Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंडरेला!
सिंडरेला! :p
धन्यावद सगळ्यांना. कुट्टुचे
धन्यावद सगळ्यांना. कुट्टुचे पदार्थ नॉर्थ मध्ये खूप करतात. माझ्या साबा कुट्टू पुरे व रसभरे आलू करतात बर्याचदा. कधीतरी खायला ठिक आहे. पण रोज तो बटाटा कालवून खाणे नको वाटते, वर तळून.
पीठाला चिकटपणा नसतो. त्यामुळी बटाटा, नाहितर काहिन काही (भोपळा,डाळ वगैरे) घालून करतात साबा.
सकाळी अर्धा तासात घरातील इतरांचा नाश्ता करून पाहुणीचा वेगळा नाश्ता कसरत आहे पण करावे लागेल. हक्काचा पोर्या पण बाहेर आहेत.
मटार पुलाव करायचा आहे..
मटार पुलाव करायचा आहे.. त्याच्याबरोबर रायता करणे सध्या थंडी असल्याने स्गक्य नाही.
एखादी व्हेज ग्रेवी करता येईल काय ?
काऊ , सायोची पनीर माखनी
काऊ , सायोची पनीर माखनी म्हणून रेसीपी आहे .झटपट आणि खात्रीशीररित्या होणारी . try करून पाहा
तेलात टोम्याटो कीस , कांदा
तेलात टोम्याटो कीस , कांदा कीस व लसुण परतले. तिखट मीठ घालुन एक मोठा उकडलेला बटाटा कुस्करुन घातला. दोन वाट्या पाणी घातले.
आणि एक वाटीभर पाण्यात दोन चमचे कॉर्न फ्लोअर घालुन तेही त्यात घातले व उकळले. मस्त ग्रेवी तयार झाली होती.
यावर्षी भारतातून परत जाताना
यावर्षी भारतातून परत जाताना वेगवेगळी पीठे करून न्यायचा विचार आहे. सोनचाफा आणि जागूच्या रेसिपिने आंबोळ्याचे पीठ करायचे ठरवले आहे. अजून काय काय नेता येईल?
झंपी, तिलाच विचारा आणि तिलाच
झंपी, तिलाच विचारा आणि तिलाच काय ते करू दया. तुम्हालाही तेव्हढाच आराम आणि बदल. (पाहुणी वयस्कर नाही हे गृहीत धरले आहे)
चिउ, थालीपीठाची भाजणी,
चिउ, थालीपीठाची भाजणी, चकलीची भाजणि, भाजलेल्या गव्हाचे पीठ (लाडु साठी),खारीक पावडर, भाजलेले बेसन किंवा मुगाचे पीठ अस आई नेहमी पॅक करून देते.
मेतकूट, सातू - नाचणी -
मेतकूट, सातू - नाचणी - राजगिरा - तांदूळ पीठे वापरत असल्यास, कुळीथ पीठ (पिठल्यासाठी), उपासाची भाजणी.
>>झंपी, तिलाच विचारा आणि
>>झंपी, तिलाच विचारा आणि तिलाच काय ते करू दया. तुम्हालाही तेव्हढाच आराम आणि बदल. (पाहुणी वयस्कर नाही हे गृहीत धरले आहे)<<
तरुणच आहे. (पाहुणी)
हो तेच करणार आहे. मी मदत करेन. एकतर अॅलर्जी असलेल्यांना चुकून काही दिले गेले तर प्रॉबलेम.
एकदा असे झालेले, जेवणं टाकून पाहुण्यांना एमर्गेन्सी गाठली.
असो. धन्यवाद सर्वांना.
Kasuri methi kashi kartat?
Kasuri methi kashi kartat? Taji methi todun walavtat ka? Uun nasale ter chalate ka. Savlit hoil ka
मनीशा ताज्या मेथीचे पाने
मनीशा ताज्या मेथीचे पाने खुडून, धुवून सावलीतच वाळवावी.
Ok thanks manju
Ok thanks manju
माझ्या माहिती प्रमाणे कसुरी
माझ्या माहिती प्रमाणे कसुरी मेथी हि राजस्थान (???) मधील एका विशिष्ट ठिकाणी येणारी मेथी वाळवून करतात. लोकल मेथी वाळवली तर ती वाळवलेली मेथी होईल कसुरी मेथी होणार नाही.
हो. आपली नेहमीची मेथीची
हो. आपली नेहमीची मेथीची पालेभाजी नसते कसुरी मेथी. ती वेगळी जात आहे मेथीची असं मलाही वाटतं.
तरला दलाल बाई नेहमीचीच मेथी सुकवायला सांगतात- http://www.tarladalal.com/glossary-dried-fenugreek-leaves-374i
मेथीचे मुठिये बनवण्यासाठी
मेथीचे मुठिये बनवण्यासाठी मेथी चिरली.जास्त झाल्याने डब्यात भरून डीपफ्रीजरमधे २ दिवस ठेवली. काल डबा उघडला, तर पाने कुरकुरीत होती.मग डाळीत घालून आमटी केली.
एका डायनिंग हॉल मधे शेवग्याचे
एका डायनिंग हॉल मधे शेवग्याचे सार होते.
(KRISHNA DINING.....KOTHRUD PUNE)
कसे करतात ?
काल दादर वरून हुरडा आणला आहे,
काल दादर वरून हुरडा आणला आहे, पण तो नुसता खाल्ल्ला तर खूपच गोड लागतो आहे. त्याबरोबर विकणार्याने सुकी चटणी दिली आहे. तो भाजूनच खायचा का? महल क्ष्मी सरस ला त्याचे थालीपीठ खाल्ले होते , ते कसे करायचे?
हो, हुरडा भाजूनच खावा. हुरडा
हो, हुरडा भाजूनच खावा. हुरडा वाटून घेऊन थालीपीठ करायचे..
हुरडा भाजून सुकवून ठेवला तर
हुरडा भाजून सुकवून ठेवला तर हवे तेव्हा दळून आणता येतो (अर्थात जास्त असेन तर). त्याचेही थालीपीठ छान होतात.
Kasuri methi kashi kartat?
Kasuri methi kashi kartat? Taji methi todun walavtat ka? Uun nasale ter chalate ka. Savlit hoil ka>>>
माझ्या साबानी सन्गितल त्याप्रमाणे :
साधी मेथी, साफ करताना प्रत्येक देठाला खाली दोन जाड पानं असतात , ती वेगळी काढायची .
स्वछ धुवून ताटात पसरावी आणि वाळवावी .
झाली कसूरी मेथी , आंम्ही घरात कधी वेगळी आणत नाही , नेहमी हीच वापरतो .
पिन्की ८० कटाच्या आमटीसाठी
पिन्की ८०
कटाच्या आमटीसाठी आभार.
काल दालच्या साठी खूप शोधाशोध केली. पण दालच्याची (व्हेज) पाकृ काही सापडली नाही. खिचडा आणि दालचा एकच का ?
नाही.खिचडा आनि दालचा वेगळ आहे
नाही.खिचडा आनि दालचा वेगळ आहे माझ्या मते तरी.
(व्हेज) दालचा मधे तुर डाळ आनि दुधी भोपळा ,तसेच आबंट्पनासाठी चुका (पालेभाजी) हे मेन पदार्थ असतात.
तर खिचडा मधे नॉन-व्हेज - मटन,सुप्/रस्सा,बाजरी/ज्वारी हे मेन पदार्थ असतात.
दालचा
दालचा ://www.maayboli.com/node/26151:
www.maayboli.com/node/26151
www.maayboli.com/node/26151
काजु करी ची रेसिपी हवी
काजु करी ची रेसिपी हवी आहे..
म्हणजे पुण्यात मिळते तशी व्हाईट ग्रेव्ही वाली गोड नव्हे..
सातारा , कराड किंवा कोल्हापुर साईड ला मिळते तशी तिखट रस्सेदार...
कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा
नाचणी ला मोड कसे काढायचे ?
नाचणी ला मोड कसे काढायचे ? प्लीज सांगा.
शिरा रवा समजुन चुकून इडली रवा
शिरा रवा समजुन चुकून इडली रवा आणला आहे, याआधी तांदुळ भिजवुनच इडल्या केल्यात तर या रव्याच्या इडल्या कशा बनवतात?
माबोवर शोधल्यावर डेफोची रवा इडली रेसिपी सापडली पण त्यात त्यांनी गव्हाचा रवा वापरला आहे, सेम रेसिपी तांदळाचा रवा वापरुन केली तर चालेल का?(कुकरमध्ये वाफवुन घेण्याची प्रक्रिया).
बर्याच जणींनी इडली पिठात शिळा भात किंवा पोहे वापरलेत तर भात/पोहे पिठात पिठ आंबवण्यास ठेवण्याआधी घालावे का इडली करण्याआधी?
किती ते प्रश्न
कृपया जमल्यास रवा इडलीची संपुर्ण पाकृ द्या
आणि हो नारळाची चटणीची ही कृती
आणि हो नारळाची चटणीची ही कृती सांगाल का? (हिरवी व तिखट इडलीसोबत खाण्यासाठी)
इडली बीबी वर आहे की
इडली बीबी वर आहे की वाचलेली.
मला लिंक आठ्वत नाहीये. इड्ली फॅन क्लब असा आहे वाटतं.
Pages