पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lasanichya patich turdal ghalun ghatt varan banavale mastach... Dhanyavad saglyana Happy

उडदाचं घुटं खूप वर्षापूर्वी केलं होतं. त्याची पाककृती हवी आहे.

गाडगं (गुलग्याचं) कधीच केलेलं नाही. पाककृती आहे पण फोटोसहीत दिल्यास सोपं जाईल.

माडगं माहीत आहे का कसं करतात ते ? प्लीज सांगा.

आणखी एक. कटाच्या आमटीचा झणझणीत (तिखटजाळ) मसाला कसा करायचा ते ही हवं आहे. आपला नेहमीचा नको.

ती हॉटेलात मिळणारी कांद्याची चटणी/ डिप पापडाबरोबर मिळते त्याची कोणाला रेसिपी माहितीये का?
मी तेलात तिखट परतून कांद्यावर घालून पाहिले पण तश्शी चव आली नाही Sad

हे गाडगं काय असतं फोटो प्लीज...कालच दिनेशदाच्या कृतीने केलं ... मस्त व सोपी कृती..

manuruchi, प्रवासात साधारण दोनेक दिवस टिकणाऱ्या भाज्या - मेथी / कोथिंबीर यांची पीठ पेरून भाजी, कारल्याचे काप वगैरे. बटाट्याच्या काचऱ्याही भरपूर तेलात खरपूस परतून घेतल्या तर दोन दिवस टिकू शकतात.

दुधीच्या सालांची परतून चटणी, छुंदा, कोरड्या चटण्या, सॉस, जॅम, मुरांबा, साखरांबा, लोणची हे माहिती असलेले, खात्रीशीर टिकाऊ तोंडी लावायचे पदार्थ.

मोड आलेली मेथी>> नाही टाकायची. नुसते मेथी दाणे टाकायचे.
पाच वाट्या तांदूळ, प्रत्येकी एक वाटी तूर,उडीद,मूग, चणा आणि मसूर डाळ या प्रमाणाला एक वाटी मेथी दाणे सध्या थंडीच्या दिवसात घालणे. एरवी पाव वाटी पुरतील.

माडगं मी लहानपणी खाल्लय......आईला पाककृती विचारते...मिळाली तर सांगेन.

माझ्या कडे ५०० ग्रॅ ओट्स आणि ५०० ग्रॅ केलोग्स आहे ,

दुधात टाकुन खा ण्या व्यतीरीक्त
अजुन काय करता ये ई ल

अमूल बटर घरी बनविण्याची कृति मी लिहीली होती.त्यासाठीचे साहित्य व कृति अशी आहे :--
साहित्यः--गायीच्या दूधापासून बनविलेले क्रीम अर्धा किलो.--हे दूध डेअरी मध्ये मिळते.], १ चमचा मीठ,२ चमचे घरी जंमवलेले दही,
एका पातेलीत क्रीम घेऊन त्यात मीठ व दह्याचे विरजण लावावे.पातेल्यावर झाकण ठेवावे.साधारण ८ तासांनी हे विरजलेले क्रीम एका चमच्याने फेटावे. क्रीम मधला पाण्याचा अंश काढुन टाकावा. फ्रीझ / माठातले साधारण एक भांडभर थंड पाणी घालुन हे क्रीम पु न्हा एकदा घुवून घ्यावे.पाणी शक्य तितके काहुन टाकावे.आता हे क्रीम स्टील किंवा टपरवेअर डब्यात ओतुन फ्रीझर मध्ये १ किंवा २ तास सेट करावे.त्यानंतर" फ्रीज" मध्येच ठेवावे.अमूल बटर तयार आहे. १] गायीचे क्रीम दूध डेअरीत मिळते.त्याचा रंग पिवळसर असतो.त्यामुळे तयार झालेल्या बटरचा रंग अगदी तंतोतंत अमूल बटर सारखाच येतो अर्धा किलो क्रीम = १ चमचा मीठ हे प्रमाण घेतल्याने योग्य चव येते.क्रीम पातळ असते.त्याला विरजण व मीठ लावल्यावर त्याचे दहीसदृश तयार होते व त्यातील पाणी वेगळे होते.हे पाणी पातेले कलते करुन हळु-हळु काढावे.व पुन्हा एकदा थंड पाणी घालुन पातेले गोलाकार फिरवून हे पाणी काढावे म्हणजे त्यातला जास्तीचा दह्याचा आंबट पणा व मीठाचा अंश निघुन जातो.अर्धा किलो क्रीम चे जवळ-जवळ ३५० ते ४०० ग्रॅम बटर तयार होते.बरेच स्वस्त पडते.
तयार बटर फ्रीज मध्येच ठेवावे.फ्रीज बाहेर टिकणार नाही..

मैदा, गहू, तांदूळ/भात वगैरे नकोय(तिला चालत नाही). पण ज्वारी, बाजरीचे लाटून काही होतं का चपातीसारखे मउ? रोज भाकरी कोण बडवणार्?(बहिणाबाईच्या जवळ जात नाही भाकरी थापण्यात)

एक पाहुणी रहाणार आहे. बरेच काही ना काही खाण्याचे बंधन आहे.

तीन आठवडा तरी असणार आहे. तिला विचारले रोज घरी काय खात होतीस? तर म्हणे कुट्टु की रोटी.
आता ह्यात बटाटे घालून का काहितरी.
रोज कुट्टु चे कोण करत बसणार? आणि रोज बेसन पोळा वगैरे कसा घालणार?(मलाच कंटाळा येइल).

तर सुचवा आणखी कुठल्या पीठाचे चपातीसारखे प्रकार होतील?

ज्वारीची भाकरी लाटून करता येते. मी करून पाहीली आहे Happy व्यवस्थित होते अगदी. थोडी जाडसर लाटायची.

बाकी थालीपिठं, धिरडी वगैरे करता येतील बहुधा. इतर पिठं चालणारेत का?

मिश्र पीठांचे डोसे. नाचणी / मूग / ओट्स वगैरेंचे डोसे बनवता येतील. भाजणीची थालिपीठे, दलिया, धिरडी.

रोज कुट्टू म्हणजे श्रींमंत पाहुणी दिसते !!! राजगिरा, शिंगाडा असल चालेल का? त्या पीठांच्या पुर्‍या/दशम्या करतात.

माझ्या कडे ५०० ग्रॅ ओट्स आणि ५०० ग्रॅ केलोग्स आहे ,
दुधात टाकुन खा ण्या व्यतीरीक्त
अजुन काय करता ये ई ल >>>>>>>>

ओट्स चा उत्तप्पा मस्त होतो. वाटीभर ओट्स ताकात सरसरीत भिजवायचे, पंधरा मिनिटांनी त्यात मीठ, मिरपूड, लांबट चिरलेल्या भाज्या (गाजर, फरसबी, ढोबळी मिरची, ब्रॉकोली, मशरूम्स, बेबी कॉर्न, कोबी काहीही चालेल.) घालून नॉनस्टीक पॅनवर जाडसर पसरायचे. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची, उलटून भाजायचे आणि गरम गरम खायचे.

Pages