Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंजुडी हे आणखी देज्यावू
मंजुडी हे आणखी देज्यावू ....यावर तुझी अपेक्षित प्रतिक्रिया होती. तुला तिकडॅ उचक्या-बिचक्या लागत नव्हत्या नं?
फक्त ती चर्चा कुठे झाली होती
फक्त ती चर्चा कुठे झाली होती (पाकृ की युसुयुसां) हे आठवत नसल्याने (वय झालं बहुतेक!) मी लिंक दिली नाही
सगळ्या प्रतिसादांबद्दल
सगळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद
आता करून बघेन
प्राडी, मस्त आहे आहे तुझी सुप
प्राडी, मस्त आहे आहे तुझी सुप करण्याची पद्धत. करुन बघेन. धन्यवाद. रश्मी तुलाही आभार.
माझ्याघरी आई दाणे आधी भाजून घेते आणि आयत्यावेळी साल काढते. अशानी दाणे अधिक दिवस टिकतात आणि कुजत नाहीत.
मी जर किराणा सामान आणत असलो तर मी लाल रंगाचे दाणे शोधून आणतो. माझी पुतणी तिला जे मिळतील ते दाणे आणते. मी मात्र लाल रंगाचे आणि आकारानी छोटे असे दाणे आणतो. ह्या दाण्याची चव खूप छान लागते.
नैनितालहून मागच्या आठवड्यात
नैनितालहून मागच्या आठवड्यात पहाडी लिंबू ( गलगल म्हणतात बहुदा )घेऊन आले. आता काळात नाही आहे त्याचे काय करू. साधारण 3 लिंब आहेत सोललेल्या नारळाच्या आकाराची. 1 लिंबू आपल्या नेहमीच्या 8 लिंबांच्या बरोबरीचा आहे. चव अगदी सेम. काय करू?
जरा जास्त आंबट असतं गलगल.
जरा जास्त आंबट असतं गलगल. गलगल म्हणजे ईडलिंबू. लोणचं घालतात त्याचं. पण तिन गलगलचं लोणचं म्हणजे तसं कमीच होईल. तुला रेसेपी हवी असेल तर घरी साबांना विचारून सांगते. सासरी गलगल + हिरव्या मिरच्या असं लोणचं घालतात. खूप मस्त असतं ते.
त्याचाच अजून एक प्रकार किम्ब /खट्टा पण असतो. साइझ गलगलएवढीच पण खूप जास्त आंबट. मी किंब नावानी त्याचा एक प्रकार लिहिलाय http://www.maayboli.com/node/31544 इथे. त्यात किम्बचे फोटो पण आहेत. तुझ्याकडे असलेलं नक्की गलगल आहे की किम्ब हे एकदा चेक करून घे.
अबइ च्या शेंगाची भाजी कशी
अबइ च्या शेंगाची भाजी कशी करायची ? > वा़क काढुन व आतिल एक पातळ साल (:अओ:) काढुन ( जशी फणसाच्या गर्यांचर असते तशी) त्या वाफवुन फोडणी + दा. कुट + खोबर + गोडा मसाला + कोथिंबीर अशी भाजी होते. अर्थात ते वाक व पापुद्रा जर शेंगा जुन असतील तर.
कोवळ्या शेंगा नुसते चिरुन एका वाफेत होतात. बाकी चविला लागणारे पदार्थ आपल्या आवडीनुसार बदलावे.
अल्पना, ईडलिंबू म्हणतात होय
अल्पना, ईडलिंबू म्हणतात होय त्याला? किंब नाही आहे बहुदा. तुझ्या लिंकमध्ये जो फोटो आहे ना त्यासारखे नाही दिसत आहेत. साल थोडी बारीक आहे. गोड आंबट लोणचे बनते का ह्या ईडलिंबूचे ?
आंबटच असतं, पण किंचीत शक्कर
आंबटच असतं, पण किंचीत शक्कर घालतात आंबटपणा कमी होण्यासाठी. आपल्या लिंबाच्या आंबटगोड लोणच्यासारखं गोड नसतं. मी रात्री घरी विचारून सांगते तुला रेसेपी.
साल पातळ असेल तर मग नाही कडू पडणार. पाण्यात घालून ठेवतात गलगलला लोणचं घालायच्य आधी. त्याने कडवट होत नाही म्हणे लोणचं.
माझं खट्टे का आचार संपलंय. अगदी १- तुकडे उरलेत... पाठव बरं लोणचं घालून मला.
अल्पना, रेसीपी पाठव. करतेच
अल्पना, रेसीपी पाठव. करतेच आता आणि पाठवते तुला.
स्नू, तुझी विपु चेक कर.
स्नू, तुझी विपु चेक कर.
धन्यवाद मोनाली
धन्यवाद मोनाली
शेंगदाण्याचं पंचामृत कसं
शेंगदाण्याचं पंचामृत कसं करायचं? ते किती दिवस टिकतं?
ाविपू बघ चिऊ!
ाविपू बघ चिऊ!
Halibut ला मराठीत काय
Halibut ला मराठीत काय म्हणतात? प्लीज कुणाला माहितिय का.
प्रिंसेस, मराठी नाव माहित
प्रिंसेस, मराठी नाव माहित नाही पण मासा चवीला छान असतो.
धन्यवाद स्वाती ताई. रेसिपी
धन्यवाद स्वाती ताई. रेसिपी माहिती असेल तर प्लीज लिहा ना.
प्रिंसेस, देशी पद्धत - आलं,
प्रिंसेस,
देशी पद्धत - आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीचे वाटण + हळद + तिखट + मीठ हॅलीबटच्या तुकड्यांना लावून फॉइल मधे गुंडाळून बेक करणे किंवा तेलावर दोन पाकळ्या लसूण ठेचून त्यावर वर दिलेला मसाला लावलेल्या तुकड्या + ओल्या खोबर्याचे वाटण घालून करी/ ओले खोबरे न घालता नुसतेच लिप्ते.
सोप्पा प्रकार - थाई करी पेस्ट + नारळाचे दूध कॅन मधले
झटपट फॅन्सी प्रकार - ऑ. ऑ. +लिबाचा रस + लिबाची झेस्ट+ लसूण किसून + मिरे पूड+ ड्राईड बेसील/ इटालियन हर्ब मिक्स . तुकड्यावर मीठ भरभुरवायचे आणि वर दिलेले मॅरीनेड लावायचे ब्रशने आणि ग्रील/ब्रॉइल करायचे.
वॉव ! धन्यवाद. करुन पाहिन एक
वॉव ! धन्यवाद. करुन पाहिन एक एक प्रकार.
मी शाकाहारी आहे. तांदळाच्या
मी शाकाहारी आहे. तांदळाच्या भाकरीबरोबर कुठली भाजी, सार, आमटी, वरण, चटणी छान लागते.
वांग्याची भाजी, चवळीचे सार,
वांग्याची भाजी, चवळीचे सार, बटाट्याचा रस्सा, भेंडीची भाजी, मसूराची आमटी, चण्याची आमटी, मूगाचे कढण...
साधारणपणे कोकणात केले जातात ते पदार्थ.
ओके धन्यवाद दिनेशदा.
ओके धन्यवाद दिनेशदा.
नारळाच्या दुधातल्या किंवा
नारळाच्या दुधातल्या किंवा नारळाचे वाटण लावून केलेल्या भाज्या, वालाचे बिरडे, कुळथाचे पिठले, सोलकढी.
केळफुलाची भाजी, फणसाची भाजी.
कारल्याचे काप, वांगे-बटाटा भाजी, पेरूचे पंचामृत.
डाळवांगे, पीठ पेरून केलेल्या (परतलेल्या) भाज्या, परतून केलेल्या पालेभाज्या (चवळई, शेपू, मुळा, पालक, मेथी, माठ, कांदापात वगैरे), ताकातला चाकवत, ताकातला पालक, अळूची पातळ भाजी.
मेतकुटाचे डांगर. मुळ्याचा चटका.
कैरीचा छुंदा / चटणी / लोणचे. तक्कू.
मला नागपुरी गोळाभाताची
मला नागपुरी गोळाभाताची [वडाभात नकोय] ऑथेंटिक कृती हवी आहे.
कोणी देऊ शकेल का?
मॄण्मयी? आणखी कोणी आहे का नागपुरकर.
धन्यवाद
कधी करणारेस?
कधी करणारेस?
विपूत टाकलीय.
विपूत टाकलीय.
घरी खुप सारे pediasure ( लहान
घरी खुप सारे pediasure ( लहान मुलान्चे हेल्थ ड्रिन्क ) सधारण २ वाटि. काय करु त्याचे?
मनिषा लिमये हे बघ आवडतय का.
मनिषा लिमये हे बघ आवडतय का.
२ वाटी पिडियाशुअर? पॅक
२ वाटी पिडियाशुअर? पॅक उघडलेला नसेल तर देऊन टाका कुणाला तरी.
>>पॅक उघडलेला नसेल तर देऊन
>>पॅक उघडलेला नसेल तर देऊन टाका कुणाला तरी.>>+१
फूड पॅन्ट्रीत देऊ शकता. फॉर्म्युला, डायपर्स, पेडीयाशुअर वगैरे गोष्टींची सततच गरज असते.
Pages