' राजकारणात बसत नाही म्हणून?
सगळे पक्ष, सगळा मिडिया एका व्यक्तीभोवती घास घ्यायला टपलेला दिसतोय ह्यातच ती व्यक्ती कशी आहे हे कळतंय. उद्योजक-राजकारणी-प्रसारमाध्यमे ह्या जीवघेण्या नेक्ससमध्ये केजरीवाल अडकत नाहीयेत, त्यांना कवडीचीही किंमत देत नाहीये आणि एकावेळी दिल्लीतल्या अनेक अवैध धंद्यांच्या मूळावर उठलेत म्हणून खुर्चीखाली अग्नी पेटला आहे ह्या सगळ्यांच्या.

दिल्लीतून आलेलं प्रचारसाहित्य संपलेलं आहे. शिवाय एका दिवसाच्या पगारात इतकंच टंकणं शक्य आहे. त्यामुळे आजसाठी इतकंच पुरे Wink

यूरो, पॅराजंपे,
दिल्लीत चालू असलेल्या कामांबद्दल लिहायचं आहे. त्यात अवैध कॉलनीजबद्दलही लिहीन. पण हे योयाप्रकरण मध्येच उपटलंय. आज दमले. नंतर लिहीन.

मिर्चीताई - तुम्ही ह्या धाग्यावर केजरीवाल सरकार काय चांगले काम करते आहे त्याचेच डीटेल्स फक्त लिहीत जा. योया, टोया .... आणि बाकीच्या आरोपांबद्दल उत्तरे देवु नका. दुसर्‍या कुठल्याच गोष्टीबद्दल लिहू नका.
फक्त आज दिल्लीत काय चांगले घडले आणि काय निर्णय झाले ह्या बद्दल लिहा. तसेच भ्रष्टाचार्‍यांवर काय काय कारवाई झाली ते लिहा.

जर केजरीवाल सरकार खरेच काही चांगले काम करत असेल आणि तुम्ही आरोप प्रत्यारोपांच्या वादात न पडता फक्त ती चांगली कामे सांगत राहीलात तर आप चा फायदा होइल.

Mirchi, if I remember itvright, by the time the journalist sting issue came up, she had joined indian express. The first article was written by her during loksabha elections.

<<टोचा | 1 April, 2015 - 13:48 नवीन
मिर्चीताई - तुम्ही ह्या धाग्यावर केजरीवाल सरकार काय चांगले काम करते आहे त्याचेच डीटेल्स फक्त लिहीत जा. >>

सहमत!

येस्स. टोचा, मान्य आहे. एखादा दिवस ब्रेक घेऊन लिहिते आपच्या कामांबद्दल. सध्या ठरवलेल्या पेक्षा जास्त वेळ दिला जातोय इथे. लेकाचे टोमणे चालू झालेत 'आई, देशसेवा पुरे आता. चल, माइनक्राफ्ट खेळूया' Lol

भरत, हे ते आर्टिकल - ऑगस्ट २०१४ मधलं. Fading promise of the Indian spring
तेव्हा चंदर डोग्रा 'द हिंदु' मध्ये होत्या, नंतर त्यांनी इंडियन एक्स्प्रेस जॉइन केलं. योयांच्या स्टिंगनंतर 'त्यांनी पत्रकारितेच्या तत्वांचा भंग केला' म्हणून त्यांना काढून टाकलं असं ऐकण्यात आलं.

एकावेळी दिल्लीतल्या अनेक अवैध धंद्यांच्या मूळावर उठलेत म्हणून खुर्चीखाली अग्नी पेटला आहे ह्या सगळ्यांच्या.>>>>>अगदी अगदी मिर्ची तै एका वाक्यात सत्य उजागर केलत.

टोचा यांच्या संपुर्ण पोस्ट शी सहमत!

I missed the news that she had been removed from her job at her indian express. Yogendra yadav had named indian express about this issue in his Facebook posts and questioned their ethics.

एखाद्या विद्यार्थ्याला गरीब समजून मदत केली आणि तो व्यसना साठी गरीबीचे सोंग आणत होता असे झाले तर मदत्कर्त्याची जी भावना आहे तीच भावना दिल्लीकरांची असेल आणि यापुढे प्रत्येक प्रामाणिक नवविचारी/क्रांतीवादी नेत्यावरही संशयाने पाहिले जाईल हेच या सर्व प्रकरणाचे कटू पण वास्तव फलीत आहे.
केजरूके गुलाम
प्रेषक, क्लिंटन, http://misalpav.com/node/30890

" बात निकलेगी तो दूर तक जाएगी
लोगों के बैडरूम तक जाएगी,

ड्राइंगरूम तक जाएगी,
रात के अँधेरे तक जाएगी "
योयांसोबत काढून टाकलेल्या प्रोफेसर आनंदकुमारांचं चॅनेलवरच्या मुलाखतीतील वक्तव्य. अतिशय हलकी पातळी. भांडणाच्या सुरूवातीच्या काळात ह्याच आनंदकुमारांचं मी कौतुक करत होते की पक्षात फाटाफूट पडू नये म्हणून हे चांगली मध्यस्थी करत आहेत. बट हि डिझर्वस द एक्स्पल्शन. Angry
त्यांनी आदल्या दिवशी असं म्हणणं आणि दुसर्‍या दिवशी डीएनए मध्ये कुमार विश्वासांबद्दल शेंडा ना बुडखा अशी चारित्र्यहनन करणारी बातमी येणं... निव्वळ योगायोग. अशक्य.
शब्दांचे नवीन अर्थ कळत आहेत --> कमिनापंथी = नीचपणा = हलकटपणा = वरील वक्तव्य.

मंदार कात्रे,
लेख तर नेहमीप्रमाणेच आहे.
लेखातील हे वाक्य सगळ्या महाभारताचं मूळ आहे. <<या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.>> बाजू कोणाची बरोबर हे माहीत नाही, पण आम्ही केजरीवालला धोपटायचं काही सोडणार नाही... __/\__ Lol
तिथे नांदेडिअन नावाच्या आयडीने प्रतिसाद लिहिलाय. वाचून किती गारगार वाटलं म्हणून सांगू ! मराठी संस्थळावर कोणीतरी आहे माझ्यासारखं खुळं जे हिरिरीने आपची बाजू लोकांसमोर मांडतंय.
इकडे बोलवावं काय? जरा बळ मिळेल मला.
(त्यांना आपकडून ताशी किती रूपये मिळतात ते विचारायला पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त मिळत असतील तर 'आपमध्ये स्वराज नाहीये' म्हणून मी पण योया आणि अवाम गँगला जॉइन होईन म्हणते :डोमा:)

<<
मिर्चीताई - तुम्ही ह्या धाग्यावर केजरीवाल सरकार काय चांगले काम करते आहे त्याचेच डीटेल्स लिहीत जा. >> +१

मुंबईत इतका कचरा आहे
काय करताय देवेंद्र फडणिस? इतकी अकार्यक्षमता? विरोधी बाकावरून बरा आवाज येत होता सत्तेवर आल्यावर चिडीचूप? साधा जन्ममृत्यु दाखला मिळवण्यास इतका विलंब लागतो की माणसाचा पुनर्जन्म होउन परत येतो तरी मृत्युदाखला मिळत नाही. ? महाराष्ट्राच्या सरकारला यात लक्ष घालता येत नाही?
पुण्यात घरपट्टी लोक नीट भरत नाहीत यावर देवेंद्रांना कळत नाही काही उपाययोजना करता येत नाही? सगळा अनागोंदी कारभार चालू आहे. पानीपट्टी वसुली नीट होत नाही. एलबीटीचे उत्पन्न कमी आहे करचुकवेपणा वाढला आहे. पण राज्यसरकार ढिम्म बसुन आहे.
महाराष्ट्र सरकार करत काय आहे?

कबीर, तुमची गल्ली चुकली आहे का?

दिल्लीमध्ये ५ एप्रिलला, म्हणजे येत्या रविवारी तालकटोरा स्टेडियममध्ये "१०३१" ही अ‍ॅण्टि-करप्शन हेल्पलाइन पुनरूज्जीवित करण्यात येणार आहे. सर्व दिल्लीकरांना आमंत्रण आहे. Happy
गेल्या वेळच्या हेल्पलाइनमधील त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न ह्यावेळी केला गेला आहे.
१. दिल्ली एसीबी (Anti-corruption Bureau) चं बजेट ८ कोटीवरून वाढवून १६ कोटी करण्यात आलं आहे.
२. आधीच्या ३० गटांमध्ये वाढ करून ४० गट करण्यात आले आहेत. ४० इन्स्पेक्टर्स ह्या गटांचं नेतृत्व करतील.
३. ह्या गटांमध्ये काम करणार्‍या अधिकारांचं प्रशिक्षण पुरं झालं आहे.
४. इतर देशांतील भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा कसं काम करतात ह्यावर दिल्ली डायलॉग कमिशन अभ्यास करून रिपोर्ट बनवत आहे. त्यातील सूचना वापरून यंत्रणेत सुधार करता येतील.
त्यासंबंधी काही बातम्या -
१. फिरसे जारी होगी अँटिकरप्शन हेल्पलाइन
२. अँटिकरप्शन ब्रांच में अब ४० टीमें

मुख्यमंत्र्यांच्या ट्रॅपमध्ये अडकला लाचखोर सचिव
मंत्रालयातील सचिव पातळीवरील लाखचोर अधिकाऱ्याला पकडवून भ्रष्टाचार आणि लाचखोरांना प्रशासनात थारा नाही, असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. लाचखोर अवर सचिव मिलिंद कदम याला पडकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच ट्रॅप लावला होता. यामुळे अधिकारीच काय तर मंत्र्यांचंही धाबं दणाणलं आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ने कायदा विधी व न्याय खात्यातील अवर सचिव असलेल्या मिलिंद कदमला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. नोटरी पदावरील नियुक्तीसाठी उमेदवाराकडून त्याने ४ लाखांची लाच मागितली होती. संबंधित उमेदवाराने याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाचखोर मिलिंद कदमवर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले.

Well done Mr. Fadanavis. He has taken inspiration from the right person, I.e. Mr. Kejriwal. One more example of him following the Delhi aap model is the steps being taken to regularise unauthorised housing colonies. Still one more, is the maharashtra government's stand that they will not allow raising of power tariff in maharashtra. Soon all states will similarly imitate Mr kejriwal in good governance.

धक्कादायक...रेल्वेत दरवर्षी १० हजार कोटींची लूट!

देशातील सर्व रेल्वेगाड्या सदासर्वकाळ तुडुंब भरलेल्या असतानाही रेल्वेची आर्थिक स्थिती बिकट कशी?, या प्रश्नाचं उत्तर ई श्रीधरन यांनी दिलंय. रेल्वे खात्याला विविध वस्तूंच्या, सामानाच्या खरेदीत दरवर्षी तब्बल १० हजार कोटींचा चुना लावला जात असल्याचा अहवालच श्रीधरन यांनी सादर केलाय.

अरे महाराष्ट्र सरकार पण इथे आणलं तर आणखीनच सावळा गोंधळ उडेल की.
देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन. शिवसेनेने आरोप केलेल्या २५००० कोती रूपयांच्या LED बल्ब घोटाळ्यातही लक्ष घालून लोकांना अपडेट्स देण्यात यावेत ही अपेक्षा आहे.

दिल्लीत ३० मार्चपासून चघळण्यात येणार्‍या (chewable tobacco) तंबाखू उत्पादनांच्या निर्मिती, विक्री आणि साठ्यांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
Govt's toll free no report violations of ban on manufacture, storage n sale of chewable tobacco products - 1800113921 & 011-23413488

तंबाखूचे दुष्परिणाम पाहिले तर एका बाजूने हा निर्णय योग्य वाटतो. तंबाखू लॉबीच्या दबावाला दिल्ली सरकार बळी पडणार नाही. पण असं बॅन घालून लोक तंबाखू खायचं खरंच थांबवतील का?? Uhoh

 

अशोक खेमका--भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा एक प्रामाणिक ऑफिसर, रॉबर्ट वाड्राच्या घोटाळे खणून काढणारा व्हिसलब्लोअर. २२ वर्षांच्या नोकरीत ४५ वेळा बदली. काँग्रेस प्रामाणिक ऑफिसर्सना छळते असा मोदीसमर्थकांचा आरोप होता. त्यासाठी दरवेळी अशोक खेमकांचं उदाहरण दिलं जायचं.
पण.....भाजपानेही तेच केलं. अशोक खेमकांची बदली अवघ्या ४ महिन्यांत राज्य परिवहन आयुक्त ह्या महत्वाच्या जागेवरून पुरातत्व आणि संग्रहालय विभागात करण्यात आली आहे. परिवहन खात्यात चालू असणार्‍या अंदाधुंदीचं बिंग फोडण्याचं काम खेमका करत होते.
त्यांची ह्याबद्दलची प्रतिक्रिया -
"Tried hard to address corruption and bring reforms in Transport despite severe limitations and entrenched interests. Moment is truly painful"

कहा तो था की 'गंगाधर' ही 'शक्तिमान' है !! Wink
मला आठवतंय, जागत्या पहार्‍याच्या धाग्यावर मोदीसमर्थकांनी खेमकांना छळण्यावरून काँग्रेसला बोल लावले होते. त्यांची आजची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

ashok khemka.jpg

बदलीच्या ३-४ च दिवस आधी वरील गोष्ट घडणं हा केवळ योगायोग असू शकतो ??

'गिरिराज का बयान भारतीय कूटनीति पर तमाचा'
http://www.bbc.co.uk/hindi/india/2015/04/150402_giriraj_singh_sonia_rema...

मोदी 'डांटते कम हैं, इनाम ज़्यादा देते हैं'
http://www.bbc.co.uk/hindi/india/2014/12/141205_sadhvi_modi_rss_rd

कमिनापंथी सारखे मवाळ शब्द वापरणार्‍यांनी यांच्या कडे क्लास लावावा.

"हरियाणा सरकार ने खेमका को परिवहन से पुरातत्व विभाग में ट्रांसफर किया है। वो वहां भी खुदाई करके मोहन जोदड़ो के इंजिनीयरों का करप्शन ढूंढेंगे।"
"नए घर में अशोक खेमका का सामान उतारने के बाद ट्रक वाले ने पूछा-साब, रुकूं या जाऊं?"

- ट्वीटरवरच्या विनोदांवर हसावं की परिस्थितीवर रडावं तेच कळत नाही. असो.

४० दिवसांमध्ये आपसरकारने केलेली कामे/पूर्ण केलेली आश्वासने -
संदर्भ : आपची पत्रकार परिषद आणि हे अधिकृत पत्रक.

POWER:
· 50% reduction in electricity tariffs for consumption up to 400 units for domestic consumers.
· White Paper on Electricity commissioned under former DERC Chief Bijendra Singh.

WATER:

· Free lifeline water up to 20k liters per month for every household with a metered connection. This facility has been extended to group housing societies as well. Sewerage charges have been waived as well.
· Amnesty scheme announced for domestic consumers to pay their outstanding dues till March 31. Late user charges have been waived off till then.

WOMEN SAFETY:
· The Delhi government has asked the Delhi Police for a list of dark spots across the national capital.
· Exercise is on to ensure marshals in DTC buses from 6 PM to 12 midnight.
· Government is working on a plan to allow SDMs to conduct surprise checks in buses with powers to take appropriate action against eve-teasers

EDUCATION:

· 200 private schools have been issued showcause notices for charging exorbitant fees.
· Process for the installation of CCTVs in schools has begun.

TRADERS:

· In a major relief to city traders, the Delhi government has decided to allow “carry forward” of refund (input tax credit) of VAT and extend the date of filing R9 form.
· Stamp vendor license will now be online.


ADMINISTRATIVE REFORMS:

· Birth/death & other certificates to be online from April 1
· Ration cards also to be online.

ENVIRONMENT:

· 66 surprise checks were conducted at pollution control centers and 18 were found to be not working properly.
· 18 waste burning checks found waste being burnt in open places and warnings were issued.
· 170 challans of overloaded vehicles was conducted, which are a major source of air pollution.

OTHER DECISIONS :
· Licences provided for 20,800 E-rickshaws in one month as compared to around 600 till now.
· There were 1 lakh-stalled old-age pensions in the past. 30,000 cleared by the Delhi government and 20,000 will be done this month.
· Anganwadi workers used to get Rs. 750 per month as rent for their Anganwadi premises, which have now been increased to Rs. 4-5 thousand per month.
· Anganwadi material in now being purchased straight from FCI straight in place of open market, surplus money being utilized to provide fruits to children.
· Attention on Forensic labs
· Mandoli Jail to be ready till October end
· Redesigning of hospitals to increase their beds-capacity to allow poor people access to health care.
· Health department conducted surprise checks on private labs to curb overcharging of Swine Flu tests beyond a cap of Rs 4500.
· Free tests and medicines in all government hospitals for Swine Flu patients

ह्यामध्ये नसलेले, पण वाचनात आलेले अजून काही निर्णय -
१. नवीन नळजोडणीसाठी पूर्वी २०,००० रूपये लागत होते. त्याचा खर्च आता ३,३१० रूपये असेल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना अधिकृत नळजोडणी घेणं शक्य होईल.
२. संजीव चतुर्वेदींच्या नियुक्तीसाठी केंद्राकडे मागणी. प्रामाणिक अधिकार्‍यांचं दिल्लीसरकारमधील महत्व अधोरेखित करणारा निर्णय. (हरयाणा सरकारने अशोक खेमकांशी केलेल्या वागणूकीच्या एकदम विरोधी !)

ई-रेशन कार्डने फायदा होईल असं वाटतंय खरं. मोठ्या प्रमाणात असलेल्या रेशनमाफियाला आळा घालण्यासाठीचा एक उत्तम निर्णय. की त्यातही चोरवाटा काढल्या जातील? Uhoh
" As soon a user buy ration he will get SMS information about quantity and rate at which he made his purchase. This system was introduced so that shop-keeper cannot manipulate or tamper his record,"
"A user can check who all are eligible for food security and names of those who have availed the service. Users can also object if they find a non-eligible person is using the services. We have made the data available to the public. This is the most robust, transparent and user friendly portal for food security in the country,"

इंग्रजीबद्दल क्षमा करा. एवढं मराठीत टंकायचा कंटाळा आला. पुढचं रिपोर्टिंग मराठीतून करीन. Happy

अशोक खेमकाच्या ४४ बदल्यांच्या वेळेला मिर्चीताई तुम्ही कुठे होता ?

मस्त पार्टी विथ डिफ्रंस चे ढोलताशे वाजवणारी भाजपा आणि त्या तालावर नाचणारे भक्तगण मागचे आधी विचारणार Rofl

अर्थसंकल्प बनवण्याच्या प्रक्रियेत एक नवीन प्रयोग ११ विधानसभांमध्ये राबवण्यात येणार आहे. ह्या विधानसभांमध्ये अर्थसंकल्प नागरिकांच्या सल्ल्याने मोहल्लासभांमार्फत बनवला जाणार आहे.
ह्या प्रयोगाच्या यश-अपयशाबाबत मी उत्सुक. Happy

<<अशोक खेमकाच्या ४४ बदल्यांच्या वेळेला मिर्चीताई तुम्ही कुठे होता ?>>

मी राजकारणात अजिबात रस न घेणारी पॉलिटिकल निरक्षर होते तेव्हा. सुबह का भूला....

Pages