पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॅक उघडलेला आहे. ओपन केल्यानन्तर मुलीने लगेच जाहिर केले खाणार नाही ते. नाशिक मधे फूड पॅन्ट्री नाहि आहे.

पिडियाशुअर रेसिपीज म्हणून गूगलवर शोधा. इथे बऱ्याच रेसिपीज् मिळतील. त्यांमध्ये तुमच्याकडील पिडियाशुअर संपून जावे आरामात.
http://pediasure.com/kid-nutrition/picky-eater-recipes

साधारण 2 किलो अख्खे कुळीथ पडून आहेत बर्‍याच दिवसांपासून.. .पण अख्ख्या कुळीथाचे काय करू? दळून आणावे लागेल का? शेंगोळे आणि पिठल्याची रेसीपी सांगा प्लीज. खूप गरम पडेल का?

आमसुले घालून कढी इतपत पातळ पिठले भातासोबत छान लागते कुळीथाचे. कुळीथाची उसळ का नाही करत? मस्त लागते. माझ्या बहिणीला किडनी स्टोन होता. ती रोज कुळीथाची उसळ खायची. कुळीथाची आमटी पण छान होते. लगेच २ किलो कुळीथ संपतील.

स्नू, या पानावर उजव्या हाताला मध्यभागी 'शोध' या शीर्षकाखाली एक पट्टी सापडेल, त्यात तुम्हाला जे पदार्थ शोधायचे आहेत त्यांची नाव लिहा आणि एंटर करा.

अख्ख्या कुळीथाचे काय करू? <<< मोड काढून आमटी, कुळिथ भिजवून डोसा, कुळीथाचे लाडू बहूतेक दिनेशदांनी कृती दिली आहे. थंडीत आता चालून जातील हे सर्व पदार्थ. गरम नाही पडणार.

अख्ख्या कुळथाचे पिठ करणे जिकीरीचे असते. ( भाजून, भरडून साले पाखडावी लागतात. ) मोड काढून उसळ करणे सोपे आहे.
पण जर पिठ करायचा खटाटोप केलाच तर पिठल्याबरोबरच, माडगं, शेंगोळे, लाडु असे अनेक प्रकार करता येतात. कुळीथ शक्तीवर्धकही आहेत. तापातून उठल्यावर अवश्य माडगे द्यावे. आता भारतात थंडीत तर अवश्य खावेत.

स्नू, पंजाब्यांमध्ये (स्पेशली पहाडी लोकांमध्ये) एक मिक्स डाळ करतात - थंडी स्पेशल त्यात अक्खे कुळिथ, अक्खे मुग इ. घालतात. मस्त असते ही डाळ थंडीत प्यायला. घरी विचार, रेसेपी मिळेल बहूतेक. नाही मिळाली तर मी देते. माझ्या साबा मस्त करतात ही डाळ.

http://www.maayboli.com/node/4861 या रेसेपीच्याच एका व्हेरिएशनमध्ये साबा आख्ख्या डाळी वापरतात, त्यात कुळिथ पण असतं. मी डिटेल, प्रमाणानुसार रेसेपी १-२ दिवसात विचारून घेईन.

धन्यवाद स्वाती२, माझ्याकडे सुद्धा कोकणातुन आणलेले कुळीथ पीठ शिल्लक आहे .आणि त्याचे पिठले करण्या पेक्षा डोशांची कल्पना आवडली. तसही डोसे हा माझ्या आवडीचा पदार्थ आहे.

सायीचे दही>> दही असेल तर विरजण लागलेलंच आहे Happy Light 1

किती दिवस साय ठेवता, कुठे राहता, साधारण सीझन कसा असतो यावर विरजणाचे तंत्र अवलंबून असतं. आमच्याकडे कधीही साय वेगळी काढली की तिला विरजण लावूनच ठेवतो. पण ताकही दोन-तीन दिवसांच्या सायीचेच करतो. जास्त ठेवत नाही. साय न विरजता नुसतीच ठेवली तर कडू होण्याची शक्यता असते.

'सही दही' हे शब्द शोधा. आपल्याकडे वेगळा बाफच आहे दह्याबद्दल. तिथे अजूनही टिपा सापडतील.

कुळीथाची उसळ किंवा डाळ करून बघते. अल्पना, अगं नैनितालला गेले होते मागच्या महिन्यात तिथे पहाडी डाळ म्हणत होते म्हणून फार हौसेने घेतले मी चांगले 2 किलो. घरी आल्यावर वैनी म्हणाली हे तर कुळीथ... पहाडात राहून थोडे हिरवेगार झालेत इतकच Proud

थन्यवाद अकु , बी ( सर्व तुम्हाला हेच म्हणतात , म्हनुन मी पन . चालेल ना ?)

घरी आल्यावर वैनी म्हणाली हे तर कुळीथ... पहाडात राहून थोडे हिरवेगार झालेत इतकच

Happy

कुळथाची पिठी माझ्या घरी आवडीची. मी गावाहुन येताना गगनगीरी कुळीथ पिठीची भरपुर पाकिटे आणते. गावचा दुकानदार आम्हाला गावात पाहिले की आधी त्याचा स्टॉक तपासतो. संपला असेल तर मागवतो Happy

कुळथाची पिठी माझ्या घरी आवडीची. >>> साधना कृती टाका ना. लहानपणी अजिबात आवडायची नाही , आता खावीशी वाटते,तर कशी करतात हे माहित नाही.

लोक्स, माझ्याकडे मेथी आहे. पीठ लावून भाजी, वरण, गोळाभाजी हे सोडून काय करता येईल? तशी जास्त नाही पण तेच ते खाऊन कंटाळा आलाय. पराठे, पुर्‍या नकोत कारण मला ते जमत नाहीत!

गरम तेलावर लसून मध्यम चिरून (हवा तर कांदा पण) परतायचा. लाल तिखट टाकायचा. किंचित जळल पाहिजे मग धुतलेली मेथी पाने टाकायची. काड्यापण टाकायला हरकत नाही (काड्या चिरून टाकायच्या). पाणी न घालता झाकण न ठेवता २-३ मिनिटं शिजवायची. मीठ टाकायचं. १० मिनिटात तयारी पासून भाजी तयार. गरमागरम भाकरी बरोबर बेस्ट.
भरपूर मेथी पाहिजे पण. चोरटी होते आणि पटकन संपते.

दाण्याचे कूट लावुन खांदेशी पद्धतीची मेथी
मुग डाळ घालुन सुकी किंवा ओली भाजी
होस्टेल फेमस मेथी बटाटा
मेथी मटर- यात बटाटा / क्रीम/ पनीर टाकु शकतात
कच्ची मेथीचा खुडा - कच्ची मेथी बारिक चिरुन घ्या, पळीत तेल गरम करा त्यात जिरे. भरपूर लसुण टाका, सुकी मिरची/ हिरवी मिरची/ तिखट/ ठेचा टाका. गरम गरम तेल मेथीवर ओता. भाकरी बरोबर छान लागते. यात नागलीचा/ नाचणीचा/ उडदाचा पापड चुरुन टाकल्यास छान लागते. मीठ घातले नाही तरी चालते. हवे असेल तर घालावे

अरे वा! बरेच पर्याय मिळालेत... दाकू वाली किंवा अमितवची कृती करीन कारण त्या जरा सोप्या वाटतायत... Wink

Pages